मँगो-पिस्ता सँडविच बर्फी

Submitted by पूर्वा on 28 September, 2011 - 15:19
mango pista sandwich burfi
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

रिकोटा चीज -१५ Oz चे दोन डबे
Unsalted Butter - २ कप किंवा ४ स्टीक्स
साखर - २ कप
मिल्क पावडर - २ कप
मँगो पल्प - १ कप
पिस्त्याची पूड- अर्धा कप
खाण्याचा हिरवा रंग- ४ थेंब
पिस्त्याचे तुकडे ( सजावटीसाठी)

क्रमवार पाककृती: 

बर्फी करण्याआधी अर्धा तास बटर फ्रिजमधून बाहेर काढून ठेवा.
आधी आपण मँगो बर्फी करणार आहोत.त्यासाठी मँगो पल्प आटवायचा आहे.
एका नॉनस्टीक भांड्यात मँगो पल्प घेऊन मध्यम आचेवर ठेवा.सतत हलवून गुठळ्या होऊ न देता १ कप मँगो पल्प अर्धा कप होईपर्यंत आटवा आणि थोडा गार करायला बाजूला ठेवा.
आता एका मायक्रोवेवच्या भांड्यात मऊ झालेले १ कप बटर (२ स्टिक्स),१५ oz रिकोटा चीजचा १ डबा,१ कप साखर आणि १ कप मिल्क पावडर व्यवस्थित एकत्र करुन घ्या.
ह्या मिश्रणाला १० मिनिटे मायक्रोवेव करा.
आता भांडे बाहेर काढून त्यात आटवलेला मँगो पल्प घालून चांगले ढवळून घ्या आणि अजून २ मिनिटे मायक्रोवेव करा.
परत एकदा बाहेर काढून चांगले ढवळून अजून २ मिनिटे मायक्रोवेव करा.
बर्फी तयार होत आली कि मिश्रण भांड्यातून सुटून येऊन गोळा होऊ लागते.
गरज पडल्यास अजून १-२ मिनिटे मायक्रोवेव करा.
मिश्रण तयार झाले कि तुपाचा हात लावलेल्या चौकोनी भांड्यात ओता.वाटीच्या तळाला तूपाचे बोट लावून मिश्रण एकसारखे सपाट करा आणि बाजूला ठेवा.
आता पिस्ता बर्फी
एका मायक्रोवेवच्या भांड्यात राहिलेले साहित्य म्हणजे १ कप बटर (२ स्टिक्स),१५ oz रिकोटा चीजचा १ डबा,१ कप साखर,१ कप मिल्क पावडर आणि अर्धा कप पिस्ता पूड व्यवस्थित एकत्र करुन घ्या.
ह्या मिश्रणाला १० मिनिटे मायक्रोवेव करा.
बाहेर काढून त्यात ४ थेंब खाण्याचा हिरवा रंग घालून नीट ढवळून परत २ मिनिटे मायक्रोवेव करा.
परत बाहेर काढून ढवळून अजून २ मिनिटे मायक्रोवेव करा.
मिश्रण सुटून आले नसेल तर अंदाजे अजून १-२ मिनिटे मायक्रोवेव करा.
मिश्रण तयार झाले कि मँगो बर्फीच्यावर ओता.तूप लावलेल्या वाटीने एकसारखे करा.
वरून पिस्त्याचे तुकडे टाकून सजवा.थोडे गार झाले कि बर्फी सेट करायला फ्रिजमध्ये ठेवा.

वाढणी/प्रमाण: 
मध्यम आकाराच्या ३०-३५ वड्या होतील.
अधिक टिपा: 

डाएट करणार्‍यांनी बर्फीचा वाससुद्धा घेऊ नका Proud
मायक्रोवेवच्या रेसिपींना घाबरणार्‍यांसाठी- कृती सोपी आहे.न घाबरता करा Happy
प्रत्येक मायक्रोवेवची पॉवर वेगळी असल्याने अंदाजे करा.प्रत्येक वेळी मिश्रण ढवळायला विसरु नका.
ही बर्फी थोडी मऊसर असते.

माहितीचा स्रोत: 
मायबोलीकर 'अमया' च्या रेसिपीवर आधारित http://www.maayboli.com/node/7474
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पहिल्या पानावर दोन दोन बर्फ्या ... अब मैं क्या करु ? Wink
पूर्वा, रेसिपी फारच कमाल आहे. लेयर्ड बर्फी करण्याचा खटाटोप जमला नाही तर नुसती मँगो बर्फी तरी नक्की करुन बघणार Happy

कसली मस्तय बर्फी. मी फक्त पिस्ता करणार. मँगो नाही आवडत.
रिकोटा चीज पुण्यात कुठे मिळेल? नसेल तर पर्याय काय Uhoh

हाईला!! कसली सॉलिड पाकृ आहे आणि फोटो पण एकदम कातिल आलाय Happy (बाजूची बिर्याणी तर अधिकच लाळगाळू दिसत्ये Wink )

वर्षा,रिकोटा चीजला पर्याय नाही माहित.खवा वापरुन प्रयत्न करता येईल.कारण कुठलाच फ्लेवर न टाकता बर्फी केली तर ती मलई/कलाकंद सारखी लागते.पण तू कशाला करत बसतेस? गाठ कोपर्‍यावरचा एखादा काका किंवा मामा Happy

तुझी मलई बर्फी कधीची करायची आहे मला >>>. नको.... हीच कर त्यापेक्षा पुन्हा पुन्हा ..ती बिघडते.. Proud

बाजूची बिर्याणी तर अधिकच लाळगाळू दिसत्ये >>>> मंजू !! तूच ती खरी खवय्यी.. तुला संपूर्ण बिर्याणीचा फोटो हवाय का? टाकतोच नंतर... Wink

वर्षा खरंतर खव्याला सबस्टिट्यूट म्हणून ईथे रिकोटा चीज वापरायला सुरवात झाली देसी मिठायांसाठी. आता हल्ली खवा पण मिळू लागलाय काही वर्षांपासून. पण रिकोटाचे बर्फी,पेढे हिट्ट असतात. पूर्वा म्हणतेय त्याप्रमाणे कलाकंद टेक्स्चर असेल तर बहुदा दूध फाडून त्या पनीर मधे फ्लेवर्स घालावे लागतील रिकोटा मिळत नसेल तर.

केली आज ही बर्फी. मावे नाही वापरला. मावेमधल्या बर्फ्या, मोदक ह्या प्रकारांचा मला जरा धसका (:फिदी:) असल्याने स्टोव्हवरच केली. वेळ भरपूर लागला अर्थात. ऑलमोस्ट १ तास लागला. पण टोटली वर्थ इट Happy पूर्वा, थँक्स रेसिपी शेअर केल्याबद्दल.

photo.JPG

मस्त !! उचलून तोंडात टाकावीशी वाटतेय बर्फी. ( कॅलरीज गेल्या उडत :फिदी:)
कसल्या सुगरणी आहेत इथे एकेक !
( हाच मेसेज सायोच्या मलई बर्फीला सुद्धा.. अजून किती ठिकाणी टाकावा बरे ? Uhoh सगळे एक से एक पदार्थ.)

हा माझा पहिलाच प्रतिसाद....
मी पण हि recipe follow केली, खुप च छान झाली बर्फी .... Thanks for sharing

थँक्स पूर्वा, इतकी छान रेसिपी लिहील्याबद्दल. खूप मस्त झाली ही बर्फी.

फोटो कसा टाकता येईल? "Upload Failed" येते आहे.

भारी रेसिपी दिसते आहे! Happy
(दोन कप बटर वाचल्यावर करायचा धीर होणार नाही. Happy कोणी केलीच तर चव बघेन बापडी. :P)

ही मी आता गणपति किंवा दिवाळीत नक्की करणार. मस्त दिसते आहे. मी पण बिल्वाच्याच कॅटेगरीत त्यामुळे स्टोव्ह वरच करीन.

बर्फीचं काही तरी तंत्र बिघडलं आहे. मिश्रण तसुभरसुद्धा घट्ट झालेलं नाही. २५ मिन. मायक्रोवेव्ह करुन झाली बर्फी Sad

सिंडी, मावेचं माहित नाही पण मला गॅसवर एका लेयर साठी ३०-३५ मि. लागले होते. पूर्ण बर्फीसाठी तासभर लागला होता.

अरेच्चा असं का झालं सिंडे? मी आत्तापर्यंत केली तेव्हा कधीच बिघडली नाही.बिल्वा म्हणते तसं स्टोव्हवर करुन बघ.पॉट /कढई न वापरता फ्राय पॅन वापर म्हणजे लवकर आळेल.
रच्याकने,रिकोटा चीजच वापरत आहेस ना?

हो, रिकोटा चीज घातलं. बटर एकच स्टिक घातलं तर चालेल असं मला वाटलं.

असो, झाली एकदाची. अजून ३-४ मिन ठेवली असती तर चाललं असतं. खूप मऊ झाली आहे. पण अतिशय अफाट सुंदर लागतेय. थँक यु पूर्वा Happy

Pages