घरे वाहून गेलेली प्रवाही....

Submitted by अनंत ढवळे on 21 December, 2012 - 20:21

तुला समजेल तर समजेल काही
तुला आनंद नाही दु:ख नाही

जिथे जातो तिथे बघतो तुला मी
किती विस्तीर्ण हा गोंधळ तुझाही

तुला का दु:ख व्हावे विप्लवाचे
तुझा साचा कुठे बनला तसाही

किनार्‍यावर उभे हे लोक सारे
घरे वाहून गेलेली प्रवाही

तुझ्या डोळ्यांमधे सरल्यात वाटा
कळेना चाललो कोठे मलाही

मने झुरतात इतक्या संयमाने
जरासा धीर सुटतो, फार नाही....

अनंत ढवळे

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रत्येक प्रतिसादाखाली आलेली ही केशरी व काळी भयावह चित्रे देण्याचे कारण काही कळत नाही. ते ३.२२ च्या प्रतिसादाखालील चित्र तर चक्क टकलू डॉनसारखे आहे. याचा गझलेशी काय संबंध?

प्रिय गं स
ही सर्व सरांचीच रूपे आहेत
कालचा बिग बॉस चा एपिसोड पाहिलात का त्यात इमाम असाच दिसत होता मला तो इम्म्या पाहिला कि देवसर आठवतात अगदी डिक्टो सेमच आचरण आहे दोघांचे!!!

लाजवाब लाजवाब लाजवाब...........! अतिशय सुंदर रचना Happy

वैभवा!
देवसर सरळसरळ चीटिंग आहे राव ही.............
आम्हाला ज्ञान शिकवता अन तुम्हीच कोरडे पाषाण !!

गझल म्हणजेच श्वासोच्छ्वास माझा!
कसा नाकारता अधिकार माझा?


अकारान्त स्वरकाफियाचा मतला आहे हा !!!!

तुम करो तो रासलीला !!.... हम करे तो कॅरेक्टर ढीला??????
<<<<<<<<
काही तरी बरळू नकोस वैभवा!
तो मतला नव्हताच!
मतला असा होता........
असू दे फाटका संसार माझा!
तुला कळणार ना व्यवहार माझा!!

या गझलेत पुढील शेर असा होता...............
गझल म्हणजेच श्वासोच्छ्वास माझा!
कसा नाकारता अधिकार माझा?
टीप: काफियातील अलामतीबाबतचे गैरसमज लगोलग काढून टाक वैभवा!
असे तुला आमचे नम्र सांगणे आहे!

ओके ओके देवसर ...तुम्ही म्हणताय तर तसेच असेल पणमी म्हणालो तेही बरोबर ठरू शकते ...............

माझा एक आगामी गझलेतला शेर हेच सांगतो...................

दे सजा ; आधी जरा आतील नजरेने पहा
आळ माझ्या पाहण्यावर घेतला आहेस तू

अभिप्रेत अर्थः
(मी वरवरचे काही पाहात नाही आहे ) तू माझ्या पाहण्यावर आळ घेतलाय्स; बेशक सजा दे !... पण आधी जरा आतील नजरेने (माझ्या प्रमाणे ) पहा . तुलाही तेच अन् तसेच दिसेल जसे मला दिसले आहे !!

शेवटचे तीन शेर फार भारी.
विप्लव चा अर्थ मला माकड असा वाटत होता. Uhoh
तुम्ही म्हणता आहात तो असेल तर तोही शेर छानच. Happy

विप्लव चा अर्थ मला माकड असा वाटत होता. Uhoh

माकडांनी महिलांपासून स्वतःला सुरक्षित कसे ठेवावे यावरही एक धागा होऊन जाऊ द्यात

कळावे

गंभीर समीक्षक

>> माकडांनी महिलांपासून स्वतःला सुरक्षित कसे ठेवावे यावरही एक धागा होऊन जाऊ द्यात
याचा इथे काय संबंध? तुम्ही तिथे लिहिलेले तर मला आठवत नाही. पण एकूण बायकांनी यावर चर्चा करू नये किंवा गझलेवरही बोलू नये असा सूर दिसतोय. असो. मला या सुरात बोलणार्‍यांशी इथे किंवा तिथे कुठेच बोलण्यात रस नाही.

>>>याचा इथे काय संबंध? तुम्ही तिथे लिहिलेले तर मला आठवत नाही. पण एकूण बायकांनी यावर चर्चा करू नये किंवा गझलेवरही बोलू नये असा सूर दिसतोय. असो. मला या सुरात बोलणार्‍यांशी इथे किंवा तिथे कुठेच बोलण्यात रस नाही. <<<

गंभीर समीक्षक ऊर्फ बेफिकीर यांचे, 'गझलप्रांत आणि स्त्रिया' या विषयावरील मत देखिल त्यांच्या स्त्रियांबद्दलच्या एकूण मताशी जुळते म्हणायचे तर.

अनंत,
>>> विप्लव हा तसा संस्कृत शब्द आहे - मोठी सामाजिक उलथापालथ या व्यापक अर्थाने वापरला जातो. <<<

मला वाटते की आपण म्हणता तसा विप्लव या शब्दाचा अर्थ नसावा. मी तपासल्याप्रमाणे कोंब, अंकूर, विशिष्ठ प्रकारचे तळे किंवा इतर अर्थ निघतात. मात्र आपण म्हणता तसा व्यापक अर्थ मला कुठेही आढळला नाही. आपणास हा अर्थ कोठून मिळाला हे सांगितलेत तर मलाही अभ्यासायला मिळेल.

जिथे जातो तिथे बघतो तुला मी
किती विस्तीर्ण हा गोंधळ तुझाही

तुझ्या डोळ्यांमधे सरल्यात वाटा
कळेना चाललो कोठे मलाही

मने झुरतात इतक्या संयमाने
जरासा धीर सुटतो, फार नाही....

हे तीन शेर आवडले.

समीर,
मला माहित आहे की विप्लव हा संस्कृत शब्द आहे ते. आता या शब्दाला मराठी प्रत्यय लावावा का हा प्रश्न वेगळा. भारत कोषात अनेक अर्थ आहेत विप्लव या शब्दाचे. तरीही मी पुन्हा तपासून सांगतो.

विप्लव - बंड, क्रांती, महाक्रांती या अर्थाचाच शब्द असल्याच दिसतंय. एका मित्राने काही वर्षांपूर्वी या शब्दाचा अर्थ वीज ( आकाशातून कोसळणारी) असा सांगितला होता. अर्थात वीज कोसळणे आणि बंडाच्या वेळची परिस्थिती एकच म्हणावे लागेल.

चु.भू.दे.घे.

अनंत,

>> या शब्दाला मराठी प्रत्यय लावावा का << असा माझा प्रश्न आहे.

म्हणजे हा शब्द जर मूळ शब्द असेल तर तसे करता येईल. पण हा शब्द जर मुळातच एखादा प्रत्यय लावून तयार झाला असेल तर..? असे मला म्हणायचे होते.

'गंभीर समिक्षक' यांनी वर लिहीलेला प्रतिसाद मनाला अत्यंत भिडला. कुणीही ध्यानात ठेवावेत असे शब्द वाटले!

धागा मुद्दाम वर आणत आहेत.
नव्या-जुन्या लोकांनी अश्या गझला वाचायला हव्यात.

धागा मुद्दाम वर आणत आहेत.
<<<<<अगदी योग्य

पण अनंतजींचीच गझल का वर आणलीत नेमकी हे समजले नाही

Pages