Submitted by वैद्यबुवा on 13 March, 2012 - 14:00
मॅरॅथॉन रनिंग (किंवा कुठल्याही रनिंग इवेंट) विषयी उपयोगी माहिती, टिपा लिहीण्याकरता आणि चर्चा करण्याकरता हा बाफं उघडला आहे.
इथे मायबोलीवर ह्या विषयी असलेल्या लेखनाच्या काही लिंका
http://www.maayboli.com/node/13901
http://www.maayboli.com/node/14908
http://www.maayboli.com/node/20192
http://www.maayboli.com/node/15839
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अभिनंदन मधुरा.. आता १० के
अभिनंदन मधुरा.. आता १० के पळा.
सायकलिंग विषयावर बीबी आहे का?
सायकलिंग विषयावर बीबी आहे का? मला सापडला नाही
मी पण ऑक्टोबर मध्ये ५K पळतेय.
मी पण ऑक्टोबर मध्ये ५K पळतेय. अॅटलांटात मायबोलीकरांची धावण्याची परागने चालू केलेली परंपरा चालू ठेवावी म्हटलं.
खूप दिवसांपासून पळायची इच्छा होती पण तीन-साडेतीन आठवड्यांपूर्वी तयारी सुरु केली. अधून मधून पळायचे त्यामुळे स्टॅमिना फार वाईट नव्हता. आता ३ आठवड्यांच्या प्रॅक्टीसनंतर नॉन-स्टॉप ५K पळता येतय पण अधून मधून स्पीड ढेपाळते त्यावर लक्ष देतेय.
हा बाफ आजच वाचला, छान टीप्स आहेत सगळ्यांच्या.
गो मो!!!
गो मो!!!
वा वा भारीच मो ! विजिगीषु,
वा वा भारीच मो !
विजिगीषु, आर्जे आणि विनायकला पण पळव की तुझ्याबरोबर..
कुठे आहे ट्रॅक ? ग्रँट पार्कला असेल तर पळून ये तिथे एकदा आधी. फार दमछाक होते तिथे.
ऑल द बेस्ट..
उद्या मी ५के पळतेय. प्रॅक्टिस
उद्या मी ५के पळतेय. प्रॅक्टिस कमी आणि चॅलेंजिंग ट्रॅक असे समीकरण झाले आहे.
पण ह्या वर्षी एक ५के करायचीच असे ठरवले होते. वॉक न करता पूर्ण वेळ धावायचे असा मनसूबा आहे. पाहू उद्या काय होते परिक्षेत :).
शुभेच्छा मो! धावून झाल्यावर
शुभेच्छा मो!
धावून झाल्यावर इथे लिहीयला विसरु नकोस.
गूडलक मो!! जमल्यास आज रात्री
गूडलक मो!!
जमल्यास आज रात्री भात, पास्ता खा. रेसच्या दीड-एक तास आधीपर्यंत सिपसिप पाणी, लिंबूपाणी आणि थोडं संत्रं, केळी खातपीत रहा. मनाला विजुलायझेशन मोडमध्ये ठेवा जेणेकरून दमणूक कमी होते.
धन्यवाद चमन आणि बुवा. चमन,
धन्यवाद चमन आणि बुवा.
चमन, टिप्स बद्दल धन्यवाद. नक्कीच अमलात आणेन.
शुभेच्छा मो. तुझा अनुभव नक्की
शुभेच्छा मो. तुझा अनुभव नक्की लिही.
शुभेच्छा मो!
शुभेच्छा मो!
गो मो. गुड लक. नंतर तुझा
गो मो. गुड लक. नंतर तुझा अनुभव इथे नक्की लिही
मो, लै भारी.. हॅव फन.. इकडे
मो, लै भारी.. हॅव फन..
इकडे नक्की लिही..
शुभेच्छा मो
शुभेच्छा मो
झाली माझी ५के!!!! ३७ मिनिटात
झाली माझी ५के!!!! ३७ मिनिटात झाली.
ट्रॅकवर बराच चढउतारांचा होता. पण मी ठरवल्याप्रमाणे पूर्ण रन करु शकले. चढावर किंवा उतारावर स्पीड न बदलता पूर्ण वेळ एकाच पेसने पळले, त्यामुळे एनर्जी कन्झर्व करायला मदत झाली.
खरं तर तयारी जुलैच्या शेवटच्या आठवड्यात तयारी सुरु केली. पहिले ३ आठवडे रेग्युलरली तयारी सुरु झाली. पण मग मुलांची आजारपणं, माझं आजारपण ह्यात त्यात मोठा खंड पडला. तयारी सुरु केली तेंव्हा आई बाबा इथे होते, त्यामुळे स्वयंपाकाचा काही प्रश्न नव्हता ;). मी ऑफिसमध्ये जाऊन आल्यावर पळून यायचे, आणि मस्त ताजे जेवण मिळायचे. पण मागच्या महिन्यात ते गेल्यावर, सगळे मॅनेज करणे अजूनच अवघड वाटायला लागले आणि फक्त शनिवारी पळणे सुरु झाले. ह्या वर्षी (खरं तर मुलगी १ वर्षाची व्हायच्या आधी) ५ के करायचीच होती, आणि अश्या गतीने अवघड वाटायला लागले. पण मंगळवारी ऑफिसमध्ये कोणी तरी TAG (Technology Association of Georgia) चे 2012 Techie 5K/10K Run/Walk पोस्टर लावलेले दिसले आणि म्हटलं हीच वेळ आहे! ऑफिसमधले कोणीच पळणार नव्हते, पण मी पळायचे ठरवले. ह्या आठवड्यात मंगळवारी घराजवळ ५के पळून आले, मग बुधवारी ट्रेडमील वर पळले आणि गुरुवारी परत बाहेर. शुक्रवारी सुट्टी घेतली. काल रात्री भात वगैरे जेवले. चांगली झोप मात्र लागली नाही :(. ती मुलीमुळे तशीही लागतच नाही ;). आज सकाळी सिरियल्स, आणि केळे असा ब्रेकफास्ट केला. चमन ने वर म्हटल्या प्रमाणे थोडे थोडे पाणी पित राहिले. खरं सांगायचं तर ५ के ला फारशी तयारी नाही करायला लागत. तयारी असेल तर रिलेटिव्हली सोप्पे आहे ५के पळणे
आज सकाळी ८ ला पळायला सुरुवात केली आणि ८:३७ ला थांबले :).
मो, मस्तच. अभिनंदन.
मो, मस्तच. अभिनंदन.
महान आहात लोकहो... शुभेच्छा.
महान आहात लोकहो...
शुभेच्छा.
अरे व्वा मो , अभिनंदन !
अरे व्वा मो , अभिनंदन ! एवढ्या व्यापातुन ५ के यशस्वी केलीस , वेरी गुड , कीप इट अप !
अभिनंदन अभिनंदन!!! आता जोम
अभिनंदन अभिनंदन!!!
आता जोम आहे तोवर १०K पळून घ्या! नाहीतर पुन्हा बे-एके-बे पासून सुरूवात करावी लागते
आणि आपण हातचा चान्स घालवला म्हणून जास्त वैताग येतो.
झोप न लागणे फार नॉर्मल आहे. थोडी अँग्झाईटी मजेदार असते.
Great Mo ! Abhinandan!
Great Mo !
Abhinandan!
झाली माझी ५के!!!! ३७
झाली माझी ५के!!!! ३७ मिनिटात झाली.>>
अभिनंदन
सहिये मो.. मनःपूर्वक अभिनंदन
सहिये मो.. मनःपूर्वक अभिनंदन ! आपल्या कंपूची परंपरा सुरु ठेवलीस ते बरं केलस..
आता थँक्स गिव्हिंगच्या वेळी अटलांटा मॅरेथॉन इव्हेंटच्या वेळी १० के असेल तर पळून टाक लगेच (बाकीच्यांनाही पळव बरोबर.. ) ! आदल्या दिवशी रात्री झोप नाहीच लागत.. !
ट्रॅक कुठे होता.. डाऊनटाऊन की ग्रँट पार्क ?
धन्यवाद लोक्स! १०के लगे हात
धन्यवाद लोक्स!
१०के लगे हात पळायची आयडीया चांगली आहे, पण सध्याच्या अतिबिझी टाइमटेबलमधून वेळ मिळेल की नाही माहिती नाही.
पराग, ट्रॅक टेक्नॉलॉजी पार्क (नॉरक्रॉस) मध्ये होता. आता कंपूमधल्या इतर लोकांना परंपरा चालू ठेवण्यासाठी सांगायला पाहिजे. सगळ्यांचा सहभाग पाहिजे नाही तर तो कंपू कसला ;).
अभिनंदन मो
अभिनंदन मो
मो >> If you think you can or
मो >> If you think you can or you think you can not - you will be always right - Henry Ford
लोकहो.. पुणे मॅरेथॉन यंदा
लोकहो.. पुणे मॅरेथॉन यंदा रविवारी २ डिसेंबरला आहे. त्याची नावनोंदणी सुरु झाली आहे. आणि नोंदणीचा शेवटची तारिख १० नोव्हेंबर आहे. बर्याच रेसेस उपलब्ध आहेत.
३.५ किलोमिटरची चॅरिटी रन पण आहे. तर आजच नाव नोंदणी करा.
वेबसाईट : http://www.marathonpune.com/dates.html
अजून जवळ जवळ महिना आहे. त्यात चॅरिटी रन किंवा अगदी १० के ची प्रॅक्टीस सुद्धा होऊ शकते.
सर्व माबोकर मिळून पळापळी करूया..
मी स्वत: १० के साठी नाव नोंदवलं आहे. गेल्या ३/३.५ महिन्यात काहीच व्यायाम केलेला नाही. त्यामुळे स्टॅमिनाची वाट लागली आहे. ह्या निमित्ताने तरी काहितरी व्यायाम होईल अशी आशा आहे !
काल पुणे आंतराष्ट्रीय मॅरॅथॉन
काल पुणे आंतराष्ट्रीय मॅरॅथॉन पार पडली ! मी १० के मध्ये भाग घेतला होता.. एकंदरीत रेस बरी झाली.. रूट चांगला होता.. फार चढ उतार नव्हते. १० के साठी ७० मिनिटंलागली.. आत्तापर्यंतच्या १० के मधला सगळ्यात जास्त वेळ ! व्यायाम आणि सरावाचा अभाव आणि ऐनवेळी झालेली सर्दी ह्या सगळ्याचा परिणाम. पण पुण्यात भर गावात सकाळी सकाळी पळायला मजा आली.. ट्रॅफिकला शिस्त लावली तर पुण्यातले रस्ते एकदम मस्त आहेत हे जाणवलं. सुरुवातीला खंडूजी बाबा चौकात आणि लक्ष्मी रोडला मधे मधे ढोल ताशांचा गजर सुरु होता. रास्ता पेठेत आणि सेव्हन लव्हज चौकात फुलांच्या पायघड्या होत्या... एम्जी रोडच्या सुरुवातीला अचानक सन्नाटा पसरला.. अगदी पीन ड्रॉप सायलेन्स आणि मग पुढे कॅम्पात इंग्लिश गाणी सुरु असलेल्या स्पिकर्सच्या भिंती लागल्या होत्या. अधेमधे रस्त्यात लोकं आणि शाळांमधली मुलं उभी होती. रस्ते झाडणार्या बायका थांबून टाळ्या वाजवत होत्या. रास्ता पेठेत ऑफिसला चाललेल्या दोन काकू एकदम उत्साहात टाळ्या वाजवून सगळ्यांना प्रोत्साहन देत होत्या !!
एरवी पादचार्यांना न जुमानणार्या पुणेरी ट्रॅफिककडे तु.क. टाकत पळायला फारच मजा येत होती !
२७ ची स्पर्धा म्हणून इतका गवगवा केला जात असताना आयोजनात मात्र तो अनुभव अजिबात दिसून आला नाही. हाफ आणि फुल मॅरॅथॉनच्या ट्रॅकवर पुरेसे स्वयंसेवक आणि पोलिस नव्हते. पळणार्यांच्या मधेमधे वहाने येत होती. चॅरीटी रनवाल्यांना दिशादर्शक बोर्ड नव्हते. कुंटे चौकात वळायच्या ऐवजी सगळं पब्लिक लक्ष्मी रस्त्यावरून पुढे जाऊन सेव्हन लव्हज चौकापर्यंत पोचलं... २ डिसेंबरला स्पर्धा आणि वेबसाईट १० नोव्हेंबरला अपडेट झाली. तोपर्यंतं गेल्यावर्षीचेच डिटेल्स होते. हाफ, फुल आणि १० के वाल्यांना 'Vest' म्हणून साधा पांढरा बनियन स्पर्धेच्या लोगोचा छप्पा मारून दिला होता !!!! तिथल्या माणसाला म्हंटलं आता एक चट्ट्यापट्याची चड्डी किंवा लेंगा पण द्या.. म्हणजे शॉर्ट्स किंवा ट्रॅकपँटच्या ऐवजी तेच घालून अगदी ऐतिहासिक वेशभुषा होईल.. ! (सकाळच्या थंडीत बरेच जण टीशर्ट वर तो बनियन घालून 'सुपरमॅन' होऊन आले होते ... !! )
अजून एक खटकलेली बाब म्हणजे भेटलेले सगळे स्वयंसेवक, पाणी देणारी मंडळी, मॅरॅथॉन भवनात नंबर वाटणारी लोकं अमराठी होते. मराठी मंडळींना अश्या गोष्टींमध्ये का इंटरेस्ट नाही कोण जाणे..
पण एकंदरीत पुण्यात हाफ मॅरॅथॉन आणि १० के मिळून जवळ जवळ दोन हजार आणि चॅरीटी रनमध्ये ५००० च्या वर लोकांना पळताना पाहून मस्त वाटलं.. शिवाय आम्ही घरचेही बरेच जण मिळून कंपू करून गेलो होतो त्यामुळे अजून मजा आली.
पुढच्या वर्षी मायबोलीकरांचाही कंपू करून पळूया...
सही रे पराग, मस्तच!!
सही रे पराग, मस्तच!! अभिनंदन!!
नमस्कार! नविन वर्श्याच्या
नमस्कार! नविन वर्श्याच्या शुभेचा
मी पण मॅरॅथॉन प्रेमी आहे. म्हणजे मी सुध्दा मॅरॅथॉन मधे भाग घेत असतो. अनुभव नंतर कधी तरी सांगेन.
आता येत्या रविवारी दि. ६ जाने. २०१३ रोजी नवी मुंबई ट्रफीक पोलिसांच्या वतीने पामबीच मॅरॅथॉन १० के मॅरॅथॉन आयोजित केली आहे. मॅरॅथॉन ही पामबीच नेरुळ सिग्नल झामा स्वीट, किग्ज एलेट्रोनिक पासुन चालु होनार आहे. वेळ सकाळी ६.३० वा.
रजिस्टट्रशन साठी पुढील प्रमाणे लिंक देत आहोत.
http://www.roadsafetynm.com/
तसेच आयोजना मधे आमची कंपनी सुध्दा आहे. अधिक माहिती साठी मला संपर्क करु शकता. 9819707573
(मी सुध्दा भाग घेतला आहे.)
नवीन वर्श्याची चांगली सुरुवात...
(प्रीय अॅडमिन, फोन नंबर टाकला तर चालतो का? नसेल चालत तर माफ करणे , फोन नंबर काढुन पोस्ट टाकणे.)
पामबीच १० के मी न थांबता नोन
पामबीच १० के मी न थांबता नोन - स्टोप १ तास ५ मिनीटात पुर्ण केली.
Pages