हवा होता मला आराम तेव्हा काम करताना
मिळावे काम आता वाटते आराम करताना
कपाळी कोरुनी सारे प्रयत्नांची मुभा देता
मनाचा खेळ देवांनो तुम्ही मुद्दाम करता ना
मना मोक्षाप्रती जाण्यास लाखो जन्म घालवले
तरी नाकी नऊ आले तुला निष्काम करताना
लढाई हारलो प्रत्यक्ष आयुष्यासवे माझी
इथे आभासत्या मुद्यांवरी संग्राम करताना
तुला ते श्रेय द्यावे की सबूरीला स्वतःच्या मी
पुराण्या विभ्रमांनी तू नवा परिणाम करताना
उगा हंसाप्रमाणे चालुनी झुलवायची वेणी
तुला जाणीवही नसणार कत्लेआम करताना
निसर्गाची कसोटी लागली अस्तित्व जपण्याची
ऋतू येईल जो त्याला तुझा हंगाम करताना
नको भेटायला हे सांगण्या भेटायला आली
किती ती डळमळत होती स्वतःला ठाम करताना
बरा वागायला गेलो कुणी साथीस येईना
मिळाले खूप उजवे हात कृत्ये वाम करताना
पहा ना 'बेफिकिर' त्यांची कशी संख्या घटत गेली
तुला बदनाम करणारे तुला बदनाम करताना
-'बेफिकीर'!
उत्तम गझल. >> कपाळी कोरुनी
उत्तम गझल.
>> कपाळी कोरुनी सारे प्रयत्नांची मुभा देता
मनाचा खेळ देवांनो तुम्ही मुद्दाम करता ना
फार आवडला हा.
शब्दांच्या अर्थच्छटा, वजन, क्रम आणि एकूण इफेक्ट या सगळ्याचा खूप अभ्यास दिसतो तुमच्या गझलेत.
संपूर्ण गझल आवडली. निसर्गाची
संपूर्ण गझल आवडली.
निसर्गाची कसोटी लागली अस्तित्व जपण्याची
ऋतू येईल जो त्याला तुझा हंगाम करताना>>> अप्रतिम शेर!
वियदगंगेत आपण किती सहज लिहीता ही काही वारंवार उल्लेखायची गोष्ट नाही हेवा वाटायची आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हवा होता मला आराम तेव्हा काम
हवा होता मला आराम तेव्हा काम करताना
मिळावे काम आता वाटते आराम करताना......क्या बात !
कपाळी कोरुनी सारे प्रयत्नांची मुभा देता
मनाचा खेळ देवांनो तुम्ही मुद्दाम करता ना.....ह्म्न !
नको भेटायला हे सांगण्या भेटायला आली
किती ती डळमळत होती स्वतःला ठाम करताना... वा वा वा
बरा वागायला गेलो कुणी साथीस येईना
मिळाले खूप उजवे हात कृत्ये वाम करताना......सहीय!
खुप आवडले हे शेर.
अप्रतिम गझल.. सगळेच शेर
अप्रतिम गझल..
सगळेच शेर सुंदर आहेत.
..........
बेफिकीर, सुरेख रचना
बेफिकीर, सुरेख रचना आहे.
आ.न.,
-गा.पै.
तुमच्या गझल लेखाबद्द्ल
तुमच्या गझल लेखाबद्द्ल मनापासुन धन्यवाद....
श्री डॉ.कैलास गायकवाड यांनी लिंक दिल्याबद्द्ल त्यांचेही आभार
वरील सर्व शेर आवड्ले....
माबो चा शतशः: ऋणी!!
हवा होता मला आराम तेव्हा काम
हवा होता मला आराम तेव्हा काम करताना
मिळावे काम आता वाटते आराम करताना
मस्त शेर. सहज आलाय.
सुंदर...
सुंदर...
अहाहा !! क्या बात है
अहाहा !!
क्या बात है !!
बेफीजी , अप्रतिम गझल !!
उगा हंसाप्रमाणे चालुनी झुलवायची वेणी
तुला जाणीवही नसणार कत्लेआम करताना >>> वाह वाह ...
नको भेटायला हे सांगण्या भेटायला आली
किती ती डळमळत होती स्वतःला ठाम करताना>>> आह , क्या बात है ! हा शेर एकदम "क्वोटेबल" आहे ...कधी तरी नक्की क्वोट करु !!
बरा वागायला गेलो कुणी साथीस येईना
मिळाले खूप उजवे हात कृत्ये वाम करताना >>> अगदी अगदी
पहा ना 'बेफिकिर' त्यांची कशी संख्या घटत गेली
तुला बदनाम करणारे तुला बदनाम करताना >>> जियो !!
आवडली
आवडली
वाह...सही बेफि!!!
वाह...सही बेफि!!!
सुरेख! खूप आवडली गझल. कपाळी
सुरेख! खूप आवडली गझल.
कपाळी कोरुनी सारे प्रयत्नांची मुभा देता
मनाचा खेळ देवांनो तुम्ही मुद्दाम करता ना
लढाई हारलो प्रत्यक्ष आयुष्यासवे माझी
इथे आभासत्या मुद्यांवरी संग्राम करताना
निसर्गाची कसोटी लागली अस्तित्व जपण्याची
ऋतू येईल जो त्याला तुझा हंगाम करताना
नको भेटायला हे सांगण्या भेटायला आली
किती ती डळमळत होती स्वतःला ठाम करताना
बरा वागायला गेलो कुणी साथीस येईना
मिळाले खूप उजवे हात कृत्ये वाम करताना
जबरदस्त!
सगळी गझल अप्रतिम. बरा
सगळी गझल अप्रतिम.
बरा वागायला गेलो कुणी साथीस येईना
मिळाले खूप उजवे हात कृत्ये वाम करताना..............हासिल-ए-गझल.
शीर्षक वाचून, ज्ञानेश चा चिरपरिचित शेर आठवला.
मला भेटायले आले,मला भेटून जाताना
गझल आवडली !
गझल आवडली !
अप्रतीम ! खुपच
अप्रतीम ! खुपच छान
(____/\____)
मला सगळीच गझल आवडली
मला सगळीच गझल आवडली![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
>> नको भेटायला हे सांगण्या
>>![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
नको भेटायला हे सांगण्या भेटायला आली
किती ती डळमळत होती स्वतःला ठाम करताना
<<
मस्त.
नको भेटायला हे सांगण्या
नको भेटायला हे सांगण्या भेटायला आली
किती ती डळमळत होती स्वतःला ठाम करताना...
>>>
अप्रतिम
हवा होता मला आराम तेव्हा काम
हवा होता मला आराम तेव्हा काम करताना
मिळावे काम आता वाटते आराम करताना
>> इतका सहज मतला मी आजतागायत वाचला नाही.
लढाई हारलो प्रत्यक्ष आयुष्यासवे माझी
इथे आभासत्या मुद्यांवरी संग्राम करताना
>> सानी मिसरा नीट समजला नाही, क्षमस्व.
उगा हंसाप्रमाणे चालुनी झुलवायची वेणी
तुला जाणीवही नसणार कत्लेआम करताना
निसर्गाची कसोटी लागली अस्तित्व जपण्याची
ऋतू येईल जो त्याला तुझा हंगाम करताना
>> मस्स्त !
नको भेटायला हे सांगण्या भेटायला आली
किती ती डळमळत होती स्वतःला ठाम करताना
>> व्वाह !!
बरा वागायला गेलो कुणी साथीस येईना
मिळाले खूप उजवे हात कृत्ये वाम करताना
>> लै भारी !
'हमने उनको भी छुप छुप के आते देखा इन गलियों में..' आठवलं..!
पहा ना 'बेफिकिर' त्यांची कशी संख्या घटत गेली
तुला बदनाम करणारे तुला बदनाम करताना
>> 'पहा ना' अनावश्यक वाटलं. क्षमस्व.
सानी जबरदस्त !
संपूर्ण गझल अप्रतिम.....
संपूर्ण गझल अप्रतिम..... सिग्नेचर गझल, बेफी....![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
नको भेटायला हे सांगण्या
नको भेटायला हे सांगण्या भेटायला आली
किती ती डळमळत होती स्वतःला ठाम करताना...
>>
वाह!
सानी मिसरा काय असतं?![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
खुप ठिकाणी वाचलय हे
विपूत सांगितलं तरी हरकत नाही
कपाळी कोरुनी सारे प्रयत्नांची
कपाळी कोरुनी सारे प्रयत्नांची मुभा देता![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मनाचा खेळ देवांनो तुम्ही मुद्दाम करता ना> सुंदर .. फारच आवडला
हवा होता मला आराम तेव्हा काम
हवा होता मला आराम तेव्हा काम करताना
मिळावे काम आता वाटते आराम करताना
सहज सुंदर मतला..
नको भेटायला हे सांगण्या भेटायला आली
किती ती डळमळत होती स्वतःला ठाम करताना
सुरेख शेर...
एकूण गझल खूप मस्त आहे...
मना मोक्षाप्रती जाण्यास लाखो
मना मोक्षाप्रती जाण्यास लाखो जन्म घालवले
तरी नाकी नऊ आले तुला निष्काम करताना
व्वा..!
सर्वच गझल सुंदर...! व्वा..!
आवडली.
आवडली.
अतिशय सुन्दर गझल
अतिशय सुन्दर गझल
तुला ते श्रेय द्यावे की
तुला ते श्रेय द्यावे की सबूरीला स्वतःच्या मी
पुराण्या विभ्रमांनी तू नवा परिणाम करताना>> सुंदर
नको भेटायला हे सांगण्या भेटायला आली
किती ती डळमळत होती स्वतःला ठाम करताना>>> केवळ अप्रतिम
कपाळी कोरुनी सारे प्रयत्नांची मुभा देता
मनाचा खेळ देवांनो तुम्ही मुद्दाम करता ना>> अत्त्युच्च... अगदी (देवाच्या) समोर बसून बोलल्यासारखा.
आभारी आहे मित्रांनो
आभारी आहे मित्रांनो
हवा होता मला आराम तेव्हा काम
हवा होता मला आराम तेव्हा काम करताना
मिळावे काम आता वाटते आराम करताना
शेरातील चमत्कृती आवडली!
नको भेटायला हे सांगण्या भेटायला आली
किती ती डळमळत होती स्वतःला ठाम करताना
विरोधाभास छान पकडलाय!
वाह ! वाह ! संपूर्ण गझल
वाह ! वाह !
संपूर्ण गझल लाजवाब ! कत्लेआम ! !
Pages