Submitted by मुग्धमानसी on 14 January, 2013 - 00:03
अंगभर ल्या वस्त्र अन् झाका म्हणे ही नग्नता,
मी कशी समजून घेऊ ही अडाणी सभ्यता?
पाट ओल्या वासनांचे वाहती चहुबाजूनी
काय मी माझी जपावी कोरडी सौजन्यता?
जन्म का झाला तीचा येथून रण होते सुरू
साकडे देवीचपाशी घालते निर्लज्जता!
वाघ आम्ही पाळलेले चार भिंतींतून हे
तेच ते सैतान झाले उंबरा ओलांडता!
तीव्रता माझ्या मनाची व्यक्त करता येईना
कधीही उल्कापात व्हावी अक्षरांतील सौम्यता.
मी कुठे लपवून ठेवू गं तुला माझ्या पिला
पंख माझे तोकडे अन् भाबडी वात्सल्यता...
सुसंस्कृतांनो या इथे घेऊन चिंध्या फाटक्या
आज झाकायाची आहे संस्कृतीची भग्नता!
या इथे रोवून टाका दगड मैलाचा कुणी...
यापुढे पेरील वाटा 'त्या' कळ्यांची अस्मिता!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुंदर...
सुंदर...
भावना पोचल्या. धन्यवाद.
भावना पोचल्या.
धन्यवाद.
समीरशी सहमत.
समीरशी सहमत.
भावना खरेतर पोचायला अवघड
भावना खरेतर पोचायला अवघड आहेत... तरिही खरोखर पोचल्या असतील तर हार्दिक अभिनंदन!