कधी वाटतं,
कविता लिहावी
कल्पकतेनं माझ्या, रसिकांच्या मनाची तार छेडावी
पण जर उमगलंच नाही कुणाला
आणि कुणी माझाच तंबोरा फोडला तर.... ?
मग मी आवरतं घेतो !
कधी वाटतं,
कथा लिहावी
व्यथा दडलेली,कुणा नडलेली ...बाजारात मांडावी
पण त्यातलं पात्र म्हणजे, मीच वाटलो कुणाला
आणि कुणी माझीच कानउघाडणी केली तर....?
मग मी आवरतं घेतो !
कधी वाटतं,
विनोदी लिहावं
मी हसलो,कसा फसलो,..हे लोकां सांगावं
पण त्यात हास्यास्पद वाटलंच नाही कुणाला
आणि कुणी मलाच बुकलून रडवलं तर....?
मग मी आवरतं घेतो !
कधी वाटतं,
ललित लिहावं
थोडक्यातच का होइना...मला आवडलेलं मांडावं
झालाच तर कुण्या विचारवंताशी संवाद साधावा
पण संवादाच्या पोटी वादच जन्मला तर..?
मग मी आवरतं घेतो !
कधी वाटतं
भुतकथा लिहावी
दुष्टावर सुष्टाचा विजय दाखवुन अंधश्रध्दा दुर करावी
कुण्या वाचकाला माझं तंत्र आवडलं नाही
आणि त्यानं मांत्रिकाच्या मदतीने, मझ्यावरच करणी केली तर....?
मग मी आवरतं घेतो !
कधी वाटतं
प्रवासवर्णन लिहावं
जग किती सुंदर आणि अजब आहे, ही अनुभुती वाटावी
कुण्या खवचट वाचकाला ते नाही रुचलं
आणि "तु रे कशाला तिकडं कडमडलांस?", विचारलं तर....?
मग मी आवरतं घेतो !
कधी वाटतं
गावरानी लिहावं
आपल्या मातीचा उत्कट गंध पसरावा
रांगडी असली तरी "आपली माणसं", त्यांचा परिचय द्यावा
पण कुणी मलाच 'गावंढळ कुठचा!', म्हणुन दगडं मारली तर...?
मग मी आवरतं घेतो!
कधी वाटतं,
कला दाखवावी
कौशल्य पणाला लावून स्वनिर्मीतीची होडी सागरात सोडावी
पण बांधणी मजबूत नाही म्हणुन, कुणी ती बुडवली तर...?
मग मी आवरतं घेतो !
कधी वाटतं
चर्चा करावी
दिवस आधी कि रात्र?,कोंबडी आधी कि अंडं?
यासारख्या निरर्थ प्रश्नांची उत्तरे शोधत ती चर्चा रंगवावी
पण चर्चा सोडुन माझ्याविरुध्द मोर्चा वळला तर.....?
मग मी आवरतं घेतो !
कधी वाटतं,
राहूदे सगळं
प्रामाणिक दाद द्यावी
मत तरी मांडावं, पटलं असेल तर हो, नाही तर नाही म्हणावं !
पण कुणाला माझं पटलं नाही , आणि माझेच पाय ओढले तर...?
मग मी आवरतं घेतो !
कधी वाटतं
मैत्री करावी
दु:खे हलकी करावी अन आनंद द्विगुणीत करावे
पण कोण असेल सावजांच्याच सदैव शोधात
म्हणाला 'चल दोस्तीत खेळूया एक कुस्ती ' , तर...?
मग मी आवरतं घेतो !
कधी वाटतं
कंपू बनवावा
तुझं कसं?माझं असं!हे बाबा असंच!.. बोलून परिचय वाढवावा
पण कंपूतली जनता माझ्या खांद्यावर बंदुक ठेवुन चालवू लागली
आणि माझा खांदा(किंवा मलाच) निकामी केला तर....?
मग मी आवरतं घेतो !
कधी वाटतं
मायावी रुप घ्यावं
कात टाकलेला साप होउन कडकडून चावावं
नडलेल्या सापावर मुंगुस होउन ,तोंडसुख घ्यावं
पण माझे खरे रूप, मीच हरवून बसलो तर ...?
मग मी आवरतं घेतो!
कधी वाटतं
माझा मी व्हावं
माझ्या असण्याला अर्थ नसला तरि नसण्याची पोकळी मिटवावी
कधी अकस्मात गेलो ....निरोप न घेता....तरी
कुणी एवढंतरी म्हणेल, "तो एक महाभाग होता रे !"
मग मी अनावर होतो...आणि बेछूट सुटतो !
-----------------------------------------------------------
प्रकाश
भारी आहे.
भारी आहे. लिहा अजुन.....
रुयामः- "वाटलं तसं" : @ watla-tasa.blogspot.com/
प्रामाणिक
प्रामाणिक प्रतिसाद लिहायचा होता पण मी आवरतं घेतो.
प्रकाश,
प्रकाश, अतिउत्तम. एकदम 'हाण तीच्या मारी' कविता आहे. शॉल्लीड बॉस.
चिमण्या...>> प्रामाणिक प्रतिसाद लिहायचा होता पण मी आवरतं घेतो>> लई भारी. जीयो.
मस्त रे
मस्त रे
~~~~~~
इथे डोकवा. http://jayavi.wordpress.com/
आणि कविता.... इथे http://maajhime.blogspot.com/
कधी
कधी वाटतं,
विपूत जावं (कुणाच्याही)
चार ओळीत का होईना... विषयाला धरून बोलावं
भावनांची चुल पेटवायला वेदनांच्या समिधा घ्याव्या
पण परवानगीशिवाय आत का आलो असं त्याला वाटलं तर..?
मग मी आवरतं घेतो !
.........................................................................................................................
http://kautukaachebol.blogspot.com/
,
,
कौतुक, लई
कौतुक, लई भारी!!!
कधी वाटतं,
वैचारीक लिहावं, विचार प्रवर्तक लिहावं
आपले विचार परखडपणे मांडावेत,
समाजात खटकणार्या गोष्टींविषयी लिहावे,
मग वाटते जाउ दे, कुणी आपल्यालाच खटकवलं तर?
अर्थाचा अनर्थ केला तर?
वादाशी वाद घातला तर?
आणि मग मी आवरतं घेते.
ही ही
ही ही मस्तच लिहीलय
------------------------
देवा तुझे किती सुंदर आकाश
सुंदर प्रकाश सूर्य देतो
कधी
कधी वाटतं,
राहूदे सगळं
प्रामाणिक प्रतिसाद लिहावा
आपले मत तरी मांडावं,दिवा द्यावा,अनुमोदन करावं
पण कुणाला पटलं नाही , कुणी माझेच पाय ओढले तर...?
मग मी आवरतं घेतो !
आवरतं घेतो
प्रकाश
प्रकाश लांबवली असते तरी चालले असते..:) अजुन बरच काही लिहावस वाटतय पण आता आवरत घेते..;)
प्रकाश, लै
प्रकाश, लै लै भारी. चिमण्या :D:-D
.............................................................................
किती पायी लागू तुझ्या
किती आठवू गा तुते
किती शब्द बनवू गा
अब्द अब्द मनी येते (मर्ढेकर)
भावना
भावना अनावर होउन प्रतिसाद दिला त्यांचे आणि ज्यांनी वाचून काही कारणाने आवरतं घेतलं त्यांचेही मनापासुन आभार!
कौतुक,वर्षा तुमचे खास आभार
प्रकाश..
प्रकाश.. मस्तच !!
.
.
क्या बात
क्या बात है! लवकर आवरत घेतलस..:)
------- हे
-------
हे ऐकलेत का? मराठी गझल इ-मुशायरा
काही काही
काही काही कडवी विषेश आवडली. कुठली ते सांगवासं वाटतं पण मी आवरतं घेते.
प्रकाश
प्रकाश मस्त. वेगळा विषय, छान मांडणी , पण तु आवरत जरा आवरत घे
कविता खूप
कविता खूप छान मस्त . भन्नाट कल्पना आणि शब्दरचना. काहीच्या काही मुळीच नाही.
माझे उलटे मत..
कधी वाटते नको ती मायबोली
उगाचच कुणाची उणीदेणी
पण प्रामाणिक मत मनांतच राहिले तर,,
काहीच्या काही सारखेच घडले तर..
आणि निंदकाचे घर दूर गेले तर..
मग मी वाहावतच राहतो
आणि जरासं सावरून घेतो
..सुसंगती सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो..
प्रकाश..भन्
प्रकाश..भन्नाट!
================
बस एवढंच!!
पहिली पाच
पहिली पाच कडवी खास जमली आहेत. शेवटच्या कडव्यांना मायबोलीचा (किंवा इतर संकेतस्थळांचा ) संदर्भ आहेत. पहिली पाच मात्र युनिव्हर्सिली अॅप्लिकेबल आहेत .
प्रकाश,
प्रकाश, आवरतं घेतोस पण किती? आवरुन ठेवतोस कुठे बाबा?
कधी
कधी वाटतं
आपणही थोडं बोलावं
बोलताना अलगद शुन्यात शिरावं
शुन्याशी खेळताना, आयुष्याचं गणित विसरावं
पण मग वाटतं...जगणंच विसरलं तर?
मग मी आवरतं घेतो!
प्रकाश, खुप छान आहे रे हे, असंच लिहीत राहा कायम. पुलेशु !!
____________________________________________
मी मायबोलीकर !!
http://maagevalunpahataana.blogspot.com/
विशाल मस्त
विशाल मस्त एकदम
वर्षे,
वर्षे, तुझं आवरतं घेणं मनाला जास्त भावलं
____________________________________________
मी मायबोलीकर !!
http://maagevalunpahataana.blogspot.com/
सर्वांचे
सर्वांचे धन्यवाद !
अलका,विशाल
पल्ली
खूपच
खूपच छान
मग मात्र आवरण्याचाच ऊबग येतो
आवरण्यावरचं आवरणच मी फाडतो
अन ऊफाळलेल्या कारंज्यागत
थुई थुई माझं कवित्व मी नाचवतो ||
पक्या, लय
पक्या, लय लय भारी बघ भावा!!!
>>अजुन थोडी लांबवतो(संबंधीतांची माफी मागुन!)
हे सगळं मूळ कवितेत टाक ना....
विशाल झक्कास!!!
कधी वाटतं
गप्पांच्या पानावर जावं
धुडगूस घालून लोकाना त्रास द्यावा
कट्ट्यावर उडी मारून बसावं
पण कोणी गप्पाच मारल्या नाहीत, कट्ट्यावरून ढकलून दिलं तर.....?
मग मी आवरतं घेतो !
प्रकाश, आवर
प्रकाश,
आवरतं घेतोय्स तरी एवढं लिहितोस :अओ:, मोकाट सोडले असते तर किती लिहिले असतेस ?
मस्त रे... चालु ठेव.........
-----------------------------------------------------
कोणाची तरी ओढ लागली की ओढाताण होतेच !
भारी आहे
भारी आहे ही "आवरतं घेतो" मालिका...
चालू ठेवा
__________________________
***हर मुलाकात का अंजाम जुदाई क्यूं है
अब तो हर वक्त यही बात सताती है हमे..***
Pages