Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 13 January, 2013 - 23:39
हा थोडा वेगळा प्रकार. हेअर पीन वर आधी अशा शेंगा विणून घेतल्या
जितकी लांबी स्टोलची हवी तेवढ्या लांब केल्या.
मग त्या एकमेकांना जोडल्या.
मग सगळ्या रंगांच्या शेंगा जोडल्यावर त्याला बॉर्डर केली.
तयार झालेला स्टोल
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्तच
मस्तच
सुंदर!
सुंदर!
मस्त
मस्त
खुपच सुंदर
खुपच सुंदर
मस्त मस्त मस्त मस्त..
मस्त मस्त मस्त मस्त..
खूपच छान आहे. एक स्टेप दाखवाल
खूपच छान आहे. एक स्टेप दाखवाल का??
खूप खूप धन्यवाद आरती....ही
खूप खूप धन्यवाद
आरती....ही लिंक बघ यावरुन तुला कल्पना येईल.
http://www.youtube.com/watch?v=exkDF2oiPR8
जयश्रीताई खूप धन्यवाद,
जयश्रीताई खूप धन्यवाद, तुमच्यामूळे क्रोशाची आवड अजून निर्माण झाली. शाळेत थोड शिकलि होती त्याचा आता उपयोग होत आहे.
तसली पिन आहे पण शोधावी लागेल कोणत्या घरी आहे ते.
जयु."यु"पिन चा स्टोल
जयु."यु"पिन चा स्टोल आवडला..मी अशी शॉल विणली होती.पिस्ता कलरची .अगदी बारीक लोकर घेतली होती.चारी बाजुला मुखर्या घातल्या होत्या.खुपच नाजुक मस्त शॉल झाली होती.उरलेल्या लोकरीतुन १०८मोती ओवुन त्याचा बटवा दोन सुयांवर केला होता.ती आठवण झाली..धन्स गं !!!
मस्तच. किती सफाई आहे ग तुझ्या
मस्तच. किती सफाई आहे ग तुझ्या हातात. ते पिसेस कसे आणि कुठे जोडले आहेत ते अजिबात कळत नाही.
सुलेखा, शालीसाठीपण असेच पिसेस करून घेतले होते का?
डिझाईन तर फारच छान रंग पण
डिझाईन तर फारच छान रंग पण मस्तच आणि काम नेहमीप्रमाणे सफाईदार
वॉव मस्तच!!!!
वॉव मस्तच!!!!
सुरेख
सुरेख
मस्त झालाय.
मस्त झालाय.
हे मस्तय करून बघेन नक्की
हे मस्तय करून बघेन नक्की
खूपच छान झाला आहे स्टोल. एकदम
खूपच छान झाला आहे स्टोल. एकदम सफाईदार काम आहे तुमचं.
ते पिसेस कसे जोडले त्याचा एखादा व्हीडीओ आहे का?
खूपच छान. करून बघावेसे
खूपच छान. करून बघावेसे वाटतेय.
हा प्रकार मस्त आहे. मला कलर
हा प्रकार मस्त आहे. मला कलर कॉम्बो खूप नाही आवडलं पण तुमच्या कलेला दाद.
मनापासून धन्यवाद लोक्स
मनापासून धन्यवाद लोक्स सध्या क्रोशेशिवाय काही सुचत नाहीये......:)
सुलेखा.....क्या बात है शाल विणलीस म्हणजे लई भारी यार !! मोती घालून केलेला बटवा पण सही दिसत असेल ना..!
छान, ती विण कशी घालायची ते
छान,
ती विण कशी घालायची ते जरा स्टेप बाय स्टेप सांगा. व्हीडीओ वरुन नीट कळत नाही.
त्या शेंगा जोडायच्या कशा त्या
त्या शेंगा जोडायच्या कशा त्या शिकाशिकवा.
साती शेंगा जोडणं अगदी
साती शेंगा जोडणं अगदी सोप्पंय.
दोन शेंगा घ्या. अगदी खालपासून सुरवात करायची. एका शेंगेंच्या २ कळ्या आणि नंतर दुसर्या शेंगेच्या दोन कळ्या सुईवर घ्यायच्या आणि आधीच्या कळ्या नंतरच्या कळ्यांमधून ओढून घ्यायच्या. मग पुन्हा पहिल्या शेंगेच्या दोन कळ्या सुईवर घेऊन आधीच्या दोन ओढून घ्यायच्या असं करत करत वर वर जायचं. एकदा करायला हातात घेतल्या की कळेल नक्की.
आकाशा मी आणखी एखादा व्हिडियो मिळतो का बघते.
साती हा व्हिडियो
साती हा व्हिडियो बघ......शेंगा जोडायचा.
http://www.youtube.com/watch?v=4MMmi20o7mw
तुम्ही क्रोशाच वेड सर्वांना
तुम्ही क्रोशाच वेड सर्वांना लावत आहात अशा सुंदर कलाकृती दाखवून.
मला ती यू पीन मिळाली. तुमचा व्हिडिओचा प्रतिसाद आल्यावर अजून प्रेरणा मिळाली पिन शोधायला. घरून निघायला एक तास बाकी होता त्यात शोधा शोध केली आणि मिळाली एकदाची.
आता ह्या विकएन्डला शिकणार.
आकांक्षा.....हा व्हिडियो बघ
आकांक्षा.....हा व्हिडियो बघ ........यावरुन तुला नक्की कळेल....... शेंगा कशा विणायच्या.
http://www.youtube.com/watch?v=BoCvWnbsTmE
हा आणखी
http://www.youtube.com/watch?v=u6j-fuxuP54