जाणले आहे तुला मी कोठला आहेस तू
मीच रे बाहेरचा माझ्यातला आहेस तू
वेळ असते आठची जातात साडेआठला
जा पुन्हा ये !.. येत साडेसातला आहेस तू !!
हो जरा निश्चिंत आता ऐक बापा माझिया
काळजी माझी करत का जागला आहेस तू
दे सजा ; आधी जरा आतील नजरेने पहा
आळ माझ्या पाहण्यावर घेतला आहेस तू
मी तुला प्रत्येक हलचालीत माझ्या पाहतो
एवढा अंदाज माझा भारला आहेस तू
मी स्वतःच्या जाणिवांच्या झावळ्यांची झोपडी
......आणि टोलेजंग माझा बंगला आहेस तू !!!
तू तुझी तब्येत सांभाळून कविता करत जा
की मला समजेल आता चांगला आहेस तू
वेळ घालवणार आहे मी स्वतःसोबत जरा
बेफिकिर माझ्यामधे का थांबला आहेस तू
______________________________________
घे तखल्लुस् "वैभवा" !!,,,,कर गझल , दाखव ह्या जगा ;
...................केवढा प्रेमात माझ्या विठ्ठला अहेस तू !!
______________________________________
तू तुझी तब्येत सांभाळून कविता
तू तुझी तब्येत सांभाळून कविता करत जा
की मला समजेल आता चांगला आहेस तू .................. छान सदिच्छाभाव !
दे सजा ; आधी जरा आतील नजरेने
दे सजा ; आधी जरा आतील नजरेने पहा
आळ माझ्या पाहण्यावर घेतला आहेस तू............मस्त मिसरा
मी तुला प्रत्येक हलचालीत माझ्या पाहतो
एवढा अंदाज माझा भारला आहेस तू.............वा वा वा ...आवडला शेर.
सगळ्याच द्विपदी अत्यंत हृद्य,
सगळ्याच द्विपदी अत्यंत हृद्य, वैभव,अभिनंदन एका सुंदर गझलेच्या निर्मितीसाठी.
मैत्र, प्रीती अन भक्तीतला अनन्यभाव ओतप्रोत भरलेला प्रत्येक ओळीत.
पु.ले.शु.
दे सजा ; आधी जरा आतील नजरेने
दे सजा ; आधी जरा आतील नजरेने पहा
आळ माझ्या पाहण्यावर घेतला आहेस तू>>> खयाल मस्त, आतील हा शब्द पोहचत नाही.
मी तुला प्रत्येक हलचालीत माझ्या पाहतो
एवढा अंदाज माझा भारला आहेस तू>>> पुन्हा खयाल मस्त, मात्र 'अंदाज' हा शब्द हिंदीतल्या अर्थाने वापरला आहेस ना? मराठीत अंदाज ह्या शब्दाचा अर्थ वेगळा आहे त्यामुळे शेर गोंधळात पाडू शकतो
मी स्वतःच्या जाणिवांच्या झावळ्यांची झोपडी
......आणि टोलेजंग माझा बंगला आहेस तू !!!>>> हा ही मस्त. जाणीवांच्या झावळ्या ही प्रतिमा सुंदर पण सानी मिसर्यात टोलेजंग हा शब्द त्याला न्याय देत नाही.
छान गझल. जरा कीस पाडला, नाराज होऊ नये
शुभेच्छा!
छान गझल....
छान गझल....
केवढा प्रेमात माझ्या विठ्ठला
केवढा प्रेमात माझ्या विठ्ठला अहेस तू>>
अप्रतिम, गझल छान
झावळ्या आणि विठ्ठ्ला ..
झावळ्या आणि विठ्ठ्ला .. दोन्ही मिसरे खूप आवडले.
...
जाणले आहे तुला, माझ्यातला आहेस तू
केवढा प्रेमात माझ्या विठ्ठला आहेस तू ..... ही सुचवनी किंवा पर्याय नाही. तुझ्याच गझलेतली ताकद आहे
पु.ले.शु!
श्रावण१८ , प्रियातै , भरतीताई
श्रावण१८ , प्रियातै , भरतीताई ,कणखरजी ,अरविंदजी , खंडाळीकर , शामजी धन्यवाद
भारतीताई विषेश आभार तुमचा प्रतिसाद मला अगदीच पटला
शामजी तुमचेही विषेश आभार
कणखरजी मी मनातल्यामनात पाडलेला कीसच तुम्हीही पाडलात हे खूप आवडले
त्यामुळे नाराज होण्याचा प्रशच नाही .....त्यात तुमच्यावर नारा़ज होण्याचा तर कधीच नाही ! ......पंढरपुरात वर्ल्डफेमस असा एक डायलॉग आहे <<<<नाराज व्हायला मी काय म्हाराजय का !!>>>> 
कणखरजी तो "ऐक बापा माझिया" .... अन् "केवढा प्रेमात माझ्या" ........ हे शेर सोडून बाकी सगळे बेफीजींसाठी मी म्हणू शकेन असे आहेत...... काहीतर त्याच भूमिकेतून लिहिले होते अजूनही काही ४-५ शेर आहेत या गझलेत दिले नाहीत ...विचार केला ; कधीकधी समोरच्यास अन् स्वतःलाही इतकं हळवं करण्यात अर्थ नसतो !!
थांबतो
सर्वांचे पुनश्च आभार
हे शेर सोडून बाकी सगळे
हे शेर सोडून बाकी सगळे बेफीजींसाठी मी म्हणू शकेन असे आहेत...... काहीतर त्याच भूमिकेतून लिहिले होते>>>
वाचताना जाणवले होते मला ते.
(No subject)