संस्कृत भाषेची उजळणी

Submitted by निंबुडा on 15 January, 2013 - 05:24

इथेच एका बीबी वर 'जिह्वा' ह्या आकारान्त स्त्रीलिंगी शब्दाचे सप्तमी चे एक वचन लिहायचे होते. तेव्हा 'माला' शब्द मनातल्या मनात चालवून पाहिला आणि लक्षात आले की अधले मधले विसमरणात गेले आहे. मग गंमत म्हणून 'देव' आणि 'वन' शब्द चालवून पाहिले. बरीचशी रुपे आठवली. मग चाळाच लागला. आत्मनेपदी, परस्मैपदी, उभयपदी; इ, वहे, महे इ. असे सर्व एका मागोमाग आठवायला लागले. शाळेत संस्कृत (तिसरी भाषा म्हणून) शिकतानाच्या आठवणी जाग्या झाल्या. त्या सर्वांना उजळणी देण्यासाठी हा बीबी. तुम्हाला जे आठवतेय ते तुम्ही ही लिहा. Happy

संस्कृत वर्ग चालू असतानाच्या आठवणीही लिहूया! Happy

+++++++++++++++++
इथे काही जणांनी आधी संस्कृत सुभाषितांची संग्रहमालिका लिहिली आहे. इथे लिंक्स देत आहे.
संस्कृतमधील सुभाषिते मराठीत

वैशिष्टयपूर्ण संस्कृत सुभाषिते

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुञ्चामि.... कॅपिटल वाय..

मराठी मधले विभक्ती प्रत्यय...

प्रथमा -
द्वितिया - स, ला, ते - स, ला, ना, ते
तृतीया - ने, ही, शी - ने, ही, ई, शी
चतुर्थी - स, ला, ते - स, ला, ना, ते
पंचमी - ऊन, हून - ऊन, हून
षष्टी - चे, ची, च्या - चे, च्या, ची
सप्तमी - त, ई, आ - त, ई, आ
संबोधन -

अहो उदयराव, मला खरेच काही समजत नाहीये हो Sad ते गण, धातु, मूळ रूप, आत्मनेपदी, परस्मैपदी प्रत्यय पार डोक्यावरुन जातय Sad

तमाखूपत्रं राजेद्रं भजमाज्ञानदायकम्,
तमाखूपत्रं राजेन्द्रं भजमाज्ञानदायकम...

हा दोन्ही ओळींचा अर्थ वेगवेगळा असणारा श्लोक असे आणखीही होते...कुणाला आठवतात का?

पंचमी : ऊन, हून
हर्शल (की हर्षल?) पहिली दोन ऐकली होती.
तिसरे हिंदीत नुकतेच वाचले.
तरुवर फल नही खात है, सरवर पियहि न पान|
कहि रहीम परकाहजित, संपति चंचहि सुजान||

>>>मराठी मधले विभक्ती प्रत्यय... <<< ओके हिम्स, म्हणजे....
प्रथमा - = राम
द्वितिया - स, ला, ते - स, ला, ना, ते = रामास/रामाला
तृतीया - ने, ही, शी - ने, ही, ई, शी = रामाने / रामाशी
चतुर्थी - स, ला, ते - स, ला, ना, ते = रामास / रामाला - रामाकरिता
पंचमी - आठवत नाहीयेत.. = रामाकडून
षष्टी - चे, ची, च्या - चे, च्या, ची = रामाचे
सप्तमी - त, ई, आ - त, ई, आ = रामात
संबोधन -<<<< = हे रामा

रामेण-अभिहता(रामेणाभिहता) निशाचर चमू = रामाकडून निशाचरचमू मारला गेला (कर्मणिप्रयोग)

रामाय तस्मै नमः = त्या रामाला नमस्कार (नम: अव्ययाला चतुर्थीची अपेक्षा)

रामात् नास्ति परायणं परतरं = शरण जायला रामाहून दुसरे दुसरे (योग्य) स्थान नाही (तुलनेसाठी पंचमी वापरतात)

रामस्य दासोस्म्यहम् = मी रामाचा दास आहे.

रामे चित्तलयं सदा भवतु मे = माझे चित्त नेहमी रामामध्ये असो. (सप्तमी - स्थानदर्शक)

भो राम मामुद्धरम् = हे रामा, मला उद्धर.

लिंबू, बालभारतीची मराठी व्याकरणाची पाठ्यपुस्तकं आण. त्याच्यात मराठीतल्या विभक्तींचा अर्थ/कार्य मराठीतच दिलंय, आणि विभक्तीप्रत्ययही. ते अर्थ फक्त संस्कृतला ट्रान्स्फर कर..

शाळेत शिकलेय तेवढंच संस्कृत येतं मला. तेही घोकंपट्टीवाल्या शिक्षिका होत्या. कुठल्याही व्याकरणाचा अर्थ फारसा उलगडून सांगितला नाही कधीच. त्यामुळे भयंकर रटाळ वाटायचं शिकताना. पण नंतर प्राकृतची बेसिक्स शिकताना उत्तम शिक्षिका लाभल्याने संस्कृतचीही गंमत थोडीफार उलगडली. मराठी शाळेत शिकल्याने पाठांतर होतंच. आता अगदी बेसिक संस्कृतचे अर्थ आपापलेच उलगडतात. Happy

पण अगदी व्यवस्थित काही वर्षं वेळ देऊन बेसिक्सच्या पलिकडचं संस्कृत आणि प्राकृत दोन्ही शिकायचंय ते राहूनच गेलंय Sad

प्रतिसाद लिहिलिहिपर्यंत बीबी केवढातरी वाह्यला Happy

भरत : हर्षल बरोबर आहे Happy
मला वाटलंच, या धाग्यावर आयाने यावं Happy संस्कृत शिकवलं आहे त्याने Happy

म.ह

निंबुडा, तुम्ही सांगताय तसेच करत आहे पण अजुनही पाय मोडत नाहीये (माझी बोटे मोडतील आता प्रयत्न करून) Sad
बॅकस्पेसचा ऑप्शन कधी कधी उपयोगी पडत आहे.

मालाम्

तद् पुल्लिंगी

स: तौ ते प्रथमा
तम् तौ तान् द्वितीया
तेन ताभ्याम् तै: तृतीया
तस्मै ताभ्याम् तेभ्यः चतुर्थी
तस्मात् ताभ्याम् तेभ्यः पंचमी
तस्य तयो: तेषाम् षष्ठी
तस्मिन् तयो: तेषु सप्तमी

तद् नपुसकलिंगी

तद् ते तानि प्रथमा
तद् ते तानि द्वितीया
तेन ताभ्याम् तै: तृतीया
तस्मै ताभ्याम् तेभ्यः चतुर्थी
तस्मात् ताभ्याम् तेभ्यः पंचमी
तस्य तयो: तेषाम् षष्ठी
तस्मिन् तयो: तेषु सप्तमी

तद् स्त्रीलिंगी

सा ते ता: प्रथमा
ताम् ते ता: द्वितीया
तया ताभ्याम् ताभि: तृतीया
तस्यै ताभ्याम् ताभ्यः चतुर्थी
तस्या: ताभ्याम् ताभ्यः पंचमी
तस्या: तयो: तासाम् षष्ठी
तस्याम् तयो: तासु सप्तमी

यद् साठी वरीलप्रमाणेच, फक्त 'त' च्या जागी 'य' Happy
किम् साठी तद् प्रमाणेच
पुल्लिंगी -
कः कौ के
कम् कौ कान्...

नपुसकलिंगी
किम् के कानि..

स्त्रीलिंगी
का के का:...

आम्हाला शाळेत असताना गुर्जर नावाच्या बाई होत्या संस्कृत शिकवायला (तिन्ही वर्षे ८ ते १० वी, ५० मार्कांचे)
खरेतर मला खुप ईच्छा होती पुर्ण संस्कृत घेण्याची पण केवळ एक दोन विद्यार्थी होते त्यामुळे तसे करता आले नाही. टिमवीच्या चतुर्थीपर्यंतच्या परिक्षा दिल्या होत्या. पुढे संस्कृत स्पेशल घेऊन बीए, एमए करायचा विचार होता, पण प्रवाहाबरोबर वहात शास्त्रशाखेकडे गेलो. अजुनही खंत वाटते.

भाषासु मुख्या मधुरा, दिव्या गिर्वाण भारती |
तस्यां हि काव्यम् मधुरम्, तस्मादपि सुभाषितम् ||

भोजनान्तेच किम् पेयम्?
जयन्तः कस्य वै सुतः?
कथम् विष्णुपदम् प्रोक्तम्?
तक्रम्, शक्रस्य, दुर्लभम्|

>>
ह्यातली गोम कळलीय का कुणाला?

भरत, तुम्ही पूर्ण सुभाषित दिल्यावर मला आठवले हे! Happy

ही समस्यापूर्ती आहे. तक्रम् शक्रश्य दुर्लभम् अशी ओळ समस्यापूर्तीसाठी दिली गेली.
आता ताक इंद्राला दुर्लभ हे कसे काय होणार? तर तीन वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरे तक्रम् शक्रस्य दुर्लभम्

भोजनान्तेच किम् पेयम्?
जयन्तः कस्य वै सुतः?
कथम् विष्णुपदम् प्रोक्तम्?
तक्रम्, शक्रस्य, दुर्लभम्|

>>
ह्यातली गोम कळलीय का कुणाला? >> निंबे.. पहिल्या तिन्ही प्रश्नांची उत्तरं क्रमवार चौथ्या ओळीमध्ये दिल्येत.. (बराबर ना??) Happy

या पाणिग्रहलालिता सुसरला तन्वी सुवंशोद्भवा
गौरी स्पर्शसुखावहा गुणवती नित्यं मनोहारिणी ।
सा केनापि हृता तया विरहितो गन्तुम् न शक्नोम्यहम्
रे भिक्षो तव कामिनी न हि न हि प्राणप्रिया यष्टिका ॥

अर्थ

(भिक्षू म्हणतो) जिचे लग्नानंतर लाड केले आहेत, जी सरळ स्वभावाची, सडपातळ, चांगल्या घरातील, गोरी, स्पर्श सुखकारक आहे, गुणवान, जी नेहमी मन हिरावून घेते, अश्या तिला कोणीतरी पळवले आहे. तिच्याशिवाय मी कोठे जाऊ शकत नाही. (हे ऐकणारा विचारतो) अरे भिक्षू, तुझी बायको का? (भिक्षू म्हणतो) नाही नाही, माझी प्राणाहून प्रिय काठी.

टीप :-
हा छेकापन्हुती अलङकार होतो त्यात द्व्यर्थी शब्दयोजना करून उत्सुकता कवी ताणतो आणि नर्म विनोद असतो. सुभाषिताच्या पहिल्या दोन चरणांमध्ये दिलेली विशेषणे स्त्री आणि काठीला दोघींना लागू होतात. काठीसाठी - जिचे हातात घेऊन लाड केले आहे, सरळ आहे (वेडीवाकडी नाही), बारीक आहे, चांगल्या बांबूपासून बनवलेली आहे, पांढरी, गुळगुळीत, जिला दोरा लावला आहे आणि नेहमी जिचे आकर्षण वाटते अशी

आनंदयात्री, ते सः, तद आणि किम ची रुपे दिल्याबद्दल धन्यवाद. Happy

अजून एक प्रश्न आहे. संस्कृत मध्ये विसर्गचिन्ह लावलेल्या अक्षराचा उच्चार करण्याबाबत काय नियम आहे?

उदा. देवः चा उच्चार शाळेत आणि कुंटे मॅडमकडूनही देवहा असाच ऐकला आहे आणि शिकविला गेला आहे. तसेच देवा: चा उच्चार देवाSSSहा असा.

पण बरोबरीच्या काही मुली एका दुसर्‍या ताईकडे संस्कृत शिकायला जात असत. तिने बहुदा संस्कृत मध्ये एम.ए. करून संस्कृतच्या शिकवण्या चालू केल्या होत्या. तिने देवः चा उच्चार देवह करायचा असे शिकविले होते. थोडक्यात पूर्णतः उच्चार पूर्णतहा असा जो आपण करतो तो चूक आहे असे तिचे म्हणणे होते. स्वतः ला स्वतह पूर्णतः ला पूर्णतह... असे! हे बरोबर आहे का?

वरील तिन्ही प्रश्नांची उत्तरं एकाच वाक्यात देऊन, त्या शेवटच्या वाक्याचा अर्थही चमत्कारीक आहे हेच ना?
ही समस्यापूर्ती आहे. तक्रम् शक्रश्य दुर्लभम् अशी ओळ समस्यापूर्तीसाठी दिली गेली.
पहिल्या तिन्ही प्रश्नांची उत्तरं क्रमवार चौथ्या ओळीमध्ये दिल्येत.. (बराबर ना??)
समस्यापूर्तीचे उदाहरण आहे हे सुभाषित..
>>
Happy

सुभाषित लिहून त्याविषयीच्या खास गोष्टीही लिहित चलूया त्याच बरोबरीने!

एक अनुप्रास अलंकारातले सुभाषित होते मजेदार. त्यात असा उल्लेख होता की एक तरुणी डोक्यावर पाण्याचा हंडा घेऊन जिना उतरत असताना तिच्या हातातून तो हंडा निसटतो तेव्हा तो हंडा पायर्‍यांवरून गडगडत खाली जाताना 'ठा ठं ठ ठ ठं ....' असा आवाज होतो. सुभाषिताच्या दुसर्‍या ओळीत तर ही ठ ची बाराखडीच होती पूर्णपणे!

माझी बोटे मोडतील आता प्रयत्न करून >> कोणता एक्स्प्लोरर आहे?

Pages