युक्ती सुचवा युक्ती सांगा- ३

Submitted by पूनम on 8 October, 2012 - 05:41

स्वयंपाकघरातील युक्ती सांगण्यासाठी आणि सुचवण्यासाठी हा तिसरा बाफ.

नवीन प्रश्न विचारण्याआधी ह्याआधीचे दोन धागे पहायला विसरू नका :

युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नी, रविवारी ब्रेफाला उत्तप्प्याबरोबर तुझी रेसिपी वापरुन टोमॅटो चटणी केली. मस्तच झाली होती. फक्त एक सांग कि टोमॅटोची सालं काढुन मग घ्यायचे होते का? ते परतल्यावर त्याची सालं मोकळी झाली. ती मी न काढता ग्राइंड केली होती त्यामुळे थोडे प्लास्टीकी तुकडे तोंडात येत होते. कदाचित साल फारच जाड असावं.

मनिमाऊ, मी तसेच घेतले भाजलेले टोमॅटो. मला नाही लागली साल मधे. खूप गरगटवले होते मात्र मी. कारण माझ्या मिक्सरचा आर पी एम गंडलाय. म्हणूनच मेदूवड्यांचं पीठही नीट झालं नसावं.

मने टोचीसा काढलिस तर उत्तम, साल तोंडात आली तर फार बोर होतं आणि खाण्याची मजा निघून जाते Sad

जुन्या तुपाला वास येतो तो आवडत नाही. >>>
अगं माझ्याकडे येऊन बघ. कितीही जुने तूप असले तरीही कधीच वास येत नाही. लोणी अर्धवट कढवले गेले की तूपाचा जुने झाल्यावर वास येतो. खरपूस रवाळ सोनेरी रंगाचे कढवायचे.
(अवांतरः खूप जुने झालेले तूप औषधी असते असे काहीतरी आयुर्वेदात म्हणतात ना? शिवाजी राजांच्या काळात शिपायांच्या जखमांवर असे जुने तूप लावत असे वाचले आहे.)

नी च्या टोंमॅटॉच्या चटणीसाठी. एकेक टोमेटॉ गॅसवर थेट भाजला तर चांगले. साल जळून जाते आणि अपेक्षित चव येते. टोमॅटो घट्ट असावा ( मऊसर असला तर त्यातून रस गळतो. ) देठाकडून काडी खुपसून गोल गोल फिरवत भाजायचा.

ममा, फोडींच्या साली करपवल्यास का? तसे केल्यास येत नाही तोंडात जाडजाड वर स्मोक्ड इफेक्टही येतो आणि जरा जास्त गरगटव नेक्स्ट टाइम.

दिनेशदांनी सांगितलेय ते योग्य आहे पण त्याला वेळ लागतो भरपूर आणि स्किल पण.
दोन्ही नसल्यास मी केले तसे करा Happy

मला वाटतंय असा स्मोकी इफेक्ट हवा असेल तर एक जाळी मिळते त्यावर कोळसे भाजल्यासारखे टोमॅटो भाजायचे. पण दिनेश म्हणाले तसे घट्ट हवेत.

दक्ष & दिनेशदा, थँक्स. ती जाळी आहे माझ्याकडे. वांगं रोस्ट करतात तसं करता येइल, पण फार वेळ लागेलसं वाटतं आहे. एकदा फुरसदतीत करुन पाहीन.

नी, टेस्ट मस्त आली होती. मी भाजले छान होते त्यामुळे स्मोक्ड इफेक्ट आणि त्याची छानशी खमंग चव होती. प्रज्ञा आणि तु सांगितलं तसं बारीक मात्र केलं नाही. पुढच्या वेळेस एकदम सॉफ्ट ग्राइंड करेन. यावेळेस कदाचित टो. पण चांगला नसावा.

पण एकुणातच घरात नारळ नसेल किंवा नकोच असेल तर करायला फटाफट छान रेसिपी आहे ही. मी उत्तप्पा केल्यावर नारळ नाही किंवा इतर कोणतंच डीप नाही म्हणुन हे करुन पाहिलं. सध्याच पहिल्या पानावर असल्यामुळे पटकन आठवली पण. Happy

लसणीची पात आणलीय, ती कशी घ्यायची? म्हण्जे त्या सफेद दोर्‍या पण घ्यायच्या असतात का? लसणीच्या पुढे असतात त्या.

वांगं रोस्ट करतात तसं करता येइल, पण फार वेळ लागेलसं वाटतं आहे. एकदा फुरसदतीत करुन पाहीन. > मनिमाऊ त्या जाळीवर वांगे छान भाजता येते. मी कायम वापरते. वांगे पकडून रहायला लागत नाही. मधे मधे फिरवायचे . त्या जाळीवर कांदा, टॉमेटो, पापड चान्ग्ले भाजता येतात. चिकन तंदूरी ही करता येते.

साक्षीमी, ती मुळे नीट वाटली / कापली जात नाहीत. खरे तर फक्त हिरवी पातच घ्यायची. त्या लसणाच्या पाकळीला पण जरा कमीच स्वाद असतो.

लसणीच्या पातीची फक्त खालची मुळे काढून टाका... चटणी फार मस्त होते... त्यात मिरची, कोथिंबीर, मीठ, साखर, लिंबू घालून वाटा..

बाजारात विकत मिळणार्‍या पिझ्झा बेसवर एक्स्पायरी डेट नसते का? मी मागच्या आठवड्यात पिझ्झा बेस विकत आणला होता. पण बनवणं झालं नाही म्हणून काल फेकून दिला. त्याआधी सहजच एक्स्पायरी डेट काय आहे म्हणून बघितलं तर त्यावर मॅन्युफॅक्चरींग डेट किंवा एक्स्पायरी डेट या दोन्ही तारखा लिहिल्या नव्हत्या.
सगळ्याच कंपनींच्या पिझ्झा बेसवर हे लिहिलेलं नसतं का?

धन्यवाद दिनेशदा आणि हिम्सकूल. ती मुळे पण मस्त कोवळी, रसरशीत दिसली म्हणुन विचारले घ्यायची की टाकायची ती.

सगळ्याच कंपनींच्या पिझ्झा बेसवर हे लिहिलेलं नसतं का? >>> Best Before लिहीलेल असतं, म्हणजे सगळ्या कंपन्यांच माहीत नाही पण मी मागच्याच आठवड्यात आणला होता त्यावर लिहिलेल होत.

निंबुडा त्या जुन्या तुपाला शतधौतघृत म्हणजे १०० वेळा स्वच्छ पाण्याने धुतलेले तुप असे म्हणतात. ते आयुर्वेदीक मेडीकल मध्ये मिळते बघ. त्याने जळवात, पायाची आग होणे थांबते असे म्हणतात. मात्र ते १०० वेळा धुतले गेल्याने खाण्यास अजीबात योग्य नसते.

घरचे जुने तुप मात्र खाण्यासाठी चांगलेच असते. तसेही घरचे तुप फार खोल नसलेल्या जखमांवर अतीशय उपयुक्त. ते तुप गरम करुन त्यात स्वच्छ निर्जंतुक कापुस बुडवुन ती पट्टी लहान मुलांना खेळतांना पडल्यावर ज्या किरकोळ जखमा होतात त्यावर बांधावी. ताबडतोक आराम पडतो, पु वगैरे होत नाही.
( स्वानुभव आहे).:फिदी:

एका वेळी जास्त अ.न्डि(१५-२०) उकडुन त्याची साले पटापट कशी काढता येईल?
<<
"ह्यां"ना सांगा Wink अन तुम्हीही मदत करा.

(उकडलेलं समजून इब्लिसकाकूंनी कच्चं अंड फाऽडकन आपटून फोडल्याचा किस्सा आठवून गडाबडा) इब्लिस

ऑन सिरियस नोट,
पटकन थंडगार पाण्यात टाका. साल पटकन सुटते. मी मेस सेक्रेटरी असताना ३०० x २ = ६०० अंडी सोलताना मेसवाल्यांना पाहिले आहे. १ तासात म्यानेज करीत असत.

प्राजक्ता, मी सहसा अंडी उकडताना भाताबरोबरच कुकरमधे लावते. तेव्हा कुकरमधे ठेवून एकदम बर्‍याच प्रमाणात अंडी उकडता यावीत. अंडी सोलण्यासाठी गार पाण्यात टाकणे हा सगळ्यात बेस्ट उपाय. फार घाई असेल तर मी सरळ थंड पाण्याच्या नळाखाली अंडी थोडावेळ ठेवते. आणखी पटकन गार होतात.

झाल अस की घरी एका पार्टीला इतर स्टार्टर बरोबर उकडलेली अ.न्डी ठेवायची होती.सगळी तयारी होता होता अ.न्डी उकडुन तयार पण सोलायचि राहिलेली अशी सिच्युएशन.मी पण अ.न्डि गार पाण्यात टाकलेली पण साल मात्र अजिबात लवकर निघत नव्हती आणी स्टार्टर साठी ठेवाय्ची तर अ.न्डि न तुटता एकस.न्ध निघायला हवि ना..
पुढच्या वेळी अस होवु नये म्हनुन इथे विचारल.

पाण्याच्या बाटल्यांमध्ये ४-५ दिवस जरी पाणी भरुन ठेवलं तरी तळाला हिरवट दिसतं. पाण्याला वास यायला लागतो. ४-५ दिवसांनी बाटल्या घासुन साफ कराव्या लागतात तरीही तो हिरवट थर संपुर्ण जात नाही. काय करता येईल??

Pages