रिकोटा चीज -१५ Oz चे दोन डबे
Unsalted Butter - २ कप किंवा ४ स्टीक्स
साखर - २ कप
मिल्क पावडर - २ कप
मँगो पल्प - १ कप
पिस्त्याची पूड- अर्धा कप
खाण्याचा हिरवा रंग- ४ थेंब
पिस्त्याचे तुकडे ( सजावटीसाठी)
बर्फी करण्याआधी अर्धा तास बटर फ्रिजमधून बाहेर काढून ठेवा.
आधी आपण मँगो बर्फी करणार आहोत.त्यासाठी मँगो पल्प आटवायचा आहे.
एका नॉनस्टीक भांड्यात मँगो पल्प घेऊन मध्यम आचेवर ठेवा.सतत हलवून गुठळ्या होऊ न देता १ कप मँगो पल्प अर्धा कप होईपर्यंत आटवा आणि थोडा गार करायला बाजूला ठेवा.
आता एका मायक्रोवेवच्या भांड्यात मऊ झालेले १ कप बटर (२ स्टिक्स),१५ oz रिकोटा चीजचा १ डबा,१ कप साखर आणि १ कप मिल्क पावडर व्यवस्थित एकत्र करुन घ्या.
ह्या मिश्रणाला १० मिनिटे मायक्रोवेव करा.
आता भांडे बाहेर काढून त्यात आटवलेला मँगो पल्प घालून चांगले ढवळून घ्या आणि अजून २ मिनिटे मायक्रोवेव करा.
परत एकदा बाहेर काढून चांगले ढवळून अजून २ मिनिटे मायक्रोवेव करा.
बर्फी तयार होत आली कि मिश्रण भांड्यातून सुटून येऊन गोळा होऊ लागते.
गरज पडल्यास अजून १-२ मिनिटे मायक्रोवेव करा.
मिश्रण तयार झाले कि तुपाचा हात लावलेल्या चौकोनी भांड्यात ओता.वाटीच्या तळाला तूपाचे बोट लावून मिश्रण एकसारखे सपाट करा आणि बाजूला ठेवा.
आता पिस्ता बर्फी
एका मायक्रोवेवच्या भांड्यात राहिलेले साहित्य म्हणजे १ कप बटर (२ स्टिक्स),१५ oz रिकोटा चीजचा १ डबा,१ कप साखर,१ कप मिल्क पावडर आणि अर्धा कप पिस्ता पूड व्यवस्थित एकत्र करुन घ्या.
ह्या मिश्रणाला १० मिनिटे मायक्रोवेव करा.
बाहेर काढून त्यात ४ थेंब खाण्याचा हिरवा रंग घालून नीट ढवळून परत २ मिनिटे मायक्रोवेव करा.
परत बाहेर काढून ढवळून अजून २ मिनिटे मायक्रोवेव करा.
मिश्रण सुटून आले नसेल तर अंदाजे अजून १-२ मिनिटे मायक्रोवेव करा.
मिश्रण तयार झाले कि मँगो बर्फीच्यावर ओता.तूप लावलेल्या वाटीने एकसारखे करा.
वरून पिस्त्याचे तुकडे टाकून सजवा.थोडे गार झाले कि बर्फी सेट करायला फ्रिजमध्ये ठेवा.
डाएट करणार्यांनी बर्फीचा वाससुद्धा घेऊ नका
मायक्रोवेवच्या रेसिपींना घाबरणार्यांसाठी- कृती सोपी आहे.न घाबरता करा
प्रत्येक मायक्रोवेवची पॉवर वेगळी असल्याने अंदाजे करा.प्रत्येक वेळी मिश्रण ढवळायला विसरु नका.
ही बर्फी थोडी मऊसर असते.
पूर्वा, ए क भा. प्र. - मँगो
पूर्वा, ए क भा. प्र. - मँगो पल्प कसा आटवलास? कॅन मधला वापरला का? किती वेळ लागतो साधारण आटवायला?
ही बर्फी एकदम हिट झालेली आहे.
ही बर्फी एकदम हिट झालेली आहे. ज्यांनी कुणी खाल्ली त्यांनी प्रत्येक घासाला 'फार छान' म्हणत खाल्ली. पुन्हा करणेत येइल
झी, मी सांगु का ? नॉन-स्टिक पॅनमध्ये आटवला मी. दीपचा कॅन्ड पल्प वापरला. थेंब उडु नये आणि भांड्याला लागु नये म्हणून ढवळत रहायचा सारखा. साधारण अंदाज येतो अर्धा झाला की. रंग पण बदलतो.
धन्स सिंडी ! खुप वेळ लागतो
धन्स सिंडी ! खुप वेळ लागतो का आटवायला? तुप नको घालायला का आटवतांना? एका तासाभरात नाही ना होणार?
एवढा वेळ नाही लागत. एक कप तर
एवढा वेळ नाही लागत. एक कप तर आहे पल्प. तूप नाही घातले मी.
सिंडरेला इज म्हणिंग राईट
सिंडरेला इज म्हणिंग राईट पटकन आटतो पल्प..फ्लॅट पॅनमध्ये कर.
बर्फीच्या रिपोर्टबद्दल धन्यवाद सिंडे!!
तुझ्या मावेची पॉवर चेक कर एकदा..मी बहुतेक ८०वर करते ही बर्फी(डिफॉल्ट सेटिंग आहे माझ्या मावेचे)
काल केली ही बर्फी. अप्रतिम
काल केली ही बर्फी. अप्रतिम झाली आहे. फक्त, २ बटरच्या स्टिक्स ऐवजी प्रत्येकी एकेकच बटर स्टीक वापरली.
हा फोटो.
थँक्यु पूर्वा, इतकी मस्त रेसिपी शेअर केल्याबद्दल.
मिनी, बर्फी खूप सुंदर
मिनी, बर्फी खूप सुंदर दिस्तेय!
बिल्वाने पाठवली तेव्हा खायला मिळाली होती. आता आळशीपणा सोडून करून बघायला हवी.
सह्ही दिसत्येय गं मिनी तुझी
सह्ही दिसत्येय गं मिनी तुझी बर्फी
बर्फी सही दिसतेय मिनी. मी
बर्फी सही दिसतेय मिनी.
मी केलेली बर्फी रवाळ दिसत होती. मिनी किंवा बिल्वाने केलेली बिन-रवाळ दिसतेय. रिकोटा चीझमुळे रवाळच व्हायला हवी ना ?
असो, आज ऑरेंज मर्मलेड घालून ट्राय केली हीच कृती. साखर अर्धा कपच घातली कारण मर्मलेड गोड असते. बटर स्टिक दोन ऐवजी एक. थोडी वेलदोडा पूड घातली. एकुणात संत्रा बर्फी खूप्पच भारी लागतेय.
फुटवा
सिंडे, संत्राबर्फी
सिंडे, संत्राबर्फी कातिल!
इकडे मँगोथर झाला आहे. पिस्ताथराचं गरगट मिश्रण मायक्रोवेव ओव्हनात आहे.
बाय द वे, बॅटर रवाळ दिस्तं आधी. पण घोटून घेतलं आणि ताटलीत थापलं की सरळ येतं, स्मूथ होतं.
मिनी आणि सिंडरेला, अशक्य
मिनी आणि सिंडरेला, अशक्य तोंपासु फोटो आहेत. मी नुसती पिस्ता बर्फी करुन पाहिली ती रवाळच झाली होती. वरचीच रेसिपी फॉलो केली, बटर अर्धेच घेतले. चवीला सुरेख लागत होती पण पिस्ताबर्फीला पिस्त्याची चव नाही आली. बहुतेक नुसती पिस्ता बर्फी करायची तर इसेन्स घालून किंवा मग काजूकतलीसारखी करत असावेत. आंबा बर्फी मात्र छानच होईल कारण आंब्याचा स्वाद स्ट्राँग असतो.
मी घोटून नाही घेतलं ते
मी घोटून नाही घेतलं ते मिश्रण. मला रवाळच आवडली. भारतात मिल्क/मलई केक मिळतो साधारण तशी लागते बर्फी.
अगो, मँगो बर्फी नक्की करुन बघ. अशक्य भारी लागते.
मला होल फुड्स मध्ये फिग स्प्रेड मिळालंय. पुढचा नंबर अंजीर बर्फीचा
मृण्मयी, सिंडी, अगो, लाजो
मृण्मयी, सिंडी, अगो, लाजो धन्यवाद.
सिंडी, मृ इज म्हणिंज राईट. आधी रवाळ होती, घोटुन घेतली मग स्मुथ झाली.
बाकी तु केलेली बर्फी पण एकदम तोंपासु दिसतेय.
मावेमध्ये पहिल्यांदा बर्फी केली. नीट जमली. आता प्रयोग म्हणून सायोची वर्ड फेमस मलाई बर्फी करावी का?
काय सही आहेत फोटो. सिंडे
काय सही आहेत फोटो. सिंडे मार्मलेड ची आयडिया भारी आहे. मी पण करणार ही.
पूर्वा आणि अमयाला अनेकानेक
पूर्वा आणि अमयाला अनेकानेक धन्यवाद! क्वालिटी कंट्रोल कमिटीकडून अप्रूव्ह होऊन ५ चांदण्या मिळाल्या.
Wow, एकसेएक फोटो यायला लागले
Wow, एकसेएक फोटो यायला लागले इथे
जबरी दिसतेय बर्फि मृ
जबरी दिसतेय बर्फि मृ
आहाहा, काय एक से एक बर्फ्या
आहाहा, काय एक से एक बर्फ्या आहेत सगळ्यांच्या.... एकदम तोंपासु
अहाहा, मस्त दिसतायत, रिकोटाला
अहाहा, मस्त दिसतायत, रिकोटाला काही पर्याय आहे का?
एकदम तो. प. सु.
एकदम तो. प. सु.
रिकोटा का नको ? तुझ्या मलई
रिकोटा का नको ?
तुझ्या मलई बर्फीचे घटक वापरुन त्यात मँगो पल्प घातला तर छान होते बर्फी. मी केली होती एकदा.
का नको असं काही कारण नाही. पण
का नको असं काही कारण नाही. पण मुद्दाम रिकोटाकरता सुमार्केटला जावं लागेला. खवा, मिल्क पावडर वगैरे घरात आहे तेव्हा ती ट्रिप वाचवायचा विचार करत होते.
भारी दिसताहेत सगळ्यांच्या
भारी दिसताहेत सगळ्यांच्या बर्फ्या!!
संत्रा बर्फीची आयडिया छाने.
अहा मृण्मयी काय कातिल दिसतेय
अहा मृण्मयी काय कातिल दिसतेय बर्फी
सगल्यानि फारच छान फोतो
सगल्यानि फारच छान फोतो ताकलेयत. मला ह्या बर्फि मधे २ sticks butter म्हनजे नेमके किति ग्राम घालयचे ते सान्गु श्काल का कोनि?
इथे दिली आहेत बर्याच जणींनी
इथे दिली आहेत बर्याच जणींनी मापं.
रच्याकने, एकच स्टिक बटर घातलं
रच्याकने, एकच स्टिक बटर घातलं तरी छान होते बर्फी.
पूर्वा तुझी रेसिपि वापरुन
पूर्वा तुझी रेसिपि वापरुन थोडे बदल करुन बदाम-केशर बर्फी बनवलि. चविला मस्त झालि.
मी रिकोटा चीज (१ छोटा डबा), ३-४ चमचे (पोहे खायचा चमचा) तुप, २ कप बदाम, केशर आणि साखर वापरुन केलि. मिल्क पावडर घालायची होति, ती ऐनवेळि सापडलि नाहि म्हणुन नाहि घालता आलि. तरिहि छान झालि होति. बदामाचि चव लागते आहे चांगलि.
धन्यवाद रेसिपि साठि.
प्रिया७,छान दिसतेय
प्रिया७,छान दिसतेय बर्फी..मस्त खुटखुटीत झाली आहे.आवर्जून सांगितल्याबद्दल थँक्स
आज या रेसिपीने पिस्ता बर्फी
आज या रेसिपीने पिस्ता बर्फी केली आहे. भारी झालीये. पिस्त्याची मस्त चव आली आहे.
Pages