Submitted by अनंत ढवळे on 21 December, 2012 - 20:21
तुला समजेल तर समजेल काही
तुला आनंद नाही दु:ख नाही
जिथे जातो तिथे बघतो तुला मी
किती विस्तीर्ण हा गोंधळ तुझाही
तुला का दु:ख व्हावे विप्लवाचे
तुझा साचा कुठे बनला तसाही
किनार्यावर उभे हे लोक सारे
घरे वाहून गेलेली प्रवाही
तुझ्या डोळ्यांमधे सरल्यात वाटा
कळेना चाललो कोठे मलाही
मने झुरतात इतक्या संयमाने
जरासा धीर सुटतो, फार नाही....
अनंत ढवळे
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान आहेत. सगळेच शेर.
छान आहेत. सगळेच शेर.
अत्तिशय सुंदर
अत्तिशय सुंदर गझल!!
'विप्लवाचे' हा शेर थोडा कमी आवडला. बाकी सगळे अप्रतिम!
आवडली गझल गोंधळ व धीर हे शेर
आवडली गझल
गोंधळ व धीर हे शेर सर्वाधिक आवडले
मने झुरतात इतक्या
मने झुरतात इतक्या संयमाने
जरासा धीर सुटतो, फार नाही....
अप्रतिम शेर!
गझलही आवडलीच !
आवडली गझल...
आवडली गझल...
छान आहेत. आवडली
छान आहेत. आवडली
किनार्यावर उभे हे लोक
किनार्यावर उभे हे लोक सारे
घरे वाहून गेलेली प्रवाही
मने झुरतात इतक्या संयमाने
जरासा धीर सुटतो, फार नाही....
क्या बात है!!
आवडली गझल.
छान! मतला पोचला
छान!
मतला पोचला नाही.
विप्लवाचे म्हणजे प्रकट वा व्यक्त होणे असेच ना?
दोन शेर आठवले ते देत आहे.......
सुने सर्व रस्ते पुकारू कुणाला?
तुझा थांगपत्ता विचारू कुणाला?
तुझ्यासारखी झाक नाही कुणाची;
तुझ्या कुंचल्याने चितारू कुणाला?
..........प्रा.सतीश देवपूरकर
सर्वांचे आभार. बाकी वरील एका
सर्वांचे आभार.
बाकी वरील एका प्रतिसादात आलेली यमकानुसारी विधाने इथे डकवण्याचे कारण समजले नाही
मूळ मुद्याला बगल देण्याची कला
मूळ मुद्याला बगल देण्याची कला वाखाणण्याजोगी आहे!

झोपी गेलेल्यालाच जागे करता येते हेच खरे!
सतीश देवपूरकर, तुमच्या वयाचा,
सतीश देवपूरकर,
तुमच्या वयाचा, ज्येष्ठतेचा सगळे मान ठेवतात याचा अर्थ असा नव्हे की सगळ्या प्रतिसादात आपली यमकानुसारी विधाने डकवावीत.
तुमच्या बाबतीत दुर्दैवाने म्हणावे लागते आहे,
तुम्हाला गझलचे तंत्र गवसले, मात्र मंत्रापासून फारच दूर आहात.
मांत्रिक कावळेराव, दुस-यांना
मांत्रिक कावळेराव,

दुस-यांना प्रगतिपुस्तके वाटण्यापेक्षा व काय डकवावे/डकवू नये हे सांगण्यापेक्षा आधी बुरख्यातून बाहेर येवून लेखन करा व आपल्या तंत्रमंत्राने अवघ्या मायबोलीकरांना मंत्रमुग्ध करा!
तुला समजेल तर समजेल काही तुला
तुला समजेल तर समजेल काही
तुला आनंद नाही दु:ख नाही<<< सुंदर
जिथे जातो तिथे बघतो तुला मी
किती विस्तीर्ण हा गोंधळ तुझाही<<< विस्तीर्ण गोंधळ! तुझाही! वा वा!
तुला का दु:ख व्हावे विप्लवाचे
तुझा साचा कुठे बनला तसाही<<< दुर्दैवाने मला विप्लव या शब्दाचा अर्थ माहीत नाही.
किनार्यावर उभे हे लोक सारे
घरे वाहून गेलेली प्रवाही<<< सुंदर शेर
तुझ्या डोळ्यांमधे सरल्यात वाटा
कळेना चाललो कोठे मलाही<<< हाही सुंदर!
मने झुरतात इतक्या संयमाने
जरासा धीर सुटतो, फार नाही....<<< व्व्व्व्वा! अतिशय भिडला. जरासा धीर सुटतो, फार नाही.
उत्कृष्ट गझल, नेहमीप्रमाणेच!
-'बेफिकीर'!
छान गझल............
छान गझल............
सुंदर गझल........ विप्लव
सुंदर गझल........
विप्लव म्हणजे काय???
विप्लव हा तसा संस्कृत शब्द
विप्लव हा तसा संस्कृत शब्द आहे - मोठी सामाजिक उलथापालथ या व्यापक अर्थाने वापरला जातो. बाहेर होणार्या मोठ्या सामाजिक बदलाना प्रस्थापित मंडळी घाबरून असतात, कारण या घटना सद्दी मोडून काढणार्या / साचे तोडणार्या असतात.
साचेबध्दपणाला बळी न पडलेल्याना मात्र अशा बदलाची भीती नसते - कारण त्यांचे काम / लेखन मूलभूत मानवी तत्वाना अधोरेखित करणारे , म्ह्णूनच कालनिरपेक्ष/ सामाजिक उलथापालथींमुळे नष्ट होणारे नसते.
आपल्या तंत्रमंत्राने
आपल्या तंत्रमंत्राने मायबोलीकरांना मंत्रमुग्ध करणारे मायबोलीवर बरेच आहेत. मिल्या,आनंदयात्री, बेफिकीर्,प्राजु,मुटे,सुप्रिया,हबा,शाम्,वीरेंद्र बेडसे,निशिकांत्,अरविंद चौधरी,क्रांती,वैभव देशमुख्,वैवकु, वैभव फाटक अशी ''अनंत '' नावे आहेत....
मात्र आपल्या गझला केवळ धुरळा उडविण्याचं काम करतात.
''उथळ पाण्याला खळखळाट फार''
असो....
तुम्ही सांगावं म्म्हणून काही मी लेखन करत नाही... मला वाटलं की मी खरडत असतो... हे वाचा.
http://www.maayboli.com/node/35697
-काव काव
कावळेरावांशी सहमत पण कावळेराव
कावळेरावांशी सहमत
पण कावळेराव एक खंतआहे राव याला काय म्हणावं ??....आमचे आवडते गझलकार कणखरजी यांचे नाव नाहीये यादीत
आणि हो...........गझलडॉक्टर कैलासजी गायकवाडही दिसत नैयेत त्यात
आपले ज्ञानोबा देखिल राहिलेत
माझे परममित्र जितू तेही नाहीयेत की हो............
प्लीज आधी त्यांची नावे टाका बघू !!..मगच विषय पुढे नेवूयात
अरे हो......... प्रा. साहेबांची "स्वामी समर्थं" ही भक्तिपर गझल साबिर नावाच्या कुणा़कडूनतरी प्रेरणा उसनी घेवून केली आहे हा जावाईशोध नुकताच लागला आहे तोही पहा (मागे एकदा तुम्ही तीळ-बीळ वाली गझल देवपूरकरांचे चौर्यकर्म असल्याचे शोधले होते त्यातलाच प्रकार दिसतो आहे )
सगळीच गझल आवडली. मत्लाधरून
सगळीच गझल आवडली.
मत्लाधरून सगळेच शेर स्पष्ट, खोल आणि सुंदर आहेत.
ब-याच दिवसांनी एक सुंदर गझल वाचली.
धन्यवाद.
वाचन-विचाराचा अभाव आणि अधीरता ही शेर न समजण्याची मुख्य कारणे बहुधा असतात.
संपूर्ण गझल अतिशय
संपूर्ण गझल अतिशय आवडली.
जरासा धीर सुटतो, फार नाही >>> वा व्वा!
कावळा, आपले स्वत:चे लेखन काय
कावळा,

आपले स्वत:चे लेखन काय उडवते ते पहावे!
कुणी धुरळा उडवतात, कुणी बसवतात!
स्वच्छ दृष्टीला धुरळयाच्या पलीकडचे दिसते!
धुरकट दृष्टीला सगळेच धुरकट दिसते, सगळीकडेच धुरळा दिसतो.
धुरळाच तो उडायचाच मग अगदी कुणी कावळा जरी फडफडत, कावकाव करत गेला तरी तो उडणारच!
आपण उडवलेला गझल तांत्रिकांचा/मांत्रिकांचा अनंत धुरळा मात्र प्रेक्षणीय होता, ज्यात स्वत:चा सामावेश करायचा मात्र विसर पडलेला दिसतो!
दुस-याला छोटे म्हटल्याने आपण मोठे होतो हा गोड गैरसमज वाखाणण्याजोगा आहे!
कमाल आहे, कावळ्यांना देखिल लांबी, रुंदी व खोली कळायला लागली की, काय?
शिवाय कावकाव सोडून इतरही नादज्ञान झालेले दिसते मग तो खळखळाट असो, कलकलाट, पलपलाट ढणढणाट असो!
डोळ्यात धूळ/धूरळा टाकण्याची बरीच हौस दिसते कावळ्यांना!
लिहिणारा लिहितोच त्याला सांगावे लागत नाही
वळते नदी, नदीला सांगावे लागत नाही!
पाण्यास झुळझुळाया शिकवावे लागत नाही!!
<<<<<<जाऊ द्या कावळेराव, हे आपल्या डोक्यावरचे आहे!
>>>बाकी वरील एका प्रतिसादात
>>>बाकी वरील एका प्रतिसादात आलेली यमकानुसारी विधाने इथे डकवण्याचे कारण समजले नाही<<<
दोन कारणे असून ती सोपी आहेत. त्यांच्या सुदैवाने आणि इतरांच्या दुर्दैवाने देवपुरकरमामांकडे वेळ रग्गड आहे. तसेच, 'आम्हालाही रचना होतात' हे दाखवण्याची हौस आहे. जणू हे पुरे पडत नव्हते म्हणून की काय, कुणा नतद्रष्टाने चलतबोळकी टाकण्याची कला शिकवल्यापासून प्रतिसादाखाली, प्रतिसादाशी पूर्णतः असंबध्द असे चलतबोळके टाकून, टिचभरदेखिल गांभीर्य प्रतिसादात उरू नये याची आजकाल ते खबरदारी घेतात.
खवटुन्निसा, गांभिर्यच हवे
खवटुन्निसा,

गांभिर्यच हवे असेल तर इथे अनेक तोतये गंभीर प्रतिसादक/समीक्षक/महाभाग आहेत!
तेव्हा प्रत्येकाचा प्रतिसाद गंभीर असण्याची आवश्यकता उरलेली नाही.
हां, पण ते बोलावणे धाडले की, मगच येतात हो, झूल/बुरखा पांघरून व मग तात्काळ ते भूमीगत होतात म्हणे, अवतारकार्य संपल्यागत!
सोस आहे, आव आहे गझल लिहिण्याचा....
कोण गझलेच्या नशेने झिंगला आहे?<<<<<<<ही आहे आजकालची परिस्थिती!
वेळ मग तो फावला असो, विरंगुळ्याचा असो, कमी असो, रग्गड असो......तो काढायला लागतो.
याच्याशी कुणाचे दैव/सुदैव/दुर्दैव वगैरेंचा काडीचाही संबंध नसतो. तो आपला गोड गैरसमज आहे.
लिखाण दाखविणे म्हणाल तर आमच्या माझे लेखनवर टिचकी मारा, आमच्या हौसेची आपणास पूर्ण कल्पना यावी
व आपल्या तर्काशक्तीलाही खुराक मिळावा!
............प्रा.सतीश देवपूरकर
साध्या शेरातील दोन
साध्या शेरातील दोन मिस-यांमधील संबंध लावता येईना मग चलतबोळक्यांचा संबंध लावणे तर दूरचीच बात आहे!

सोस आहे, आव आहे गझल
सोस आहे, आव आहे गझल लिहिण्याचा....
कोण गझलेच्या नशेने झिंगला आहे?<<<<<<<ही आहे आजकालची परिस्थिती!
कवी सतीश,
आम्ही पाहिलेला जमाना उत्कट काव्याचा होता. तेथे कवीला कवीप्रती आदर होता, भले त्याच्या काव्यप्रकाराप्रती वा काव्यशैलीप्रती नसेलही. त्या काळी लता, आशा असे स्वर्गीय आवाज शब्दांना लाभत. शब्दांची ताकद, मार्मिकता, सुंदरता त्या जमान्यात प्रकर्षाने जाणवत असे.
हळूहळू परिस्थिती बदलत गेली. यमकांना बटीक बनवणारे आणि शब्दांना गुलाम बनवणारे कवी गझलांचा रतीब घालू लागले. मराठी विस्तृत व श्रीमंत काव्यसंपदेतील फक्त एकाच सुरेश भटांचे नांव घेऊन स्वतःला सूर्य वगैरे मानून गझला पाडू लागले. पूर्वी फराळाचे पदार्थ फक्त दीपावलीत मिळत व आम्ही मुले मोठ्या उत्कंठेने दीपावलीची प्रतीक्षा करत असू. आजकाल हातभट्टीच्या दुकानातही चकणा म्हणून चकल्या ठेवतात असे एका गझललेखनाचा प्रदीर्घ अनुभव पाठीशी असलेल्याने व गझलेच्या नशेने झिंगलेल्याने आम्हास सांगितले. मराठी गझलेचेही हेच झालेले आहे. कोणीही सोम्यागोम्या मुशायर्यात टाळ्यांच्या कडकडाटात खाली गझल ऐकवून खाली बसतो. त्याचा परिचय देताना 'हे भटांचे आठवे शिष्य, हे दुसरे शिष्य' यापलीकडे दिला जाऊ शकत नाही. गझल ऐकली तर सगळा आनंदच असल्याचे दिसते. तुम्ही या जमान्याचे प्रतिनिधित्व करताना आम्हास दिसत आहात. आम्हाला पाचारण करावे लागत नाही. जेथे मराठी गझल तेथे आम्ही असतोच. आम्ही गप्प असतो याचे कारण प्रत्येक गझलेवर लिहू लागलो तर रोज सकाळी उठून तेच करावे लागेल. कवी सतीश, गझलेवर लक्ष केंद्रीत करा. गझलेत राजकारण करू नका, आणू नका. कमी लिहा पण चांगले लिहा. शब्दांना मेंढरांसारखे आशयाच्या शेतात खत द्यायला बसवू नका. शब्दांच्या हाती स्वतःच्या मनातील विचारांचा लगाम द्या. विचार असतील तर शब्द आपोआप त्यांना पुढे नेतील. घोडा आहे म्हणून कोणी बग्गी बनवत नाही. बग्गी बनवली तर ती पुढे न्यायला घोडा विकत घेतात. अजून तुम्हाला बराच लांबचा पल्ला गाठायचा असल्याने आम्ही तूर्त थांबतो.
तुमच्या गझललेखनास शुभेच्छा!
+++
कवी अनंत,
गझल अतिशय परिपक्व असून मतला अध्यात्मिकतेच्या जवळ पोहोचलेला आहे व ती आपली खासियत नेहमीच दिसून येते. तुमच्या गझला वाचून व आकलन करून घेऊन एक गंभीर गझलकारांची पिढी तयार होणे सहज शक्य आहे असे आमचे मत!
कळावे
गंभीर समीक्षक
किनार्यावर उभे हे लोक सारे
किनार्यावर उभे हे लोक सारे
घरे वाहून गेलेली प्रवाही
तुझ्या डोळ्यांमधे सरल्यात वाटा
कळेना चाललो कोठे मलाही
मने झुरतात इतक्या संयमाने
जरासा धीर सुटतो, फार नाही....
------ वा! अशाच सघन गझला अनंतहस्ते देत रहा!
शब्दांना मेंढरांसारखे
शब्दांना मेंढरांसारखे आशयाच्या शेतात खत द्यायला बसवू नका.
प्रोफेसर,
किमान एवढे ..कराच.
ग.स. आपल्या चिंतनपाल्हाळातील
ग.स.

आपल्या चिंतनपाल्हाळातील व्यक्तिद्वेष खटकला!
श्वासांचा कुठे रतीब असतो काय?
गझल म्हणजेच श्वासोच्छ्वास माझा!
कसा नाकारता अधिकार माझा?
शब्दांबद्दल म्हणाल तर,
शब्दब्रह्माचाच मी आहे पुजारी!
मी तुझ्या दारातला आहे भिकारी!!
भट, सूर्य, शिष्य, असले बोथट बाण मारणे सोडा आता!
जो माणूस स्वत:चे नावगाव बुरख्यात ठेवून स्वत:ला गंभीर का काय ते घोषित करतो हा म्हणजे एक विनोदच आहे. लिहिताना मर्यादा पडत आहेत. आम्ही आमचा फोन नंबर इमेल आयडी दिलेला आहे. संपर्क साधू शकता, जर इच्छा व इच्छाशक्ती असेल तर!
आम्ही कुठे उभे आहोत, आम्ही काय लिहितो, हे आम्ही चांगलेच जाणतो, त्यासाठी कोणत्याही गंभीर विदुषकाच्या प्रशस्तिपत्रकाची आम्हास गरज नाही.
कळपांवर/टोळ्यांवर/व्यक्तिपूजेवर आमचा विश्वास नाही.
खोटी स्तुती करणे, कुणाचे भाट होणे, आमच्या पिंडात नाही!
जाता जाता एक आमचा शेर देतो व थांबतो...........
मी असा दिसतो नको जाऊस त्यावर......
जाण तू पडली कुणाशी गाठ आहे!
.......प्रा.सतीश देवपूरकर
कावळेराव व आशय/विषय?
कावळेराव व आशय/विषय?

देवसर सरळसरळ चीटिंग आहे राव
देवसर सरळसरळ चीटिंग आहे राव ही.............
आम्हाला ज्ञान शिकवता अन तुम्हीच कोरडे पाषाण !!
गझल म्हणजेच श्वासोच्छ्वास माझा!
कसा नाकारता अधिकार माझा?
अकारान्त स्वरकाफियाचा मतला आहे हा !!!!
तुम करो तो रासलीला !!.... हम करे तो कॅरेक्टर ढीला??????
Pages