साहित्यः
९ अक्रोड
फेव्हीकॉल किंवा फेव्हीस्टीक
बेस साठी गोल पुठ्ठा किंवा थर्माकोल
ग्लिटर
सुरी
कृती:
चार अक्रोड अख्खेच ठेऊन पाच अक्रोड बरोबर मधून काढून घ्या. त्यातील गर सुरीने काढून वाट्या करुन घ्या. (मधला खाऊ मुलांना देऊन किंवा तुम्ही खाऊन फस्त करुन टाका :स्मित:)
पुठ्ठ्यावर किंवा थर्माकोलवर एक अख्खा अक्रोड फेव्हीकॉलने चिकटवा व त्याच्या बाजूने फुलाप्रमाणे अक्रोडच्या ५ कापलेल्या वाट्या उपड्या चिकटवून घ्या.
आता मधाल्या अक्रोडवर दोन अख्खे अक्रोड एकावर एक चिकटवून घ्या. ह्यात मी फेव्हीकॉल व फेव्हीस्टीक दोन्हीची चिकटण्यासाठी मदत घेतली.
फेव्हीकॉल सुकत आला, अक्रोड चांगले चिकटले की वरच्या अक्रोडवर आधी फेव्हीस्टीक व अजुन मजबूत राहण्यासाठी फेव्हीकॉल वापरुन वाट्या वरती तोंड करुन चिकटवाव्यात. हे जरा जिकरीचे काम असते. वाट्या चिकटवताना खाली चिकटवलेल्या वाटीच्या समांतरच वरची वाटी येऊ द्यावी.
हया वाट्या व्यवस्थीत चिकटल्या की मग ह्या वाट्यांच्या मध्यभागी एक अख्खा अक्रोड टोकदार बाजू वर येईल अशा दिशेने उभा चिकटवावा.
आता झाली समई तयार.
अशीच समईही सुंदर दिसते. पण अजुन सुशोभीत करायची असेल तर बेसला व पुर्ण समाईला थोडा थोडा फेव्हीकॉल लावून समईला गोल्डन ग्लिटर व बेसला वेगळा रंगाचा ग्लिटर चिकटवा. आयत्यावेळी वातीही ठेवू शकता. पण पेटवू नका (:हाहा:)
टिप:
ही समई मी नणंदेच्या रुखवतीत ठेवण्यासाठी अगदी लग्नाच्या आदल्या दिवशी केली. त्यामुळे घाई झाल्याने बेसला एवढे फिनिशिंग नाही देता आले. पण पुठ्ठा घेतला तर काही प्रॉब्लेम नाही. पुर्ण समई मी तयार केली व ग्लिटर माझ्या नणंदांनी लावले. अजुन काही प्रकार केले ते हळू हळू देतेच. मागे मी रुखवतीचा धागा काढला होता त्यात ह्याच्या लिंक्स टाकते. व पुर्ण रुखवतीचे फोटोही त्यात टाकते.
रुखवतीची लिंक - http://www.maayboli.com/node/39399?page=1#new
आयत्यावेळी वातीही ठेवू शकता.
आयत्यावेळी वातीही ठेवू शकता. पण पेटवू नका >>> मी नेमकं हेच विचारणार होतो. जाऊदे पुढचा मासा कुठला ?
मस्त आयडिया आहे .
मस्त
मस्त
मस्त जागू.
मस्त जागू.
सही
सही
वॉव........... जागु किती
वॉव........... जागु किती आर्टिस्टीक . ग्रेट आयडिया
खुपच सुंदर .... जागु, ख्ररचं
खुपच सुंदर .... जागु, ख्ररचं तुझे किती कौतुक करावे तेवढे कमीच आहे....:)
काय काय करत असतेस.....
आमच्या रूखवतामधे हे विकत आणलं
आमच्या रूखवतामधे हे विकत आणलं होतं मी. घरी करण्यासारखं आर्टिस्टिक कुणीच नव्हतं
जागू काय काय करतेस? मस्त!
जागू काय काय करतेस? मस्त! शीर्षक वाचून काहीच अंदाज आला नाही. इसको बोल्ते किडा ऑफ क्रिएटिविटी!
श्री पुढचा मासा आणते
श्री पुढचा मासा आणते लवकरच.
वर्षा, आरती, इंद्रा, वर्षू ताई, प्रिती, नंदीनी, मानुषी धन्यवाद.
खुपच सुंदर ..
खुपच सुंदर ..
जागू , मस्तच !
जागू , मस्तच !
Wow. Jagucha bb asun pan ithe
Wow. Jagucha bb asun pan ithe tompasu nahi lihu shakat :-(:-( te aakrod sampavales na aadhich
Pan mast ga.
जागु.. आत मेण भरून वाती
जागु.. आत मेण भरून वाती ठेवल्या तर चालेल?? त्या टी कँडल सारख्या..
वॉव, काय पण कल्पना आहे,
वॉव, काय पण कल्पना आहे, सह्हीच!
मी ते अक्खे आक्रोड ठेवले नसते
मी ते अक्खे आक्रोड ठेवले नसते गर खाऊन टरफलं परत चिकटवून घेता येतील की
जागू, मस्त दिसतेय समई.
जागू, मस्त दिसतेय समई.
तुझ्या लेकींच्या लग्नात रुखवतात काय काय असेल? असा विचार आला.
इब्लिस
मी ते अक्खे आक्रोड ठेवले
मी ते अक्खे आक्रोड ठेवले नसते. गर खाऊन टरफलं परत चिकटवून घेता येतील की. <<<
करेक्टो..
आम्ही काही वाया घालवत नाही (सपेकोब्रा!!)
छानच. मी माझ्या बहिणीच्या
छानच.
मी माझ्या बहिणीच्या लग्नात सुपार्या आणि बदामाची साले यापासून केली होती.
मी ते अक्खे आक्रोड ठेवले
मी ते अक्खे आक्रोड ठेवले नसते. गर खाऊन टरफलं परत चिकटवून घेता येतील की. >>>> एकदम बरोबरे इब्लिसचं. मीपण असंच केलं असतं.
आम्ही काही वाया घालवत नाही (सपेकोब्रा!!) >>>>> सेम फक्त कंसात पांशा ऑन खादाडखाऊ पांश ऑफ खाऊप्रेमी.
बाकी जागु समई सुरेख दिसतेय.
जागू, कित्ती सुरेख ! आणि
जागू, कित्ती सुरेख ! आणि कल्पकताही किती
फारच गोजिरी दिसतेय समई !
सारं रुखवत बघायची उत्सुकता
सारं रुखवत बघायची उत्सुकता लागलीय आता
जागू, कित्ती सुरेख ! आणि
जागू, कित्ती सुरेख ! आणि कल्पकताही किती स्मित
फारच गोजिरी दिसतेय समई ! >>>> +१००...
मस्तच दिसतेय समई. मी ते अक्खे
मस्तच दिसतेय समई.
मी ते अक्खे आक्रोड ठेवले नसते >>> ओ इब्लिसभाऊ थोडे आक्रोड नवर्याकडच्या लोकांनापण जाऊ द्यात की.
कवटी दिलीये ना. मेंदू कशाला
कवटी दिलीये ना. मेंदू कशाला हवाय?
जागु तुला शिर साष्टांग
जागु तुला शिर साष्टांग नमस्कार!!
लवकर बाकी रुखवत पण दाखव>
खुपच सुंदर ..
खुपच सुंदर ..
ग्रेटच
ग्रेटच
मस्त कल्पना!
मस्त कल्पना!
काय मस्त कल्पना आहे...... !!
काय मस्त कल्पना आहे...... !! अजून पण येऊ दे
जागू, चायनामेड बारिक
जागू, चायनामेड बारिक दिव्यांची माळ ठेव समईत एकदम इटुकले दिवे असतात. मस्त दिसतील पेटल्यावर.
बाकी आयडियेची कल्पना मस्त आहे.
Pages