मी गेलेल्या आयुष्याला आता वाचत नाही

Submitted by -शाम on 16 January, 2013 - 03:48

चष्म्यामध्ये पुर्वीइतके पाणी साचत नाही
मी गेलेल्या आयुष्याला आता वाचत नाही

बंद घरातच बडबडगाणे थकून झोपी जाते
खांद्यावरती चिमणे घेउन अंगण नाचत नाही

घुसमट होते,पाणी झरते आणि उदासी उरते
आठवणींचे पोते कोणी उगाच टाचत नाही

नात्यांचा की कर्तव्यांचा, हे ही कळते कोठे
दोर नेमका कुठला काचे कुठला काचत नाही

कातर होवो सांज कितीही वा बरसूदे श्रावण
निकरट झाले की मग काही काही जाचत नाही

निंदेनेही कोपेना 'तो' भक्तीने पावेना
'शाम' वाटते आता काही माणुस वाचत नाही

..................................................................शाम

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बंद घरातच बडबडगाणे थकून झोपी जाते
खांद्यावरती चिमणे घेउन अंगण नाचत नाही>> खूप आवडला... खूप खूप आवडला

नात्यांचा की कर्तव्यांचा, हे ही कळते कोठे
दोर नेमका कुठला काचे कुठला काचत नाही>> खरंय...!!

चष्म्यामध्ये पुर्वीइतके पाणी साचत नाही
मी गेलेल्या आयुष्याला आता वाचत नाही.......वा वा

नात्यांचा की कर्तव्यांचा, हे ही कळते कोठे
दोर नेमका कुठला काचे कुठला काचत नाही......क्या बात ! क्या बात!

कातर होवो सांज कितीही वा बरसूदे श्रावण
निकरट झाले की मग काही काही जाचत नाही...सहीय !

नेहमीप्रमाणेच आवडली गझल . Happy

धन्यवाद!

नात्यांचा की कर्तव्यांचा, हे ही कळते कोठे
दोर नेमका कुठला काचे कुठला काचत नाही

कातर होवो सांज कितीही वा बरसूदे श्रावण
निकरट झाले की मग काही काही जाचत नाही

मस्त शेर आहेत दोन्ही.

गझल छान. पहिले तीन शेर जरा संदीग्ध झालेयत.

सुंदर ! खूप आवडली.
(तुमचं नाव वाचून उघडली, आणि छान पद्य वाचल्याचं समाधान मिळालं Happy

बंद घरातच बडबडगाणे थकून झोपी जाते
खांद्यावरती चिमणे घेउन अंगण नाचत नाही>>
कातर होवो सांज कितीही वा बरसूदे श्रावण
निकरट झाले की मग काही काही जाचत नाही >>

हे विशेष आवडलं.

बंद घरातच बडबडगाणे थकून झोपी जाते
खांद्यावरती चिमणे घेउन अंगण नाचत नाही>>> अप्रतिम सुंदर!!!

नितांत सुंदर काव्य!
शब्द्न् शब्द छान!!!

गझल आवडली.

नात्यांचा की कर्तव्यांचा, हे ही कळते कोठे
दोर नेमका कुठला काचे कुठला काचत नाही

छानै...

मला गझलेतलं काहीच कळत नाही. तरीपण गझल एक कविता म्हणून आवडली. जो आशय पोहोचवायचा आहे तो पोहोचतोय. ही गझल तबियत उत्पन्न करणारी आहे. (हे मी बरोबर बोललो का?)
-गा.पै.

वा...........जबरी !!
मतला एकदम भारी !!
पूर्ण गझलच प्रचंड आवडेश Happy