निसर्गाच्या गप्पा (भाग ११)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 13 October, 2012 - 04:19

"जगात नाही मित्र मिळाले तरी सृष्टीत आहेत. आपल्या घरी नाही मिळाले तरी बाहेर आहेत. देवाने आधीच तुम्हाला मित्र दिले आहेत. हे निळे निळे अनंत आकाश. ते नेहमी तुमच्यावरच पाखर घालीले. तारे तुम्हाला रमवतील. नद्या पाणी देतील. वारा गाणे गाईल. फुले सुगंध व सौंदर्य देतील. वृक्षलतावेली तुमच्यासमोर डोलतील, नाचतील. फार दु:ख नका करू. कोणी शिव्याशाप दिले तर वाईट नका वाटुन घेऊ. या निसर्गाकडे पहा आणि आनंदी रहा.
-सानेगुरूजी (सानेगुरूजींच्या गोड गोष्टी).
जिप्सी यांच्या सौजन्याने.

निसर्गाच्या गप्पांच्या ११ व्या भागाबद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अभिनंदन आजोबा Happy

आजोबा, पणजी, खापर पणजी सगळ्यांचे हार्दिक अभिनंदन!! पेढे/बर्फी द्या बरं.....>>>>>आम्हाला आधीच मिळाली Happy :टुकटुकः

सुप्रभात मंडळी.
काल बरोब्बर ४ वाजता(म्हणजे नेहेमीपेक्षा बिफोर टाइमच.) चक्क २ जोड्या वेडे राघू आले होते. पण मी सज्ज होऊन गच्चीत जाईपर्यंत उडून गेले. (मोनाली कुठाय ती?आँ?)
४ दिवसांपूर्वी बागेची सफाई करून घेतली. आता बाग अगदी जावळ काढलेल्या मुलासारखी गोड दिसतेय. आणि गणपतीत झेंडूचे हार वाळल्यावर चुरा करून कडेला टाकले होते. त्यातली फक्त हीच व्हरायटी आली. तर सफाई झाल्यावर काय बहरलाय झेंडू!

DSCN1562.JPG

हां............तरीच ! दिनेशदा मी खाल्लीय ती बर्फी. वेगळी चव पण ओळखीची वाटली. कारण लहानपणी बागेतल्या कोहळ्याची आई बर्फी करायची आणि पेठेही.

वॉव.. मानुषी, भलताच ब्राईट कलर आहे झेंडूचा.. मस्त..

कोहळा बर्फी = संत्रा बर्फी... अरेरे.. Uhoh लोकं बिचारे नागपूर ला जाणार्‍याला आवडीने संत्रा बर्फी ऑर्डर करत असतात घेऊन यायला

हाय वर्षू सुप्रभात. अगं अचानकच फॉन्ट मोठा झालाय. त्यामुळे काहीतरी गडबड होतेय. फोटो अपलोड करताना ...अप्लोडपर्यंतच स्क्रीन दिस्तोय.सेन्ड टू टेक्स्ट पर्यंत जाताच येत नाहीये.
झेंडूच्या झाडाचेच फोटो टाकायचेत.हे फूल छोटं आहे. मॅक्रोत फोटो काढलाय.

हायला तुझ्या वेड्या राघू सारखा काँप पण काहीबाही वेडेपणा करायला लागलाय वाटतं..
वेड्या राघूचा फोटू काढण्याचा नाद सोड बाबा आता.. Proud

अगं माझा कर्सरही वेड्या राघूसारखा गणलाय. अचानकच कुठे पळतो. असो..........
परवा थोपूवर या वेड्य़ांचे फ़ोटो टाकले तर एकाने विचारले हा वेडा "रघू" कोण?
(हसणारी बाहुली!)

ओळखा पाहू हे कोण ?>>>>>>>>>>>करवंद ना? Happy (हे तरी बरोबर आहे का? :अओ:)
सौरभ, मस्त फोटो. Happy
(इथे नवीन आहात का? तर सुस्वागतम! Happy )

>>करवंद ना? >>> शोभा - अगदी बरोब्बर..... पैकीच्या पैकी मार्क्स...

सौरभ, काय सुरेख फोटो काढलाएस वेड्या राघूचा... ग्रेट, ग्रेट..

>>करवंद ना? >>> शोभा - अगदी बरोब्बर..... पैकीच्या पैकी मार्क्स...>>>>>>>>>>>>>धन्यवाद! येवढ्या आयुष्यात, पहिल्यांदाच मिळालेत. Proud (मला आता पिकलेल्या करवंदांच्या जाळी दिसायला लागल्या. Uhoh :स्मित:)

सौरभ, काय सुरेख फोटो काढलाएस वेड्या राघूचा... ग्रेट, ग्रेट..>>>>>>>>>>.कित्ती सुंदर दिसतोय ना? पिल्लूच वाटतय. Happy

दिनेश दा Lol

शोभे अभिनंदन गं बाई.. १००% मार्क्स मिळवलेस Happy

सौरभ ,अतिशय सुंदर राघू.. इतका क्लोजप .. ग्रेट वर्क

कुत्रे सोडले तर बाकि सगळ्या प्राण्या पक्ष्यांचा तोंडावळा आपल्या नजरेला एकसारखाच दिसतो. ते लोक आपला साथीदार / पिल्ले कसे लक्षात ठेवत असतील ?

काय अगदी माझ्या मनातला प्रश्न दिनेशदा!
अहो मूल नुक्तंच शाळेत जायला लागलं की युनिफॉर्ममधलं मूल .......इतक्या सगळ्या सारख्या दिस्णार्‍या पिलांत आईला सुद्धा पटकन ओळखू येत नाही........सवय होईपर्यंत! मग हे पशू पक्षी काय करत असतील?
सौरभ भारीच आहे हा वेडा राघू..........आज्जिबात वेडा नाही, शहाणा वाटतोय......हो ना वर्षू?

पेंग्विन, त्याच्या पिल्लाच्या आवाजावरुन, झेब्रे पट्ट्यांच्या रचनेवरुन आणि ऊंट वासावरुन एकमेकाना ओळखतात एवढे वाचलेय. चिमणीमधे गळ्यावरच्या रंगावरुन त्यांचा दर्जा ठरतो हेही माहित आहे. माकडात
त्यांच्या आईवरुन, ओळखतात. पण पक्ष्यांच्या बाबतीत मात्र काय असेल, कळत नाही. पक्ष्यांना गंधज्ञानही नसते फारसे.

सौरभ खुपच छान फोटो आहे राघुचा.

शशांकजी ही करवंदाची फुले माझ्या लहनपणिच्या आठवणींचा अजुन उजाळा आहे. मला ह्यांचा वास खुप आवडतो. मला वाटायच की ह्या फुलांचा गजरा करुन घालावा.

पक्ष्यांना गंधज्ञानही नसते फारसे. > मला तर अगदी उलट वाटत होतं इतके दिवस. पिकलेली फळं पक्षांना गंधावरून कळतात असं वाटल होत.

पक्ष्यांना रंग आणि किटकांना गंध जास्त कळतात. पक्ष्यांना लाल / पिवळी फळे फुले जास्त आवडतात. ( पांगारा, पळस, सावर ) किटकांना गंध तर सूक्ष्म असले तरी कळतात शिवाय रंग आपल्यापेक्षा खुपच वेगळे दिसतात.

आमच्याकडे सध्या एका गावठी कुत्रीचे बाळंतपण चालू आहे. नंतर फोटो टाकतेच. कुठूनतरी आली आणि आमच्या वाडीत पिल्ल घातली बुलबुल घालत असते तशी. आता पिल्ले मोठी होत आली आहेत. पण बाळांचे आणि बाळंतीणीचे बाळंतपणाची जबाबदारी आमच्यावरच पडली आहे.

Di_da sarva kutumbiyanche abhinandan Happy
:-)manushi Wink aahe mi. Aga tu itke mast photo kadhales ki to friends na gheun alla model mhanun.
tya don bahini great magehi vachalele tyanchyabaddal.
da burfI milali khalli va avadali kasali ka asena :-o
jagu banglyache nav badalun sutikagruh zaley ka he paha ekada Wink

मानुषी, झेंडूचा फोटो खूप मस्त आलाय. काय सुंदर रंग आहे नै! याचा ताटवा फार देखणा दिसतो.

सौरभ, वेड्या राघूचा फोटो अगदी "दाखवण्यासाठी" काढल्यासारखा आलाय !
>>>>>>> +१००००

दिनेशदा, तुम्ही म्हणता तसे चतुष्पाद प्राण्यांचे गंधज्ञान खूपच चांगले असते. त्यामुळे त्यातल्या काहींची दृष्टी (उदा. हत्ती) जरी कमजोर असली तरी ते वासावरून आपले पिल्लू ओळखू शकतात. पण पक्ष्यांना मात्र ही देणगी त्यांच्या कानात साठवली असावी. कारण ते खूपदा एकाच पिल्लाला खाऊ घालतात. जे सारखे आ वासून पुढे येते, जे सशक्त असते किंवा थोडे डॉमिनेटिंग असते त्याला जास्त खाऊ मिळतो. आणि इतर पिल्लांना बर्‍याच वेळा कमी खाऊ मिळतो. पण दूरवरून आपल्या पिल्लांचा आवाज मात्र ते व्यवस्थित ओळखू शकतात. सध्या लोकसत्ताच्या वास्तुरंग पुरवणीत श्री. उमेश वाघेलांचे लेख येताहेत त्यात पण त्यांनी असेच निरिक्षण नोंदवले आहे.
दृष्टीच्या बाबत उंचावर उडणारे पक्षी मात्र याला अपवाद! त्यांच्या लेन्सेस अफलातून बनवल्या आहेत!!
जागू, खूप दिवसांनी आलीस गं निग वर. तुझ्या गोड बाहुलीला बघायची खूप उत्सुकता आहे. तिचा खेळकरपणा वाढला असेल ना चांगलाच!
आणि पक्ष्यांपाठोपाठ आता प्राण्यांनीसुद्धा तुझ्याकडे मॅटर्निटी होम उघडलं ना..:स्मित:

इथे कोणी स्टार प्रवाह वरची आंबटगोड मालिका बघते का? त्यातली दया सौरभला म्हणाली असती, 'ए वेड्या, त्या वेड्या राघूचा फोटो किती सुंदर काढला आहेस रे!"

सौरभ, खरच! खूप अप्रतिम फोटो आलाय.

हो शांकली, घार वगैरे पक्षी, जमिनीवरची छोटीशी हालचाल नजरेने टिपू शकतात.

माहेरच्या दिवाळी अंकात, डॉ अनुराधा सोवनी यांचा, पुण्यातील त्यांच्या घराभोवतालच्या निसर्गावर मस्त लेख आहे. त्यांना लहानपणी कारली आवडत नसत. त्यांच्या आईला आवडत असत. आवारातल्या कारल्याच्या वेलाला कारलीच लागू नयेत ( आणि मग त्याची भाजी खावी लागू नये ) म्हणून त्या कारल्याच्या वेलाची सगळी फुलेच खुडून टाकत असत. आपल्या लहान भावाला पण त्यांनी तसेच शिकवले होते. आईला वाटायचे वेलाला रोग जडला म्हणून, फुले गळत असतील Happy

आमच्या घरी पण कारल्याचा वेल होता. त्याला जास्त कारली लागावीत म्हणून मी कृत्रिम परागवहन ( रंगाच्या ब्रशने ) करत असे. आमची माती आमची माणसं, मधे दाखवले होते तसे.

Pages