Submitted by निंबुडा on 15 January, 2013 - 05:24
इथेच एका बीबी वर 'जिह्वा' ह्या आकारान्त स्त्रीलिंगी शब्दाचे सप्तमी चे एक वचन लिहायचे होते. तेव्हा 'माला' शब्द मनातल्या मनात चालवून पाहिला आणि लक्षात आले की अधले मधले विसमरणात गेले आहे. मग गंमत म्हणून 'देव' आणि 'वन' शब्द चालवून पाहिले. बरीचशी रुपे आठवली. मग चाळाच लागला. आत्मनेपदी, परस्मैपदी, उभयपदी; इ, वहे, महे इ. असे सर्व एका मागोमाग आठवायला लागले. शाळेत संस्कृत (तिसरी भाषा म्हणून) शिकतानाच्या आठवणी जाग्या झाल्या. त्या सर्वांना उजळणी देण्यासाठी हा बीबी. तुम्हाला जे आठवतेय ते तुम्ही ही लिहा.
संस्कृत वर्ग चालू असतानाच्या आठवणीही लिहूया!
+++++++++++++++++
इथे काही जणांनी आधी संस्कृत सुभाषितांची संग्रहमालिका लिहिली आहे. इथे लिंक्स देत आहे.
संस्कृतमधील सुभाषिते मराठीत
वैशिष्टयपूर्ण संस्कृत सुभाषिते
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ऋणं कृत्वा घृतं पिबेत् ,
ऋणं कृत्वा घृतं पिबेत् , यावत् जिवेत सुखम् जिवेत |
भस्मीभूतस्य देहं च, पुनरागमनाय कुतः ||
(काही चूक असेल तर दुरूस्ती सुचविणे)
***
ऋणं कृत्वा हेच मुळात चूक आहे. चार्वाकाच्या तत्वज्ञानाची रेवडी उडविण्याकरता रचलेले ते नंतरचे प्रकर्ण आहे, व त्याचे कर्ते बहुदा आदी शंकराचार्य आहेत असे वाचल्याचे आठवते.
यावज्जीवं सुखं जीवेत् नास्ति मृत्योरगोचरः ।
भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः ॥
ही एक चार्वाकदर्शनाची सुंदर लिंक
चार्वाकदर्शनं किञ्चन
चार्वाकदर्शनं
किञ्चन विभिन्नं दर्शनम् अस्ति । चिन्तनगाम्भीर्यदृष्टया पश्यामः चेत् ज्ञायते यत् निम्नस्तरीयं दर्शनं चार्वाकदर्शनम् इति । बृहस्पतिः एव जनान् मोहयितुं प्रियकरैः वचनैः चार्वाकमतम् उपदिष्टवान् इति श्रूयते । चार्वाकदर्शनस्य मूलग्रन्थः इदानीं न उपलभ्यते । चार्वाकदर्शनं धर्माधर्मादीनां, पापपुण्यादीनाम् आत्मादीनां वा अस्तित्वं न अङ्गीकरोति । चार्वाकाः भोगवादं विशेषतः पुरस्कुर्वन्ति । किन्तु एतावता न निर्णेतव्यं यत् ते भोगैकतत्पराः दुराचाराः च आसन् इति । अहिंसा, शान्तिप्रियता, युद्धनिषेधः इत्यादयः बहवः अंशाः तैः अपि प्रतिपादिताः । अस्य दर्शनस्य सूत्रकारः बृह्स्पतिः नाम आचार्यः भवति । दर्शनस्यास्य प्रचारकः चार्वाको नाम दैत्यः आसीत् इत्यतः चार्वाकदर्शनमिति ख्यातिः । चार्वाकदर्शनानुसारं मरणमेव मोक्षः । मरणात् परं किमपि नास्ति इति ते वदन्ति । परलोकं पुनर्जन्म च न अङ्गीकुर्वन्ति ते । ‘भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः ?’[१] इति ते पृच्छन्ति च । तेषां तु शरीरमेव आत्मा शरीरभिन्नः कश्चिद् आत्मा नास्ति । एतत् चार्वाकदर्शनं लोके बाहुल्येन प्रचलितत्वात् लोकायतदर्शनम् इत्यपि नाम प्राप्तम् । प्रत्यक्षं तेषाम् एकमात्रं प्रमाणम् ।
-संस्कृत विकीवरून साभार!
@इब्लिस - अवांतर प्रतिसाद
@इब्लिस -
अवांतर प्रतिसाद -
चार्वाक हा एकटाच नव्हता. तर त्या पूर्ण परंपरेला लोकायत असं नाव आहे. देबीप्रसाद चट्टोपाध्याय नावाच्या अभ्यासकांचं या परंपरेविषयक विश्लेषण प्रमाणभूत मानलं जातं
हो वरदाजी. वर मी डकवलं आहेच.
हो वरदाजी.
वर मी डकवलं आहेच. बृहस्पती नामाचा आचार्य आद्य सूत्रकार. चार्वाक नावाचा 'दैत्य' याचा प्रचार करी. अन हे तत्वज्ञान लोकप्रिय होवून लोकायत म्हणून मान्यता पावले.
देवीप्रसादांचे विश्लेषण कुठे मिळेल?
इब्लिस, विपु बघा
इब्लिस, विपु बघा
आज्ञार्थ परस्मैपद १४६१०
आज्ञार्थ परस्मैपद १४६१० वर्गीय प्रत्यय असे आहेत :
आनि आव आम
- तम् त
तु ताम् अन्तु
द्वितीयपुरुषी एकवचनी प्रत्यय नसल्याने पाठ करतांना संस्कृतच्या बाईंनी शून्य म्हणायला सांगितले होते. आमच्या वर्गातल्या कारट्यांना थोडेच मान्य होणार! आम्ही नॉट असा इंग्रजी शब्द वापरात असू.
आनि आव आम नॉट तम् त तु ताम् अन्तु असा रट्टा मारून पाठ केले जाई!
-गा.पै.
मस्त वाहता धागा निंबुडा, खूप
मस्त वाहता धागा निंबुडा, खूप सुंदर समृद्ध भाषा..
तिच्या गमतीही अनेक .
एक गमतीदार श्लोक आठवतोय , स्वागत कसे करावे -एक शिष्टाचाराचा भाग-
एह्यागच्छ (या या ) ,गृहाणचासनमिदं (बसा हो या इथे) कस्माच्चिराद्दृष्यसे ( खूप दिवसांनीसे दिसलात !)
का वार्ताsअस्ति (काय खबरबात )दुर्बलोsसि (वाळलात की !) कुशलं ?(ठीक आहे ना सगळं )प्रीतोsस्मि ते दर्शनात ( बरं वाटलं हो तुम्हाला पाहून)
एवं नीचजनेपि वक्तुमुचितं प्राप्ते सतां सर्वदा..( अगदी नीच माणसाशीही सज्जनांनी असं बोलावं )..
अयि महेश, कुत्र गच्छसि | (अरे
अयि महेश, कुत्र गच्छसि |
यायचे
(अरे महेश, कुठे जातोस)
असे वाक्य आले की खुप
आमच्या शाळेत अगदी शेवटच्या
आमच्या शाळेत अगदी शेवटच्या प्रिलिम परिक्षेनंतर शाळेतला शेवटचा तास चक्क off मिळाला. off period ला संस्कृत च्या बाई आल्या. सगळ्यांचे मार्क वगरे विचारून झाले. वर्गात चक्क २ जणाना १०० पैकी १०० मिळाले होते. एकूण सर्व जण जरा 'हवेत' होते.
बाई नी शांत पणे विचारले, "तर मुलांनो, ३ वर्षे तुम्ही संस्कृत ही 'भाषा' शिकलात. रूपं , धातू, परस्मैपद, आत्मनेपद, सुभाषित माला, सीन्-अनसीन सगळं करून दाखवीलंत. तुम्ही दहावीच्या परीक्षेसाठी तयार आहात...आता पटकन कोणी तरी संस्कृत मध्ये 'हो' असे म्हणून दाखवा बरं!"
.. पुढे काय झाले ते सांगायला नको पण त्या दिवशी शालेय जीवनातला सगळ्यात मोठा धडा आमच्या वर्गाला मिळाला होता.
आम् अद्य एकम् श्लोकम्
आम्
अद्य एकम् श्लोकम्
रात्रिर्गमिष्यति भविष्यति सुप्रभातम्
भास्वानुदेष्यति हसिष्यति पंकजश्री:
इति विचिन्तयति कोषगते द्विरेपे
हा हन्त हन्त नलिनीम् गजमुज्जहार ||
>>>> आता पटकन कोणी तरी
>>>> आता पटकन कोणी तरी संस्कृत मध्ये 'हो' असे म्हणून दाखवा बरं!" <<<<<

तुमच्या बाई ग्रेटच होत्या म्हणावे लागेल
बर, पण मग "हो" कसे म्हणायचे?
अप्रतिम तंतू ("धागा" हा
अप्रतिम तंतू ("धागा" हा हिब्रू शब्द असल्यामुळे येथे वापरला नाही.)
बर, पण मग "हो" कसे म्हणायचे?
माझ्या माहितीप्रमाणे "हो" साठी "आम्" असे म्हटले जाते.
@महेश | 16 January, 2013 -
@महेश | 16 January, 2013 - 11:09
पेरू, मी वर दिलेल्या सुभाषिताचा अर्थ सहज समजेल असे वाटते, नसेल तर लिहू का ??
<<
पेरू यांची सूचना स्वागतार्ह आहे. ज्यांनी सुभाषित दिले आहे त्यांना अर्थ माहीत असेल तर तो अवश्य द्यावा त्यामुळे [१] माझ्यासारखे भाशेशी जेमतेम ओळख होऊन कारणपरत्वे तीपासुन दुरावलेल्या पण तिच्याविषयी आस्था असणार्यांची सोय होईल [२] भाषा न शिकलेल्या पण या उत्तम धाग्यावरील माहितीने गोडी निर्माण झालेल्या अनेकांची सोय होइल [३] अर्थ देण्यात चूक झाली असेल तर माबो वाचणार्या अनेक तज्ञांकडून त्याची दुरुस्तीही होऊ शकेल.
तात्पर्य अर्थ लिहाच.
एक सुभाषित जे माबोवरच्या
एक सुभाषित जे माबोवरच्या बर्याच आयडींना (विशेषतः डुआयना) लागू पडेल असे,
नलिकागतमपि कुटिलम् न भवति सरलम् शुनः पुच्छम् |
तद्वत खलजन हृदयम् बोधितमपि नैव याति माधुर्यम् ||
अर्थ :
कुत्र्याचे शेपूट नळीत घातले तरी देखील सरळ होत नाही,
त्याचप्रमाणे दुष्ट लोकांचे (खल जन) हृदय हे कितीही बोध केला तरी पालटत नाही,
त्यात माधुर्य येत नाही.
अस्मासु को जना:
अस्मासु को जना: संस्कृतभाषायाम् वार्तालाप: कर्तुम शक्नुवन्ती?
(आपल्यातील कोण-कोण लोक संस्कृतभाषेतून एकमेकांशी बोलू शकतात? हा माबोकरांना प्रश्न आहे.)
मह्यम् रोचते तद्, किंतू बहूप्रयत्नेन, यथातथा साधयति...
(मला ते आवडते, परंतू खूप प्रयत्नानंतरही फार थोडेच जमते...)
शाळेत केलेली घोकंपट्टी .. (
शाळेत केलेली घोकंपट्टी .. ( फोनवर लिहील्याने व संस्कृत विसरल्याने शुद्धलेखनाच्या बर्याच चुका आहेत)
पुराकिल् अयोध्यायाम् हरिश्चंद्रः नाम नृपः अवस़त् ( पूर्वी अयोध्येत हरिश्चंद्र नावाचा राजा रहात होता)। तारामती तस्य भार्या रोहिदासः च पुत्रः (तारामती बायको व रोहिदास मुलगा)। हरिश्चंद्र भूपते सत्ते अतीव निष्ठा अभवत ( राजाची सत्त्यावर फार निष्ठा होती) । सः स्वप्ने अपि असत्यम् न अभाषत ( तो स्वप्नातही खोटे नाही बोलायचा)।
एकदा सः विश्वामित्रः मुनि स्वप्ने अपश्यत ( एकदा तो विश्वामित्र मुनिंना स्वप्नात पहातो)। मुनिः अवदत् हे भूपते, अहं तव राज्यम् याचे (मुनी म्हणतात की मी तुझे राज्य मागतो )। नृपः बाढम् इति अवदत् (राजा बरं म्हणतो)। अपरे दिने मुनिः स्वयं हरिश्चंद्रंप्रति अगच्छत् अभणत् च - अहमेव स्वप्ने तव राज्यम् अवाच्छम् ( दुसर्या दिवशी मुनी स्वतः राजाकडे येतात व म्हणतात की मीच स्वप्नात येऊन तुझे राज्य मागितले)। त्वम् च तत् मह्यम् अयच्छः ( तू पण मला ते दिलेस)। अधुना तत् स्विकर्तुम् अहम् उपस्थितः ( तेव्हा ते घेण्यास मी आलोय)।
( राजा राज्य देतो) मुनिः पुनः अवदत्, दक्षिणायाम् तु का व्यवस्था (दक्षिणेचे काय करतोस )। तदा दक्षिणायाम् व्यवस्था कर्तुं राजा परनगरे गत्वा तत्र स्वस्य भार्यया पुत्रस्य च विक्रयेण धनम् लब्ध्वा मुनिम् दक्षिणा यच्छति ( तेव्हा दक्षिणेची व्यवस्था करण्यासाठी दुसर्या नगरात जाऊन, तिथे आपल्या बायको व मुलाची विक्री करून मिळालेले धन मुनींना दक्षिणा म्हणून देतो)।
अहो तस्य निर्धारः (what a निर्धार !!)
हुश्श !! दमले ...
मला लय राग यायचा त्याचा. सरळ सांगायचं ना स्वप्नात वचन दिलं तर स्वप्नातच येऊन घे म्हणून. नायतर त्याच्याकडे personal gifts नव्हती काय द्यायला.. ती राज्याची नसणार ना. पण मग दिवस कमी होते गोष्टं बदलायला म्हणुन तीच ठेवली.
भारती बिर्जे डि... | 16
भारती बिर्जे डि... | 16 January, 2013 - 22:00
एक गमतीदार श्लोक आठवतोय , स्वागत कसे करावे -एक शिष्टाचाराचा भाग-
एह्यागच्छ (या या ) ,गृहाणचासनमिदं (बसा हो या इथे) कस्माच्चिराद्दृष्यसे ( खूप दिवसांनीसे दिसलात !) का वार्ताsअस्ति (काय खबरबात )दुर्बलोsसि (वाळलात की !) कुशलं ?(ठीक आहे ना सगळं )प्रीतोsस्मि ते दर्शनात ( बरं वाटलं हो तुम्हाला पाहून)
एवं नीचजनेपि वक्तुमुचितं प्राप्ते सतां सर्वदा..( अगदी नीच माणसाशीही सज्जनांनी असं बोलावं )..
<<
छान.
मराठीतून-कानडी शिकवणारे पुस्तक पाहिले होते. त्यात व्यवहारात उपयुक्त अशा संभाषणांचे कांही छोटे छोटे नमुने दिले होते. त्यात जवळपास अशाच तर्हेचे कानडी संभाषण होते. तुम्ही दिलेल्या या जुन्या श्लोकावरून तर बेतलेले नसेल?
माझी रोजच्या वापरातली
माझी रोजच्या वापरातली सुभाषिते -
न भूतपूर्वं न कदापि वार्ता
हेम्नं कुरंगो न कदापि दृष्टा
तथापि तृष्णा रघुनंदनस्य
विनाशकाले विपरीतबुद्धीः
(ना पूर्वी कधी घडले ना कोणी ऐकले
सोन्याचा हरिण कधी दिसलाही नाही
तरीही रामाची तहान टपकली ( षष्ठीला हा शब्द शोभला)
म्हणतात ना, विनाशकाळ आला की बुद्धी फिरते )
अतिपरीचयात् अवज्ञा संततगमनादनादरो भवति
मलये भिल्लपुरंध्रि चंदनतरुकाष्ठकम् इंधनम् कुरुते
(जास्त ओळखीने अपमान होतो, सारखे सारखे एखाद्याच्या घरी गेले की आदर होत नाही
जसे मलय पर्वतावर भिल्लीण चंदनाचे लाकूड (भरपूर मिळत असल्याने ) इंधन म्हणून वापरते.)
दधि मधुरम् मधु मधुरम् द्राक्षा मधुरा सुधापि मधुरैव
तस्य तदैवहि मधुरम् यस्य मन यत्र सल्लग्नम्
(दही, मध, द्राक्षे, अमृत हे सगळे गोड असते. पण ज्याचे मन जिथे लागते त्याला तेच गोड वाटते )
@सोनू दधि मधुरम् मधु मधुरम्
@सोनू
दधि मधुरम् मधु मधुरम् द्राक्षा मधुरा सुधापि मधुरैव
तस्य तदैवहि मधुरम् यस्य मन यत्र सल्लग्नम्
(दूध, मध, द्राक्षे, दारू हे सगळे गोड असते. पण ज्याचे मन जिथे लागते त्याला तेच गोड वाटते )
<<
दधि म्हणजे समुद्र ना? तो तर खारट. दारू तर कडू [असे म्हणतात ].
त्यामुळे आपण दिलेल्या सुंदर श्लोकाच्या अर्थाची पुन्रर्मांडणी करायला लागेल असे वाटते.
वीस उपसर्ग कोणते याबद्दल एक
वीस उपसर्ग कोणते याबद्दल एक सुभाषित होते. म्हणायला मजा वाटायची molecular table सारखी -
प्रपरापसमन्ववदुर्निर्भिर् वधिसूदतिनिःप्रतिपर्यपयः उप्आंगिति विंशतिरेष सखे उपसर्गगणः कथितम् कविना
(प्र, परा, अप, सम्, अनु, अव, दुर्, निर्, अभि, वि, अधि, सु,उद्, अति, नि, प्रति, परि, अपि, आ, उप) संधि जमली नसण्याची शक्यता. घोकणे सोपे लिहीणे अवघड
@ मी-भास्कर, दधि म्हणजे दही
@ मी-भास्कर,
दधि म्हणजे दही (गोड कवडी दही अभिप्रेत आहे इथे)
सुधा म्हणजे अमृत. सुरा आणि सुधा मधे गोंधळ झाला. दोन्ही देवाचीच पेये म्हणून कदाचित. बदल केलेत. आभार.
@ गामा आनि आव आम - तम् त तु
@ गामा
आनि आव आम
- तम् त
तु ताम् अन्तु
-- आम्ही डॅश म्हणायचो - ला
आणि कशीही मोडतोड करायचो.
तम् त तम् त् - जमतं जमतं
तु ताम् अन्तु - तू काय म्हणतु
सोनू., लई ड्याशिंग तुमी
सोनू., लई ड्याशिंग तुमी प्वारी! आन आमी येकदम नॉटठाळ कार्टी!
आ.न.,
-गा.पै.
हर्षल को जना: नाही, के जना:
हर्षल
को जना: नाही, के जना: हवे.
अहं संस्कृतभाषायां वार्तालापं कर्तुं शक्नोमि |
'तुभ्यं संस्कृतसम्भाषणं रोचते'इति ज्ञात्वा अतीव आनन्दित; अभवम् |
'प्रयत्नेन तु सिध्यन्ति कार्याणि न मनोरथै:' इति वचनं शिरोधार्य प्रयत्नरतेन भवितव्यं |
क्या बात है! मस्त भर पडतीये
क्या बात है!
मस्त भर पडतीये या तंतूमधे! 
सोनू., अहो येवढे लक्षात आहे तुमच्या? ग्रेट.
>>>> अप्रतिम तंतू ("धागा" हा हिब्रू शब्द असल्यामुळे येथे वापरला नाही.) <<< हे देखिल लक्षात ठेवलय
>>> दारू तर कडू [असे म्हणतात
>>> दारू तर कडू [असे म्हणतात ].<<<< अहो ती हल्ल्लीची गावठी हातभट्टी किन्वा विदेशी - शिन्चे कशाहीपासून काहीही कुजवून बनवतात.!
सोमरस मात्र गोडच अस्तो!
संस्कृत भाषा दिन केंव्हा
संस्कृत भाषा दिन केंव्हा असतो? असे मी इथे विचारले होते. कुणाला माहिती आहे का?
अमोल
श्रावणी पौर्णिमेला
श्रावणी पौर्णिमेला संस्कृत-दिन साजरा केला जातो.
छान चर्चा चालू आहे. पाठ्येतर
छान चर्चा चालू आहे.
पाठ्येतर सुभाषितांचे अर्थ लावताना आमच्या संस्कृतच्या बाई आम्हाला आधी त्या सुभाषितांमधून वाक्य तयार करायला लावायच्या. हा प्रकार मला फार आवडायचा. मुळातच पद्यापेक्षा गद्य अधिक जवळचं वाटायचं, त्यामुळे असेल.
उदा. वर कुणीतरी दिलेलं हे सुभाषित -
नलिकागतमपि कुटिलम् न भवति सरलम् शुनः पुच्छम् |
तद्वत खलजन हृदयम् बोधितमपि नैव याति माधुर्यम् ||
तर, त्याचं वाक्य होईल - नलिकागतम् अपि शुनः कुटिलम् पुच्छम् सरलम् न भवति| तद्वत खलजन हृदयम् बोधितमपि माधुर्यम् नैव याति || (काही चुकलं असेल, तर दुरूस्ती करण्यात यावी.)
ललितादेवी, तुम्हे म्हणालात
ललितादेवी, तुम्हे म्हणालात तसे पद्याचे गद्य रूपांतर करण्याला अन्वय लावणे म्हणतात.
आ.न.,
-गा.पै.
Pages