Submitted by पूनम on 8 October, 2012 - 05:41
स्वयंपाकघरातील युक्ती सांगण्यासाठी आणि सुचवण्यासाठी हा तिसरा बाफ.
नवीन प्रश्न विचारण्याआधी ह्याआधीचे दोन धागे पहायला विसरू नका :
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वत्सला, आम्ही जाड शेवयांची
वत्सला, आम्ही जाड शेवयांची घट्ट आणि किंचीत कमी गोड खीर करून त्यात सब्जा, रोझ/ केशर/ बटरस्कॉच सिरप घालून आईसक्रिम घालून फालूदा करतो. बॅम्बिनोच्या फालूदा स्पेशल अश्या रोस्टेड शेवया मिळतात.
मंजुडी, मस्त सोपी आयडीया
मंजुडी, मस्त सोपी आयडीया आहे! बॅम्बिनोच्या शेवया आणि सब्जा मिळतात इथे! रुह अफजा पण आहे!
थँक्यु!
थँक्स अरुंधती .
थँक्स अरुंधती .
कॉर्नफ्लोअर पाण्यात किंचीत
कॉर्नफ्लोअर पाण्यात किंचीत साखर घालून घट्ट्सर शिजवायचे आणि शेवयाच्या साच्याने बर्फाच्या पाण्यात त्याची शेव पाडायची. ही त्या शेवयांची मूळ कृती.
कर दिया ना
कर दिया ना फालुदा!
दिनेशदा,
आयच्यान सांगतो. कधी डाक्टरकी सोडून प्रकाशक बनायचा विचार केला ना, पैले झूट तुमचं पाककलेचं पुस्तक छापीन आन माबोसोबत प्रायोजित करून पहिलं इन्डियन विथ ग्लोबल टच पाकृचं इ-बुक विकायला ठेवीन.
कधींचं सांगतोय, नीट संकलित करून लिहा.
साला माझ्यापाशी टाईम नाय सध्या, नैतर मीच केला असता उद्योग.
मला बटाटेवडे आधी करून
मला बटाटेवडे आधी करून ठेवण्यासाठी युक्ती हवी आहे. संध्याकाळी ४ ला पाहुणे येणार असतील आणि बटाटे वडे सकाळी करुन ठेवले तर चांगले राहतील का? तळण, किचन स्वच्छता हे सारं आधीच झालं पाहिजे. मावेमधे किंवा ओव्हनमधे गरम केले तर तेलकट दिसतात. दुसरा काही उपाय??
बटाटवड्यांसाठी कुणाकडे आयडिया
बटाटवड्यांसाठी कुणाकडे आयडिया नाहीत का??
धनश्री, निर्लेप तव्यावर मंद
धनश्री, निर्लेप तव्यावर मंद गॅसवर रचून ठेवायचे आयत्या वेळेच्य दहा मिनिटे आधी...गरम होतात. आम्ही सामोसे असे गरम करतो कधी कधी...दहा बारा माणसांसाठी असेल तर जमेल ह्या पद्धतीने.
धनश्री, माझी एक मैत्रीण करुन
धनश्री, माझी एक मैत्रीण करुन ठेवलेले ब.व. अत्यंत कडथ तेलात तळुन सर्व करते. तेलाचे तापमान अजिबात कमी व्हायला नको. मी केले नाहीत पण खाल्ले आहेत. थोडे तेलकट वाटतात पण काम होते.
दिनेशदा, धन्यवाद!
इब्लिस, फालुदा किया ही नही खतम भी कर दिया!
धनश्री,एकदा ब.व. नेहमीपेक्षा
धनश्री,एकदा ब.व. नेहमीपेक्षा कमी तळुन रोळीत कागदावर काढुन ठेवायचे वर कापड झाकायचे.झाकण नको..आयत्या वेळी पुन्हा एकदा अगदी गरम तेलातुन तळायचे. किंवा नेहमीसारखे तळायचे आयत्या वेळी मावेत गरम करुन पेपर वर टिपुन सर्व करायचे ..मी दोन्ही प्रकार करते.फरक जाणवत नाही.
कॉर्नफ्लोअर पाण्यात किंचीत
कॉर्नफ्लोअर पाण्यात किंचीत साखर घालून घट्ट्सर शिजवायचे आणि शेवयाच्या साच्याने बर्फाच्या पाण्यात त्याची शेव पाडायची. ही त्या शेवयांची मूळ कृती.
>> +१. ते शक्य नसेल तर बाम्बिनोच्या शेवया (त्याही मिळत नसतील तर) शीरकुर्माच्या शेवया मिळतात, त्या दुधात शिजवून, निथळून वापरता येतील.
इसेन्स वगैरे स्ट्राँग वाटत असेल तर दुप्पट प्रमाण घेऊन बनवायचे. म्हणजे त्यांनी एक कप दूध सांगितले असेल तर दीड अथवा दोन कप वापरायचे.
धन्यवाद सुमेधा, वत्सला,
धन्यवाद सुमेधा, वत्सला, सुलेखा.
) नाहीतर सकाळी वडे करून सुलेखाच्या आयडियेने मावे मधे गरम आणि टिश्युने तेल टिपून घ्यायचे.
मला वाटतंय माझ्यासाठी २ पर्याय आहेत सगळी तयारी सकाळी करून आयत्यावेळी वडे तळायचे (आणि पसारा जितका जमेल तेवढा स्वच्छ करायचा
चलेगा....
हलव्याचे मुकूट बनवणार आहे.
हलव्याचे मुकूट बनवणार आहे. कुणी हे सांगू शकेल का की हलवे कागदावर चिकटवायला फेविस्टिक् लागेल की फेविकॉल? की अजून काही ट्रिक असते? २-३ दिवस आधीच करून ठेवलेत तर खराब होतील का? (अस्थानी प्रश्न असल्यास सांगा. इथून उडवते.)
धारा फेविस्टीक नको. फेव्हिकॉल
धारा फेविस्टीक नको. फेव्हिकॉल चालेल, इव्हन भाताच्या खळीनेही चिकटतील कदाचित. पण फेव्हिकॉल वगैरे लावलंस तर हे दागिने लहान मुलांच्या हाती लागू देऊ नकोस. ते उचकटून फेव्हिकॉल युक्त तीळगूळ खाण्याचा प्रयत्न करतील.
धारा हलव्याचे सर बांधुन घे..
धारा हलव्याचे सर बांधुन घे.. म्हणजे एक जिगेच तुकडा ओवायचा नंतर गाठ मारताना मध्ये हलवा सरकवायचा. मुले जाम मस्तीखोर असतात. त्यामुळे हलव्याचे सर बांधुन शिवले तर अजिबात हलवा पडत नाही. तसेच नंतर तो हलवा खाल्ला तरी चालतो.तसेच हलव्यावर डिझाईन करताना पण खायचे रंग वापर.
कच्ची मटण बिर्याणी करताना
कच्ची मटण बिर्याणी करताना नेहमी तासभर आधी भात करुन घेते. उद्या सकाळि सकाळीच करायची आहे. रात्री भात करुन ठेवला फ्रीजमधे तर चालेल का
इब्लिस, माझ्या फुटकळ लेखनाचे
इब्लिस, माझ्या फुटकळ लेखनाचे संकलन सोपे आहे. जे काय लिहिलेय ते इथेच आहे. ( सातीच्या शब्दात माबासं अजिबात नाहीत. ) सर्व हक्क मायबोलीकडेच आहेत.
दिनेशदा
दिनेशदा
दिनेशदा, सुलेखा आणि वर्षू नील
दिनेशदा, सुलेखा आणि वर्षू नील हे माबोवरचे माष्टर शेफ माझ्यासाठी.
मेधाको अॅडो उसमे! तिने
मेधाको अॅडो उसमे!
तिने टाकलेल्या रेस्पीज शोधून काढून करते मी कधी कधी.
त्यात बेकिंग क्वीन लाजोजी
त्यात बेकिंग क्वीन लाजोजी हव्यातच !
आणि जागू पण ! खरेच हे आता
आणि जागू पण ! खरेच हे आता मनावर घ्यायला हवे ( कुणीतरी ! )
येस्स.. जो जो मस्ट!
येस्स.. जो जो मस्ट!
मिनोतीच्या रेसिपी पण मस्त
मिनोतीच्या रेसिपी पण मस्त असायच्या! तीच्या रेसिपी मिस करते मी...
आपणच काढू एक पुस्तक आणि
आपणच काढू एक पुस्तक आणि त्याला 'मायबोलीचे स्वयंपाकी' असं नाव देऊ
असो, आता मला एक सांगा. दूधाची
असो, आता मला एक सांगा. दूधाची पिशवी फ्रिजर मध्ये ठेवली असेल आणि दगड झाली असेल तर ती थेट तशीच्या तशी मावेत ठेवून ते दूध पातळ करून घेता येते का? येत असेल तर पिशवी किती पावर ला, किती वेळ मावेत ठेवायची?
माझ्या अनुभवाने दूधाच्या ट्रे पेक्षा फ्रिजरमध्ये पिशवी ठेवली तर जास्ती दिवस टिकते. अगदी दुसर्या दिवशी तापवायचं असेल तर मी मिल्क ट्रे मध्ये ठेवते पिशवी.
प्राजक्ता, मिनोतीच्या पाककृती
प्राजक्ता, मिनोतीच्या पाककृती जरी इथे नसल्या तरी तिच्या ब्लॉगवर वाचता येतील. ही लिंक
दक्षिणा, पिशवी प्लॅस्टिकची
दक्षिणा, पिशवी प्लॅस्टिकची असल्यामुळे तशी मावेत गरम करु नयेस असं वाटतं.
सायो+१ पातेल्यात गरम पाणी
सायो+१
पातेल्यात गरम पाणी करुन त्यात सोडुन ठेवायची दगडी पिशवी ...
हम्म! ओके गॉट इट.
हम्म! ओके गॉट इट.
Pages