काय झालं..? ....... काही कळत नाहीये...
काही भांडण वगैरे?..... नाही नाही.. किती सारखे होतो (म्हणजे आहोत) आपण ..
काही गैरसमज? .... गैरसमज.. आणि आपल्यात? शक्यच नाहीये..
मग आठवणच यायची बंद झाली का?.. तसंही नाही. रोज नाही पण बरेचदा येतच असते की आठवण..
मग इंटरेस्ट च कमी झाला नाही?... तसं काही झालं असतं तर कशाला एकमेकांना इतक्यांदा साद घातली असती?
मग नक्की झालं तरी काय?
तेच तर कळत नाहीये ना..
आपण कायमच खूप समजून घेतलं ना एकमेकांना?
कधी मी साद घातली तर तू व्यस्त..
कधी तुझ्या हाकेला नेमकी मी व्यस्त..
तरी कधी राग नाही आला..
"काहीतरी महत्वाचं काम असल्याशिवाय तू असं करणार नाहीस.."
दोघांनाही ही खात्री..
असा कितीतरी काळ लोटून गेलाय मध्ये..
न भेटता.. न बोलताच..
तुझ्या माझ्यातल्या या अमर्याद अंतरभर आता फक्त समजूतदारपणाच उरलाय..
आणि म्हणूनच कदाचित हे अंतर पार करणं अशक्य आहे आपल्याला..
समजूतदारपणा..
Submitted by मी मुक्ता.. on 13 January, 2013 - 23:34
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
शेवट आवडला. असे होते खरे.
शेवट आवडला. असे होते खरे. अचूक पकडले गेल्यासारखे वाटले कोणतेतरी सूक्ष्म भाव. थेट लिहिलेले आहे. कविता म्हणून स्वीकारायला किंचित जड जात आहे, हे निव्वळ आकृतीबंधामुळे नव्हे तर विचारांच्या थेट व मोजून मापून केलेल्या मांडणीमुळेही.
चु भु द्या घ्या
-'बेफिकीर'!
बेफी + १
बेफी + १
वा. कविता आवडली.
वा.
कविता आवडली.
थेट एकदम आणि अजून! ह्म्म!
थेट एकदम आणि अजून!
ह्म्म! समजूतदारपणाचं हे अंतरच रोखून धरतं!
मस्त मस्त.
मस्त मस्त.
मस्त
मस्त
>>कधी मी साद घातली तर तू
>>कधी मी साद घातली तर तू व्यस्त..
कधी तुझ्या हाकेला नेमकी मी व्यस्त..
तरी कधी राग नाही आला..
"काहीतरी महत्वाचं काम असल्याशिवाय तू असं करणार नाहीस.."
दोघांनाही ही खात्री..
असा कितीतरी काळ लोटून गेलाय मध्ये..
न भेटता.. न बोलताच..
तुझ्या माझ्यातल्या या अमर्याद अंतरभर
आता फक्त समजूतदारपणाच उरलाय..
आणि म्हणूनच कदाचित
हे अंतर पार करणं अशक्य आहे आपल्याला>>>>
एवढ्या भागात ते कवितापण आहे ना,उरलेले मुक्तक चिंतनच , काव्यमय..ले.शु.
सर्वांचे आभार.. बिफिकीर,
सर्वांचे आभार..
बिफिकीर, बागेश्री,
ह्म्म... खरय..
भारती,
you said it...!
मस्त!
मस्त!
आवडली ,भारतीजी शी सहमत .
आवडली ,भारतीजी शी सहमत .
छान
छान
आवडली...पटलीही !
आवडली...पटलीही !
अगदी समर्पक वाटले..... आवडले
अगदी समर्पक वाटले..... आवडले
मस्त
मस्त
काहीप्रमाणात बेफीजी व
काहीप्रमाणात बेफीजी व काहीप्रमाणात भारतीताईंशी सहमत
आवडली
बागेश्रीचीच कविता वाचतोय असे वाटत होते नंतर पुन्हा नाव वाचले तर मी मुक्ता!
असो
सर्व नवीन प्रतिसादकांचे खूप
सर्व नवीन प्रतिसादकांचे खूप आभार..
वैभव,
हो.. आमची पद्धत बर्यापैकी सारखी आहे..