बलात्कारविरोधी आंदोलन भरकटत तर चालले नाही ना???

Submitted by आशुचँप on 23 December, 2012 - 08:58

गेले दोन दिवस बातम्यांमध्ये जे वाचतोय आणि न्यूज चॅनेलवरून जी दृश्ये दाखवत आहेत त्यावरून सुरुवातीला तरी असे वाटले चला, अत्याचाराविरुद्ध देशाची जनता रस्त्यावर उतरून आपली संवदेनशीलता दाखवत आहे आणि हेच जिवंत समाजाचे लक्षण आहे. आता त्या दुर्दैवी तरूणीला नक्कीच न्याय मिळेल.
पण जसे जसे आंदोलनाला हिंसक वळण लागू लागले तशी मनात शंका डोकावू लागली की हे आंदोलन भरकटत तर चालले नाही ना.
ही आंदोलने म्हणजे सरकारविरुद्ध, महागाईविरुद्ध, भ्रष्ट्राचाराविरुद्ध, सडलेल्या व्यवस्थेविरुद्ध साचत चाललेल्या संतापाला एक मोकळी वाट करून देण्याचे माध्यम असा समज तर लोकांमध्ये पसरत तर चालला नाहीये ना.
मान्य आहे की त्या दुर्दैवी तरुणीबद्दल सगळ्यांनाच सहानभुती आहे आणि हे नृशंस कृत्य करणार्यांबद्दल तीव्र संताप. पण गेले दोन दिवस इंडिया गेट आणि राष्ट्रपती भवनासमोर जो जमाव पोलिंसांवर दगडफेक आणि गाड्यांची तोडमोड करत आहे त्यातले खरोखर किती टक्के लोक खरोखर त्या प्रश्नाच्या मूळाशी जायचा प्रयत्न करत आहेत. आता तर अरविंद केजरीवाल त्यांच्या आम आदमी पार्टीसह आणि बाबा रामदेव त्यांच्या सहकार्यांसह आंदोलनात उतरले आहेत. त्यामुळे याला एक वेगळेच राजकीय वळण लागण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
बलात्कार्यांना कडक शासन व्हावे ही सगळ्यांचीच इच्छा आहे पण दगडफेक करून ती कशी साध्य होणार.
एका दिवसात तर कायदा बदलता येणे शक्य नाही. हे म्हणजे अण्णांच्या आत्ताच्या आत्ता लोकपाल बिल पास करा नाहीतर उपोषण करतो यासारखे झाले.
इतक्या ताकतीने आख्खे राष्ट्र त्या तरुणीच्या बाजूने उभे राहील्यामुळे सरकारला, पोलिसांना आणि न्यायालयाला चालढकल करणे शक्यच होणार नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे या दगडफेकीने नक्की काय साध्य होणार आहे.
निदर्शने आणि मोर्चांनी आपण पहिली लढाई जिंकली आहे. आता कायद्यात बदल होण्यासाठी सदनशीर मार्गानेच जाण्याची आवश्यकता आहे असे वाटत नाही का...
तुम्हाला काय वाटते

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्यांचा मृत्यू झाला आहे.>> याची जवाबदारी "आयत्या बिळावरचे नागोबे" केजरीवाल आणि रामदेव घेणार आहे का? आंदोलनाचे श्रेय लाटण्यासाठी पळत पळत आपल्या समर्थकांना घेउन आले. आता जवाबदारी आल्यावर शेपुट घालुन मागच्यामागे पळतील

रविवारी झालेल्या हिंसाचारात जखमी झालेले कॉन्स्टेबल सुभाषचंद तोमर ( ४७ ) यांचा हॉस्पिटलमध्येच मंगळवारी मृत्यू झाला . तोमर यांना झालेल्या मारहाणीप्रकरणी पोलिसांनी सोमवारीच अरविंद केजरीवाल यांच्या ' आम आदमी ' पक्षाच्या आठ कार्यकर्त्यांना अटक केली होती . आता त्यांच्याविरोधात थेट हत्येचाच गुन्हा दाखल करण्यात आला आहे . त्यामुळे या प्रकरणाला आणखी एका राजकीय वादाचे स्वरूप आले आहे . तोमर यांच्या मृत्यूला जबाबदार
असलेल्या खऱ्या आरोपींपर्यंत पोहोचण्यास पोलिसांना अपयश ठरल्यानेच ' आम आदमी ' च्या कार्यकर्त्यांवर त्याचे खापर फोडण्यात आले आहे . या कार्यकर्त्यां ​ विरोधात पोलिसांकडे कोणतेही पुरावे नाहीत , असा दावा केजरीवाल यांनी केला . बाबा रामदेव , माजी लष्करप्रमुख व्ही . के . सिंग यांच्याविरोधातही हिंसाचाराला उद्युक्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे
>
महाराष्ट्र टाईम्सः-
.
हे आम कार्यकर्ते का आले इथे ? आता जवाबदारी घ्यायला का घाबरत आहेत ?

खुपच वायीट बातमी. आता कुठे गेले सत्यमेव जयते वाले. चार भिंतीच्या आत A/c स्टुडीओ मधे चर्चा करने सोपे असते. एकादा Study Report, Short film दा़खवायची त्यासाठी एखाद्या पीडीत व्यक्तींचा आधार घ्यायचा आणि TRP वाढवायची नाहीतर चित्रपटाचे प्रमोशन करायचे. आपण जागे व्हायला पाहीजे.

Rape protests: Doctor says constable Subhash Tomar had a cardiac arrest, but no major injuries http://ibnlive.in.com/news/delhi-gangrape-protests-doctor-says-constable...

>>>> ह्याची जवाबदारी रामदेव किन्व्हा केजरीवाल ने घ्यावी का? दिल्ली पुलिस लोकांना मुर्ख बनवत आहे, आणि काही लोक बनत पण आहेत.आता कॉंग्रेस चे लोक कुठे आहेत? काल तर खूप बोंबा मारत होते केजरीवाल विरुद्ध.

गीता,

आपण दिलेला लोकसत्तेतील लेख वाचला. लेखाशी साधारणत: सहमत आहे.

मात्र त्यात जनरल विजयकुमार सिंगांविषयी अश्लाघ्य वक्तव्ये केली आहेत. त्यांना शेंदाड शिपाई म्हंटले आहे. याचा तीव्र निषेध. त्यांची सैन्यदलात काय प्रतिमा आहे हे लेखकाने पाहायला हवे होते. उगीच उचलली जीभ लावली टाळ्याला! सिंगांनी म्हणे वय चोरले! काय बकवास चालू आहे? त्यांच्या वयाबद्दल त्यांनी रीतसर तक्रार नोंदवून तिचा पाठपुरावा केला आहे हे लोकसत्तावाल्यांना माहीत नाही काय? संवेदनशील विषयाच्या आधारे प्रतिमाहनन करणे लोकसत्ताकारांना शोभून दिसत नाही.

आ.न.,
-गा.पै.

हाय
आता न्यूजमध्ये कॉन्टेबल तोमतयांच्या मृत्यू बद्दल बातमी आहे. दोघा प्रत्यक्ष दर्शीनी सांगितलं की दंगलीत मारहाण म्हणुन नव्हे तर लोकांमागे धावताना ते अचानक खाली पदले. त्यांना मदत करायला यातला तरूणही गेला. महत्वाचे म्हणजे याचे प्रत्यक्ष फुटेजही दाखवताहेत. त्यात सरळदिसल्तय तो तरुण त्यांच्याशी बोलतोय, मदत करतोय. काल पर्यंतच्या दिल्ली पोलिसांचे याबद्दलचे वक्तव्य चक्क खोटे होते हे स्पष्ट होतेय. दिल्ली पोलिसांबद्दल सगळा विश्वासच उडाला आज माझा . सगळ्याचा राग राग येतोय Angry

आता मात्र खरेच दुर्दैवी वळण लागत आहे. न्यायदानास वेळ लागणार आहे पण गृहमंत्र्याने त्याबद्दल वारंवार निवेदन देणे गरजेचे आहे. यावेळी पक्षीय राजकारण विसरुन, जमावाला शांत करु शकतील असे नेते पुढे यायला हवेत.

योगेंद्र, पाओलिनी आणी डौ़क्टर सिंद्धु यांच्या धेर्याचे आणी प्रामाणिकपणाचे कौतुक करावे तितके कमी आहे!

त्यांचा मृत्यू झाला आहे.>> याची जवाबदारी "आयत्या बिळावरचे नागोबे" केजरीवाल आणि रामदेव घेणार आहे का? आंदोलनाचे श्रेय लाटण्यासाठी पळत पळत आपल्या समर्थकांना घेउन आले. आता जवाबदारी आल्यावर शेपुट घालुन मागच्यामागे पळतील >>>>>>>>>> आता तुमचे शिंदे आणी तुमचे मुके सरदारसाहेब जबाबदारी घेणार का कमिशनरच्या खोटेपणाची ? का गेली शेपुट आतमध्ये ?

मात्र त्यात जनरल विजयकुमार सिंगांविषयी अश्लाघ्य वक्तव्ये केली आहेत.>>> विके सिंगावरही लाठीमार झाला.
युवराज, महाराणी आणी मुके सरदार साहेब यांच्यात आहे का हिम्मत जनतेत मिसळण्याची!

एक रिटायर झालेला मुख्य सैन्याधिकारी मुकाट्याने पेंशन खात आणी निरनिराळ्या समित्यांवर पदे घेऊन आरामात राहू शकला असता. पण जनरल सींग त्या ऐवजी लोकांच्या प्रश्नांबाबत संवेदनशील राहून त्यांच्याबरोबर चळवळीत उतरतात याचे खरे तर कौतुक करायला पाहिजे. तो वयाबाबतचा विषय आता फुसका आहे. किती दिवस वापरणार?
त्यावरून त्यांच्याबद्दल इतक्या खालच्या पातळीची वक्तव्ये करणारे पढतमूर्ख आहेत.अशांचा तीव्र निषेध!

@गा. पै., भारतीय - एकदम सहमत. general ला शेंदाड शिपाई म्हणायचे गिरिश कुबेर ला ( संपादक ) काहीही कारण नाही. ह्या महाशयांनी असा काय पराक्रम गाजवला आहे आयुश्यात?

जरा होउ च दे दगड्फेक आणि जाळपोळ आणि काही दिवस बंद च राहु देत मोठी शहरे, त्याशिवाय ह्या सरकार ला अक्कल येणार नाही.

एक police मेला तर ( ते सुद्धा heart attack नी ), तर लगेच बोंबलायला लागले सगळे, इथे इतकी सामन्य माणसे रोज मरत आहेत ह्या पोलिसांच्या दुर्लक्षामुळे, त्याचे आधी बोला.

एक police मेला तर ( ते सुद्धा heart attack नी ), तर लगेच बोंबलायला लागले सगळे, इथे इतकी सामन्य माणसे रोज मरत आहेत ह्या पोलिसांच्या दुर्लक्षामुळे, त्याचे आधी बोला.>>>>>>>>>> +१

एवढे आंदोलन होत असतानाहि आज ५ रेपचे रिपोर्ट आहेत. Angry

आता तर राज्यकर्ते / पोलिस / नेते / न्यायव्यवस्था आणि अर्थातच भारतीय लोकांची कसोटी आहे.
गुन्हेगारांना किती लवकरात लवकर शिक्षा होऊ शकते, हे दाखवून द्यावेच लागेल.

गुन्हेगारांना किती लवकरात लवकर शिक्षा होऊ शकते, हे दाखवून द्यावेच लागेल. <<

अहो अनंत अडचनी पार करून खुनी-बलात्कार्‍यांना न्यायव्यवस्थेकडून कायम करण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेवर दया दाखवणार्‍या राजकारण्यांकडून अशी अपेक्षा ठेवणे स्वप्नरंजन आहे.

भास्कर तूमचा मुद्दा मला व्यक्तीशः पूर्णपणे मान्य आहे. change.org वर पदावरून दूर गेलेल्या राष्ट्रपतिंच्या
निर्णयावर, फेरविचार व्हावा असे पेटीशन करु शकता. या काळात तूम्हाला नक्कीच पाठिंबा मिळेल.

Pages