Submitted by धनश्री on 18 January, 2013 - 14:36
इब्लिस यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे हा गप्पांचा धागा काढत आहे. पहिला किस्सा माझ्या मावसभावाचा. त्याने ५ मित्रांबरोबर पैजलावून ४८ पाणीपुर्या खाल्ल्या होत्या. जिंकला नाही आणि पोटाला पण काही झालं नाही त्याला. त्या भैय्याकडच्या पुर्याच संपल्या नाहीतर नक्की जिंकला असता.
अजून किस्सा एका मैत्रिणीच्या लग्नातला. जिलब्या खाण्याची पैज आणि खरंच तिच्या एका भावाने अशा काहीतरी ३० एक जिलब्या हाणल्या होत्या. जिलबी एका घासात आणि मग अर्धी वाटी मठ्ठा जेवणानंतर गुपचूपपणे जाऊन ब्यॉक पण करून आला होता
पण खाल्ल्या होत्या हे खरं.
तुमचे पण असे किस्से येऊ द्यात.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
एका लग्नात जेवण झाल्यावर मी
एका लग्नात जेवण झाल्यावर मी पैजेवर पाऊण किलो श्रीखंड संपवलंय. तोंडी लावायला बटाटा भजीपण मागवली.
फार पूर्वी मराठी दूरदर्शनवर
फार पूर्वी मराठी दूरदर्शनवर लक्ष्मीकांत बेर्डेची एक मालिका/सिनेमा होती/ता. नाव नाही आठवत. मी खूप लहान होते पण त्यातील एक इडली खाण्याची स्पर्धा अजून आठवते. प्रदीप पटवर्धन त्यामधे इडल्या कुस्करून त्यात सांबार घालून गोळे करून खातो आणि पहिला येतो. एक कुणीतरी नटी नऊवारीत असते गूपचूप बर्याच इडल्या साडीच्या ओच्यात घालते मग ती दुसरी येते. आणि लक्ष्या आणि त्याचा मित्र स्पर्धा संपली तरी खातच असतात त्यामुळे त्यांना एक विशेष बक्षीस मिळते. सविता मालपेकर असावी किंवा कोणीतरी दुसरी स्त्री तिला सर्वात कमी इडल्या खाल्ल्याचे बक्षीस मिळते.
प्रदीप पटवर्धनची स्टाईल फार भारी झाली होती.
गोव्यात एकदा बटाट्वडे
गोव्यात एकदा बटाट्वडे खाण्याच्या स्पर्धेत येकाने काहितरि ३०-४० वडे खाल्ले आणि तदनन्तर प्राण गमवला होता. फारच ट्रेजिक होत ते प्रकरण (~ १९९०).
असं कधी केलं नाही पण नॉर्मल
असं कधी केलं नाही पण नॉर्मल साइजचे गुलाब जामुन १०+ खाउ शकतो.
आता वाढत्या वयोमानानुसार जरा झेपत नाही जास्त खाणं.
पण कॉलेजच्या दिवसांमध्ये माझं खाणं अफाट होतं हे नक्की.
माझ्या मैत्रिणीने तिच्या
माझ्या मैत्रिणीने तिच्या हॉस्टेलमधे ७० गुलाबजामुन खाल्ले होते. एका वेळेस.. असं तिने सांगितलं.. ख को ती जा..
बटाटेवड्यांचा सेम किस्सा.. चुलत भावाने सांगितलेला. कोणीतरी एक जण वडापाव खाण्याची पैज जिंकु लागलेला तेव्हा बाकीच्यांनी त्याला हा वरचा किस्सा सांगितला.. त्यामुळे त्याने घाबरुन पैजेचे वडापाव खाणेच बंद केले
आता वाढत्या वयोमानानुसार>>>>> खरं का? की आकारमानानुसार

माझ्या माहेरच्या गावात
माझ्या माहेरच्या गावात (कार्यालयात) खूपदा कार्यानंतर परातीने जिलबी, लाडू खाण्याच्या पैजा होतात, आता प्रमाण कमी आहे पण बाबा, काका वैगरे सांगतात की ते लहान असताना १ परात, २ परात अश्याच होत असत.
त्यात बुंदिचे लाडू चुरा करुन त्यावर तुप, पिठीसाखर घालून परात भरुन खातात.
जिलबी मठ्ठ्याबरोबर.
आमच्या २ मित्रांमध्ये पैज
आमच्या २ मित्रांमध्ये पैज लागली होती. एका वड्याबरोबर जास्तीत जास्त पाव खायचे.
जो जिंकला त्याने ११ पाव खाल्ले होते.
अजुन आहेत, नंतर पोस्टेनच
खरं का? की आकारमानानुसार>> तु
खरं का? की आकारमानानुसार>> तु मा ख मै..
आबा आने दो और भी किस्से.
हॉस्टेलवरची मुलं सांगायची रविवारी एकच टाइम मेस दुपारी.
संध्याकाळी मेसला सुट्टी.
शिवाय रविवारी फिस्ट. चिकन किंवा मटण वै.
तर १५-१७ चपात्या एकेकजण हाणायचा म्हणे.
म्हणजे संध्याकाळी जेवायलाच नको.
मी वीस वर्षापुर्वी एकट्याने
मी वीस वर्षापुर्वी एकट्याने अडीच किलो चिकन खाल्ले आहे ,तेही अर्धा तासात.
असलं प्रचंड खाणार्यान्बद्दल
असलं प्रचंड खाणार्यान्बद्दल माझ्या मनात नेहमी आदरच दाटून येतो
अशांना खाताना बघण हि सुद्धा एक मेजवानीच असते
- (बेतास बेत खाणारा ) प्र
इचलकरंजीला भाग्यरेखा टॉकीज
इचलकरंजीला भाग्यरेखा टॉकीज समोरे चिकन ६५ भन्नाट मिळते , कायम हाऊसफुल्ल .
)
एका मित्राच्या वाढविवसाला पैजेवर मी १४ प्लेट खाल्ल्या होत्या ., (१ प्लेट अंदाजे १०० ग्रॅम असल्याने १.४ किलो चिकन म्हणजे फार नाही , पण त्यावरच्या मसाल्याने आठवडाभर जायला त्रास होत होता.
२००६ साली आम्ही ३मित्रांनी
२००६ साली आम्ही ३मित्रांनी पिझ्झा हट चे ४ फॅमिली साईझ पिझ्झे (८ स्प्लिट टॉपिंग्स ऑप्शन्स देऊन) हादडले होते. अन वर नॅचरल्स ला जाऊन २-३ आईस्क्रीम्सही हाणली होती.
(पि.ह. मेनूकार्डाप्रमाणे एक फॅमिली पिझ्झ ४ लोकांच्या फॅमिलीकरता असतो. त्यामुळे तीन काडीपैलवानांनी असली अचरट ऑर्डर दिल्यावर वेटर थोडावेळ डोळे वटारून पहात उभा होता.
)
गेले ते दिन गेले...
गप्पांचं पान म्हणजे वाहून
गप्पांचं पान म्हणजे वाहून जाणार हो. अॅडमिन ना बांध घालायची विनंती करा आता..
कॉलेज काळातच असल्या पैजा अन आचकट विचकट खाणं होत असतं. अन पैज लावून हादडायला मिळतंय ना? मग हाणा असा कार्यक्रम असतो. आमच्या बीजे मेडिकल कॉलेजच्या गॅदरिंगच्या डिनरसाठी स्वीटडिश गुलाबजाम फिक्स असे. अन कमीत कमी ५० पासून पुढे कितीही अशा पैजा लागत. मग नंतर गडाबडा लोळणे, किंवा कधीकधी कुणाला ससूनला नेऊन अॅडमिट करावे लागणे हे दर वर्षी चाले.
पण खाण्याच्या क्वांटिटीपेक्षा विचित्र प्रकारे, आडमाप खाणे अशा पैजा आठवणीत आहेत. त्यातली एक :
संध्याकाळी कॉलेज ग्राऊंडवर जिम आहे, तिथे व्यायाम झाल्यानंतर ग्राऊंडला १० राऊंड पळत मारून दाखव, मिल्क शेक पाजू अशी पैज लावली जायची. अन बकरा पैज जिंकला तर त्याला 'चौपाटी'वर (हॉटेल ब्लू नाईल व पोलिस मुख्यालय यांदरम्यान रस्त्यावर नेहरू मेमोरियल साईडला फ्रूटज्यूस, चिकन तंदूरी, भेळ, उसाचा रस इ. विकणार्या ३०-३५ टपर्या होत्या, ती चौपाटी) नेऊन 'बनाना मिल्क शेक' पाजला जाई. हे प्रकरण म्हणजे केळ्याचं शिकरण मिक्सरमधे फिरवून गिळगिळीत केलेला आयटम होता. नॉर्मल बकरा दोनच घोटात नको म्हणून पैज विसरून जाई. किंवा थोडेफार भांडाभांडी प्रकरण होई.
एकदा एका महाण नमून्याने चाखत माखत तो केळ्याचा लगदा गिळला. वरून विचारतो, अजून राऊंड मारू का? हे पाहून आम्हाला चेव आला, म्हटलं ५ मिल्क शेक पिऊन दाखव.
याने ५ ग्लास आरामात संपवले. काँट्रीब्युशन असलं तरी डायरेक्ट ५०-६० रुपयांना खड्डा पडलेला होता (त्या काळी ५०० रुपयांत जेवून खाऊन मजा करून महिना धकत असे.)
आता मात्र पब्लिक पेटलं. स्टेशनवर जाऊन १० वडापाव खाऊन दाखव यावर. पैज! पठ्ठ्या तयार. गेलो स्टेशनवर.
त्याचे ९ खाऊन झाले. आम्हा बघतोय. १०वा त्याने खायला सुरुवात करणार तेव्हा पब्लिकचा बांध फुटला. अन त्याच्या हातातून हिसकवून तो वडापाव खाऊन टाकला गेला. पैज गेली उडत. आपल्या पैशानी कुणी मस्त चरतोय अन त्याला अजिब्बात त्रास होत नाहीये, हे नुसतं पहाणं देखिल होस्टेलला असतांना किती वेदनादायी असतं, ते होस्टेलाईट्सनाच कळेल.
तिथून परत येऊन हा महाण माणूस रात्री मेसला जेवायलाही आमच्याबरोबर होता, हा या एपिसोडचा हायलाईट.
हा या एपिसोडचा हायलाईट.>>>
हा या एपिसोडचा हायलाईट.>>>
डॉक्टर कधीतरी खरे लिहित जा
डॉक्टर कधीतरी खरे लिहित जा .....दहा वडापाव ,पाच मिल्क शेक रात्रिचे जेवण, १० राउण्ड .....डिंग्या मारु नका
एकदा खूप भूक लागली होती.
एकदा खूप भूक लागली होती. हॉटेलात राईसप्लेट मागतिली. खाउन झालीतरी थोडी भूक होतीच. वेटर आला. त्यानं विचारलं काही डेझर्ट्स हवेत का? मी त्याला शांतपणे अजुन एक राईसप्लेट आणायला सांगितल. तेंव्हा त्याच्या चेहर्यावरचे भाव आताही आठवतात.
अनु३ तुमचे माहेरचे गाव मिरज
अनु३ तुमचे माहेरचे गाव मिरज काय?
आमच्या आज्जी आजोबांच्या
आमच्या आज्जी आजोबांच्या लग्नात तूप प्यायची पैज लावली होती. जी व्यक्ती जिंकली त्याच्या पोटात रात्री दुखायला लागलं. आतमधे तूप गोठलं होतं. मग त्याला गरम तव्याने शेकून वगैरे काढलं तरी उपयोग होइना म्हनून शेकोटी करून त्यावर झोपाळ्यासारखा हलवला होता (जेणेकरून तूप पातळ होईल आणि उलटी करून बाहेर काढता येइल.) अशी दंतकथा सांगतात. खखोदेजा.
आमच्याकडे लग्नाच्या पंगतीत असल्या शर्यती कायमच्याच. मांडे खाण्याची. पुरणपोळीवर बेसनाचा लाडू कुस्करून मग त्यावर तूप पिठीसाखर आणि दूध घालून खायची, जिलेब्या खायच्या वगैरे स्पर्धा ठरवून खेळतात. माझ्या लग्नाच्या पंगतीमधे मसालेभात संपवायची स्पर्धा लागली होती. स्पर्धेसाठी सर्वानुमते एक क्वार्टरप्लेट चा आकारमान फायनल ठरवला होता. योगेशचा- माझ्या भावाचा एक मित्र आहे मुकेश नावाचा, त्याने १७ प्लेट मसालेभात खाल्ला. नंतर अर्धा एक किलो जिलेबी खाल्ली. एवढं होऊन परत नॉर्मल पंगतीतलं सर्व जेवण जेवलाच.
तो म्हणे, नॉर्मली एवढं एकदम खाता येत नाही पण पैज वगैरे लावलेली असते तेव्हा सगळे चीअर वगैरे करतात म्हणून खायला मजा येते.
कैच्याकै किस्सेचा धागा आहे की
कैच्याकै किस्सेचा धागा आहे की कोण रंगवून सांगू शकतो गोष्टी असा धागा आहे?
काही किस्से उगाच लिहिलेले वाटताहेत.
मला खरेच वाटत नाही इतके गुलाबजाम , जिलेबी, बवडे कधी खाउ शकतो माणूस....
(जेमतेम खाणारी मी)
काळ काम वेग आणि चहा. माझ्या
काळ काम वेग आणि चहा.
माझ्या जीभेला चटका बसत नाही. दैवी देणगी आहे.
मी कितीही गरम चहा पाण्यासारखा घटाघटा पितो.
मित्रांमध्ये चहा मागवला जातो तेव्हा अर्थातच माझाच पहिला संपतो मात्र त्यानंतर मी याच्या त्याच्या चहावरही झडप घालतो.
एकदा काही मित्रांनी मला आव्हान दिले, दोन मिनिटांमध्ये तब्बल दहा चहा संपवायचे. मी स्विकारले. आणि जिंकलो.
सुरुवातीचा पहिला मिनिट मी सर्व ग्लास एकत्र ठेऊन त्यावर फक्त फुंकर मारायचे काम करत होतो.
किंचित कमी गरम झाले, माझ्या जीभेला चटका झेपेल असे आणि....
पुढच्या मिनिटात प्रत्येक ग्लास दोन दोन घोटांत घटाघटा....
नंदीनीबाई, मनुष्याचे शरीराचे
नंदीनीबाई, मनुष्याचे शरीराचे तापमान 38 अंश सेल्सि असते, एवढ्या तापमानाला तुप काही गोठत नाही. काय पण सांगु नका ...
ऋषिभाऊ, अशी दंतकथा सांगतात.
ऋषिभाऊ,
अशी दंतकथा सांगतात. खखोदेजा.
असं म्हणाल्या की नंदिनी....
अंड्या, सेम हिअर. मीही चहा
अंड्या, सेम हिअर.
मीही चहा पिला कि कंपनीतील कलिग म्हणायचे चहा पितोस कि कोल्ड ड्रिंक?
एक परात जिलबी, पातेलंभर
एक परात जिलबी, पातेलंभर मसालेभात, डबाभर आमरस वगैरे खाणारी माणसं मी प्रत्यक्ष बघितली आहेत. मिरजेत तालमीत नेहेमी जाणार्या टोळ्या लग्नात वगैरे असल्यास इतपत खाणे अगदी सामान्य होते. इब्लिसने लिहिलेले मुळीच अशक्य नाही. बरेचदा श्रीखंड/गुलाबजाम/जिलबी वगैरे गोड गोष्टींबरोबर चाखायला लोणचे/लिंबू वगैरे घेतात.
माझ्या सासरी अश्या व्यक्ती
माझ्या सासरी अश्या व्यक्ती खूप आहेत. तरुण असतांना परात-परात जिलब्या पैजा लावून खाल्ल्या आहेत साबू आणि त्यांच्या सगळ्या भावांनी. त्यांनी आमच्या व्याहीभोजनात ४० पुऱ्या आणि त्यावर पातेलंभर नारळीभात खाल्लेला पाहून मी घाबरले होते. आता सवय झालीये असले आचरट प्रकार पहायची.
आमच्या लग्नात पैज लावुन
आमच्या लग्नात पैज लावुन लोकांनी पातेली भर-भरुन बासुंदी ओरपली होती.
कॉलेजचे जेवण - पुर्ण जेवण
कॉलेजचे जेवण - पुर्ण जेवण झालं होतं, आणि मग पैज लागली, रसगुल्ले खाण्याची, आधीच जेवण खुप झालं होतं आणि त्यावर हे काय नविनच अस झालं. एक एक वाटी खाऊन होत होती तशी माणसं गळायला लागली, २६ वाट्या खाऊन होईपर्यंत २च जण राहिले, आणि २७ वी वाटी खाऊन मी पैज जिंकली. नंतरपण मला काही झालं नाही, हे नशीब.
त.टि. - प्रत्येक वाटित ४ तरी रसगुल्ले असले पाहिजेत अशी अट होती.
माझ्या एका चुलत चुलत
माझ्या एका चुलत चुलत बहिणीच्या लग्नात तिची पाठवणी करून आम्ही सगळे घरी परतलो. त्यानंतर संध्याकाळी माझ्या काकाने तिच्या सख्ख्या भावाला मोठ्ठे ताटभरून रचलेला चिवड्याचा डोंगर खायचे चॅलेंज केले. आणि पठ्ठ्याने ते करून दाखवले. पैज पण फक्त १०० रूपयांची होती. तरी खाल्ला त्याने.
दुसर्या दिवशी पहाटेच्या गाडीने आम्ही घरी परत निघालो त्यामुळे ताटभर चिवड्याच्या डोंगराने पुढे काय इफेक्ट केला ते काही कळले नाही.
मी पैज लाऊन नाही गैरसमजूतीतून
मी पैज लाऊन नाही गैरसमजूतीतून भयंकर खाल्ले आहे...एकदा जुन्नरला एका कामासाठी गेलो असताना ओळखीने तिथल्या गेस्ट हाऊसला उतरायची सोय झाली. त्या आख्या गेस्ट हाऊसमध्ये मी एकटाच राहायला होतो. रात्री खानसामा आला आणि जेवणाचे ताट वगैरे मांडले.
मी जाऊन बघतो तर पोळ्यांची ही मोठी चवड. ते बघून मी हबकलोच.पण असे वाटले बिचार्याने आपल्यासाठी एवढे कष्ट करून जेवण बनवले आहे तर उगाच उरवून वाया का घालवा म्हणून पद्धतशीर मांडी घालून एक एक करत सगळ्या पोळ्या संपवल्या...मला वाटते १०-१२ असाव्यात..एकदम मऊसुत आणि तुप लावलेल्या त्यामुळे दोन घास जरा जास्तच जेवलो...इतके की नंतर सगळे जेवण घशाशी आले...उठता येईना..बेकार तडस लागली....
नंतर तो खानसामा ज्यावेळी ताट वाट्या गोळा करायला आला तेव्हा माझी अवस्था बघून तो पण घाबरला...
मी म्हणलो - एवढे जेवण कोणी देतं का...माणसाची भूक किती तुम्ही वाढता किती...
तर तो म्हणे अहो साहेब तुमच्या नंतर मी जेवणार होतो..तुम्ही काय सगळ्या चपात्या खाणार नाही असे वाटले आणि मग त्याच घेऊन जाणार होतो..असुद्या आता खाल्ल्यात तर....मी करील दुसरा काय तरी....
आशुचँप खास किस्सा.
आशुचँप
खास किस्सा.
Pages