Submitted by -शाम on 16 January, 2013 - 03:48
चष्म्यामध्ये पुर्वीइतके पाणी साचत नाही
मी गेलेल्या आयुष्याला आता वाचत नाही
बंद घरातच बडबडगाणे थकून झोपी जाते
खांद्यावरती चिमणे घेउन अंगण नाचत नाही
घुसमट होते,पाणी झरते आणि उदासी उरते
आठवणींचे पोते कोणी उगाच टाचत नाही
नात्यांचा की कर्तव्यांचा, हे ही कळते कोठे
दोर नेमका कुठला काचे कुठला काचत नाही
कातर होवो सांज कितीही वा बरसूदे श्रावण
निकरट झाले की मग काही काही जाचत नाही
निंदेनेही कोपेना 'तो' भक्तीने पावेना
'शाम' वाटते आता काही माणुस वाचत नाही
..................................................................शाम
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नात्यांचा की कर्तव्यांचा, हे
नात्यांचा की कर्तव्यांचा, हे ही कळते कोठे
दोर नेमका कुठला काचे कुठला काचत नाही<<< मस्त
गझलही आवडली
बंद घरातच बडबडगाणे थकून झोपी
बंद घरातच बडबडगाणे थकून झोपी जाते
खांद्यावरती चिमणे घेउन अंगण नाचत नाही>> खूप आवडला... खूप खूप आवडला
नात्यांचा की कर्तव्यांचा, हे ही कळते कोठे
दोर नेमका कुठला काचे कुठला काचत नाही>> खरंय...!!
जबरी, अप्रतिम, भन्नाट,
जबरी, अप्रतिम, भन्नाट, सर्वांगसुंदर..........
शेवटचा शेर आणि पुर्ण गझल
शेवटचा शेर आणि पुर्ण गझल छान!!
गझल आवडली अमोल केळकर
गझल आवडली
अमोल केळकर
चष्म्यामध्ये पुर्वीइतके पाणी
चष्म्यामध्ये पुर्वीइतके पाणी साचत नाही
मी गेलेल्या आयुष्याला आता वाचत नाही.......वा वा
नात्यांचा की कर्तव्यांचा, हे ही कळते कोठे
दोर नेमका कुठला काचे कुठला काचत नाही......क्या बात ! क्या बात!
कातर होवो सांज कितीही वा बरसूदे श्रावण
निकरट झाले की मग काही काही जाचत नाही...सहीय !
नेहमीप्रमाणेच आवडली गझल .
धन्यवाद!
छान.......
छान.......
नात्यांचा की कर्तव्यांचा, हे
नात्यांचा की कर्तव्यांचा, हे ही कळते कोठे
दोर नेमका कुठला काचे कुठला काचत नाही
कातर होवो सांज कितीही वा बरसूदे श्रावण
निकरट झाले की मग काही काही जाचत नाही
मस्त शेर आहेत दोन्ही.
गझल छान. पहिले तीन शेर जरा संदीग्ध झालेयत.
सुंदर ! खूप आवडली. (तुमचं नाव
सुंदर ! खूप आवडली.
(तुमचं नाव वाचून उघडली, आणि छान पद्य वाचल्याचं समाधान मिळालं
बंद घरातच बडबडगाणे थकून झोपी जाते
खांद्यावरती चिमणे घेउन अंगण नाचत नाही>>
कातर होवो सांज कितीही वा बरसूदे श्रावण
निकरट झाले की मग काही काही जाचत नाही >>
हे विशेष आवडलं.
वाहवा... नितांतसुंदर गझल.
वाहवा...
नितांतसुंदर गझल. सगळे शेर आवडले.
बंद घरातच बडबडगाणे थकून झोपी
बंद घरातच बडबडगाणे थकून झोपी जाते
खांद्यावरती चिमणे घेउन अंगण नाचत नाही>>> अप्रतिम सुंदर!!!
नितांत सुंदर काव्य!
शब्द्न् शब्द छान!!!
गझल आवडली. नात्यांचा की
गझल आवडली.
नात्यांचा की कर्तव्यांचा, हे ही कळते कोठे
दोर नेमका कुठला काचे कुठला काचत नाही
चष्म्यामध्ये पुर्वीइतके पाणी
चष्म्यामध्ये पुर्वीइतके पाणी साचत नाही
मी गेलेल्या आयुष्याला आता वाचत नाही >> क्या बात्!!!
सुंदर गझल!
छानै...
छानै...
सर्व शेर आवडले
सर्व शेर आवडले
__/\__ ! ! ! ! ! !
__/\__
! ! ! ! ! !
खूप खूप धन्यवाद दोस्तांनो
खूप खूप धन्यवाद दोस्तांनो
छानच...
छानच...
शाम _________________________
शाम
____________________________/\________________________
अप्रतिम रे.
संपूर्ण सुंदर गझल. >>निकरट
संपूर्ण सुंदर गझल.
>>निकरट झाले की मग काही काही जाचत नाही >>
निबरट म्हणायचे होते का ?
अप्रतिम... खूपच सुन्दर
अप्रतिम... खूपच सुन्दर
मला गझलेतलं काहीच कळत नाही.
मला गझलेतलं काहीच कळत नाही. तरीपण गझल एक कविता म्हणून आवडली. जो आशय पोहोचवायचा आहे तो पोहोचतोय. ही गझल तबियत उत्पन्न करणारी आहे. (हे मी बरोबर बोललो का?)
-गा.पै.
चश्मा, अंगण आणि दोर हे शेर
चश्मा, अंगण आणि दोर हे शेर फार आवडले!
सुरेख गझल.. मतला आणि चौथा
सुरेख गझल..
मतला आणि चौथा पाचवा शेर जबरी झाले आहेत...
शुभेच्छा
वा...........जबरी !! मतला
वा...........जबरी !!
मतला एकदम भारी !!
पूर्ण गझलच प्रचंड आवडेश
बंद घरातच बडबडगाणे थकून झोपी
बंद घरातच बडबडगाणे थकून झोपी जाते
खांद्यावरती चिमणे घेउन अंगण नाचत नाही
व्वा..!
सुंदर गझल...