निसर्गाच्या गप्पा (भाग ११)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 13 October, 2012 - 04:19

"जगात नाही मित्र मिळाले तरी सृष्टीत आहेत. आपल्या घरी नाही मिळाले तरी बाहेर आहेत. देवाने आधीच तुम्हाला मित्र दिले आहेत. हे निळे निळे अनंत आकाश. ते नेहमी तुमच्यावरच पाखर घालीले. तारे तुम्हाला रमवतील. नद्या पाणी देतील. वारा गाणे गाईल. फुले सुगंध व सौंदर्य देतील. वृक्षलतावेली तुमच्यासमोर डोलतील, नाचतील. फार दु:ख नका करू. कोणी शिव्याशाप दिले तर वाईट नका वाटुन घेऊ. या निसर्गाकडे पहा आणि आनंदी रहा.
-सानेगुरूजी (सानेगुरूजींच्या गोड गोष्टी).
जिप्सी यांच्या सौजन्याने.

निसर्गाच्या गप्पांच्या ११ व्या भागाबद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मागे साधनाच्या घरच्या कलिंगडाचे फोटो बघितले होते त्यावरुन आठवले.
इथे गेल्या २ महिन्यापासून पावसाळी वातावरण आहे. दुपारच्या सुट्टीत आमच्याच कंपनीतील कामगारांनी कलिंगडे खाउन ज्या बिया फेकल्या होत्या, त्याचे बरेच वेल तयार झालेत. काल बघितले तर त्यांना आता मोसंब्याएवढी कलिंगडे पण लागली आहेत. आता ती किती मोठी होतील, ते बघायचेय.

. ऑफिसमधल्या एका झाडाचे आंबे खुप गोड आहेत. ते मला दिले जातात>>>>>>>>>.दिनेशदा मज्जा आहे तुमची. मी आंब्याला मुकलो असं वाटायला नको. Happy

आमच्याच कंपनीतील कामगारांनी कलिंगडे खाउन ज्या बिया फेकल्या होत्या, त्याचे बरेच वेल तयार झालेत. काल बघितले तर त्यांना आता मोसंब्याएवढी कलिंगडे पण लागली आहेत.>>>>>>>>..भगवान जब देता है, छप्पर फाडके देता है! Lol आता खा हवी तेवढी कलिंगड. Happy

माझ्याकडे सध्या जास्वंदाची खुप फुले येत आहेत... रंग पण खुप सुरेख आहे. लाईट गुलाबी रंगाची. नंतर एकदा
फोटो टाकेन.....

जिप्सी, तू म्हणतोस तसंच आहे. मुचकुंदाच्या बोटॅनिकल नावात खूप कन्फ्यूजन आहे. अजूनही निरनिराळ्या बोटॅनिस्टचे मत वेगवेगळे आहे. टेरोस्पर्मम अ‍ॅसेरिफोलियम आणि टेरोस्पर्मम सुबरीफोलियम यातला नक्की कनकचंपा कोण आणि मुचकुंद कोण हा वादाचा मुद्दा आहे. पण फुलं मात्र तू वर दिलेल्या दोन्ही प्रकारच्या पानांच्या वृक्षांची सारखीच असतात. शिवाय सुगंधपण सारखाच असतो. आहे की नै गंमत! पण आपल्या सर्वांची (निग वाल्यांची) एक गोष्ट खूप छान आहे; ती म्हणजे ह्या वादात आपण कुणीच पडत नाही तर फक्त आनंद घेण्यासाठी म्हणून ह्या चर्चा आपण करत असतो. Happy

सध्या पांढरी सावर फुलावर आलीये. बर्‍याच वृक्षांवर पानोपान कळ्या लागल्याएत.

मी असतोच नेहमी ! जागूबाई सध्या बिझी आहेत.

या वर्षी महाराष्ट्रात तीव्र पाणी टंचाई जाणवेल का ? मुख्यमंत्रानी आतापासूनच तसे सांगायला सुरवात केली आहे. आतापासून आहे त्या पाणीसाठ्याचे नियोजन केले पाहिजे.

कसले नियोजन करताहेत कप्पाळ???

आणि शासनाने कितीही नियोजन केले तरी आपले काय?? आपण इथे कुठली गोष्ट संभाळून वापरतो? हा देश माझा आहे म्हणुन मी अमुक अमुक सार्वजनिक गोष्ट संभाळणार आहे हा विचार आपण करत नाही तर हा देश माझा आहे म्हणुन अमुक अमुक सार्वजनिक गोष्टीचा सत्यानाश करायचा मला अधिकार आहे हा विचार आपण करतो.

नेरुळला वंडर्स पार्क गेल्या शनवारी सुरू झाले. अतिशय सुंदर पार्क, जगातील सात आश्चर्ये तिथे मिनिएचर रुपात उभी केलीत. तिथली परिस्थिती पाहाल तर लाजेने मान खाली जाईल. 'हात लाऊ नका' असा बोर्ड लावलेला आहे, शेजारी सिक्युरीटी गार्ड उभा आहे, हात लाऊ देत नाही तरीही लोक हात लावून पाहाताहेत. काही उत्साही मंडळी गार्डशी हुज्जत घालताहेत, हिरवळीवरुन मुले धावताहेत, धावण्यासाठी वेगळी जागा आहे, पण नाही, आम्ही हवे तिथुनच धावणार.

बसण्यासाठी, खाण्यासठी वेगळी जागा आहे पण तरीही मिळेल तिथे बसुन, खास करुन राखिव हिरवळीवर बसुन पालक-बालक चरताहेत, चरल्यावर उरलेले अन्न आणि कागद तिथेच टाकताहेत. शेजारच्या कचराकुंड्या वाट पाहताहेत 'आमचा खाऊ आम्हाला द्या' म्हणुन, कोणाचे तिकडे लक्षही नाही.

वॉशरुममध्ये नळ वाहताहेत, लोकांना नळ उघडायला हात आहेत, बंद करायला नाहीत.. पाण्याचे छोटे तलाव केलेत नुसते पाहायला, लोक त्यात चक्क डूंबताहेत. मुले तिथेच कपडे बदलताहेत. ओल्या मुलांनी महिलांचे वॉशरुम नुसते पाणीमय करुन टाकलेय. मिनी रेल्वे ख-या रेल्वेपेक्षाही जास्त ओसंडुन वाहतेय. आपला नंबर येईतो वाट पाहायची तयारीच नाही कोणाची.

डोक्यावर हात मारुन घेतला हे सगळे पाहुन..... आपण फक्त परदेशातल्या पार्कांची स्तुती करायची, आपल्याकडे का नाही म्हणुन हळहळायचे. आणि मग शासनाने बनवुन दिले की पहिल्याच दिवसापासुन त्याचा सत्यानाश करायचा. वर कोणाला बोलायला गेले की, तेरे बाप का है क्या? हे ऐकायचे. हा देश सगळ्यांचा बापाचा आहे, आणि त्यामुळेच कोणाचाही नाही. Sad Sad Sad

इतर बाफांवर मुलांवर संस्कार करायला हवेत हा उपदेश वाचला की हसू येते. कोणावर संस्कार करायचे? कोणी करायचे? इथे मनुष्यप्राणी म्हणुन जन्माला आले की काय करायचे ह्या बेसिक संस्कारापासुनच सगळी वानवा आहे, तिथे इतर संस्काराचे काय विचारता?

आमच्या एसवर यापेक्षा जास्त चांगले संस्कार आहेत आणि ते आम्ही केलेले नाहीत तर त्याच्या रक्तातच आहेत.

साधना, खरोखर हि मनमानी वृत्ती कुठून येते तेच कळत नाही. जे काही आहे ते आजच लुबाडून खायचंय, जणू काही जग उद्या खरंच बुडणार आहे !

सध्या माझ्या ऑफिसरुमच्या बाहेर वडाची फळे खायला बरेच पक्षी येतात. बुलबुल - लालबुड्या व रेड व्हिस्कर्ड, तांबट, व्हाईट आय, कोकिळ, मॅगपाय रॉबीन, हळद्या, शिंपी, इ.
पक्षी व आमच्यामधे सनफिल्म कोटेड काच असल्याने चांगले निरीक्षण करता येते (म्हणजे आम्हाला ते जवळून पहाता येतात पण पक्ष्यांना आम्ही लोक दिसत नाहीत). सर्व पक्षी प्रचंड चळवळ करीत असल्याने फोटो काढणे अशक्यच असते.
.....पण.....एक हळद्या (गोल्डन ओरिओल) जवळजवळ १५-२० मि. एका जागी बसून होता पण कॅमेरा मिळवून फोटो काढेपर्यंत महाराज हालचाल करु लागले - तेवढ्यात हे फोटो मिळाले ----

1.JPG2.JPG3.JPG4.JPG

दिनेशदा,
राज्यातला या वर्षीचा दुष्काळ हा १९७२ पेक्षा भयानक आसेल अस काही जाणकार म्हणत आहेत, पण हिवाळी अधिवेशन आणि बाकीच्या अनेक (याहुन महत्वाच्या?) घटना,इतर विषयामुळे या विषायाकडे बघायला कुणाकडे वेळ दिसत नाही.खुप दिवसांनी मा.मुख्यमंत्र्यांनीच हा विषय काढला.

साधना,
तुम्ही लिहिलेल सगळीकडेच दिसतं, हा अगदी राग येणारा,विचार करायला लावणारा प्रकार/विषय आहे.
लोक जे चुकीच वागतात, मुळात ते चुकीचं आहे,इतरांना त्रासदायक आहे, हेच त्यांना कुणी शिकवलेल नसतं किंवा माहित नसतं अस मला वाटतं..

शशांकजी,
छान फोटो आणि माहिती ..

हळद्या किती गोड दिसतोय. दोनेक आठवड्यापुर्वी मी याच आकाराचा एक हळद्या पाहिलेला... अगदी अकस्मात हिरव्या पानांच्या आड दडलेला दिसला Happy

हळद्या जेव्हा झाडात शिरतो त्यावेळी त्याचा पिवळा रंग कसला झळाळतो, नाही. अगदी सोनसळी रंग असतो तो.

अनिल,
७२ चा दुष्काळ आठवतोय मला. तांदळाचे भाव खुप वाढले होते. पण त्यावेळी निदान रेशनिंग तरी होते. आता तर तेही नाही. सरकारी गोदामात धान्य असेल किंवा ते आयातही करता येईल. पाण्याचे काय ?

झी मराठीवर मधली सुट्टीत पुण्याची राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा सुरू आहे, माझ्या ऐशूची शाळा Happy

शशांक मस्त फोटो.
मला असं वाटतं की जेवढा लहान पक्षी तेवढा अस्थीर असतो आणि जेवढा मोठा तेवढा शांत असतो, त्याच्या हालचाली निवांत असतात व बराच वेळ एका जागी बसतो. त्या मुळे छोट्या पक्षांचे फोटो मिळवण कठीण जातं.

जो एस, नैरोबीला पक्ष्यांचा वेगळाच अनुभव येतो. तिथले मोठे मोठे पक्षी तर रस्त्यावरच्या ट्राफिक जॅममधूनही चालत फिरत असतात. आणि तिथल्या उद्यानातले पक्षी तर आपल्या पुढे पुढे करतात. माझा फोटो काढ, असे सांगताहेत असे वाटते. मी तिथले असे फोटो इथे टाकले होते.

आणि तिथल्या उद्यानातले पक्षी तर आपल्या पुढे पुढे करतात. माझा फोटो काढ, असे सांगताहेत असे वाटते. >>>> आपल्या भारतातील पक्ष्यांनी यातला चिमूटभर तरी धडा घेणे फार आवश्यक आहे - असे सर्व फोटोग्राफर्सना राहून राहून वाटेल... Happy

शोभा, मदत मिळेलच. या आजारातून मुले हमखास बरी होतात. आमच्या सोसायटीत एक केस आहे. आता त्या मुलाकडे बघून, त्याला लहानपणी हा आजार होता हे खरे वाटणार नाही.

बापरे १४४ पोस्ट वाचायच्या आहेत. सावकाश वाचेन. फोटोही काही टाकायचे आहेत. तेही टाकेन हळू हळू.

जूना आहे तो लेख. दुसरा भाग पण होता त्याचा.

इथही काही वेगळे पक्षी दिसताहेत. पण मी इथे आल्यापासून एकही कावळा बघितलेला नाही. आफ्रिकन कावळा, भारतीय कावळ्यांपेक्षा वेगळा असतो. आकाराने मोठा असतोच पण त्याचा गळा आणि पोट पांढरे असते. तो मला केनयात आणि नायजेरियातपण दिसला. पण इथे अंगोलात मात्र नाही.

प्रज्ञा१२३,
इथे सकाळ नॉट अलॉवड,त्यामुळे नंतर वाचेन

दिनेशदा,
छान माहिती
आज दुपारी बाजुला झाडांवर बसलेल्या दोन शांत कावळ्यांकडे माझ लक्ष गेलं, इथे नेहमी दिसत असलेले कावळे रंगाने गडद काळे दिसत नाहीत,कावळ्यांमध्ये देखील अनेक प्रकार असतील ना ?

आपल्याकडे राखी मानेचे आणि पुर्ण काळे ( डोमकावळे ) दिसतात. मुंबईला राणीच्या बागेत पुर्ण पांढरा कावळा पण आहे.

दुर्गा भागवत म्हणतात, कावळ्यासारखा सभ्य प्राणी नाही. त्यांचे मिलन कुणाच्याही नजरेस पडत नाही.

कावळा प्रचंड चाणाक्ष, सावध, हुशार वगैरे सर्व काही असतो. आपण एखादा पदार्थ खात असू तरच तो ते खाईल. इतर कुठल्याही पक्ष्यांपेक्षा त्याने स्वतःला आसपासच्या परिसराशी व्यवस्थित मिळवून घेतले आहे. आमच्या घराच्या जवळच पाचगाव पर्वती वनविहार भाग आहे. मी पूर्वी त्यात फिरायला जायचो तेव्हा लगेच तिथले कावळे ओरडून इतर प्राणी व पक्षी यांना सावध करायचे. कावळ्याचे फोटो काढणेही लवकर शक्य होत नाही - आपल्या हातातील कॅमेरा बघून तो केव्हाच पसार होतो - आपल्या हातात दुर्बिण, कॅमेरा असे काहीही असले तरी शंकेखोर कावळा लांब जातो व इतर पक्ष्यांनाही सावध करतो.

Pages