२०१० मध्ये पहिल्यांदा हंगेरीला आलो तोपर्यंत ह्या देशाबद्दल 'पुर्वाश्रमीचा साम्यवादी देश' ह्यापलिकडे काहिही माहिती नव्हती. खरेतर मी हंगेरीला जाईन असे मला स्वप्नातसुद्धा आले नव्हते. मी 'कराड'मध्ये दीड वर्ष इन्फोसिससाठी एक प्रोजेक्ट करत होतो आणि ते संपल्यावर महिना-दोन महिने सुट्टीवर जायचे असा बेत आखत होतो. आणि अचानक एके दिवशी एकाने विचारले 'अरे हंगेरीत एक प्रोजेक्ट सुरु होणार आहे, जाणार काय?' आणि मी हो म्हणालो. बास. नोव्हेंबर २०१०च्या शेवटल्या आठवड्यात इथे आलो तो २०११ संपेपर्यंत इथेच होतो. आणि आता पुन्हा सप्टेंबर २०१२ला पुन्हा इथे आलोय. २०११ मध्येच चिनूक्सने हंगेरीवर काहितरी लिही असे सुचवले होते, ते काही जमले नाही. पण आता प्रयत्न करेन पुन्हा. असं नमनाला घडाभर तेल झालं असल्यामुळे सुरू करतो.
मी इथे राहतो त्या गावाचे नाव आहे Székesfehérvár - सेकेशफेहेरवार. पण अगदी मराठीतल्यासारखा उच्चार करू नका. त्या पहिल्या आणि तिसर्या e च्या डोक्यावर एक तिरकी रेघ दिसते आहे का? त्याचा अर्थ दीर्घ 'ए'. बिना रेघेचा e म्हणजे र्हस्व 'ए'. नुसता a म्हणजे ऑ आणि a च्या डोक्यावर रेघ असेल तर आ. आणि sz म्हणजे स आणि नुसता s म्हणजे श. म्हणुन Székesfehérvár म्हणजे सेSकेशफेहेSरवार. साधारण लाखभर लोकवस्तीचे हे शहर-गाव. बुडापेस्टपासून साठ किलोमीटरवर. सेकेश म्हणजे खुर्ची/सिंहासन, फेहेर म्हणजे पांढरं आणि वार म्हणजे किल्ला/महाल. सेकेशफेहेरवार - पांढर्या खुर्चीचा महाल Or 'The seat of the white castle'.
पण सेकेशफेहेरवारकडे वळण्याआधी हंगेरी बघू थोडासा. हंगेरीयन लोकं स्वतःला आणि स्वतःच्या देशाला हंगेरी म्हणत नाहीत. हंगेरीयन भाषेला हंगेरीयन मध्ये मॉज्यॉर म्हणतात आणि हंगेरीयन वंशाची लोकं म्हणजे पण मॉज्यॉर (ह्यातला ज्य चा उच्चार थोडा ग्य च्या अंगाने होतो). आणि हंगेरीचे नाव आहे मॉज्यॉरोर्साग. मध्य युरोपातला हा एक तसा मोठा देश - म्हणजे युरोपच्या मानाने हं. आकाराने बघितलेत तर महाराष्ट्राच्या एक तृतियांश आहे हा साधारण. म्हणजे मुंबई, नगर, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, कोकण आणि ह्याच्या मध्ये सातारा-पुणे असं डोळ्यासमोर आणा. साधारण तेव्हडा. हा देश कार्पेथियन बेसिन मध्ये आहे. बहुतकरून सर्व देश सपाट आहे. थोडीफार टेकाडं आहेत इकडे-तिकडे आणि उत्तर-पुर्वेला 'मात्रा' पर्वतरांगा थोड्याश्या उंच आहेत. पण सपाटीच जास्त सगळीकडे. आणि हंगेरीला समुद्र किनारा नाही. सगळीकडून जमिनच आहे. त्यामुळे बंदरे नाहीत. हंगेरीत मधोमध बालाटोन नावाचे एक तळे आहे. हे मध्ययुरोपातले सगळ्यात मोठे तळे. हंगेरीयन लोकांचे आवडते ठिकाण - ह्याला ते मजेनं आणि कौतुकानं हंगेरीयन समुद्र म्हणतात. हंगेरीतले तापमान तसे विचित्र आहे. हिवाळ्यात चांगले -१०, -१५ असते - विशेषकरून उत्तर-पुर्वेला युक्रेनवगैरेच्या बाजूला चांगले थंड असते. आणि उन्हाळ्यात ३० डिग्री अगदी सरसकट. आणि काही दिवस चांगले ३५-३६ डिग्रीपर्यंत तापतात. त्यामुळे तापमानाची पसरण ६० डिग्री एव्हडी आहे. बाकी युरोपात एव्हडा स्प्रेड नाही दिसणार.
बर्याच हंगेरीयनांच्या घरात एक जुना पुराणा पिवळसर नकाशा असतो. म्हणजे तो नवीन असला तरी त्याचा रंग नक्कीच पिवळसर असतो. हा अखंड हंगेरीचा नकाशा. आणि अखंड भारतासारखाच तो आता काल्पनिक मानायला हरकत नाही. झालं काय की साधारण १८व्या शतकापासून हंगेरी ऑस्ट्रियन साम्राज्याचा एक भाग होता. त्याला हॅब्जबर्ग मोनार्की म्हणतात. १८६७पासून हंगेरीला बरोबरीचा दर्जा देउन ऑस्ट्रो-हंगेरीयन साम्राज्याची स्थापना झाली. हंगेरीला स्वतःची पार्लमेंट मिळाली, हंगेरीयन राजाला बरोबरीचा दर्जा मिळाला. हॅब्जबर्ग ते पहिले महायुद्ध ह्या साधारण दोनशे-सव्वा दोनशे वर्षात हंगेरीची चांगली भरभराट झाली. पहिल्या महायुद्धाच्यापर्यंत ऑस्ट्रो-हंगेरीयन साम्राज्य युरोपातले सर्वात प्रबळ साम्राज्य होते. पण दुर्दैवाने पहिल्या महायुद्धात हंगेरी होता जर्मनी-ऑस्ट्रियाबरोबर. मग हारल्यावर युद्धाची भरपाई म्हणुन आणि पुन्हा उठून हंगेरीने प्रबळ होऊन युद्धखोर होऊ नये म्हणुन फ्रान्समध्ये वर्सायला 'ग्रॅन्ड ट्रायानॉन पॅलेस'मध्ये हंगेरीयनांना ट्रिटी ऑफ ट्रायानॉनवर सही करण्यास भाग पाडण्यात आले. ह्या करारानुसार युद्धाच्या आधीच्या हंगेरीयन साम्राज्यापैकी ७०% भूमी रोमेनिया, स्लोवाकिया, क्रोएशिया, सर्बिया ह्यांच्याकडे गेली. त्यांची लोकसंख्या ६४%ने कमी झाली - आणि ३१% हंगेरीयन वंशाची लोकं हंगेरीच्या बाहेर फेकली गेली. हंगेरीची बंदरे क्रोएशियाकडे गेली आणि सर्वात मोठ्या दहा शहरांपैकी पाच शहरे दुसर्या देशांना मिळाली. खरेतर पहिल्या महायुद्धात हंगेरी ओढला गेला आणि भौगोलिक आणि राजकीयदृष्ट्या त्यांना जर्मनी-ऑस्ट्रियाबरोबर जाण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. पण जर्मनी-ऑस्ट्रियाच्या तुलनेत हंगेरीला जबर शिक्षा मिळाली. हंगेरीयन हे दु:ख आजवर विसरले नाहीत. भरीस भर म्हणुन दुसर्या महायुद्धात पुन्हा हंगेरी शत्रुराष्ट्रांबरोबर. दुसरं महायुद्ध संपल्यावर झालेल्या भांडवलशाही आणि साम्यवादी साठमारीत ऑस्ट्रिया नशीबवान ठरून पश्चिम युरोपच्या पदरात पडला आणि मार्शलप्लॅनच्या मदतीने पुन्हा श्रीमंत झाला. हंगेरी मात्र दुर्दैवाने सोव्हिएत रशियाच्या हातात पडला आणि १९८९ पर्यंत वाढायचा थांबला. ९ नोव्हेंबर १९८९ ला बर्लिनची भिंत पडली आणि हंगेरीयन पुन्हा खुश झाले.
छान लिहितोयस, उच्चाराच्या
छान लिहितोयस,
उच्चाराच्या बाबतीत माझी कायमचीच बोंब आहे , अरनॉल्ड्चं आडनाव उच्चारताना आजही जीभेला वेटोळे पडतात
अश्या हटके देशांची माहिती
अश्या हटके देशांची माहिती व्हायला हवीच. पटापट येऊ देत भाग, फोटोंसह.
हंगेरीचा हा इतिहास माहित
हंगेरीचा हा इतिहास माहित नव्हता. छान लिहीलय. पु. लं. चा हंगेरी- माझा नवा मित्र हा लेख आठवतोय.
पुढचा भाग लवकर येऊ दे.
टण्या, उत्तम माहिती! विकी
टण्या,
उत्तम माहिती! विकी म्हणतं की हंगेरीचा सुप्रसिद्ध राजा अर्पाद हा अतिला हूणाचा वंशज मानला गेलाय. खखोदेजा!
एक रंजक विधान : http://www.abovetopsecret.com/forum/thread55255/pg1#pid588139
तुमच्याकडून अधिक वाचायला आवडेल. पु.भा.प्र.
आ.न.,
-गा.पै.
सुरुवात चांगली झालीये. फोटोही
सुरुवात चांगली झालीये. फोटोही येऊ देत.
छान.. (वारी पण पुर्ण करायचं
छान..
(वारी पण पुर्ण करायचं बघा की, प्लीज)
सुंदर सुरवात आहे. अजुन
सुंदर सुरवात आहे. अजुन येऊद्या.
वा! पाहिल्या पाहिल्या त्वरित
वा!
पाहिल्या पाहिल्या त्वरित क्लिक करून वाचायला सुरूवात करावी अशी एक नवीन लेखमालिका सुरू झालेली आहे. प्रत्येक भागाची उत्सुकतेनं वाट पाहिली जाईलच, कारण अर्थातच हंगेरीबद्दल जाणून घ्यायला आवडेल.
मॉज्यॉर >>> नुकताच एका इंग्रजी पुस्तकात हा शब्द वाचनात आला. (तिथे तो Magyar असा लिहिलेला होता.) त्याचा खरा उच्चार आत्ता कळला.
मस्त सुरुवात. फोटू टाका की..
मस्त सुरुवात. फोटू टाका की..
रंजक माहिती! फोटोही पाहायला
रंजक माहिती! फोटोही पाहायला आवडतील.
छान सुरवात.
छान सुरवात.
(No subject)
चांगली सुरूवात!
चांगली सुरूवात!
मस्त सुरवात. पुढचेही भाग
मस्त सुरवात.
पुढचेही भाग वाचायची उत्सुकता आहे.
मस्त. अजून वाचायला आवडेल
मस्त. अजून वाचायला आवडेल
छान... अजुन येउदे.
छान... अजुन येउदे.
अटिला बद्दल पण लिहि रे नक्की
अटिला बद्दल पण लिहि रे नक्की टण्या. हंगेरी म्हटले कि अॅटिला आलाच पाहिजे समोर.
वाचते आहे. (अजून 'माहिती'च
वाचते आहे. (अजून 'माहिती'च येते आहे. 'टण्या टच'च्या प्रतीक्षेत. )
छान!
छान!
(No subject)
टण्याने अशी मुक्तपिठीय
टण्याने अशी मुक्तपिठीय सुरुवात का केलीये लेखाची ?
हंगेरीबद्दल फार माहिती नाही. तसं पण ज्या-त्या ठिकाणी राहून फर्स्ट हँड अनुभव वाचायला जास्त आवडतं. तेव्हा पुढील भागांच्या प्रतिक्षेत. हंगेरीची वारी करु नकोस पण.
हंगेरीची वारी करु नकोस पण.>>>
हंगेरीची वारी करु नकोस पण.>>> +१
हंगेरीची वारी करु नकोस पण.>>
हंगेरीची वारी करु नकोस पण.>> +१.