"जगात नाही मित्र मिळाले तरी सृष्टीत आहेत. आपल्या घरी नाही मिळाले तरी बाहेर आहेत. देवाने आधीच तुम्हाला मित्र दिले आहेत. हे निळे निळे अनंत आकाश. ते नेहमी तुमच्यावरच पाखर घालीले. तारे तुम्हाला रमवतील. नद्या पाणी देतील. वारा गाणे गाईल. फुले सुगंध व सौंदर्य देतील. वृक्षलतावेली तुमच्यासमोर डोलतील, नाचतील. फार दु:ख नका करू. कोणी शिव्याशाप दिले तर वाईट नका वाटुन घेऊ. या निसर्गाकडे पहा आणि आनंदी रहा.
-सानेगुरूजी (सानेगुरूजींच्या गोड गोष्टी).
जिप्सी यांच्या सौजन्याने.
निसर्गाच्या गप्पांच्या ११ व्या भागाबद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf
जो एस - "व्हाईट आय" पक्षी आहे
जो एस - "व्हाईट आय" पक्षी आहे ना हा ? फारच मस्त फोटो आलाय.....
शशांक धंन्यवाद चश्मेवालापण
शशांक धंन्यवाद
चश्मेवालापण म्हणतातना
मागील आठवड्यात एका शेतकरी
मागील आठवड्यात एका शेतकरी मित्राच्या घरी व शेतावर गेलो असताना अगदी जवळून "हुप्पू" ने दर्शन दिले पण कॅमेरा काढेपर्यंत स्वारी उडून गेली होती. इतरही मुनिया, पाकोळी, वेडा राघू, किंगफिशर वगैरे बरेच पक्षी पहायला मिळाले. सगळ्यात "हुप्पू" चे दर्शन फारच जवळून, अनपेक्षित व भारी होते.
आंतरजालावरुन मिळालेला हुपू फोटो (या हुप्पू चा उच्चार काय आहे देव जाणे - हुपू का हुप्पू ?)
सुप्रभात, जो एस - "व्हाईट आय"
सुप्रभात,
जो एस - "व्हाईट आय" पक्षी आहे ना हा ? >>>>>>>>>>>>>> म्हणजेच "चष्मेवाला" का?
शशांक, हुप्पुचे दर्शन ..... फारच छान.
शशांक, आता खरोखरच केनयाला जा
शशांक, आता खरोखरच केनयाला जा ! असले पक्षी तिथे मुद्दाम आपल्यासमोर येऊन बसतात !
जो_एस, वेल कसली होती ती, मायाळूची का ?
श्रीकांत. झाडांच्या / किटकांच्या अंतर्गत घड्याळाबाबत बीबीसी सी एक छान फिल्म आहे. यू ट्यूबवर दिसली तर लिंक देतो.
शांकली, मी बी.एस.एन.एल. च्या एका माणसाला तूम्हा दोघांसमोर हजर करणार आहे, पकडा त्याला.
दिनेशदा... खरंच असं घडेल का?
दिनेशदा...:हहगलो:
खरंच असं घडेल का? चांगला जाब विचारीन म्हणते!
शशांक, हा नैरोबीचा !
शशांक, हा नैरोबीचा !
पैल तटी न का तृण मी झाले,
पैल तटी न का तृण मी झाले, तूडवीता तरी पदी... ही ओळ ऐकली आणि हे लिहावेसे वाटले.
गवत हे आपण नेहमी पायाखाली तूडवतोच. पण गवताने सगळ्या जगावर आज राज्य चालवले आहे. आपण
खातो ती बहुतेक धान्ये तृणधान्ये आहेतच शिवाय बांबू आणि साखरेचा ऊस हे देखील गवताचेच प्रकार आहेत.
पण यासाठी गवताने जबरदस्त संघर्ष केलाय.
डायनोसोर्स ना नष्ट करणार्या उल्कापातानंतर बहुतेक वनस्पति नष्ट झाल्या पण गवत मात्र जिवंत ( बीजरुपाने ) राहिले. पण त्यानंतरही त्याचे जगणे सोपे नव्हतेच. त्या काळात वातावरणातला कार्बन डाय ऑक्साईड खुप कमी झाला होता. आणि कुठलीही वनस्पति याशिवाय तग धरू शकत नाही. जास्तीत जास्त कार्बन डाय ऑक्साईड आपल्याला मिळावा, म्हणून गवताने आपल्या पात्यात एक नवीन रचना केली. आधुनिक मोटारीत जास्त पेट्रोल जाळून भन्नाट वेग मिळवण्यासाठी, जास्त हवा इंजिनात ओढली जाते. त्या यंत्रणेसारखीच हि रचना होती. या कारणाने गवताची वाढ भराभर होऊ लागली.
पण मग गवताला सामना करायचा होता तो तृणभक्षी प्राण्यांशी. खरे तर माझे वाक्य चुकलेच. तृणभक्षी प्राणी
त्यावेळी नव्हतेच, पण गवताशिवाय दुसरे अन्नच नसल्याने, काही प्राणी तृणभक्षी बनले. त्यासाठी त्या
प्राण्यांना आपल्या दातात आणि पचनसंस्थेत कमालीचे बदल घडवावे लागले. आजच्या गायी, घोडे हे सगळे
असे बदललेले प्राणी आहेत.
या प्राण्याविरुद्ध एक लढा म्हणून, गवताने जमिनीतले सिलिका शोषून पानाच्या कडेने धारदार काटे निर्माण
केले. ऊसाच्या मळ्यातून आपण गेल्यास आपले अंग ओरबाडून निघते ते या काट्यांनेच. पण सध्या तरी
प्राण्यांनी यावर मात केलीय.
जंगलातले वणवे हे तर सगळ्याच वनस्पति नष्ट करतात. मोठी झाडे बराच काळ धुमसत राहतात आणि त्यातच संपतात. गवत मात्र यातून सहज वाचते. त्याची वरची पाने भरकन जळून जातात, पण मूळातील कोंब मात्र वाचतो. याच तंत्राने गवत स्वतःला चरणार्या प्राण्यांपासून वाचवते. त्यांनी चावा घेतल्यावर केवळ
पानेच त्यांच्या तोंडात जातात आणि तूटतात ( असे सहज तूटणारे सांधेच असतात गवतात ) पण धावती
मूळे मात्र वाचतात.
गवताकडे अन्न म्हणून मानवाचे लक्ष गेले नसते तरच नवल. पण गवतापेंक्षा गवताच्या बियात मानवाला रस
होता. आपल्याकडे आता चिमणीचे पोहे, तूरे वगैरे जी गवते असतील, त्यांचे निरीक्षण करा. त्यातल्या बिया
पक्व होऊन वार्याने सहज दूरवर फेकल्या गेल्या असतील. आता दसर्याच्या तोरणातील भाताची किंवा गव्हाची ओंबी घ्या. तीच्यावर जोरदार फुंकर मारतील तरी ते दाणे सुटे होणार नाहीत.
हा गवताने केलेला एक महत्वाचा बदल होता. पुर्वी गव्हासकट सर्वच दाणे अगदी हलके होते. ते वार्याने सहज
सुटे होऊन वार्यावर स्वार होत असत. मानव असे दाणे गोळा करत असे. पण एकतर ते गोळा करणे कठीण
होते आणि मूळातच ते हलके असल्याने त्यांच्या भक्षणातून फार पोषण मिळत नसे.
त्याचवेळी गवताने केवळ एक छोटासा जनुकीय बदल घडवला. बियांना मुख्य दांड्याशी जोडणारा जो सांधा
असतो तो भक्कम केला. त्यामूळे दाणे ओंबीलाच राहिले आणि मानवाला ते गोळा करणे सोपे झाले.
अर्थातच मानवाने त्याची शेती केली. त्यासाठी तणापांसून संरक्षण केले. बिया वेगळ्या करण्यासाठी
प्राण्यांकडून ओंब्या तुडवून घेतल्या. नंतर प्रचंड यंत्रे तयार केली. सध्या तर गव्हासारख्या एका धान्याने, बहुसंख्य मानवजातीची भूक भागवण्याची जबाबदारी घेतलीय.
शशांकजी, छान फोटो
शशांकजी,
छान फोटो !
दिनेशदा,
नविन माहिती !
अशी माहिती वाचणे म्हणजे खजिना मिळाल्यासारखच वाटतं..
दिनेशदा, मस्त चिंतन. खूप
दिनेशदा, मस्त चिंतन. खूप आवडलं.
सुदुपार!!!!! नि.ग वर येणे,
सुदुपार!!!!!
नि.ग वर येणे, वाचणे नेहमीचेच पण लिहीणे खूप दिवसांनी..
सगळ्यांचे फोटो छान. दिनेशदा, नेहमीप्रमाणे नवीन माहीती अगदी संग्रही ठेवण्यासारखी.
माझ्या घरच्या बागेतील काही
माझ्या घरच्या बागेतील काही फोटो प्रथमच टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
मस्त गं नितू छान आलेत फोटो.
मस्त गं नितू छान आलेत फोटो. चाफा आणि मधुमालती छान फुललीय
नितू, मस्त फोटो. दिनेशदा, छान
नितू, मस्त फोटो.
दिनेशदा, छान माहिती !
मागे सुर्यफुलाच्या बीयाचा
मागे सुर्यफुलाच्या बीयाचा उल्लेख आलेला. ह्या सुर्यफुलाच्या बिया. साधारण छोट्या शेंगदाण्यापेक्शा
जरा लहान असतात.
मस्त फोटो नीतू, साधना साधना
मस्त फोटो नीतू, साधना
साधना ह्या बिया भाजुनपण खातात ना? भोपळ्याच्या बियांसारख्या.
हो. खास भाजुन खाण्यासाठीच
हो. खास भाजुन खाण्यासाठीच मागवल्या होत्या
Khandeshat ya specially
Khandeshat ya specially bhajalelyach miltat. Dhule / shirpur side specially. Sashana kahinche ya jast khavun doke dukhate va malamalate.
nitu mast photo
हो. खास भाजुन खाण्यासाठीच
हो. खास भाजुन खाण्यासाठीच मागवल्या होत्या>>>>>मग आहेत कि संपल्या?
वा नितू, बाग सुरेख आहे. ते
वा नितू, बाग सुरेख आहे. ते पहिले तीन फोटो कशाकशाचे आहेत ?
दिनेशदा, गवती माहिती मस्तच
दिनेशदा, गवती माहिती मस्तच आहे..
सुर्यफुलाच्या बिया न भाजता खायलाही मस्त लागतात..
आह्हा.. सूर्यफुलाच्या बिया
आह्हा.. सूर्यफुलाच्या बिया इथे खारवून भाजलेल्या मिळतात.. चांगल्या एक इंच लांबीच्या, टपोर्या..थंडीच्या दिवसातला सुप्पर टाईम पास!!!
दिनेश दा, गवती माहिती आणी इतर माहिती खूप्पच छान आहेत..
दुबई एअरपोर्टवरुन डोकावतोय !
दुबई एअरपोर्टवरुन डोकावतोय !
ओहो.. भारतापासून थोडंसच अंतर
ओहो.. भारतापासून थोडंसच अंतर राहिलं आता..
भरून आलेल्या एक्साईटमेंट चं फील जाणवतंय इकडूनच...
मामीकडून तुमच्याकरता ठेवलेली
मामीकडून तुमच्याकरता ठेवलेली छोट्टीशी भेट घ्यायला विसरू नका..
काल नील, श्वेता पोचलेत मुंबई ला... त्यांचीही जिवाची मुंबई सुरुये
आजची बातमी. चीनचा समुद्र
आजची बातमी.
चीनचा समुद्र गोठला! १ हजार जहाजे फसली
शांघायः सध्या चीनला कडाक्याच्या थंडीने विळखा घतला आहे. संपूर्ण चीनमध्ये गेल्या तीन दशकातील निचांकी म्हणजेच उणे ३.८ अंश सेल्सियस एव्हढ्या तापमानाची नोंद झाली आहे. समुद्राचे पाणी थंडीमुळे गोठल्याने सुमारे १ हजार जहाजे या थंडीमुळे अडकली आहे. मध्य हुनान प्रांतातील विमानतळावरील १४० विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.
वर्षुतै काय म्हणताएत ?
वर्षुतै काय म्हणताएत ? तुझ्याकडे एवढी थंडी नाहीएका ?
है ना...
है ना... बर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र!!!!!!!!!!!! भरपूर गारठले आहे.. चार लेयर्स कपडे + २४ तास हीटर शिवाय पर्याय नाहीये... तरी बरं मी दक्षिण टोकाला आहे म्हणून.. तरी एव्हढी थंडी हा उत्तरेकडील स्नो, थंडीचा परिणाम...
है ना...
है ना... बर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र!!!!!!!!!!!! भरपूर गारठले आहे..>>>
दिनेशदा तो मायाळूचाच वेल आहे.
दिनेशदा तो मायाळूचाच वेल आहे. बरेच पक्षी त्याची फळे खातात. खास करून कोकीळ.
Pages