साहित्यः
९ अक्रोड
फेव्हीकॉल किंवा फेव्हीस्टीक
बेस साठी गोल पुठ्ठा किंवा थर्माकोल
ग्लिटर
सुरी
कृती:
चार अक्रोड अख्खेच ठेऊन पाच अक्रोड बरोबर मधून काढून घ्या. त्यातील गर सुरीने काढून वाट्या करुन घ्या. (मधला खाऊ मुलांना देऊन किंवा तुम्ही खाऊन फस्त करुन टाका :स्मित:)
पुठ्ठ्यावर किंवा थर्माकोलवर एक अख्खा अक्रोड फेव्हीकॉलने चिकटवा व त्याच्या बाजूने फुलाप्रमाणे अक्रोडच्या ५ कापलेल्या वाट्या उपड्या चिकटवून घ्या.
आता मधाल्या अक्रोडवर दोन अख्खे अक्रोड एकावर एक चिकटवून घ्या. ह्यात मी फेव्हीकॉल व फेव्हीस्टीक दोन्हीची चिकटण्यासाठी मदत घेतली.
फेव्हीकॉल सुकत आला, अक्रोड चांगले चिकटले की वरच्या अक्रोडवर आधी फेव्हीस्टीक व अजुन मजबूत राहण्यासाठी फेव्हीकॉल वापरुन वाट्या वरती तोंड करुन चिकटवाव्यात. हे जरा जिकरीचे काम असते. वाट्या चिकटवताना खाली चिकटवलेल्या वाटीच्या समांतरच वरची वाटी येऊ द्यावी.
हया वाट्या व्यवस्थीत चिकटल्या की मग ह्या वाट्यांच्या मध्यभागी एक अख्खा अक्रोड टोकदार बाजू वर येईल अशा दिशेने उभा चिकटवावा.
आता झाली समई तयार.
अशीच समईही सुंदर दिसते. पण अजुन सुशोभीत करायची असेल तर बेसला व पुर्ण समाईला थोडा थोडा फेव्हीकॉल लावून समईला गोल्डन ग्लिटर व बेसला वेगळा रंगाचा ग्लिटर चिकटवा. आयत्यावेळी वातीही ठेवू शकता. पण पेटवू नका (:हाहा:)
टिप:
ही समई मी नणंदेच्या रुखवतीत ठेवण्यासाठी अगदी लग्नाच्या आदल्या दिवशी केली. त्यामुळे घाई झाल्याने बेसला एवढे फिनिशिंग नाही देता आले. पण पुठ्ठा घेतला तर काही प्रॉब्लेम नाही. पुर्ण समई मी तयार केली व ग्लिटर माझ्या नणंदांनी लावले. अजुन काही प्रकार केले ते हळू हळू देतेच. मागे मी रुखवतीचा धागा काढला होता त्यात ह्याच्या लिंक्स टाकते. व पुर्ण रुखवतीचे फोटोही त्यात टाकते.
रुखवतीची लिंक - http://www.maayboli.com/node/39399?page=1#new
सही!
सही!
मस्त जागुतै. किती करता वेळात
मस्त जागुतै. किती करता वेळात वेळ काढून अशी वहिनी सर्वांना मिळो.
जबरीच!!!
जबरीच!!!
अत्त्त्त्त्त्त्त्तिशय सुंदर
अत्त्त्त्त्त्त्त्तिशय सुंदर जागुताई...खुपच आवडली. ती न रंगवताच खुप गोड दिसतेय.
एक सहजच सुचवते. रंग द्यायचा असेल ना, असं रुखवतात वगैरे ठेवण्यासाठी तर मेटॅलिक कलर्स ने आधी रंगवून मग चिकटवा. कॉपर आणि सोनेरी रंगसंगती खुप उठून दिसेल.
जागू,फारच सुरेख!अक्रोडाचा असा
जागू,फारच सुरेख!अक्रोडाचा असा छान उपयोग होईल हा विचारच केला नव्हता.
श्रद्धादिनेश,मेटॅलिक रंगाची
श्रद्धादिनेश,मेटॅलिक रंगाची कल्पनाही छान.
सृष्टी, रावी, मोनाल, माधवी,
सृष्टी, रावी, मोनाल, माधवी, शोभा, निरजा, दिनेशदा, श्रूती, शशांक, मामी, सुखदा, विनया, जाई, नलिनी, जयवी, साती चिन्नु, अश्विनीमामी, रोहन, अंशा धन्यवाद.
हे मात्र खरे आहे.
इब्लिस
वर्षू ताई अग चालेल पण पेटवता नाही ना येणार. अक्रोड्ची टरफल जळतील. सातीची आयडीया चांगली आहे. दिव्याची माळ पेटवूही शकतो.
अवल अग रुखवतीचा धागा बघ त्यात टाकले आहे.
श्रद्धा धन्यवाद मला अशा सुचना हव्याच आहेत. अशीच आता मला माझ्या मैत्रीणीने करुन मागीतली आहे समई. तिला तुझ्या सल्ल्याप्रमाणे देते.
खुपच सुंदर .. सारं रुखवत
खुपच सुंदर .. सारं रुखवत बघायची उत्सुकता लागलीय आता.
मस्त कल्पना आहे. सूंदर आहे
मस्त कल्पना आहे. सूंदर आहे समई
मस्त मस्त ! जागु, भारी कल्पना
मस्त मस्त ! जागु, भारी कल्पना आहे.
इब्लिस
अनुराग, कंसराज, रुणुझुणू
अनुराग, कंसराज, रुणुझुणू धन्यवाद.
मी रुखवताची लिंक वरच्या लेखनात टाकते.
बॅटरीचे टी-लाईट छान दिसले
बॅटरीचे टी-लाईट छान दिसले अस्ते!
खरेच एकदम मस्त कल्पना
खरेच एकदम मस्त कल्पना आहे.....
खूप खूप छान
खूप खूप छान
मस्तच !!!
मस्तच !!!
जबरदस्त.. अक्रोडापासून समई
जबरदस्त.. अक्रोडापासून समई बनवता येते.. ही म्हणजे एकदम भारी आयडियाची कल्पना..
जागू, खूपच सुरेख झालीय ग
जागू, खूपच सुरेख झालीय ग समई.
खरच काय मस्त आयडियाची कल्पना आहे ही.
मस्त आहे. विजेचे दिवे लावायची
मस्त आहे. विजेचे दिवे लावायची कल्पनाही मस्त
कवटी दिलीये ना. मेंदू कशाला
कवटी दिलीये ना. मेंदू कशाला हवाय?
मस्तच! ... सगळं!!
सुंदर!
सुंदर!
मी बनवण्याचा प्रयत्न केलेला
मी बनवण्याचा प्रयत्न केलेला पण ते अक्रोठ एकमेकांना चिकटले च नाही फेविस्टिक आणि फेविकाल ने, मधले अक्रोठ जे उभे लावायचे होते
Pages