निसर्गाच्या गप्पा (भाग ११)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 13 October, 2012 - 04:19

"जगात नाही मित्र मिळाले तरी सृष्टीत आहेत. आपल्या घरी नाही मिळाले तरी बाहेर आहेत. देवाने आधीच तुम्हाला मित्र दिले आहेत. हे निळे निळे अनंत आकाश. ते नेहमी तुमच्यावरच पाखर घालीले. तारे तुम्हाला रमवतील. नद्या पाणी देतील. वारा गाणे गाईल. फुले सुगंध व सौंदर्य देतील. वृक्षलतावेली तुमच्यासमोर डोलतील, नाचतील. फार दु:ख नका करू. कोणी शिव्याशाप दिले तर वाईट नका वाटुन घेऊ. या निसर्गाकडे पहा आणि आनंदी रहा.
-सानेगुरूजी (सानेगुरूजींच्या गोड गोष्टी).
जिप्सी यांच्या सौजन्याने.

निसर्गाच्या गप्पांच्या ११ व्या भागाबद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आजची बातमी.

चीनचा समुद्र गोठला! >>>>>>>>>>>>>>>>

महाबळेश्वरचा वेण्णा लेक सुद्धा गोठला. एबिपी माझाच्या बातम्यांमधे दाखवले. (०८.०१.२०१३)

सध्या "महाराष्ट्रातील फुलपाखरे" लेखक श्री. राजू कसंबे यांचे पुस्तक वाचत आहे. त्याही पेक्षा वाचताना चित्रे पहात आहे, डोळ्यात साठवत आहे आणि लक्षात ठेवायचा प्रयत्न आहे. पुस्तक खुप छान, रंगीत, सचित्र, विभागवार आणि मराठीतले पहीलेच.

फुलपाखरू छान किती दिसते............फुलपाखरू ...!!!!!!
फुलपाखराच आयुष्य खूप कमी असत म्हणे??????.
मी ऐकल आहे.
खरतर कधी कधी वाटत फुलपाखरा सारखाच जागाव
सगळ्याच गुरफटलेल्या गोष्टीतून मुक्त होऊन आभाळ भर फिराव.

जागु, आता मी नियमीत येण्याचा प्रयत्न करेन खुप मिसले मी निसर्ग गप्पा. मला अ‍ॅड करशील? त्य मुळे तरी येणे होइल. Happy

हल्ली झाडांखालून जाताना अगदी बारिक थेंब पडल्यासारखे वाटतात. दिसत तर काही नाही. या सिझनला खरंच असं होत, की मला भास होतायत ?

रावी असं खरच होतं. झाडांच्या फुलां मधून सूक्ष्म थेंब पडतात. उन्हाच्या कवडशात दिसतातही पडताना. झाडा खाली गाडी उभी केली तर चिकट होते थोड्या वेळानी. मला वाटतं हा काहितरी रोग असावा झाडांचा.

मला वाटतं हा काहितरी रोग असावा झाडांचा.<< रोग असेल असे वाटत नाही
पण ह्या चिकट पदार्था कडे अन्य किटक आकर्षीत होतात

रावी, रस्त्याच्याकडेने बहुधा रेन ट्री लावलेले असतात. यांच्या पानांवर सिकॅडा (एक प्रकारचा कीटक) असतात. त्यांच्या उत्सर्जनामुळे आपल्या अंगावर पाणी पडल्यासारखं वाटतं. आणि रेन ट्रीला चक्क पावसाचंच झाड म्हणतात. Happy

669px-Tibicen_linnei.jpg

महाबळेश्वर च्या वेण्णा लेक चे दर्शन घडले ऑक्टोबर मधे.. नजारा इतका भव्य होता कि कॅमेर्‍याच्याच काय माणसाच्या डोळ्यातही मावू नयेसा

सुप्रभात मंडळी! वाचतेय...................मस्त!
नीतू ........मीही माझी मधुमालती कधी फुलेल अशी वाट बघतेय!
सर्वांचेच फोटो आणि चिंतन मननीय!

हल्ली झाडांखालून जाताना अगदी बारिक थेंब पडल्यासारखे वाटतात. दिसत तर काही नाही. या सिझनला खरंच असं होत, की मला भास होतायत ?>>>>>> आंब्याच्या मोहरातुन असं गळतं नेहमी.. अगदी टपटप आवाज देखील ऐकला आहे मी.

आंब्याच्या मोहरातुन असं गळतं नेहमी.. अगदी टपटप आवाज देखील ऐकला आहे मी.>>>
अगदी मी ही हेच लिहिणार होतो. आणि अशा अंब्याच्या झाडांची पानं त्याने भरलेली असतात, व पानांवर ओघळ येत असतात. अशा झाडाचा बराचसा मोहोर जळून्/वाळून जातो. कुठल्यातरी किटकांमुळे असं होतं अस ऐकलं होतं

वर्षू नील, तो धोम डॅम नाहिये, त्याच्या आधी एक छोटं धरण झालय ते आहे. धोम याच्या दुप्पट आहे. गुगल अर्थ मधे दिसेल हे, धोमच्या बॅक वॉटरला लागुनच आहे. balkawadi अस नाव आहे त्याचं

" हा नक्की वेण्णा लेक आहे का? का धोम धरण आहे?"..
गिरीश.. नो आयडिया.. ड्रायवर नी सांगितलं होतं कि हा वेण्णा नदीवरचा डॅम आहे.. महाबळेश्वर हून पाचगणीला जायच्या रस्त्यावरून कुठून तरी वळण घेऊन गेलेला दाखवायला..

जो_एस .. धन्स

सुदुपार मंडळी!
धन्यवाद मधुमकरंद! हं.......म्हणजे काळा असतो कोकीळ! (फारच बेसिक प्रश्न!)
असो.............सध्या दुपारी ४.३० ते ५ च्या दरम्यान ३ पक्षी येतात.....गच्चीतल्या तारांवर बसायला. मग तिथून ते कडुलिंबावर जातात. आणि १५/२० मि. नाचानाची करून उडून जातात.
साधारण हिरवट पण पोपटापेक्षा आकाराला लहान. आणि शेपटातून एक काडीसारखी अजून एक शेपूट बाहेर आलेली दिसते. आज फोटो काढण्याचा प्रयत्न करणारे. हा वेडा राघू का?

खुप दिवसांनी डोकावलो इथे. भारतात यावेळेस बर्‍याच मायबोलीकरांना भेटता आले. ( ३ दिवसात ५ गटग !!! )
उरण-वाशी-ठाणे-पुणे आणि दादर.

यावेळेचा दुबई - लुआंडा विमानप्रवास दिवसाचा होता. अशी विमाने सहसा सरळ रेषेत येत नाहीत. आमचे एमिरेटसचे विमान, दुबईवरुन उडाल्यावर, ओमान सौदी बॉर्डर, येमेन, रेड सी, सुदान, इथिओपिया असे करत चक्क नैरोबी, मवांझा ( टांझानिया ) करत आले आणि काँगोच्या हिरव्यागार जंगलावरून बराच वेळ उडत राहिले.
हे जंगल फक्त वरुन बघायलाच खास आहे, ते जमिनीवरुन पार करणे अशक्यप्रायच आहे.
नंतर नामिबीया वर बरेच ढग लागले त्यांना अलगद टाळत ( ढगात शिरल्यावर विमान प्रचंड थरथरते ) अगदी कौशल्याने अलगद विमान आणले. ( शिवाय पराठे, लोणचे, चना मसाला, पालक पनीर, रसमलाई, फरसाण, फ्रुट सलाद, बडीशेप, केक असे खास एमिरेट्स स्टाईल लाड पण चाललेच होते.)

भारतात पण नागपूर, इंदूर, उरण, पुणे असे बरेच भटकलो. उज्जैनला पण जाऊन आलो. ६ ते ११ जानेवारी असे सहा दिवस रोज एक या हिशेबात विमान उड्डाणे केली. आता हि शिदोरी सहा महिने पुरवायची. वर्षूची भेट मामीने पोहोचवलीच शिवाय मायबोलीकरांकडून पुस्तके / पापड / लोणची / घरची हळद / तीळपोळ्या / पेपर क्वीलिंगची फ्रेम / ताडगोळे / शेवग्याच्या शेंगा असा भेटवस्तूंचा मारा झालाच.

Happy वेलकम बॅक दिनेश दा.. प्रवास सुखरूप झाला, भारत भेट छान पार पडली इ. वाचून खूप बरं वाटलं..

एमिरेट्स ने तर भरपूर लाड केलेले दिस्तायेत.. नाहीतर आजकाल विमानात दिसभराच्या प्रवासात जेवण इतकं चांगलं मिळणं महामुश्किल झालंय..

तर आता तुमच्या भारताच्या धावत्या भेटीचं वर्णन वाचायला उत्सुक आहो..

Pages