"जगात नाही मित्र मिळाले तरी सृष्टीत आहेत. आपल्या घरी नाही मिळाले तरी बाहेर आहेत. देवाने आधीच तुम्हाला मित्र दिले आहेत. हे निळे निळे अनंत आकाश. ते नेहमी तुमच्यावरच पाखर घालीले. तारे तुम्हाला रमवतील. नद्या पाणी देतील. वारा गाणे गाईल. फुले सुगंध व सौंदर्य देतील. वृक्षलतावेली तुमच्यासमोर डोलतील, नाचतील. फार दु:ख नका करू. कोणी शिव्याशाप दिले तर वाईट नका वाटुन घेऊ. या निसर्गाकडे पहा आणि आनंदी रहा.
-सानेगुरूजी (सानेगुरूजींच्या गोड गोष्टी).
जिप्सी यांच्या सौजन्याने.
निसर्गाच्या गप्पांच्या ११ व्या भागाबद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf
दिनेशदा, Common Hoopoe चा
दिनेशदा, Common Hoopoe चा फोटो मस्त आलाय.
दिनेशदा, प्रवास सुखरूप
दिनेशदा,
प्रवास सुखरूप झाला,सगळीकडची भारत भेट छान पार पडली, इ. वाचून खूप बरं वाटलं.
तर आता तुमच्या भारताच्या धावत्या भेटीचं वर्णन वाचायला उत्सुक आहो..
वर्षु,
अनुमोदन !
गटग खुप छान झालं,सगळ्यांना भेटुन आनंद झाला.
https://fbcdn-sphotos-h-a.aka
https://fbcdn-sphotos-h-a.akamaihd.net/hphotos-ak-prn1/537151_4657291401... हे बघितल्यावर " तू बैल आहेस रे अगदी" अस कुणालाही म्हणायची माझी तरी हिंमत नाही .( तो वळू आहे ते सोडा )
सुप्रभात मंडळी हा पक्षी
सुप्रभात मंडळी
हा पक्षी कोणता? चिमणी वाटत नाही.
सकाळी ६.३० वाजता आमचे लुई
सकाळी ६.३० वाजता आमचे लुई महाराज झोपाळ्यावर विश्रांती करत असतात.
मानुषी, हा ग्रे टीट असावा.
मानुषी, हा ग्रे टीट असावा. अगदी आपल्या चिमणीसारखाच त्याच आकाराचा पण राखाडी रंगाचा असतो.
लुई मस्तच!!
हं .........! धन्यवाद शांकली.
हं .........! धन्यवाद शांकली. सकाळी सूर्य उगवला की काळेभोर आणि काही खाकी रंगावर असलेले सनबर्ड्स कडुलिबावर येतात. चिवचिवाट चालतो. आणि संध्याकाळी या पक्ष्यांबरोबरच हा वरचा "ग्रे ट्रीट"हे असतओ. त्यांच्याही २/३ जोड्या असतात.
वेड्या राघूंची २/३ दिवस वाट पाहिली पण आलेच नाहीत. आधी अगदी रोज नेमाने यायचे.
वा सर्व पोस्टी मस्त. दिनेशदा
वा सर्व पोस्टी मस्त.
दिनेशदा यावेळेस कॅमेरा नेलात ना?
मानुषी, वेड्या राघूंची २/३ दिवस वाट पाहिली पण आलेच नाहीत. आधी अगदी रोज नेमाने यायचे.>>> त्याने नक्की माबो वरची तुझी कमेंट वाचली, मग जा मी नाही म्हणत गायब झाला
श्रीकांत - भारी फोटो आहेत
श्रीकांत - भारी फोटो आहेत हां, बैल असूनही बदला घेतोय म्हंजे मानलंच बुवा, खरंच बैल म्हणावं का याला - जाऊंदे गाईचा नवरा म्हणू या...
मानुषी - तो पक्षी ग्रे टिट च आहे. लुई म्हाराज झिंदाबाद...
कुंडीतल्या वेलीवर १-२ काकडी
कुंडीतल्या वेलीवर १-२ काकडी आकाराला आल्या..
सकाळी पानावर आलेला पाण्याचा थेंब टिपण्याचा केलेला प्रयत्न ..
अनिल.. कुंडीत वेल आणी वेलावर
अनिल.. कुंडीत वेल आणी वेलावर चक्क काकड्या... वॉव....
हां तिसर्या फोटोत थेंब नीट दिस्तोय..
सुप्रभात. सर्वांचे फोटो छान
सुप्रभात.
सर्वांचे फोटो छान आहेत.
जागू - लिंबाचे फूल आहे का हे
जागू - लिंबाचे फूल आहे का हे ???
बर्याच गप्पा चालल्यात
बर्याच गप्पा चालल्यात नि.ग.वर !
श्रीकांतजी, फोटो मस्त
दिनेशदा, कसा झाला प्रवास? सविस्तर वृत्तांत वाचायला खूप आवडेल , आणि हो कॅमेरा बरोबर घेऊन गेलात ना?
हो हो कॅमेरा आणलाय ना ! आता
हो हो कॅमेरा आणलाय ना ! आता युझर मॅन्यूअल वाचायला घेतलेय.
परवा, माझ्या भाचीला मुलगी झाली. मी आजोबा, माझी आई पणजी आणि माझ्या आईची काकू, खापरपणजी झाल्या. बाळबाळंतीण खुषाल. रोज रिपोर्ट मिळतोय. पहिल्याच दिवशी बाळाने पाळण्यात झोपायला नकार दिला व आजीच्या जवळ रात्र काढली. पहिल्याच दिवशी बांधलेले हात सोडवून, अंगठे चोखायला सुरवात !
परवा, माझ्या भाचीला मुलगी
परवा, माझ्या भाचीला मुलगी झाली. मी आजोबा, माझी आई पणजी आणि माझ्या आईची काकू, खापरपणजी झाल्या. बाळबाळंतीण खुषाल. रोज रिपोर्ट मिळतोय. !>>>>>>>>>>>>>आजोबा, अभिनंदन!
पणजी, आणि खापर पणजीला पण आमचे अभिनंदन पोहोचवा.
पहिल्याच दिवशी बाळाने पाळण्यात झोपायला नकार दिला व आजीच्या जवळ रात्र काढली. पहिल्याच दिवशी बांधलेले हात सोडवून, अंगठे चोखायला सुरवात >>>>>>>>>>>>>ही आहे नवीन पिढी.
ओह्हो.. आजोबा, पणजी आणी
ओह्हो.. आजोबा, पणजी आणी खापरपणजीचं मनःपूर्वक अभिनंदन..
वॉव.. नवी पिढी खरीच.. पहिल्या दिवसापासूनच स्वतःची आवडनिवड चोख कळतेय म्हंजे ग्रेट्च..
दिनेशदा, अभिनंदन तुम्हा
दिनेशदा, अभिनंदन तुम्हा सर्वांच !
त्याने नक्की माबो वरची तुझी
त्याने नक्की माबो वरची तुझी कमेंट वाचली, मग जा मी नाही म्हणत गायब झाला >>>>>>
मोनाली.......कालची माझी माबोवरची कमेंट वाचलेली विसरला गं , आला बाई शेवटी!....वेडाच ना तो! हेहेहेहे!
त्याने नक्की माबो वरची तुझी
त्याने नक्की माबो वरची तुझी कमेंट वाचली, मग जा मी नाही म्हणत गायब झाला >>>>>>
मोनाली.......कालची माझी माबोवरची कमेंट वाचलेली विसरला गं, आला बाई शेवटी!....वेडाच ना तो! हेहेहेहे!
आजोबा, पणजी, खापर पणजी
आजोबा, पणजी, खापर पणजी सगळ्यांचे हार्दिक अभिनंदन!! पेढे/बर्फी द्या बरं.....
मानुषी, शेवटी वेड्या राघूने तुला फोटो सेशन करू दिलेच हं.. बघ किती शहाणा आणि समजूतदार आहे तो!
मस्तच आहे वेडा राघू. खरे तर
मस्तच आहे वेडा राघू. खरे तर त्याला वेडा हे नाव ऊगाचच पडलेय. तो जे किटक खातो, तेच वेडेवाकडे उडतात आणि त्यामूळे त्याला तसे उडावे लागते. आणि तो किटक खाल्ला कि त्याला आपल्या पहिल्या जागीच येऊन बसायचे असते. ( आता याला वेडेपणा का म्हणायचे ?)
हो शांकली नक्की ! भाची लाडकी होतीच आता नात पण होणार !
दिनेशदा....लेकाच्या लग्नाच्या
दिनेशदा....लेकाच्या लग्नाच्या गडबडीत असल्याने तुमच्या पुणे गटगला येता आले नाही. असो....................आजोबा, पणजी, खापर पणजी सगळ्यांचे हार्दिक अभिनंदन!! पेढे/बर्फी द्या बरं.....>>>>>>शांकली +१००
दिनेशदा, आजोबा, पणजी आणी
दिनेशदा,
आजोबा, पणजी आणी खापरपणजीचं मनःपूर्वक अभिनंदन..
आजोबा,पणजी,खापरपणजी झालेली जुनी माणसे किती नशीबवान आहेत्,यातही या लोकांची तब्बेत या काळात देखील अगदी ठणठणीत दिसुन येते हे विशेष.
नवआजोबांचं आणि पणजी,
नवआजोबांचं आणि पणजी, खापरपणजींचं मनःपुर्वक अभिनंदन!!!
मानुषी, राघुचे फोटो छान आलेत
मानुषी,
राघुचे फोटो छान आलेत
वर्षु,
ही सगळ्यात मोठी झालेली काकडी (सुर्यप्रकाश भरपुर मिळाला असेल म्हणुन) बाल्कनीच्या बाहेरच्या बाजुला लागलेली होती, पुर्ण मोठी झाल्यावरच बघितली,तीही मुलांने वेल ओढली म्हणुन..
वेडा राघू मस्तच. बसल्यावर जी
वेडा राघू मस्तच. बसल्यावर जी लांब शेपटी दिसत आहे ती प्रत्यक्षात एक नसून दोन पंखांवर दोन असतात. उडताना हे स्पष्ट दिसते. पंख मिटल्यावर एकावर एक येतात आणि एकच लांब शेपटी दिसते.
ऑफिसमधे पळस फुलला आहे. एक कांचनही फुलला आहे. सुंदर दिसतात. पण वेळेआधी फुलले आहेत असे वाटते.
पंख मिटल्यावर एकावर एक येतात
पंख मिटल्यावर एकावर एक येतात आणि एकच लांब शेपटी दिसते.>>>>>>>>मधुमकरंद ........हो का...........आता पाहीन.
वर्षू धन्यवाद!
आज सकाळी आकाशवाणी , पुणे वर
आज सकाळी आकाशवाणी , पुणे वर एक सुरेख मुलाखत ऐकली. आदिती आणि अपूर्वा संचेती नावाच्या दोन कॉलेज मधल्या मुली पुण्यापासून जवळच पाच वर्षापासून स्वतः शेती करतात. त्यांनी एक मातीचे घर ही बांधले आहे. सगळं अगदी पर्यावरणपूरक. अर्थात अजून अर्थिक स्वयंपूर्ण नाही झाल्या. पण त्या दिशेने वाटचाल चालू आहे.
बघ किती शहाणा आणि समजूतदार
बघ किती शहाणा आणि समजूतदार आहे तो!>>>>>>>> शांकली --------+१००
हो रावी या मुलींची मुलाखत पेपरमधे वाचलीये. फोटोही पाहिलेत. खरं म्हणजे जाऊन पहावसं वाटतं की या मुली काय करतात ते!
Pages