कधी वाटतं....

Submitted by प्रकाश काळेल on 8 May, 2009 - 13:41

कधी वाटतं,
कविता लिहावी
कल्पकतेनं माझ्या, रसिकांच्या मनाची तार छेडावी
पण जर उमगलंच नाही कुणाला
आणि कुणी माझाच तंबोरा फोडला तर.... ?
मग मी आवरतं घेतो !

कधी वाटतं,
कथा लिहावी
व्यथा दडलेली,कुणा नडलेली ...बाजारात मांडावी
पण त्यातलं पात्र म्हणजे, मीच वाटलो कुणाला
आणि कुणी माझीच कानउघाडणी केली तर....?
मग मी आवरतं घेतो !

कधी वाटतं,
विनोदी लिहावं
मी हसलो,कसा फसलो,..हे लोकां सांगावं
पण त्यात हास्यास्पद वाटलंच नाही कुणाला
आणि कुणी मलाच बुकलून रडवलं तर....?
मग मी आवरतं घेतो !

कधी वाटतं,
ललित लिहावं
थोडक्यातच का होइना...मला आवडलेलं मांडावं
झालाच तर कुण्या विचारवंताशी संवाद साधावा
पण संवादाच्या पोटी वादच जन्मला तर..?
मग मी आवरतं घेतो !

कधी वाटतं
भुतकथा लिहावी
दुष्टावर सुष्टाचा विजय दाखवुन अंधश्रध्दा दुर करावी
कुण्या वाचकाला माझं तंत्र आवडलं नाही
आणि त्यानं मांत्रिकाच्या मदतीने, मझ्यावरच करणी केली तर....?
मग मी आवरतं घेतो !

कधी वाटतं
प्रवासवर्णन लिहावं
जग किती सुंदर आणि अजब आहे, ही अनुभुती वाटावी
कुण्या खवचट वाचकाला ते नाही रुचलं
आणि "तु रे कशाला तिकडं कडमडलांस?", विचारलं तर....?
मग मी आवरतं घेतो !

कधी वाटतं
गावरानी लिहावं
आपल्या मातीचा उत्कट गंध पसरावा
रांगडी असली तरी "आपली माणसं", त्यांचा परिचय द्यावा
पण कुणी मलाच 'गावंढळ कुठचा!', म्हणुन दगडं मारली तर...?
मग मी आवरतं घेतो!

कधी वाटतं,
कला दाखवावी
कौशल्य पणाला लावून स्वनिर्मीतीची होडी सागरात सोडावी
पण बांधणी मजबूत नाही म्हणुन, कुणी ती बुडवली तर...?
मग मी आवरतं घेतो !

कधी वाटतं
चर्चा करावी
दिवस आधी कि रात्र?,कोंबडी आधी कि अंडं?
यासारख्या निरर्थ प्रश्नांची उत्तरे शोधत ती चर्चा रंगवावी
पण चर्चा सोडुन माझ्याविरुध्द मोर्चा वळला तर.....?
मग मी आवरतं घेतो !

कधी वाटतं,
राहूदे सगळं
प्रामाणिक दाद द्यावी
मत तरी मांडावं, पटलं असेल तर हो, नाही तर नाही म्हणावं !
पण कुणाला माझं पटलं नाही , आणि माझेच पाय ओढले तर...?
मग मी आवरतं घेतो !

कधी वाटतं
मैत्री करावी
दु:खे हलकी करावी अन आनंद द्विगुणीत करावे
पण कोण असेल सावजांच्याच सदैव शोधात
म्हणाला 'चल दोस्तीत खेळूया एक कुस्ती ' , तर...?
मग मी आवरतं घेतो !

कधी वाटतं
कंपू बनवावा
तुझं कसं?माझं असं!हे बाबा असंच!.. बोलून परिचय वाढवावा
पण कंपूतली जनता माझ्या खांद्यावर बंदुक ठेवुन चालवू लागली
आणि माझा खांदा(किंवा मलाच) निकामी केला तर....?
मग मी आवरतं घेतो !

कधी वाटतं
मायावी रुप घ्यावं
कात टाकलेला साप होउन कडकडून चावावं
नडलेल्या सापावर मुंगुस होउन ,तोंडसुख घ्यावं
पण माझे खरे रूप, मीच हरवून बसलो तर ...?
मग मी आवरतं घेतो!

कधी वाटतं
माझा मी व्हावं
माझ्या असण्याला अर्थ नसला तरि नसण्याची पोकळी मिटवावी
कधी अकस्मात गेलो ....निरोप न घेता....तरी
कुणी एवढंतरी म्हणेल, "तो एक महाभाग होता रे !"
मग मी अनावर होतो...आणि बेछूट सुटतो !
-----------------------------------------------------------
प्रकाश

गुलमोहर: 

कधी वाटतं
आता आवरतं घ्यावं
मनाच्या लहरींना मनातच कोंडावं
वाटलच कधी तर स्वतःशीच भांडावं
पण मग वाटतं...
भांडणंच अनावर झालं तर?
मग मी बेछुट सुटतो...
नवनव्या वाटा शोधायला लागतो
अनावर शोधमोहिमेत स्वतःलाच हरवतो
तेव्हा लक्षात येतं की अरे....
चुकलोच की !
मागेच आवरतं घ्यायला हवं होतं !

____________________________________________

मी मायबोलीकर !!
http://maagevalunpahataana.blogspot.com/

वार्‍याची बात !
वार्‍यावरची नाही !! ---
" भन्नाट. "

हे सर्व मिळून एकत्र लिहावे ही विनंती करून..
..सुसंगती सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो..

आवरतं घेणार्‍यांनो, आणखी येऊ द्या.
मी मात्र आवरतं घेतो.

सर्वांच्या प्रतिसादांबद्दल अनेक आभार.

कवितेत मला सुचतील तसे बदल केले आहेत आणि ती योग्य(मला वाटलेल्या) ठिकाणी हलविली आहे.

कांही कडवी, खूप कडवी झाल्यामुळे बदलली/काढली आहेत.

राहिलेल्यात गोड मानुन घ्याल अशी अपेक्षा ! Happy

(शोनू, धन्यवाद. कविता युनीव्हर्सली अ‍ॅप्लीकेबल बनवायच्या इनडायरेक्ट सल्ल्याबद्दल!
कोणाला दुखावले असेल तर क्षमस्व !)

प्रकाश

प्रकाश क्या बात है ! खुप छान.

नेहमीसारखीच इतर साहित्याच्या गडबडीत एवढी सुंदर रचना वाचायची राहुन गेली होती..काय मस्त लिहीलंय प्रकाशजी..आणी स्गळे प्रतिसादही एकदम भारी...दिलसे...:)

*******************
सुमेधा पुनकर Happy
*******************

हे हे हे.. आवरत घेत उधळलेल्यांनो.. गम्मत लै भारी हे! कड्डक! Proud

नको नको, असले विचारही मनात आणु नकोस. सगळेजण असा विचार करुन आवरते घ्यायला लागले, तर मायबोली आवरती घ्यावी लागेल.. Happy


कधी वाटतं
माझा मी व्हावं
माझ्या असण्याला अर्थ नसला तरि नसण्याची पोकळी मिटवावी

खुप सुंदर..

*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...

धन्यवाद सर्वांचे ! Happy

°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
~ प्रकाश ~ GET CONNECTED

Pages