एवढे मी टंकले की, वाचणेही शक्य नाही

Submitted by शायर पैलवान on 9 January, 2013 - 01:06

गझल विडंबन
----------------------------------------------------------------------------

एवढे मी टंकले की, वाचणेही शक्य नाही!
बेगडी आंतरजालावरी ह्या मज थांबणेही शक्य नाही!!

वैवकुंनी आजवर त्याच्या परीने खूप केले....
आज पर्यायी परंतू शेर देणेही शक्य नाही!

एकटे गाठून मजला घेरले सा-या वाचकांनी....
या बिचार्‍यांना तसे समजावणेही शक्य नाही!

जे तिन्हीत्रीकाळ असती चोवीशीत वेढलेले;
हुंदके ललितातले त्यांचे टाळणेही शक्य नाही!

वाचक नाहीत, मते पिंकणारे थुंकबंधू!
संकेतस्थळाबाहेर त्यांना गाठणेही शक्य नाही!!

कोणतीही वाट नसते फक्त खुशमस्कर्‍यांची परंतू;
मारून फाट्यावर, टीकाकारांना ठेचणेही शक्य नाही!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शा.पै., तुम्ही पण फटकेबाजीत कमी नाही. Lol हे म्हणजे फलंदाज आणि त्याचा साथीदार यांनी आपापसात चेंडू टोलवल्यासारखे झाले.
Biggrin
आ.न.,
-गा.पै.