१९९२ साली भारतात सुरु झालेल्या जागतिकीकरणानं बाजाराचं व्याकरण बदलून टाकलं. 'गोष्टी जपून वापरा, पिढ्यान् पिढ्या टिकवा' ही शिकवण मागे पडून 'अधिक खरेदी करा, वापरा आणि फेकून द्या' या मूल्यानं भारतीयांच्या मानसिकतेत शिरकाव केला. परदेशी ब्रँडदेखील सुलभतेनं मिळू लागले तसं साहजिकच एकेका गाडीसाठी सहा महिन्यांच्या प्रतीक्षायादीचे किस्से जुनेपुराणे वाटू लागले.
डालड्याचा पिवळा डबा, चेतकची स्कूटर, बोटांनी गोलगोल फिरवत डायल करायचा टेलिफोन ते आजच्या स्टायलिश चारचाकी गाड्या, आयफोन या स्थित्यंतराचे आपण साक्षीदार आहोत. बाजारव्यवस्था बदलली, तसे नातेसंबंध बदलले, आपली परस्परांतली वागणूकही बदलली.
’पुणे ५२’ हा चित्रपट १९९२ साली घडतो. भारतानं मुक्त अर्थव्यवस्थेसाठी आपली दारं उघडली, त्या काळात.
१८ जानेवारी, २०१३ रोजी प्रदर्शित होणारा हा चित्रपट याच बदलांचा वेध घेतो. या चित्रपटाच्या निमित्तानं पुन्हा एकदा या काळाच्या आठवणी जागवूयात.
ही स्पर्धा सोपी आहे. तुम्हांला करायचंय इतकंच की, तुम्हांला आठवत असलेल्या, १९९२ सालानंतर घडलेल्या बदलांमुळे आता आपण फारशा वापरत नसलेल्या, किंवा विस्मरणात गेलेल्या दहा वस्तू लिहायच्या आहेत. उदाहरणार्थ, डालड्याचा पिवळा डब्बा, आणि चेतकची स्कूटर.
या वस्तू (किंवा तुमच्या यादीतल्या जास्तीत जास्त वस्तू) ’पुणे ५२’ या चित्रपटातही असतील, तर तुमचं नाव विजेत्यांच्या यादीत येईल. एकापेक्षा अधिक विजेते असल्यास लकी ड्रॊ पद्धतीनं विजेते निवडले जातील.
या स्पर्धेतल्या दोन विजेत्यांना मिळतील पुणे / मुंबई इथे १७ / १८ जानेवारी, २०१३ रोजी होणार्या शुभारंभाच्या खेळांची प्रत्येकी दोन तिकिटं.
चला तर मग, आठवूयात तो काळ!!!
चेतकची स्कूटर >> मी अजुनही
चेतकची स्कूटर >> मी अजुनही वापरते
१] प्रिमीयर पद्मीनी
२] निरमा
३] कोडॅक कॅमेरा ( नॉन्-डीजीटल )
४] बंब
5] वाण्याच्या दुकाणातला वजनकाटा
६] विको वज्रदंती
७] रॉकेलसाठीची रांग
८] घाण्यावरुन तेल आणने
९] पापड , कुरडया घरी करणे
१०] घराघरात असलेली पितळि भांडि
११] स्टोव्ह
१२] पारले जी चे मोठे डबे ( रंगवलेले )
१३] लाईट-बील , बँक ईत्यादीसाठी रांगा
१४] दुपारी बंद असणारी दुकाणे ( आजकाल राजस्थानी दुकाने जास्त आहेत. आणी ती बहुदा दुपारी बंद नसतात )
१५] रस्त्यावर दिसणार्या सायकलींची संख्या
१६] कॉलेजला जाणार्या मुला-मुलींचा पेहराव
१७] दप्तरांची जागा सॅकने घेतलीये
१८] पत्र येण्याची फ्रिक्वंसी
१९] तिनताळि डबा ( वर्कर्स वापरायचे )
आठवेल तसे लिहीते
छान खेळ
छान खेळ
मस्त आहे खेळ. १९९२ भूतकाळात
मस्त आहे खेळ. १९९२ भूतकाळात गेलेलं बघून मला म्हातारं झाल्यासारखं वाटलं.
बहुतेकांची उत्तरे सारखी असतील
बहुतेकांची उत्तरे सारखी असतील तर कसे करणार?
१. याशीकाचा कॅमेरा २. एनी
१. याशीकाचा कॅमेरा
२. एनी ११८
३.वेस्पा स्कूटर (आता नवीन आली आहे), बजाज, प्रिया, लॅम्रेटा स्कूटर
४. रेशन वर सगळ्यांना मिळणारे रॉकेल, साखर.
५. भांडी घासायची शितल पावडर (अजून मिळते का? आजकाल विम बार किंवा तत्सम)
६. टेपरेकॉर्डर
७. रात्री वीज गेल्यावर वापरले जाणारे सेल वर चालणारे दिवे. (आता इन्वर्टर किंवा इमजन्सी लाइट)
८. एम ५०
९. ब्लॅक अँड वाईट टीव्ही. (खरतर हे आधीच गेले असावेत. पण ९२ नंतर कलरमध्ये नवे नवे ब्रँडस आले. )
१०.आधी फक्त दुरदर्शन आणि त्यावरच्या सिरीअल्स. फक्त दूरदर्शन. नंतर केबल टीव्ही. (हे ९२ मुळे झाले क ते माहितं नाही.)
११. विसीआर. आणि ती मोठी कॅसेट.
स्पर्धा छानच आहे. पण एकाने
स्पर्धा छानच आहे. पण एकाने लिहिलेल्या वस्तु दुसर्याने रीपीट करून चालतील का? असे असेल तर लेट भाग घेणार्याला जास्त चॉइसच उरणार नाही.
सगळ्यांनी लिहिल्यावर मी
सगळ्यांनी लिहिल्यावर मी कॉपीपेस्ट करुन एक पोस्ट बनवनार
१) लुना प्लस २) हिरो पुक ३)एम
१) लुना प्लस
२) हिरो पुक
३)एम ८०
४) ५०१ बार
५) बिनाका/ सिबाका टुथ ब्रश
६) उषा पंखे
७) खेतान पंखे
८) ECE बल्ब
९) वनदेवी हिंग
१०) टीव्हीएस फिफ्टी
११) बीपीएल टीव्ही
१२) झारापकर टेलरिंग
१३) रावळगाव चॉकलेट
१४) माकड छाप दंत मंजन
लाल कलर चा टेप रेकॉर्डर
लाल कलर चा टेप रेकॉर्डर ....कॅसेट सहीत
अॅम्बॅसिडर
अॅम्बॅसिडर
१. अॅल्युमिनियमचे मोठे
१. अॅल्युमिनियमचे मोठे स्टोरेज डब्बे - जे दिवाळीच्यावेळी घासुन पुसुन लखलखीत केले जात त्यावेळी केलेला डब्बाभर फराळ ठेवण्यासाठी ( अजुनही खुपजणांच्या घरी असतील असे डब्बे पण आता त्याची संख्या कमी झाली असेल )
२. स्टीलचे किचन स्टोरेज स्टँड जे आता आउटडेटेड वाटते पण त्यावेळी गृहिणी आवडीने विकत घ्यायच्या व त्यावर घरातील स्टीलची भांडी सजवुन ठेवायच्या.
३. ब्लॅक अॅन्ड व्हाईट टिव्ही जो बहुतेकदा ब्राउन रंगाच्या लाकडी कव्हरमध्ये असायचा.
४. व्हिडियो कॅसेट्स व प्लेयर
५. टेपरेकॉर्डर व कॅसेट्स - आता बहुतेकांकडे जुन्या कॅसेट्स तश्याच पडुन असतील किंवा रद्दित जमा झाल्या असतील.
६. अॅम्बासेडर कार, मारुती व्हॅन
७. गोल्ड स्पॉट, लिमका
८. कोडक कॅमेरा ज्यात रोल भरुन आपण फोटो काढायचो व फोटो धुउन हातात आल्यावर आपल्याला फोटो चांगला निघाला कि वाईट निघाला ते कळायचे. जे आता डिजिटल कॅममुळे लगेच कळते व नको असलेला फोटो तिथल्या तिथे डिलिट करता येतो.
९. शाळेत घेउन जायचे खाकी रंगाचे दप्तर
१०. तांब्या पितळीच्या हंडाकळशी
११. अॅल्युमिनियमच्या बादल्या ज्याची जागा आता प्लॅस्टिकच्या बादल्यांनी घेतली आहे.
१२. पॉन्ड्सचा गुलाबी रंगाचा पावडरचा डब्बा, शिकाकाई साबण, लाईफबॉयचा लाल रंगाचा मोठा साबण, शिंगारची लाल रंगाची गंध बॉटल, पॉन्ड्स कोल्ड क्रिम
१३. स्टीलची भांडीकुंडी - ज्याचा अजुनही वापर होतो पण आता त्यालाही दुसरे पर्याय उपलब्ध आहेत.
१४. रॉकेलवर चालणार स्टोव्ह
१५. बहुतेक घरांवर डौलात उभे असलेले टिव्ही अँटीने
१६. लुना व जुन्या स्टाईलच्या स्कुटर्स
१७. पाटा वरवंटा ,जुन्या डिजाईनचा मिक्सर
१८. लाकडी शोकेस जो हॉलमध्ये ठेवला जायचा, ज्याच्या खालील भागात बंद कप्पे असत व वरील भाग काचेने बंद केलेला असे. ज्यात हौशी गृहिणी क्रोकरी सेट, हस्तकलेच्या वस्तु मांडुन ठेवीत.
१९. BSA SLR साईकल्स
२०. पारले किसमी, मॅंगो बाईट्स, पानपराग,लिमलेटच्या गोळ्या
२१. केसांच्या दोन लांबसडक वेण्या घालुन शाळेत जाणारया मुली
१) वॉकमन २) कॅसेट्स ३) व्ही
१) वॉकमन
२) कॅसेट्स
३) व्ही सी आर
४) झोळी सद्रुश बॅग (शबनम बॅग म्हणतात ना!) (ही तेव्हा अनेकांसाठी रोज वापरायची बॅग होती! माझे बाबा वापरत असत.)
५) भला मोठा टेप रेकॉर्डर (ह्यात कॅसेट घालण्यासाठी २ जागा असत. एका बाजुला एक कॅसेट लावायची. दुसर्या बाजुला २ स्पेशल बटने असायची. आत रेकॉर्डेबल कॅसेट घालून ही दोन बटने दाबली की बाजुच्या साईडला जे काही प्ले होत असेल ते त्यात रेकॉर्ड होत असे. )
६) वाण्याकडून सामान कागदाच्या पुड्यांमध्ये बांधून दिले जाणे.
७) २५ पैशांची नाणी
८) १ रुपयाची नोट
९) पेजर
१०) शाई पेन
१. हॉटशॉटचा चपटा, आडवा कॅमेरा
१. हॉटशॉटचा चपटा, आडवा कॅमेरा ("Just Aim And Shoot " - अशी त्याची जाहिरात लागायची.)
२. १० रुपयांची काळी-पांढरी नोट; २० आणि ५ पैश्यांची नाणी
३. प्रिमियर पद्मिनी कार
४. टाटा शॅम्पू (काचेच्या बाटलीत मिळायचा. टाटा सुगंधी तेलाची बाटली आणि या शॅम्पूची बाटली एकसारखी दिसायची.)
५. एनर्जी दूध कोल्ड्रिंक
६. पुढे इंजिन असलेल्या रिक्षा (इंजिन चालकाच्या सीटखाली असायचं. त्याचा खूप आवाज यायचा.)
७. स्प्रिंगचा सोफा (त्याचा पाठीकडचा भाग आडवा पाडता यायचा.)
८. वाण्याच्या दुकानात मिळणारं सुटं गोडेतेल
९. CIZER ची मनगटी घड्याळं
१०. मॅटिंग (खाली गोणपाट आणि वर आकर्षक रंगसंगती आणि डिझाईन असलेलं एक प्रकारचं कार्पेट. पूर्वी मध्यमवर्गीय दिवाणखान्यांत हे हमखास असायचं.)
१. डबल डेक वाली BESTची बस २.
१. डबल डेक वाली BESTची बस
२. चाळीतील खिळखिळे झालेले लाकडी जिने
३. गलोल
४. Heroची सायकल
५. चटणी पाव (शाळेच्या कॅन्टीन मधला ५० पैशाचा वडा पाव महाग वाटायचा म्हणून १० पैशाचा चटणी पाव)
६. पट्टी समोसा
७. 'थम्स अप'च्या बोटच्या आकारा एव्हढ्या बाटल्या
८. Murphyचा रेडियो
९. पायलची स्लिपर
१०. सार्वजनिक नळ
११. ECचा टिव्ही
१२. Bajajचा बल्ब
१३. शाळेच कापडी दप्तर
१४. लिमलेटची गोळी
१५. कापड गिरणीचा सायरन
छान बदल नोंदवताय मित्रहो!
छान बदल नोंदवताय मित्रहो!
पण ही स्पर्धा आहे, त्यामुळे स्पर्धेचे नियम लक्षात घ्या - तुम्हाला विस्मरणात गेलेल्या दहा वस्तू लिहायच्या आहेत.
दहापेक्षा अधिक वस्तू आठवत असतील तर हरकत नाही. पण मग अग्रक्रमाने दहा वस्तू लिहून पुढच्या वस्तू केवळ आठवण म्हणून लिहा.
@ रोहन..., एकापेक्षा अधिक विजेते असल्यास लकी ड्रॊ पद्धतीनं विजेते निवडले जातील
ऑल द बेस्ट!!
हो खरे तर दहाच लिहायच्या
हो खरे तर दहाच लिहायच्या ठरवल्या होत्या पण नंतर जेवढया आठवत गेल्या तेवढया लिहुन काढल्या
भाग्यश्री अन्नु अगरवाल जुही
भाग्यश्री
अन्नु अगरवाल
जुही चावला (च्यावला असे वाचावे)
रविन टंडन
श्रीदेवी
जयाप्रदा
तब्बु
निलम
शिल्पा शिरोडकर
मधू
.
.
.
.
.
यांचे ५० पैशात मिळणारे फोटू
१) मर्फी रेडीओ २) जाते ३)
१) मर्फी रेडीओ
२) जाते
३) पाटा वरवंटा
४) खल मुसळ
५) गोधडी ( साड्यांची)
६) बिना शीट्टीचा कुकर
७) स्टोव्ह वातीचा
८) चिमण्या, कंदिल
९) काला दंत मंजन
१०) तितली गोटा, (धुण्याचा साबन) (त्यावर मारायची लाकडी बॅट)
११) भुश्याची शेगडी
जुने कागदपत्र, आलेली पत्र
जुने कागदपत्र, आलेली पत्र अडकवून ठेवायची तार..
१) ग्रामोफोन २) पाटी, दगडी
१) ग्रामोफोन
२) पाटी, दगडी पेन्सील
३) वडलांकडचा टाक/ बोरु
४)शाई ची बाटली
५) खाकी दप्तर
६) केनींगचा सोफासेट
७) म्याटिंग - लिनोलियम
८) ब्लॅक & व्हाईट टीव्ही दार वाला
९) क्यासेट्स
१०) सन्मायका लावलेल डायनिंग टेबल , खुर्चा
११) अभ्यासाच लाकडी कपाट
१२) पुस्तक ठेवायला मिळालेली आजीची ट्रंक
१३)लॅमरेटा स्कुटर
१४) न्यारो गेज रेल्वे- कोळशाच इंजीन
इंपाला ची लांबलचक कार
इंपाला ची लांबलचक कार
१) दुधाचा शिट्टीवाला कुकर २)
१) दुधाचा शिट्टीवाला कुकर
२) गोणपाटाची पायपुसणी
३) रावळगाव चॉकलेट्स
४) घरी आईस्क्रिम तयार करायचे भांडे
५) जुन्या पानांच्या बनवलेल्या वह्या
६) रॉकेलचे गॅलन
७) प्लास्टिकच्या वायरपासुन बनवलेल्या बास्केट्स, शोपिसेस
८) जुने प्लास्टिकच्या मोठ्या फ्रेमचे चष्मे
९) घण घण असे टोले देणारि भिंतीवरची मोठी घड्याळे
१०) दिवाणखान्यात ठेवले जाणारे काचेचे कपाट नि त्यातील क्रोकरी
१ - शाळेचे खाकी दप्तर २ -
१ - शाळेचे खाकी दप्तर
२ - मारूती ८००
३ - जुना संगणक ४८६
४ - Heroची सायकल + पुढे बसायला असलेले छोटे सिट
५ - डबलडेकर बस
६ - बजाज एम ८०
७ - टायपिंग मशीन
८ - खाकी दप्तर
९ - असेंबल केलेला कलर टिव्ही
१०- शिलाई मशिन उषा, नॉव्हेल, राजेश
विको वज्रदंती >>> ??? अजूनही
विको वज्रदंती
>>>
???
अजूनही आहे की हे!!
एनर्जी दूध कोल्ड्रिंक >>> माझ्या मते हे ही मिळते ना अजून! दादरला प्यायचो (२००१ पर्यंत तरी प्यायलेय हे दादरला) हे कोल्ड्रिंक हे आठवतेय.
आडव्या गजाच्या खिडक्या शाळेचे
आडव्या गजाच्या खिडक्या
शाळेचे खाकी दप्तर
मुम्बैच्या लोकलची पुठ्याची तिकिटे
टूथपेस्ट्च्या पत्र्याच्या ट्युब्स ( ज्यातील शेवटची पेस्ट लाटण्याने दाबून काढता यायची)
बोर्बोन बिस्किटचा चंदेरी आणि कॉफी रंगाचा पुट्ठ्याचा बॉक्स
बाबांकडच्या जाड्या टकटक् करणार्या बॉलपेनची स्टीलची जाडी रीफील
हॉट्शॉट्चा चपटा ,रोलवाला कॅमेरा
गचीवरच्या लांब दांड्याच्या टीव्ही अँटीना
VCD /VCR
भांडी घासण्यासाठी ओडोपिक पावडर आणि नारळाची शेंडी
दहा वस्तु ब्रॅ.न्डेड च हव्या
दहा वस्तु ब्रॅ.न्डेड च हव्या का ?
अफगाण स्नो! मार्लेक्स
अफगाण स्नो!
मार्लेक्स कुकर
लुना
बिनाका गितमाला
सिबाका टुथ्पेस्ट
बोरोलिन क्रिम
भो.न्ग्याचा रेकोर्ड प्लेअर
प्रिमिअर पद्मिनी गाडी
पितळी ब.न्ब
किल्लीची टोल देणारी घड्याळ
झाडांवर बहुसंख्य असलेल्या
झाडांवर बहुसंख्य असलेल्या चिमण्या
किचन ओट्यामागे असलेली खिडकी
टी.व्ही. साठी सरकतं लाकडी दार असलेली फ्रेम
शिक्का मारून होणारे मतदान
बांधकामाच्या जवळ खडी चाळण्यासाठी तिरकी ठेवलेली जाळीची चौकट
राडारोडा वाहून नेण्यासाठी गाढवं
बॅग्गी पँट्स
लूजर शर्टस्
ऑक्सिडाईज्ड ज्वेलरी
पेठांमधले बहुसंख्य वाडे
कॉम्प्युटर ची धुडं आणि त्यासाठी ए सी रूम्स
हाकामारी आणि भिंतीवर फुल्या !
मी तेव्हा तिसरी चौथीला
मी तेव्हा तिसरी चौथीला असल्याने फारसं काही आठवत नाही पण तरीदेखील:
१९९२ साली शाहरूख खानचे दिवाना, दिल आशना है, चमत्कार आले. हिंदी सिनेसृष्टीमधे एका सुपरस्टारचा उदय वगैरे अजिबात वाटलं नव्हतं तेव्हा!!! (यात विस्मरणात काय गेलय? तर शाहरूखचा नैसर्गिक स्क्रीन प्रेझेन्स!! आतासारखा कृत्रिम नव्हता तेव्हा)
मला आठवतं ते जवळजवळ सगळं वर
मला आठवतं ते जवळजवळ सगळं वर येऊन गेलंय. एका वस्तूचा उल्लेख झालेला नाहीये. ती म्हणजे एचेमटीची चावीची मनगटी घड्याळं. हल्ली दिसंत नाहीत. उच्च दर्जाची होती.
-गा.पै.
Pages