ज्ञानोबा माऊली.
अगा जी उदारा | ज्ञानाच्या सागरा | संत योगेश्वरा | तुज नमो ||
विश्वाची माऊली | भक्तांसी साउली | तुझीच पाऊली | हृदी वसो ||
(प्रगटे करुणा | ऐसा गा महिमा | परब्रह्मरुपा | तुज नमो ||)
ग्रंथ ज्ञानेश्वरी | काय वानू थोरी | बरवी साजिरी | दिली आम्हा ||
तूच उकलवी | त्यातील भावासी | कवळ भरवी | माता जैशी ||
लागोनी चरणा | प्रार्थी पुन्हा पुन्हा | द्यावे कृपादाना | इतुकेच ||
नको योगज्ञान | निरंजनस्थान | भक्तिचे निधान | देई माये ||
वैखरी वसावी | ओवी ज्ञानदेवी | हरिपाठी गोडी | वाढो नित्य ||
गुरुकृपे साच | कळो आले हेच | ठसा भक्तिचाच | श्रेष्ठ ऐसा ||
तोच अंतरात | उमटवी सत्य | जाईल असत्य | लयासीच ||
जपता अंतरी | ज्ञानदेव हरि | दुर्गुण विखारी | उरेचिना ||
व्यापता निखळ | तूच गा निर्मळ | भरे प्रेमजळ | हृदयात ||
मग मी निवांत | राहेन निश्चिंत | येवो की देहांत | बापुडा तो ||
विश्वाची माऊली | राखे ब्रीदावळी | पुरवावी आळी | बालकाची ||
__/\__ अर्थ सगळाच कळला अस
__/\__
अर्थ सगळाच कळला अस नाहिये, पण भाव पोहचला.. अप्रतिम रचना..
तोच अंतरात | उमटवी सत्य |
तोच अंतरात | उमटवी सत्य | जाईल असत्य | लयासीच ||
जपता अंतरी | ज्ञानदेव हरि | दुर्गुण विखारी | उरेचिना ||
व्यापता निखळ | तूच गा निर्मळ | भरे प्रेमजळ | हृदयात ||
सुंदर..!! शशांक....
फारच सुन्दर!देहांतालाहि बपुडा
फारच सुन्दर!देहांतालाहि बपुडा म्हणाव इतक निवांतपण त्यांच्या व्यापण्यानि येइल.केवढि हि श्रद्धा.
चिमुरी, जोशी, शोभनाताई -
चिमुरी, जोशी, शोभनाताई - सर्वांचे मनापासून आभार....
अवीट गोड!!
अवीट गोड!!
सुंदर अर्थ सगळाच कळला अस
सुंदर
अर्थ सगळाच कळला अस नाहिये, पण भाव पोहचला.. अप्रतिम रचना..>>>>+१.
पुरंदरे साहेब या रचनेसाठी
पुरंदरे साहेब या रचनेसाठी म्यां पामराचा सा. न. स्वीकारा ...........
_________/\__________
फारच सुंदर
फारच सुंदर
फारच सुन्दर!देहांतालाहि बपुडा
फारच सुन्दर!देहांतालाहि बपुडा म्हणाव इतक निवांतपण त्यांच्या व्यापण्यानि येइल.केवढि हि श्रद्धा.
>>> +१
फारच शांतपणे संयमाने केलेली
फारच शांतपणे संयमाने केलेली खूप काही सांगणारी रचना आवडली.
फार सुंदर.
फार सुंदर.
शशांकजी, केवढा अवघड विषय
शशांकजी, केवढा अवघड विषय लीलया हाताळलात.
शब्दकळा अशी की सात्विकाला सौंदर्याचा साज..
व्यापता निखळ | तूच गा निर्मळ | भरे प्रेमजळ | हृदयात ||
मग मी निवांत | राहेन निश्चिंत | येवो की देहांत | बापुडा तो ||
अन त्यावर शांतरसाचा शिडकावा...
छान
छान
वा ! फारच छान
वा ! फारच छान
शशांक अतिशय अतिशय रसाळ... खूप
शशांक अतिशय अतिशय रसाळ... खूप आवडली.
नको योगज्ञान | निरंजनस्थान | भक्तिचे निधान | देई माये ||
मग मी निवांत | राहेन निश्चिंत | येवो की देहांत | बापुडा तो ||
... देहांताला बापुडा करण्याची शक्ती...
केवळ अप्रतिम
बागेश्री, जिप्सी, वैभव,
बागेश्री, जिप्सी, वैभव, स्मितू. कविन, मराठे, दिनेशदा, भारतीताई, डॅफोडिल्स, अवल, दाद ----------
प्रतिसादाबद्दल (म्हणजेच माऊलींवरील प्रेमाबद्दल) सर्वांचे मनापासून आभार.
"ओवी ज्ञानेशाची | अति आवडीची | पूर्ण ज्ञानेश्वरी | सामावली ||"
खुप छान.. आवडली.
खुप छान.. आवडली.
कृपा आहे कृपा राहो.वांछित
कृपा आहे कृपा राहो.वांछित लाहो .जे हवे ते .
अप्रतिम रचना
अप्रतिम रचना
नको योगज्ञान | निरंजनस्थान |
नको योगज्ञान | निरंजनस्थान | भक्तिचे निधान | देई माये || ... क्या ब्बात... !!
खूप खूप सुंदर!
खूपच छान. माउली...!! उशिरा
खूपच छान. माउली...!!
उशिरा वाचली मी खूप
ग्रंथ ज्ञानेश्वरी | काय वानू
ग्रंथ ज्ञानेश्वरी | काय वानू थोरी | बरवी साजिरी | दिली आम्हा ||
तूच उकलवी | त्यातील भावासी | कवळ भरवी | माता जैशी ||
अप्रतिम..
प्रिय शशांक, फार छान. तुमच्या
प्रिय शशांक,
फार छान. तुमच्या रचनेत काव्यगुण आणि भक्तीभाव दोन्ही आहेत. तुम्ही अधिकाधिक लिहावे असे वाटते.
)
एक छोटीशी सूचना - तुमच्या लिखाणात काहीच दोष नाहीत म्हणून (आधीच क्षमा मागतो
ह्या प्रकारच्या काव्यात, दुसरया आणि तिसरया चरणाचे यमक जुळले पाहिजे. पाहिल्याचे जुळले तर उत्तम, नाही जुळले तरी ठीक.
उदा (दोन्ही प्रकारचे):
१. देवाचिये द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्ती चारी साधियेल्या || - (३ जुळतात)
२. तुका म्हणे तेथे पाहिजे जातीचे येरा गबाळ्याचे काम नोहे || - ( २ जुळतात)
३. प्रगटे करुणा ऐसा गा महिमा परब्रह्मरुपा तुज नमो || - (काहीच जुळत नाही)
मी ह्यातील तज्ञ नाही - अभ्यासू आहे.
खुपच सुंदर रचना आहे ह.भ.प.
खुपच सुंदर रचना आहे ह.भ.प. पुरंदरे महाराज.
सुरेख! अतिशयओघवती रचना! सहज
सुरेख! अतिशयओघवती रचना! सहज सुंदर!! आवडलीच
मनस्मी, विक्रांत, अनिल, शाम,
मनस्मी, विक्रांत, अनिल, शाम, चैतन्य, सारीका, आकाश नील, पा भे, के अंजली - सर्वांना मनापासून धन्यवाद.
आकाश नील - तुमचे म्हणणे पूर्ण मान्य. आता केलेला बदल कसा वाटतोय?
सुरेख!
सुरेख!
मी दोनदा मोठा अभीप्राय दिला
मी दोनदा मोठा अभीप्राय दिला पण तो इथे दिसत नाही ...
बदल चांगला आहे
श्री ज्ञानेश्वर महाराज
श्री ज्ञानेश्वर महाराज जन्मसोहळा - श्रावण वद्य अष्टमी
श्री ज्ञानेशो भगवान विष्णु: ||
माऊली, माऊली ......