रिकोटा चीज -१५ Oz चे दोन डबे
Unsalted Butter - २ कप किंवा ४ स्टीक्स
साखर - २ कप
मिल्क पावडर - २ कप
मँगो पल्प - १ कप
पिस्त्याची पूड- अर्धा कप
खाण्याचा हिरवा रंग- ४ थेंब
पिस्त्याचे तुकडे ( सजावटीसाठी)
बर्फी करण्याआधी अर्धा तास बटर फ्रिजमधून बाहेर काढून ठेवा.
आधी आपण मँगो बर्फी करणार आहोत.त्यासाठी मँगो पल्प आटवायचा आहे.
एका नॉनस्टीक भांड्यात मँगो पल्प घेऊन मध्यम आचेवर ठेवा.सतत हलवून गुठळ्या होऊ न देता १ कप मँगो पल्प अर्धा कप होईपर्यंत आटवा आणि थोडा गार करायला बाजूला ठेवा.
आता एका मायक्रोवेवच्या भांड्यात मऊ झालेले १ कप बटर (२ स्टिक्स),१५ oz रिकोटा चीजचा १ डबा,१ कप साखर आणि १ कप मिल्क पावडर व्यवस्थित एकत्र करुन घ्या.
ह्या मिश्रणाला १० मिनिटे मायक्रोवेव करा.
आता भांडे बाहेर काढून त्यात आटवलेला मँगो पल्प घालून चांगले ढवळून घ्या आणि अजून २ मिनिटे मायक्रोवेव करा.
परत एकदा बाहेर काढून चांगले ढवळून अजून २ मिनिटे मायक्रोवेव करा.
बर्फी तयार होत आली कि मिश्रण भांड्यातून सुटून येऊन गोळा होऊ लागते.
गरज पडल्यास अजून १-२ मिनिटे मायक्रोवेव करा.
मिश्रण तयार झाले कि तुपाचा हात लावलेल्या चौकोनी भांड्यात ओता.वाटीच्या तळाला तूपाचे बोट लावून मिश्रण एकसारखे सपाट करा आणि बाजूला ठेवा.
आता पिस्ता बर्फी
एका मायक्रोवेवच्या भांड्यात राहिलेले साहित्य म्हणजे १ कप बटर (२ स्टिक्स),१५ oz रिकोटा चीजचा १ डबा,१ कप साखर,१ कप मिल्क पावडर आणि अर्धा कप पिस्ता पूड व्यवस्थित एकत्र करुन घ्या.
ह्या मिश्रणाला १० मिनिटे मायक्रोवेव करा.
बाहेर काढून त्यात ४ थेंब खाण्याचा हिरवा रंग घालून नीट ढवळून परत २ मिनिटे मायक्रोवेव करा.
परत बाहेर काढून ढवळून अजून २ मिनिटे मायक्रोवेव करा.
मिश्रण सुटून आले नसेल तर अंदाजे अजून १-२ मिनिटे मायक्रोवेव करा.
मिश्रण तयार झाले कि मँगो बर्फीच्यावर ओता.तूप लावलेल्या वाटीने एकसारखे करा.
वरून पिस्त्याचे तुकडे टाकून सजवा.थोडे गार झाले कि बर्फी सेट करायला फ्रिजमध्ये ठेवा.
डाएट करणार्यांनी बर्फीचा वाससुद्धा घेऊ नका
मायक्रोवेवच्या रेसिपींना घाबरणार्यांसाठी- कृती सोपी आहे.न घाबरता करा
प्रत्येक मायक्रोवेवची पॉवर वेगळी असल्याने अंदाजे करा.प्रत्येक वेळी मिश्रण ढवळायला विसरु नका.
ही बर्फी थोडी मऊसर असते.
वा वा. टाकलीस का रेसिपी.
वा वा. टाकलीस का रेसिपी. धन्यवाद.
फार भारी होते ह्या रेसिपीने बर्फी.
फोटो ?
फोटो ?
पराग / मो कोणीतरी फोटो टाका
पराग / मो कोणीतरी फोटो टाका रे
वा वा!! पाकृ मस्तंय, पण लई
वा वा!! पाकृ मस्तंय, पण लई खटाटोप आहे बघा! त्यापेक्षा अॅटलांटाला येऊन फुकटात खाणं सोपं आहे. (त्या आधी कमीतकमी ५ दिवस उपास करू.)
हिच ती पूर्वाने बनवलेली
हिच ती पूर्वाने बनवलेली जगप्रसिद्ध बर्फी. अजुनची आठवूनच तोंपासू.
धन्यवाद मो!! मृ, नक्की ये
धन्यवाद मो!!
मृ, नक्की ये गं...कधी येतेस?
वा! मस्तच. बरंच कौतुक ऐकलं
वा! मस्तच. बरंच कौतुक ऐकलं होतं ह्या बर्फीचं कातिल एकदम.
व्वा! भारी दिसतेय!
व्वा! भारी दिसतेय!
कसली मस्त दिसतीय बर्फी.
कसली मस्त दिसतीय बर्फी.
वा वा टाकलीस का रेसिपी !! मृ
वा वा टाकलीस का रेसिपी !! मृ साठी करशील तेव्हा आणि बाकीही जेव्हा करशील तेव्हाही आमच्यासाठी ठेव आणि पाठवून दे !
फारच सही होती ही बर्फी !!!!
माझा पत्ता पाठवते आहे
माझा पत्ता पाठवते आहे
वा कसला तोंपासु फोटो!!!! या
वा कसला तोंपासु फोटो!!!! या दिवाळीला हा आयटम पक्का
एक प्रश्ण मघाशी विचारायचा
एक प्रश्ण मघाशी विचारायचा राहिला. मँगो पल्प आटवला नाही तर काय होईल?
राखी,मँगो पल्प न आटवता १ कप
राखी,मँगो पल्प न आटवता १ कप घातला तर बर्फी मिळून यायला वेळ लागेल/बर्फी मऊ होईल आणि अर्धा कपच घातला तर आंब्याची चव कमी येईल असे वाटल्याने मी आटवला.पल्प ऐवजी हापूस आंब्याची पावडर मिळत असेल तर ती पण टाकून बघता येईल.
सऽही. खूपच मस्त दिसतेय बर्फी.
सऽही. खूपच मस्त दिसतेय बर्फी. पूर्वा माझा पत्ता आहेच तुझ्याकडे.
खूप छान दिसतेय बर्फी. पण ही
खूप छान दिसतेय बर्फी. पण ही सर्व करे पर्यंत फ्रीज मधेच ठेवायची का? आणी बाहेर काढल्यावर पाणी वगैरे नाही ना सुटत?
वा! मस्तच आहे फोटो .. हे
वा! मस्तच आहे फोटो ..
हे किंवा/आणि ते मलई बर्फी प्रकरण करून बघायलाच हवं एकदा!
ओके पूर्वा सशल, मला बोलाव
ओके पूर्वा
सशल, मला बोलाव केलंस की
अहाहा, कसली दिसतेय खतरु.
अहाहा, कसली दिसतेय खतरु. माझ्याकडे सगळ्या मायबोलीकरांना पुरुन उरेल एवढा मँगो पल्प आहे तेव्हा आत्ता दिवाळीत नक्कीच करेन.
छान दिसते आहे बर्फी!! पूर्वा,
छान दिसते आहे बर्फी!! पूर्वा, रेसीपी छान आहे. यंदा दिवाळीत करुन पाहाते तुझ्या कृतीने !!
वा. मस्तच रेसीपी पुर्वा. खुपच
वा. मस्तच रेसीपी पुर्वा. खुपच आवडली.
प्रॅडी फ्रीझमध्ये नाही
प्रॅडी फ्रीझमध्ये नाही मायक्रोवेव्ह मध्ये ठेवायची आहे
व्वा! सह्ही आहे रेसिपी फोटु
व्वा!
सह्ही आहे रेसिपी
फोटु एकदम कातिल
मस्तच.
मस्तच.
सगळ्यांना धन्यवाद!! अमयाचे
सगळ्यांना धन्यवाद!!
अमयाचे स्पेशल धन्यवाद
प्रॅडी, बर्फी झाल्यावर फ्रीजमध्ये ठेवायची.बाहेर काढून ठेवली कि थोडी मऊ होते पण पाणी वगैरे नाही सुटत.साधरण कलाकंद सारखी कन्सिस्टंसी असते.तू पण पत्ता पाठव नाहीतर
सायो, तू माझी बर्फी करुन बघ मी तुझी करुन बघते.तुझी मलई बर्फी कधीची करायची आहे मला
सिंडाक्का _/\_ तू पण पत्ता
सिंडाक्का _/\_
तू पण पत्ता पाठव नाहीतर <<<पाठवते. मग तू लाईव्ह ट्युटोरियल घे.घरी येऊन
माझ्याकडे आंब्याचा मावा आहे. मला वाटतं आमरस आटवण्या ऐवजी तो घालता येईल.
पूर्वा _/\_
पूर्वा _/\_
पूर्वा मी पण पत्ता पाठवू का?
पूर्वा मी पण पत्ता पाठवू का? मस्त दिसतेय बर्फी एकदम तोंपासू
पूर्वा आमच्या सगळ्यांच्या
पूर्वा आमच्या सगळ्यांच्या दिवाळीच्या मिठाईच्या ओर्डरी घेच आता.
लईच भारी दिसतेय.....
लईच भारी दिसतेय..... तोंपासु एकदम..
Pages