७-८ लांबुळक्या पांढरट हिरव्या मिरच्या (चवीला माइल्ड ते मध्यम तिखट)
ऑलिव्ह ऑइल (ऑ ऑ)
१/३ वाटी हरभर्याचे दाणे
१ छोटा टोमॅटो
१५-२० पुदिन्याची पाने
पेराएवढे आले किसून
१ मोठी लसूण पाकळी
अर्धी वाटी पातळ पोहे
१ चमचा फ्लेक्ससीडस
१ चमचा भोपळ्याच्या बिया
२ लाल सुक्या मिरच्या
चवीप्रमाणे मीठ
२ चीझ स्लाइस
१. अर्धी वाटी पातळ पोहे, १ चमचा फ्लेक्ससीडस, १ चमचा भोपळ्याच्या बिया, २ लाल सुक्या मिरच्या हे सगळे तव्यावर कोरडे भाजून घ्या.
२. जरा गार झाले की मिक्सरमधून भरड वाटून घ्या.
३. १/३ वाटी हरभर्याचे दाणे, १ छोटा टोमॅटो, १५-२० पुदिन्याची पाने, पेराएवढे आले किसून, १ मोठी लसूण पाकळी हे सगळे मिक्सरमधून भरड वाटून घ्या.
४. दोन्ही वाटणे चार थेंब ऑ ऑ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या. याच वेळेला चवीनुसार मीठ घाला. पातळ पोहे असल्याने हे पटकन आळत जातं त्यामुळे मिरच्यांचे सिडींग आधी केल्यास बरे. नाहीतर थोडे पाणी घालून सारखे करायला हरकत नाही. सारणाची कन्सिस्टन्सी हवी. खूप पातळ नको.
५. मिरच्या मध्यभागी चिरून बिया आणि शिरा काढून घ्या.
६. चीझ स्लाइसच्या अर्ध्या सेमी जाडीच्या पट्ट्या कापून घ्या.
७. या पट्ट्या प्रत्येक अर्धमिरचीत एकेक अश्या भरा
८. चीझच्या पट्टीनंतर सारण ओतप्रोत भरा.
९. बेकिंग पॅन/ डिश ला ऑ ऑ चा हात पुसून घ्या.
१०. ओव्हन १७० डि से. ला २०-२५ मिनिटे चालवा.
११. खाण्याइतपत गार झाल्यावर हादडा
अनेक गोष्टींना अनेक सब्स्टिट्यूट करता येतील. करून बघा आणि कळवा
दह्याचा बेस असलेल्या कुठल्याही चटणीबरोबर अफलातून लागेल.
हो घे की.
हो घे की.
कसल्या मस्त दिसतायत
कसल्या मस्त दिसतायत मिरच्या....
मस्त रेसिपी
वॉव ! मस्तच. आमच्या कडे फार
वॉव ! मस्तच. आमच्या कडे फार आवडतील.
नीधप,खूप्पच छान..मस्त रेसिपी
नीधप,खूप्पच छान..मस्त रेसिपी आहे.चीज स्लाइस मुळे छान चव येत असणार .भरलेले मिश्रण तर मस्त कोम्बिनेशन आहे.मिरची बरोबर दुसरीकडे ही वापरता येईल--भेंडी,तोंडली,बेबी कॉर्न ,बेबी पोटेटो
लई तोंपासु रेस्पी! >>
लई तोंपासु रेस्पी! >> +१
चीजची आयडिया मस्तच!
भेंडी येईल गं पण बाकीच्या कसं
भेंडी येईल गं पण बाकीच्या कसं भरणार? कार्व्ह करायचे का?
अहाहा!! तोंपासु दिसतायत!!
अहाहा!! तोंपासु दिसतायत!! नक्की करुन बघेन!
मिरची बरोबर दुसरीकडे ही
मिरची बरोबर दुसरीकडे ही वापरता येईल--भेंडी,तोंडली,बेबी कॉर्न ,बेबी पोटेटो
>> टोमॅटो वापरून्ही करता येइल का?
मस्त लागतील
मस्त लागतील
नी..मस्तच गं! मिरच्या
नी..मस्तच गं! मिरच्या हादडणार्यांना ट्रीटच!
वा वा!! मस्त रेसिपी. मस्त
वा वा!! मस्त रेसिपी. मस्त फोटो. चीजची आयड्या आवडली. मी पण मटार घालून करून खाऊन बघणार.
भारीच एकदम !
भारीच एकदम !
मस्त वाटतेय पाकृ. सुरेख फोटो.
मस्त वाटतेय पाकृ. सुरेख फोटो. धन्यवाद नी.
मी म्हणलं ना तसाही हा प्रयोग
मी म्हणलं ना तसाही हा प्रयोग असल्याने कुठलिही गोष्ट सिमिलर वस्तूने सब्स्टिट्युट करू शकता.
मटार हे हरभर्यांपेक्षा सहज मिळणारे आहेत त्यामुळे तेच केलं जाईल माझंही सीझन नसताना.
ही अशी व्हेरिएशन्स करून बघा आणि मला कळवा
हायला!! झक्क दिसतायत!!! फोटोज
हायला!! झक्क दिसतायत!!!
फोटोज पण मस्त!
छान कल्पक प्रकार. गोव्यामधे
छान कल्पक प्रकार.
गोव्यामधे आणखी एका प्रकारच्या मिरच्या मिळत. पोपटी रंगाच्या, टोकेरी पण जाड नाहीत. चवीला फार छान असत त्या. बहुतेक कर्नाटकातून येत होत्या. ( मुंबईत बघितल्या नाहीत ) त्याचा असा प्रकार चांगला लागेल.
भारी रेसिपि. आणि मिरचिइतकाच
भारी रेसिपि. आणि मिरचिइतकाच तडका लिखाणाला पण. ओतप्रोत भरा, अर्धमिरची वगैरे वाचून जाम मजा आलि. मी केल्याच तर हे सगळं आठवेल त्यावेळी.
नी काय इनोवेटीव्ह डिश बनवलीस.
नी काय इनोवेटीव्ह डिश बनवलीस. मस्तच.
जबरदस्त! स्टेपवाईज टाकलेली
जबरदस्त!
स्टेपवाईज टाकलेली कृती मस्तच.>>>>>>>>++++१११११११११
तोंपासु कृती आणि मस्त फोटो.
तोंपासु कृती आणि मस्त फोटो. चीजची आयडिया फारच आवडली.
फोटो आणि पाकृ दोन्ही मस्तच.
फोटो आणि पाकृ दोन्ही मस्तच.
मिरच्या हादडणार्यांना ट्रीटच!>> +१
लाळच गळायला लागलीये माझी
लाळच गळायला लागलीये माझी तर..... !!
मस्त रेसीपी.........नक्की करुन बघणार
मलाही ओले हरभरे मिळणार नाहीत.
मलाही ओले हरभरे मिळणार नाहीत. मी त्या जागी भिजवलेले ब्राऊन चणे वापरणार आहे. कसे लागते ते कळवेनच.
मस्त प्रकार वाटतोय! सारण एकदम
मस्त प्रकार वाटतोय! सारण एकदम हटके!
कार्व्ह न करता "हा मसाला "
कार्व्ह न करता "हा मसाला " वरुन टाकुन मंद आचेवर झाकणात पाणी ठेवुन भाजी शिजवायची.हि. चण्याची चव मस्त येईल
यम्मी यम्मी!
यम्मी यम्मी!
उफ उफ मिरची....एकदम तोंपासु
उफ उफ मिरची....एकदम तोंपासु फोटो टाकलेत गं आणि डिटेलवार रेसिपी. अगदी चविष्ट लागत असणार हे प्रकरण.
सुलेखा, ती वेगळीच भाजीची
सुलेखा, ती वेगळीच भाजीची रेस्पी झाली की..
मस्त होईल बहुतेक.
मस्त रेसिपि, पिक्चर सुद्धा
मस्त रेसिपि, पिक्चर सुद्धा छान दिसत आहेत.
अतिसुंदर दिसताहेत. इथुनच
अतिसुंदर दिसताहेत. इथुनच उचलुन खाय्ची सोय असती तर बरे झाले असते.. काहीतरी चमचमीत खावेसे वाटतेय (ह्या कंटाळावाण्य संध्याकाळि हाफिसात बसुन कंटाळलेय)
Pages