प्रोफेसरांच्या एका सुंदर गझलेतील अमृत आम्ही चाखले आणि आमच्या मनात आले की आपणही एखादी गझल करून पाहावी. पण दुर्दैवाने आम्हाला चढलेली धुंदी उतरलीच नाही. त्याच धुंदीत लिहिलेल्या काही लडबडत्या ओळी आहेत ह्या.
काल चाखली तेव्हा मजला अर्थ कळाला डुलण्याचा!
घोट घोट मी सारी प्यालो, स्वाद समजला चकण्याचा!!
सोबत करण्या तुला नेमका हवाच होता कुणी तरी;
सोस हिला ही रुसण्याचा अन् सोस तुला ही 'बसण्याचा'!!
द्रव्य मिळाले खोऱ्याने; पण...हाय, काल मी गमावले!
किंगफिशरच्या प्याल्यामध्ये शाप मिळाला हरण्याचा!!
एकच प्याला, स्थान परंतू कितीक वेळा पालटतो!
प्रयत्न अमुचा फुकाचि, त्याला एका जागी धरण्याचा!!
स्वच्छ करू ह्या कसे मुखाला? 'मामा' पुढती उभा दिसे;
यंत्रावरती वास पकडला, बेत बिनसला पळण्याचा!!
टल्ली होउनि अडवा पडलो, बलाढ्य ठरली वामांगी!
वाया गेला प्रयत्न अमुचा गृहखात्याशी लढण्याचा!!
हरेक बुक्क्यासरशी माझी फुटू पाहते किंकाळी.....
कुणी तरी ऐकणार का हो टाहो अमुच्या रडण्याचा?
.............श्री.चैत रे चैत
थूःशास्त्र व बंडलकाव्यतंत्रज्ञान विभाग,
'नवरोजींची काढूया' महाविद्यालय.
फोन नंबर: ००१२४५१५४६२७०
सिग्नेचर चांगलीये !!
सिग्नेचर चांगलीये !!
.:-D
:-D.:-D
जबरदस्त.
जबरदस्त.
टल्ली होउनि अडवा पडलो, बलाढ्य
टल्ली होउनि अडवा पडलो, बलाढ्य ठरली वामांगी!
वाया गेला प्रयत्न अमुचा गृहखात्याशी लढण्याचा!!<<<
हरेक बुक्क्यासरशी माझी फुटू पाहते किंकाळी.....
कुणी तरी ऐकणार का हो टाहो अमुच्या रडण्याचा? <<<
लै भारी !! लैच रे लैच !
लै भारी !!
लैच रे लैच !
आय-हाय! क्या बात है !
आय-हाय! क्या बात है !
मायबोलीच्या काव्य विभागात
मायबोलीच्या काव्य विभागात विडंबने करण्याची प्रथा उत्तमरित्या पुढे चालविल्याबद्दल अभिनंदन.
त्यात कवीच्या नाव/गांवाचेही विडंबन करण्याची नवी व अती अनुकरणीय अशी सभ्य प्रथा सुरु केल्याबद्दल आपणास काहीतरी विषेश पुरस्कार मायबोली प्रशासनाने द्यावा, अशी आग्रही मागणी इथे नोंदवितो.
जबराट ! हरेक बुक्क्यासरशी
जबराट !
हरेक बुक्क्यासरशी माझी फुटू पाहते किंकाळी.....>>>>>सर्वोत्तम मिसरा
मला आजवर सर्वाधिक आवडलेले विडंबन .
धन्स
इब्लिस यांना पाठिंबा... चैत
इब्लिस यांना पाठिंबा...
चैत रे चैत महाराज... जबरी जमलंय हे
'नवरोजींची काढूया'!!! वाहरे
'नवरोजींची काढूया'!!! वाहरे बच्चन!
छान जमल आहे, इब्लिस यांना
छान जमल आहे,
इब्लिस यांना पाठिंबा...
ह्या विनोदी गझलेला चांगली
ह्या विनोदी गझलेला चांगली म्हणणार्यांचे आभार.