हेअर पीन क्रोशे स्टोल

Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 13 January, 2013 - 23:39

हा थोडा वेगळा प्रकार. हेअर पीन वर आधी अशा शेंगा विणून घेतल्या

DSC02018.JPG

जितकी लांबी स्टोलची हवी तेवढ्या लांब केल्या.

DSC02019.JPG

मग त्या एकमेकांना जोडल्या.

DSC02022.JPG

मग सगळ्या रंगांच्या शेंगा जोडल्यावर त्याला बॉर्डर केली.

DSC02026.JPG

तयार झालेला स्टोल Happy

DSC02028.JPGDSC02029.JPG

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त Happy

जयश्रीताई खूप धन्यवाद, तुमच्यामूळे क्रोशाची आवड अजून निर्माण झाली. शाळेत थोड शिकलि होती त्याचा आता उपयोग होत आहे. Happy
तसली पिन आहे पण शोधावी लागेल कोणत्या घरी आहे ते. Uhoh

जयु."यु"पिन चा स्टोल आवडला..मी अशी शॉल विणली होती.पिस्ता कलरची .अगदी बारीक लोकर घेतली होती.चारी बाजुला मुखर्‍या घातल्या होत्या.खुपच नाजुक मस्त शॉल झाली होती.उरलेल्या लोकरीतुन १०८मोती ओवुन त्याचा बटवा दोन सुयांवर केला होता.ती आठवण झाली..धन्स गं !!!

मस्तच. किती सफाई आहे ग तुझ्या हातात. ते पिसेस कसे आणि कुठे जोडले आहेत ते अजिबात कळत नाही.

सुलेखा, शालीसाठीपण असेच पिसेस करून घेतले होते का?

मनापासून धन्यवाद लोक्स Happy सध्या क्रोशेशिवाय काही सुचत नाहीये......:)

सुलेखा.....क्या बात है Happy शाल विणलीस म्हणजे लई भारी यार !! मोती घालून केलेला बटवा पण सही दिसत असेल ना..!

साती शेंगा जोडणं अगदी सोप्पंय.

दोन शेंगा घ्या. अगदी खालपासून सुरवात करायची. एका शेंगेंच्या २ कळ्या आणि नंतर दुसर्‍या शेंगेच्या दोन कळ्या सुईवर घ्यायच्या आणि आधीच्या कळ्या नंतरच्या कळ्यांमधून ओढून घ्यायच्या. मग पुन्हा पहिल्या शेंगेच्या दोन कळ्या सुईवर घेऊन आधीच्या दोन ओढून घ्यायच्या असं करत करत वर वर जायचं. एकदा करायला हातात घेतल्या की कळेल नक्की.

आकाशा मी आणखी एखादा व्हिडियो मिळतो का बघते.

तुम्ही क्रोशाच वेड सर्वांना लावत आहात अशा सुंदर कलाकृती दाखवून. Happy
मला ती यू पीन मिळाली. तुमचा व्हिडिओचा प्रतिसाद आल्यावर अजून प्रेरणा मिळाली पिन शोधायला. Happy घरून निघायला एक तास बाकी होता त्यात शोधा शोध केली आणि मिळाली एकदाची.
आता ह्या विकएन्डला शिकणार.

आकांक्षा.....हा व्हिडियो बघ ........यावरुन तुला नक्की कळेल....... शेंगा कशा विणायच्या.

http://www.youtube.com/watch?v=BoCvWnbsTmE

हा आणखी

http://www.youtube.com/watch?v=u6j-fuxuP54