७-८ लांबुळक्या पांढरट हिरव्या मिरच्या (चवीला माइल्ड ते मध्यम तिखट)
ऑलिव्ह ऑइल (ऑ ऑ)
१/३ वाटी हरभर्याचे दाणे
१ छोटा टोमॅटो
१५-२० पुदिन्याची पाने
पेराएवढे आले किसून
१ मोठी लसूण पाकळी
अर्धी वाटी पातळ पोहे
१ चमचा फ्लेक्ससीडस
१ चमचा भोपळ्याच्या बिया
२ लाल सुक्या मिरच्या
चवीप्रमाणे मीठ
२ चीझ स्लाइस
१. अर्धी वाटी पातळ पोहे, १ चमचा फ्लेक्ससीडस, १ चमचा भोपळ्याच्या बिया, २ लाल सुक्या मिरच्या हे सगळे तव्यावर कोरडे भाजून घ्या.
२. जरा गार झाले की मिक्सरमधून भरड वाटून घ्या.
३. १/३ वाटी हरभर्याचे दाणे, १ छोटा टोमॅटो, १५-२० पुदिन्याची पाने, पेराएवढे आले किसून, १ मोठी लसूण पाकळी हे सगळे मिक्सरमधून भरड वाटून घ्या.
४. दोन्ही वाटणे चार थेंब ऑ ऑ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या. याच वेळेला चवीनुसार मीठ घाला. पातळ पोहे असल्याने हे पटकन आळत जातं त्यामुळे मिरच्यांचे सिडींग आधी केल्यास बरे. नाहीतर थोडे पाणी घालून सारखे करायला हरकत नाही. सारणाची कन्सिस्टन्सी हवी. खूप पातळ नको.
५. मिरच्या मध्यभागी चिरून बिया आणि शिरा काढून घ्या.
६. चीझ स्लाइसच्या अर्ध्या सेमी जाडीच्या पट्ट्या कापून घ्या.
७. या पट्ट्या प्रत्येक अर्धमिरचीत एकेक अश्या भरा
८. चीझच्या पट्टीनंतर सारण ओतप्रोत भरा.
९. बेकिंग पॅन/ डिश ला ऑ ऑ चा हात पुसून घ्या.
१०. ओव्हन १७० डि से. ला २०-२५ मिनिटे चालवा.
११. खाण्याइतपत गार झाल्यावर हादडा
अनेक गोष्टींना अनेक सब्स्टिट्यूट करता येतील. करून बघा आणि कळवा
दह्याचा बेस असलेल्या कुठल्याही चटणीबरोबर अफलातून लागेल.
मस्तय रेसिपी !!
मस्तय रेसिपी !!
यम्मी. करुन झाल्या की सांगेन
यम्मी. करुन झाल्या की सांगेन
जबरी प्रकार आणि आयड्या , नाव
जबरी प्रकार आणि आयड्या , नाव ही मस्त, करुन बघायला पाहिजे
मस्त रेसिपी! <<<खाण्याइतपत
मस्त रेसिपी!
>>> नक्कीच!
<<<खाण्याइतपत गार झाल्यावर हादडा
सही.....तोंडाला पाणी
सही.....तोंडाला पाणी सुटलं....या शनीवारी सुट्टी आहे तेव्हा करुन बघेन.....वाचता वाचता आणि पिक्स बघता बघता लाळ गळुन टेबल वर पडण्याच्या बेतात आली होती........दिसतय पण ऑसम.....:)
वॉव्..मस्त तव्यावर शॅलो
वॉव्..मस्त![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तव्यावर शॅलो फ्राय करता येईल का? तव्यावरच्या मि. जास्त खमंग लागतील असं वाटतय!
तों.पा.सु. च
तों.पा.सु. च![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तोपासु.
तोपासु.
इथे वाचुन मी प्रयोग केला. पण
इथे वाचुन मी प्रयोग केला.
पण सारण बदलुन केला,मी मिरच्यांमधे सारणासाठी दोन कप पिझ्झा चीज,एक कप वाफवलेले स्वीट कॉर्न दाणे आणि तीन सॅशे डोमिनोचे पिझ्झा सोबत आलेले हर्ब मिक्स केले.
नी च्या रेसिपीनुसार स्लाईस चीज घालुन नंतर वरिल मिश्रण भरले.
थोड्या मिरच्या मैद्याच्या घोलात डिप केल्या,त्यातल्या थोड्या ब्रेड्क्रंप मधे घोळल्या न निम्म्या ग्रिल केल्या न उरलेल्या शॅलो फ्राय केल्या.
(थोडक्यात खालील combinations बनवले
१.मैदाघोल्+ब्रेडक्रंप कवर+शॅलो फ्राय
२.मैदाघोल+ब्रेडक्रंप कवर+ग्रिल
३.मैदाघोल+शॅलो फ्राय
४.मैदाघोल+ग्रिल
५. नो कवर+शॅलो फ्राय
६.नो कवर+ग्रिल
घरात सर्वांना खुप आवडले.
मी राधा, या नव्याच रेस्पी
मी राधा, या नव्याच रेस्पी झाल्यात की तयार![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तपशीलात द्या रेस्पी.
हाय हाय मिर्ची....उफ उफ
हाय हाय मिर्ची....उफ उफ मिर्ची !!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
नी ची आठवण काढून मी आज मेक्सिकन यालापिनो मिर्च्यांवर प्रयोग केला आला आहे.
नीर्ज्या बाई धन्यवाद तुमास्नी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सारणात पोह्यांबरोबर उकडलेला बटाटा मिक्स केलाय.
चण्यां ऐवजी मी हिरवे तूर दाणे वापरले, पुदिन्या ऐवजी कोथिंबिर, थोडा बारीक कापलेला कांदा आणि
लाल मिर्च्यां ऐवजी झणझणित रेशिम् पत्ती लाल तिखट वापरले म्हणून चिमुटभर साखर आणि आमचूर घातले.
यालापिनो थोड्या जाडसर होत्या म्हणून मी ओव्हन मध्ये ३०० वर २० मिनिटे भाजल्या.![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
एकुण जे काय बनले ते एकदम तोंपासू होते..
चिंचेच्या चटणी सोबत चट्टामट्टा करुन टाकले
मस्त दिसतायत मिरच्या आणि
मस्त दिसतायत मिरच्या
आणि त्या चिंचेच्या चटणीच्या मिरच्या पण सह्हीच ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वाव्वा वाव्वा!! बर हालापिनो
वाव्वा वाव्वा!!
बर हालापिनो की यालापिनो?
खरा... अॅलापिनिह ओ
खरा... अॅलापिनिह ओ
यालापिनोच म्हणतात मेक्सिकन.
हे बघ इथे दिलाय उच्चार
डॅफो, मिरची झकास.
डॅफो, मिरची झकास.
(उच्चारावरून मला वाटले आता इथे कॉस्टच्यूम, कॉस्च्युम सुरु होणार की काय?)
आपण म्हणू तो उच्चार बरोबर .. नाही कोणाला कळला/पटला तर 'मोगामुसिया' गावात असेच म्हणतात सांगायचे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जस्ट किडींग...
Pages