निसर्गाच्या गप्पा (भाग ११)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 13 October, 2012 - 04:19

"जगात नाही मित्र मिळाले तरी सृष्टीत आहेत. आपल्या घरी नाही मिळाले तरी बाहेर आहेत. देवाने आधीच तुम्हाला मित्र दिले आहेत. हे निळे निळे अनंत आकाश. ते नेहमी तुमच्यावरच पाखर घालीले. तारे तुम्हाला रमवतील. नद्या पाणी देतील. वारा गाणे गाईल. फुले सुगंध व सौंदर्य देतील. वृक्षलतावेली तुमच्यासमोर डोलतील, नाचतील. फार दु:ख नका करू. कोणी शिव्याशाप दिले तर वाईट नका वाटुन घेऊ. या निसर्गाकडे पहा आणि आनंदी रहा.
-सानेगुरूजी (सानेगुरूजींच्या गोड गोष्टी).
जिप्सी यांच्या सौजन्याने.

निसर्गाच्या गप्पांच्या ११ व्या भागाबद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कुंडीत फुललेल्या गुलाबाचे हे काही फोटो (काढण्याचा केलेला प्रयत्न.. )

DSCN0188.JPGDSCN0190.JPGDSCN0261.JPGDSCN0182_1.JPGDSCN0183_1.JPGDSCN0240.JPGDSCN0222.JPGDSCN0241.JPG

या वेलीला आता वरती वाढण्यासाठी काय आधार द्यायचा या बद्दल सल्ला द्या
DSCN0234.JPG

ते छोटु काय आहे? काकडी??

गुलाब तर अगदी मस्त...

मनिप्लँट एकटा वर चढवण्यापेक्षा एक जाडी प्लॅस्टिकची दांडी घेऊन त्याला जाडी सुतळी भरपुर गुंडाळायची. गावाला ह्या दिवसात झाडांवर हिरवा मॉस मिळतो, तोही दांडीभोवती लावला तरी चालेल. खुपच हौस असेल तर बाजारात कुंडीवाल्यांकडे विकतच्या मॉसदांड्या मिळतात त्या आणायच्या. कुंडीत दांडी खोवुन, त्याच कुंडीत मनिप्लँट लावाय्चे आणि त्याला दांड्याच्या भोवती गोल गोल चढवायचे.

मग रोप असे एकटेच वर वर जाण्याऐवजी कुंडीत गोल वाढेल आणि थोड्याच दिवसात मस्त भरगच्च भरलेली सुंदर कुंडी तयार होईल.

वर्षु,
नोव्हेंबर पर्यंत एकावेळी ४-४ फुले उमलायची पण या महिन्यात एकही नवीन फुल नाही, कदाचित थंडीचा परिणाम असेल !

ते छोटु काय आहे? काकडी??
साधना,
ती काकडी आहे, खुप लागले पण मोठे नाही झाले.
माहिती बद्दल धन्यवाद !

वरील गुलाब कोणत्या प्रकारचा आहे हे मात्र माहित नाही ...

अनिल / शोभा, मी काही बिया घेऊन येतोय.

काल चंद्र आणि चांदणी पाठशिवीचा खेळ खेळत होते. इथे खिडक्यांना छप्पर नसते त्यामूळे चंद्रप्रकाश थेट घरात येतो. मी बेडवर पडल्या पडल्या बघत होतो. रात्री साडेअकराला तर केवळ वीतभर अंतर राहिले असे वाटत होते.
( आम्ही भारताच्या साडेचार तास मागे आहोत. ) आजही कदाचित हा खेळ रंगेल. पण आज राज्य चंद्रावर असेल. आज त्याला चांदणीची पाठ शिवायची आहे. आठवणीने बघा.

गणेशवेल - फक्त पावसाळ्यात येणारी आणि फुलणारी नाजूक पानांची आणि उलुशा लालचुटूक फुलांची वेल. चार वर्षापूर्वी मी त्याचे बी लावले होते कुंडीत. पावसाळ्यात भरपूर फुले आली आणि नंतर त्यांच्या बिया झाल्या. पावसाळ्यानंतर वेल सुकून गेली पण तिच्या बिया कुंडीत पडल्या होत्या. ७-८ महिने त्या तशाच होत्या पण पुढच्या पावसाळ्यात त्या आपोआप रुजल्या आणि नविन वेली आल्या

असे चक्र ४ वर्षे चालू होते. पावसाळा संपल्यानंअतर वेल सुकून जायची आणि मग तिचा मागमूसही नसायचा - पुढच्या पावसाळ्या पर्यंत! ह्या पावसाळ्यात पण भरपूर वेली आल्या त्यातल्या ५ वेली मी वाढू दिल्या. कोणत्या तरी अगम्य कारणाने त्यातल्या एकाही वेलीला एकही फूल आले नाही. पावसाळा संपला, सगळ्या वेली सुकून गेल्या. पण अचानक मागच्या आठवड्यात २ बीया अंकुरल्या आणि ह्या आठवड्यात एकीला फुल पण आले.

पवसाळ्यानंतर गणेशवेल अंकुरताना मी तरी पाहिली नाहिये आणि इतक्या लवकर (३-४ दिवसात) तिला फुल पण येत नाही. या वेळेस असे का घडले असावे - पावसाळ्यात आलेल्या वेलींना फुले आली नाहीत त्यामुळे टिकून रहाण्यासाठी तातडीची उपाययोजना केली पाहिजे असा मेसेज ब्रॉडकास्ट झाल्यासारखे?

होय माधव, दिनेशदा म्हणतात तसंच आहे ते. आणि तुमचं अनुमान अगदी बरोब्बर आहे..'तातडीची उपाययोजना केली पाहिजे असा मेसेज ब्रॉडकास्ट झाल्यासारखे'

मधे एकदा एक दुर्मिळ आणि वेगळंच झाड बघायला मिळालं.तसं बघितलं तर या झाडात वरवर बघता वैशिष्ट्यपूर्ण असं काही दिसत नाही. आपलं झाडासारखं झाड! पण याचं खरंखुरं वैशिष्ट्य लपलंय याच्या बियांमधे. या झाडाचं नावच मुळी 'ब्लॅक पर्ल' आहे! आणि याच्या तीन भागात उकलणार्‍या शेंगेत काळे मोती (बिया) असतात. मला याची फुलं बघायचं भाग्य नाही मिळालं; पण हे मोती मात्र मिळाले.
याचं बोटॅनिकल नाव आहे हर्पुलिया झँक्वेबरीका..(Harpullia zanquebarica). गूगलवर शोध घेतल्यास याच्या फुलांचा आणि शेंगेसहीत बियांचा (काळ्या मोत्यांचा) फोटो बघायला मिळेल. तूर्तास हा एका मोत्याचा फोटो माझ्याकडून...

doc 005.jpg

या बी वर सूक्ष्मशी पांढरी लव आहे. आणि स्पर्श तर इतका मखमली आहे की बस्स! याला ब्लॅक पर्ल नाव फारच समर्पक दिलं गेलं आहे.

सुंदरच आहे हा काळा मोती आणि फुलांपेक्षा फळे जास्त देखणी दिसताहेत.

मुंबईला सागर उपवन मधे आहे हे झाड असे याहू ग्रुपवर म्हणताहेत !

http://www.youtube.com/watch?v=7Qyqs4Y1lns

विरांबा, टांझानिया आणि झांबिया भागात वास्तव्य करुन राहणारा एक समूह. या समूहाची विलक्षण जीवनपद्धती
बघण्यासाठी अलास्काहून विद्यार्थी येतात. त्यांच्यासोबत वर्षभर राहतात. या समूहाची त्याला काहीच हरकत नसते. ( पण त्यांच्यात काहि संवाद नसतो.) एक विद्यार्थी वर्षभर राहून गेला कि दुसरा येतो, पण हि सोबत अखंड असते.

काय आहे त्यांचे वेगळेपण ? हा समूह शेती करत नाही, पण इतर अनेक बाबतीत तो प्रगल्भ आहे. या समूहात स्त्रिया, पुरुष, बाळं असे असले तरी, या समूहाचे नेतृत्व दोन स्त्रिया करतात. त्या दोघींचे त्या समूहातले स्थान निश्चित आहे. म्हणजे एक स्त्री आहे अत्यूच्च स्थानी तर दुसरी आहे अगदी खालच्या पातळीवर. त्यांचा हा
सामाजिक स्तर त्यांच्या जन्मावरुन ठरलाय. आणि त्यांच्या पुढच्या पिढीतही तो असणार आहे.

पण तरी या समूहाचे रोजचे सर्व निर्णय या दोघीच घेतात. पुरुषांचे काम केवळ समूहाचे संरक्षण करणे एवढेच आहे. आणि निर्णय तरी कसले तर अगदी रोजच्या रोज काय करायचे याचे.

हा समूह ज्या भागात राहतो, तिथे वर्षातले काही दिवसच खायला प्यायला मुबलक असते. पण तो साठा संपला
आणि त्या भागातला उन्हाळा सुरु झाला कि त्या समूहाला अन्नाच्या शोधात भटकत रहावे लागते.
यावेळी कुठल्या दिशेने जायचे याचा निर्णय कनिष्ठ पातळीवरची स्त्री घेते. तिच्याकडे या बाबतीतले
असामान्य ज्ञान आहे. आजवरच्या आयूष्यात, अगदी लहानपणीदेखील ती ज्या ज्या ठिकाणी गेली होती,
त्या सर्व जागा तिच्या लक्षात आहेत. कुठल्या काळात समूहासाठी कुठे अन्नपाणी मिळेल, याबाबतीतले
तिचे निर्णय अचूक असतात. यासाठी सर्व समूहाला मैलोन् मैल चालावे लागते, पण तिचे निर्णय अचूक
असतात.

पण त्या ठिकाणी ती सर्व समूहाला घेऊन गेली तरी ते अन्नच काय पाणी देखील सर्वांच्या आधी घ्यायचा
तिला अजिबात हक्क नाही. सर्वांचे खाऊन पिऊन झाल्यावरच ( त्यात उच्च स्थानावरची स्त्री पण आहे ) ती
खाऊ पिऊ शकते. समूहाची रोगप्रतिकारशक्ती वाढवायला काय अन्न घ्यायचे, हे पण तिला माहीत आहे,
आणि ते अन्न ती समूहासाठी शोधते.

अर्थात मूलाबाळांना घेऊन हा प्रवास सुखाचा नसतो. हा प्रवास आफ्रिकेतील गवताळ प्रदेशातून करायचा
असतो. तिथे गवतात लपलेले बिबळे दिसू शकत नाहीत. या उलट जर तो प्रवास त्या भागातून जाणार्‍या
रस्त्याने केला तर हा धोका नसतो पण रस्त्यावरील वाहनांचा तर असतोच. दोन्हीकडे अपघात होतातच.

अपघातात दगावलेल्या सभासदांसाठी शोक तर असतोच पण तिथे थांबता येत नाही, पुढे जावेच लागते.

गवताळ प्रदेशात कधी कधी आग लागते. काही वणवे मानवनिर्मित असतात तर काही नैसर्गिक.
मानवनिर्मित वणवे दुष्ट हेतूनेच लावले जातात असे नाही तर काहीवेळा आगीने फार नुकसान होऊ
नये, या हेतूने लावलेले असतात. पण तरी गेल्या १०,००० वर्षात असे दोन्ही प्रकारचे वणवे लागत
असल्याने, तेही आता नैसर्गिकच मानतात. या वणव्यांपासून समूहाचे रक्षण कसे करायचे हे त्यांना माहीत
आहे. कधीकधी तर वणव्यानंतर त्यांना भाजलेल्या बियांचा खाऊ सहज मिळतो, हे पण त्यांना माहीत आहे.

तसा हा समूह शिकार करत नाही, पण एखाद्या दिवशी भूक अनावर झाली तर पुरुष मंडळी एखादे पाडस
वगैरे मारतात.

एकंदर त्यांचे जीवन मजेत चाललेले असते.

आता नवल वाटेल, कि हा समूह मानवांचा नसून एका खास प्रकारच्या माकडांचा आहे. यांचे खुपच सुंदर चित्रण
यू ट्यूबवरच्या, वरील माहितीपटात आहे.

आता नवल वाटेल, कि हा समूह मानवांचा नसून एका खास प्रकारच्या माकडांचा आहे. यांचे खुपच सुंदर चित्रण
यू ट्यूबवरच्या, वरील माहितीपटात आहे. >>>>> यात नवल एकच की आपण एवढे उत्क्रांत म्हणवणारे मानव या मंडळींकडून विमूटभरदेखील अक्कल घेऊ शकत नाही...... अरेरे रे रे, कसले आपण दुसर्‍याच्या, निसर्गाच्या जीवावरच उठणारे अति प्रगल्भ, अति उत्क्रांत, अति विज्ञानशील प्राणी.....

मला आता जगात बाकी कुठेही जायला नाही मिळाले तरी चालेल, काहीही बघायला नाही मिळाले तरी चालेल - पण या प्राण्यांचा सहवास घडावा याची नक्कीच ओढ लागली आहे ......

त्यांच्यावर संशोधन करणारी ती लेडी डोक्याएवढ्या गवतात आणि बिबट्या दिसुनसुद्धा तिथे निर्भयतेने वावरतांना बघुन नवल वाटले.

<<<त्यांच्यावर संशोधन करणारी ती लेडी डोक्याएवढ्या गवतात आणि बिबट्या दिसुनसुद्धा तिथे निर्भयतेने वावरतांना बघुन नवल वाटले.>>>> मलासुद्धा अगदि हेच म्हणायचे होते. खूप छान व्हिडिओ आहे.

दिनेशदा, आमच्याकडे हा व्हिडियो दिसत नाही सलग :अरेरे:....... सारखी सारखी लिंक तुटते त्या फिल्मची...:अरेरे:

असो..

सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!

नवीन वर्षाच्या सर्वांना खूप शुभेच्छा!!

वर गणेशवेली बद्दल च्या लिखाणात वाचल की एक वेळ अजिबात फुल आली नाहीत. निसर्गात अशा अनेक गूढ गोष्टी अनुभवायला मिळतात. माझा एक अनुभव सांगतो. एकदा मला काही आकाराने लहान असे हळदीचे कंद नातेवाईकांकडून मिळाले. पावसाळ्याचे दिवस असल्याने लगेच रुजले, रोपं उगवली. पावसाळा संपल्यावर मी गावी गेलो होतो त्या काळात पान पिवळी पडून सुकुन गेली. मला वाटल पाणी न मिळाल्यान सुकली. कारण माती अगदीच कोरडी झाली होती. म्हणून मी एक दिवस आड का होईना थोड पाणी घालत होतो. पण रोप परत काही उगवली नाहीत. माती उकरुन कंद पाहिले, कुजले नव्हते, थोड शेणखत वगैरे घालून पुन्हा पाणी घालत राहीलो. रोप उगवायच नाव नाही. मी नाद सोडून दिला. पाईप च्या फवार्‍याने पाणी घातल्याने जमीन ओली होत होतीच.
मग पुन्हा एकदा पावसाळा आला. पहिला पाऊस पडला अन काय आश्चर्य रोपांचे कोंब तरारून वर आले. मी वर्षभर घालत होतो ते पाणी बहुतेक त्या कंदाना आवडत नव्हत. Lol अन पावसाच्या पाण्यात नक्की काहीतरी जादू असणार.

सुदुपार !

सर्व निसर्गप्रेमींना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !

दिनेशदा,
विडीवो छान आहे,इतका मोठा असुनही त्या मानाने लगेच डाऊनलोड होत होता ..

मी वर्षभर घालत होतो ते पाणी बहुतेक त्या कंदाना आवडत नव्हत. अन पावसाच्या पाण्यात नक्की काहीतरी जादू असणार.
श्रीकांत,
पावसाच्या पाण्यातुन झाडांना,पिकांना नक्कीच काहीतरी वेगळं मिळत असणार,ऊसाला कितीही पाणी द्या पण ज्या वर्षी पुरेसा पाऊस त्यांना मिळत नाही त्या वर्षी ऊस तितकासा वाढत नाही.

श्रीकांत कांदा, हळद वगैरे कंद सिझनल असतात. जमिनीतुन काढण्यायोग्य झाले की त्यांची वरची पात आपोआप सुकते. मग कितीही पाणी घातले तरी फायदा नाही Happy अशावेळी त्यांना काढून घ्याय्चे आणि ठेऊन द्यायचे. पुढच्या वर्षी पेरले की परत पाने फुटतात.

Pages