Submitted by धनश्री on 18 January, 2013 - 14:36
इब्लिस यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे हा गप्पांचा धागा काढत आहे. पहिला किस्सा माझ्या मावसभावाचा. त्याने ५ मित्रांबरोबर पैजलावून ४८ पाणीपुर्या खाल्ल्या होत्या. जिंकला नाही आणि पोटाला पण काही झालं नाही त्याला. त्या भैय्याकडच्या पुर्याच संपल्या नाहीतर नक्की जिंकला असता.
अजून किस्सा एका मैत्रिणीच्या लग्नातला. जिलब्या खाण्याची पैज आणि खरंच तिच्या एका भावाने अशा काहीतरी ३० एक जिलब्या हाणल्या होत्या. जिलबी एका घासात आणि मग अर्धी वाटी मठ्ठा जेवणानंतर गुपचूपपणे जाऊन ब्यॉक पण करून आला होता
पण खाल्ल्या होत्या हे खरं.
तुमचे पण असे किस्से येऊ द्यात.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ब्वाप रे.. भारीच किस्से आहेत.
ब्वाप रे.. भारीच किस्से आहेत.
रिक्षा नाही, पण विषयाला धरून
रिक्षा नाही, पण विषयाला धरून आहे.
https://www.maayboli.com/node/68013
वाचलाय अज्ञातवासी. प्रतिसाद
वाचलाय अज्ञातवासी. प्रतिसाद द्यायचा राहून गेला होता. :स्मित.
तर तो म्हणे अहो साहेब तुमच्या
तर तो म्हणे अहो साहेब तुमच्या नंतर मी जेवणार होतो..तुम्ही काय सगळ्या चपात्या खाणार नाही असे वाटले आणि मग त्याच घेऊन जाणार होतो..असुद्या आता खाल्ल्यात तर....मी करील दुसरा काय तरी....Submitted by आशुचँप on 19 January, 2013>>>
पैज असो नसो - ४०-५० शुद्ध
पैज असो नसो - ४०-५० शुद्ध तुपाच्या गरमागरम जिलब्या खाणे, रसगुल्ले एकावेळी ३०-४० उडवणे, १०-१२ वेगवेगळ्या फ्लेवरचे आईस्क्रीम 'चाखणे' हे माझ्यासाठी नॉर्मल आहे.
देवाशपथ सांगतो मी आजवर गुलाबजाम, रसगुल्ले, लाडू हे पदार्थ 'आतून' कसे दिसतात हे बघितलेच नाही, नेहेमी आख्खेच खाल्लेत
गेल्यावर्षीपासून रक्तशर्करा प्रमाण जरा बिघडू लागल्यामुळे आता आचरटपणे खाण्यावर स्वप्रेरित बंदी आहे.
आता पैजेचे प्रकार बदलायला
आता पैजेचे प्रकार बदलायला हवेत.
जो चिकन दम बिर्याणी, मटन निहारी, रान, पाया सुप, बटर नान खाणाऱ्या मित्रांसोबत साधे वरण आणि भात तुप, लोणचे न घेता खाऊन दाखवेल तो पैंज जिंकेल. आता त्याला बक्षिस काय द्यायचे ते तुम्ही सुचवा.
साधं वरण भात मी खाऊ शकेन तूप,
साधं वरण भात मी खाऊ शकेन तूप, लोणच्या शिवाय. अत्यंत आवडता प्रकार आहे. तसही मी नॉन व्हेज खात नाही. बक्षिसाची अमाउंट ट्रान्स्फर करा बरं लगेच.
अरे मी हे लक्षातच घेतलं नाही.
अरे मी हे लक्षातच घेतलं नाही.

>>>>जो चिकन दम बिर्याणी, मटन
>>>>जो चिकन दम बिर्याणी, मटन निहारी, रान, पाया सुप, बटर नान खाणाऱ्या मित्रांसोबत साधे वरण आणि भात तुप, लोणचे न घेता खाऊन दाखवेल तो पैंज जिंकेल. <<<<
@ शाली ..... मला पैजेत सुतराम स्वारस्य नाही.
मी पैजेसाठी सहाय्य म्हणून चिकन दम बिर्याणी, मटन निहारी, रान, पाया सुप वगैरे खाणारा निरलस मित्र बनण्यास तयार आहे..
साधं पिवळधमक वरण, मस्त
साधं पिवळधमक वरण, मस्त इंद्रायणी तांदळाचा भात आणि वरून थोड्याश्या जुन्या साजुक तुपाची धार असेल ना,
मांसाहारी पंचपक्वान्न जरी ठेवलेत तरी मी ढुंकून बघणार नाही.
निरुदा मीच फसलो पैज लावता
निरुदा मीच फसलो पैज लावता लावता.
पण असो. या निमित्ताने ठरवा बुवा एकदा गटग. या वेळी वरील मेनू करुयात.
महाश्वेता एकदा या आमच्याकडे गटगच्या निमित्ताने. निव्वळ अप्रतिम इंद्रायणी असतो आमच्याकडचा.
दारू असेल तर मी पैजेचा वरण
दारू असेल तर मी पैजेचा वरण भात उचलायला तयार आहे।
मला पैजेत सुतराम स्वारस्य
मला पैजेत सुतराम स्वारस्य नाही.
मी पैजेसाठी सहाय्य म्हणून चिकन दम बिर्याणी, मटन निहारी, रान, पाया सुप वगैरे खाणारा निरलस मित्र बनण्यास तयार आहे.>>>>
तुम्हाला खाण्यात मदत करायला मी तयार आहे. उगीच एकदम एवढे सगळे तुम्ही कसे खाणार ना...
जो चिकन दम बिर्याणी, मटन
जो चिकन दम बिर्याणी, मटन निहारी, रान, पाया सुप, बटर नान खाणाऱ्या मित्रांसोबत साधे वरण आणि भात तुप, लोणचे न घेता खाऊन दाखवेल तो पैंज जिंकेल. आता त्याला बक्षिस काय द्यायचे ते तुम्ही सुचवा.>>>>>
मी तयार आहे आणि मला बक्षिस म्हणून उकडीचे मोदक आणि शेव शिरवळ्या चालतील.
मी काकांना पैजेखातर ३२
मी काकांना पैजेखातर ३२ गुलाबजाम खातांना पहिले आहे, मध्यम आकाराचे गुलाबजाम होते. त्यांना असे आणि इतके गोड खातांना पाहून मलाच माळमळले
माझा एक मित्र मेस मध्ये पावभाजी असली कि १०-१२ पाव सहज खायचा ..
मला स्वतःला कधीही असेल काही जमले नाही
खाण्याचे आचरट प्रकार
खाण्याचे आचरट प्रकार लहानपणापासून गावातले लोक करत असलेले पाहून ते नॉर्मल आणि काहीतरी भारी वाटायचं - आता कळतंय की काहीही आहे हे!
अत्याचार शरीरावर!
एक माजी मुख्यमंत्री पैजा लाऊन
एक माजी मुख्यमंत्री पैजा लाऊन ३५ पुरणपोळ्या पातेलभर तुपासोबत खायचे असं त्याच्या सुविद्य पत्नीनेच सांगितले... लहानपणी ऐकलेली बकासुराची गोष्टच आठवली.
३५ पुरणपोळ्यांबद्दल मी पण
३५ पुरणपोळ्यांबद्दल मी पण नुकतंच ऐकलं. पण ते कोण ते माहिती नव्हतं. इथे वाचा.
https://www.maayboli.com/node/81102
(No subject)
Pages