बलात्कारविरोधी आंदोलन भरकटत तर चालले नाही ना???

Submitted by आशुचँप on 23 December, 2012 - 08:58

गेले दोन दिवस बातम्यांमध्ये जे वाचतोय आणि न्यूज चॅनेलवरून जी दृश्ये दाखवत आहेत त्यावरून सुरुवातीला तरी असे वाटले चला, अत्याचाराविरुद्ध देशाची जनता रस्त्यावर उतरून आपली संवदेनशीलता दाखवत आहे आणि हेच जिवंत समाजाचे लक्षण आहे. आता त्या दुर्दैवी तरूणीला नक्कीच न्याय मिळेल.
पण जसे जसे आंदोलनाला हिंसक वळण लागू लागले तशी मनात शंका डोकावू लागली की हे आंदोलन भरकटत तर चालले नाही ना.
ही आंदोलने म्हणजे सरकारविरुद्ध, महागाईविरुद्ध, भ्रष्ट्राचाराविरुद्ध, सडलेल्या व्यवस्थेविरुद्ध साचत चाललेल्या संतापाला एक मोकळी वाट करून देण्याचे माध्यम असा समज तर लोकांमध्ये पसरत तर चालला नाहीये ना.
मान्य आहे की त्या दुर्दैवी तरुणीबद्दल सगळ्यांनाच सहानभुती आहे आणि हे नृशंस कृत्य करणार्यांबद्दल तीव्र संताप. पण गेले दोन दिवस इंडिया गेट आणि राष्ट्रपती भवनासमोर जो जमाव पोलिंसांवर दगडफेक आणि गाड्यांची तोडमोड करत आहे त्यातले खरोखर किती टक्के लोक खरोखर त्या प्रश्नाच्या मूळाशी जायचा प्रयत्न करत आहेत. आता तर अरविंद केजरीवाल त्यांच्या आम आदमी पार्टीसह आणि बाबा रामदेव त्यांच्या सहकार्यांसह आंदोलनात उतरले आहेत. त्यामुळे याला एक वेगळेच राजकीय वळण लागण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
बलात्कार्यांना कडक शासन व्हावे ही सगळ्यांचीच इच्छा आहे पण दगडफेक करून ती कशी साध्य होणार.
एका दिवसात तर कायदा बदलता येणे शक्य नाही. हे म्हणजे अण्णांच्या आत्ताच्या आत्ता लोकपाल बिल पास करा नाहीतर उपोषण करतो यासारखे झाले.
इतक्या ताकतीने आख्खे राष्ट्र त्या तरुणीच्या बाजूने उभे राहील्यामुळे सरकारला, पोलिसांना आणि न्यायालयाला चालढकल करणे शक्यच होणार नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे या दगडफेकीने नक्की काय साध्य होणार आहे.
निदर्शने आणि मोर्चांनी आपण पहिली लढाई जिंकली आहे. आता कायद्यात बदल होण्यासाठी सदनशीर मार्गानेच जाण्याची आवश्यकता आहे असे वाटत नाही का...
तुम्हाला काय वाटते

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आता तर अरविंद केजरीवाल त्यांच्या आम आदमी पार्टीसह आणि बाबा रामदेव त्यांच्या सहकार्यांसह आंदोलनात उतरले आहेत >> आयत्या बिळावर नागोबा आहेत ते.
तरुणांनीच त्यांना बाहेर काढले पाहीजे
आता जे काही चालु आहे ते भावनेच्या भरात चालु आहे. त्याचाच फायदा हे आधुनिक नागोबा उचलायला पाहत आहेत Angry

का? बाबा रामदेव आणि केजरीवालांना ह्या घटनेवर प्रतिक्रिया देण्याचाही हक्क नाही का? त्यांचे राजकारण हा वादाचा विषय असू शकतो.पण यात जेवढे जास्त्तीते जास्त लोक उतरतील तेवढे बरे....

होय.

आंदोलन भरकटले आहे यात शंकाच नाही.मुळात मागण्या काय आहेत तेच समजले नाहिये.घडलेली घटना अमानुश आहे यात वाद नाहि पण अशी तोडफोड्,जाळपोळ करुन राष्ट्राच्या सम्पत्तीचे नुकसान सोडून काय साध्य होणार आहे? निर्नायकी आंदोलने क्षणभंगुरच ठरतात शेवटी.तापलेल्या तव्यावर स्वताच्या राजकीय पोळ्या भाजायला लोक टपूनच बसलेले असतात.

आंदोलनाला पाठिंबा द्यायलाच हवा. प्रश्न ताबडतोब कायदा कसा होणार हा नसून विश्वार्हतेचा आहे. बाबा रामदेव ह्यांचे आंदोलन पोरकटपणाचे होते, केजरीवाल भडकाऊ भाषणे करतात, लोकपाल बिल ताबडतोब आणा म्हणणारे आण्णा बालिश वाटतात मग 'सिस्टीम' बदलणार कशी आणि कधी? आंदोलन कोण करतय ह्या पेक्षा मुद्दे आणि मागण्या योग्य आहेत का? हे महत्वाचे. कुठलेही राजकारणी तापल्या तव्यावर पोळी भाजण्यात पटाईत असतात फक्त त्यांना आपण आपल्याला गृहीत धरायची मोकळीक द्यायला नको. हिंसक आंदोलने चुकीचीच आहेत पण अहिंसक आंदोलने करणाऱ्या रामदेव बाबा, आण्णा हजारे आणि आत्ता जमलेल्या तरुणी ह्या काय सरकार उलथवायला आल्या होत्या का? आंदोलनाची दिशा भरकटत आहे असे वाटतंय हे नक्की. पण उद्रेकाला थोडं संयमानी आणि सन्मानानी बघुयात. चुकीच काही होत असेल तर निषेध करूयात पण मुद्द्याला तर पाठिंबा देऊयात. बघा पटतंय का?

बाबा रामदेव आणि केजरीवालांना ह्या घटनेवर प्रतिक्रिया देण्याचाही हक्क नाही का?
------ हक्क जरुर आहे पण एव्हढा वेळ का लागला त्यांना प्रतिक्रिया तयार करायला ? शब्दांच्या शोधात होते का?
जर प्रतिक्रिया द्यायला एव्हढा वेळ यांना लागू शकतो तर संसदेने कायदे तत्पर, त्वरित करावेत अशा अपेक्षा ते कसे ठेवतात ?

भावनेचा फायदा घेणं आणखी कुठल्या लोकांना चांगलं जमतं ह्याची उदाहरणं पाहिलीत की भारताने.

सर्व मवाली कोणीतरी घुसडलेच असणार... दुसरे काय.

महाराष्ट्र टाईम्सः-
देशभर महिलांविरोधात होणाऱ्या अत्याचाराविरोधात दिल्लीतील मध्यमवर्गीय तरुणांनी शांततेत आणि गांभीर्याने सुरू केलेल्या आंदोलनाचे रुपांतर रविवारी मात्र हुल्लडबाजीत झाले! संपूर्ण दिल्ली शहरात लागू करण्यात आलेली जमावबंदी झुगारून शेकडो तरुणांनी इंडिया गेट आणि आसपासच्या परिसरात ठिय्या दिला... आणि दुपारपर्यंत आंदोलनाने हिंसक वळण घेतले.

जमावातील काहींनी पोलिसांवर दगडफेक केली, लाकडी बॅरकेड्स तोडून त्यांना आग लावली. निदर्शकांमध्ये काही गुंड प्रवृत्तीची मंडळी घुसून त्यांनीच हे आंदोलन ताब्यात घेतल्याचे दिल्ली पोलिसांचे म्हणणे असून ते आखणी भडकू शकते, असा अहवाल केंद्रीय गृहखात्याला पाठवण्यात आला आहे.

तरुणांचे आंदोलन ताब्यात घेण्यासाठी योगगुरू रामदेव बाबा हे बसेसमध्ये भरलेल्या कार्यकर्त्यांसह दिल्लीत येऊन दाखल झाले. त्यांचा मोर्चा 'इंडिया गेट'कडे आधीच अडकवण्यात आला. त्यांच्या जोडीला 'आम आदमी' पक्षाचे अरविंद केजरीवाल आणि त्यांचे समर्थकही आंदोलनाच्या ठिकाणी थडकले. आंदोलनातील वाढत असलेली अनागोंदी पाहून संध्याकाळी पोलिसांनी अश्रुधूर, पाण्याचे फवारे, लाठीमार करत इंडिया गेटचा परिसर रिकामा केला. गृहराज्यमंत्री आर. पी. एन. सिंग यांनी पोलिस कारवाईबाबत माफी मागितली तसेच, पंतप्रधानांनी शांततेचे आवाहन केले. >>>>>>
.
काल टिव्हीवर दाखवत होते दगडफेक मधे २ पोलिसांचा मृत्यु आणि ४३ पोलीस जखमी झालेत
फेसबुक वगैरे सगळी कडे एका मुलिला पोलिस लाठी मारत असलेला फोटो प्रसारीत करत होते. पण दगडफेक तुफान केली त्यात पोलिसांचा मृत्यु जखमी वगैरे काहीच सांगितले जात नव्हते का ? फोटो दाखवुन युवकांच्या भावना पध्दतशीर पणे पेटवल्या जात आहेत. आणि हे सगळे मुद्दामुन केले जात आहे आणि हे कोण करत आहे हे सगळ्या जगाला ठावुक आहे.
तो जो अत्याचार झाला आहे त्याला फाशी पेक्षाही कडक शिक्षा झालीच पाहीजे परंतु भावनेच्या भरात कायदे होत नाहीत. हे आजच्या फास्टफुड पिढीला कळत नाही. यांचे नेतेच अधिरपणे वागत असतील तर युवकांचा काय दोष. Sad

आत्ताच Star India वर ऐकलेल्या बातमी नुसार काल ईंडियागेट समोर शांतपणे निदर्शने करीत असलेल्यांवर पोलिसांनी लाठीमार सुरु केला व त्यामुळे निदर्शकांनी उग्र रूप धारण केले. म्हणजेच निदरशकांना मुद्दाम भडकावण्यात आले होते.

आज मध्य दिल्लीतली ९ मेट्रो स्थानके बंद ठेवली आहेत.

पण दगडफेक तुफान केली त्यात पोलिसांचा मृत्यु जखमी वगैरे काहीच सांगितले जात नव्हते का? >>>> पोलिसाच्या मृत्युची बातमी कुठे आहे? आज इथल्या वृत्तपत्रांमध्ये तरी अशी काही बातमी नाहीये.


@आशुचँप अवांतर आपण फेसबूकवर मंदार कात्रे या नावाने कार्यरत आहात काय?

(@मंदार कात्रे ..आपण मायबोलीवर आशुचँप या नावाने कार्यरत आहात काय? असा प्रश्न फेसबूकवर विचारला आहे)

नाही, मी मंदार कात्रे यांचे लिखाण वाचले आहे. त्यांना ओळखत नाही.
फेसबूकवर मी माझ्या मुळ नावाने कार्यरत आहे.
हा प्रश्न पड्ण्याचे काय विशेष कारण?

जमावाची मनोवृत्ती कशी असते यावर भाऊ तोरसेकारांनी आज एक उत्तम लेख लिहिला आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे लोक गुन्हेगारांना घाबरून रस्त्यावर आलेत. मला हे कारण व्यक्तिश: पटले. मात्र प्रत्येकाने त्यांची चिकित्सा मुळातून वाचावी व मत बनवावे.
-गा.पै.

मला असे वाटते की मंदार कात्रे यांनी इथूनच ते तिकडे टाकले असावे. हे मीच लिहिले आहे याबाबत माझ्या मनात अजिबात शंका नाही. आणि त्यांनी फेबुवर टाकले असल्यास माही अजिबात हरकतही नाही. माझ्या दृष्टीने या लिखाणात कुठलाही प्रताधिकाराचा मुद्दा येत नाही. अजुनही कुणाला त्यांच्या फेबुवर टाकायचे असल्यास खुशाल टाकू शकता. नाव देण्याचीही गरज नाही.
मला काय म्हणायचे आहे ते लोकांपर्यंत पोहोचल्याशी कारण.

आशु, सहमत.
न्याय मिळायला हवा हे तर आहेच पण आधी त्या विद्यार्थिनीला बरे वाटो, ही माझी प्रार्थना आहे.
त्या गुन्हेगारांना शिक्षा व्हावीच, पण या प्रवृत्तीला रोखण्यासाठी काय करता येईल / काय केले जाणार आहे, हे गृह मंत्रालयाने सांगितले पाहिजे. जमावाला कुणी प्रतिसाद न दिल्याने ते चिघळत चालले आहे का ?

दिनेश,
त्या विद्यार्थिनीला बरं वाटो ही सदिच्छा तर आहेच, पण त्या नराधमांनी तिला एक नॉर्मल आयुष्य जगता येणार नाही (ती वाचली तर) याची पुर्ण खबरदारी(??) घेतली
आहे. तिचं १५ इंच आतडं डॅमेज झालं होतं जे काढावं लागलं इन्फेक्शन होऊ नये म्हणून... आता ती तोंडाने काहीच खाऊ शकणार नाही कधी. Sad किती अघोरी आहे हे सगळं? Sad

न्याय मिळायला हवा हे तर आहेच पण आधी त्या विद्यार्थिनीला बरे वाटो, ही माझी प्रार्थना आहे.>> दिनेशदा, असे म्हणणे साहजिक आहे पण तिची अवस्था खूप वाईट आहे. डॉक्टर म्हणतात कि तिला खूप वेदना होत आहेत आणि ती बरी होऊन नॉर्मल आयुष्य जगू शकत नाही.

<<@आशुचँप अवांतर आपण फेसबूकवर मंदार कात्रे या नावाने कार्यरत आहात काय?

(@मंदार कात्रे ..आपण मायबोलीवर आशुचँप या नावाने कार्यरत आहात काय? असा प्रश्न फेसबूकवर विचारला आहे)>>

मी उपरोक्त लेख इथून कॉपी करून फेसबुकवर दिला आहे ,असे केल्यास मी नेहमी मूळ लेखक व वेबसाइट चे नाव तिथे देतो, पण आज अनावधानाने घाईत तसे देणे राहिले ,त्याबद्दल आशुचॅम्प यांची माफी मागतो .

एवढ्या वेदना सहन करुनही ती आयूष्याशी अजून लढा देतेय, याचा अर्थ तिच्याकडे जबरदस्त मानसिक ताकद आहे.
गुन्हेगारांना शिक्षा झालेली तिला दिसलेच पाहिजे.

भारतात गेल्या दशकात किती राज्यव्यापी / देशव्यापी आंदोलने हिंसक वळण न लागता, कोणीही राजकीय पोळ्या न भाजता यशस्वी झालीत?
आपल्यापुढे चांगल्या प्रकारे, शांतपणे आंदोलन करायचे उदाहरण आहे का?

पोलिसांचा लाठीमार यांसारख्या घटना अगोदरच संतप्त, क्षुब्ध जमावाला ठिणगीसमान पुरेश्या असतात. पुढचा वणवा तो जमाव आपण होऊन लावून घेतो. त्यात आंदोलने भरकटतातच. परंतु जमावाला दिशा असते का?

हे आंदोलनही इतर आंदोलनांच्या वळणानेच जाणार असे वाटते. परंतु त्या निमित्ताने न्यायव्यवस्था, कायदे व सुरक्षा यंत्रणा यांच्यात योग्य सकारात्मक बदल आणि जनमानसांत जागृती, अशा प्रकारे बलात्कार करणार्‍या लोकांच्या मनात दहशत या गोष्टी साध्य व्हाव्यात हे फार फार वाटते.

मंदार कात्रे माफी वगैरे नको हो...मी आधीच लिहील्याप्रमाणे माझी कसलीही हरकत नाही.

अगदी अगदी आज संध्याकाळी डॉक्टर तिच्या तब्येतीविषयी मेडीकल बुलेटीन देत होते तेव्हा माझ्या मनात तेच आले. पण डॉक्टरांच्या मते आज प्रकृतीत सुधारणा नाही. परंतु मानसोपचार तज्ज्ञांच्या मते ती बर्यापैकी सावरली आहे. बोलू शकत आहे.

सुशीलकुमार शिंदेना इंग्रजी नीट बोलता येत नसेल तर त्यांनी बोलू नये...आरआर आबांप्रमाणेच काहीतरी बोलून घोळ करणार याची मला शंका वाटू लागली आहे.

पोलिसांचा लाठीमार यांसारख्या घटना अगोदरच संतप्त, क्षुब्ध जमावाला ठिणगीसमान पुरेश्या असतात. पुढचा वणवा तो जमाव आपण होऊन लावून घेतो. त्यात आंदोलने भरकटतातच. परंतु जमावाला दिशा असते का?

हे आंदोलनही इतर आंदोलनांच्या वळणानेच जाणार असे वाटते. परंतु त्या निमित्ताने न्यायव्यवस्था, कायदे व सुरक्षा यंत्रणा यांच्यात योग्य सकारात्मक बदल आणि जनमानसांत जागृती, अशा प्रकारे बलात्कार करणार्‍या लोकांच्या मनात दहशत या गोष्टी साध्य व्हाव्यात हे फार फार वाटते. +१००

आज तर बातमी आहे की या आंदोलना दरम्यान जी मारामारी झाली त्यात एक कॉन्स्टेबल जखमी झाले होते, त्यांचा मृत्यू झाला आहे. Sad

सुशीलकुमार शिंदेना इंग्रजी नीट बोलता येत नसेल तर त्यांनी बोलू नये...आरआर आबांप्रमाणेच काहीतरी बोलून घोळ करणार याची मला शंका वाटू लागली आहे.
>>> अगदी अगदी !
पंतप्रधानांचे "ठीक है" ऐकले का? :रागः

Pages