"जगात नाही मित्र मिळाले तरी सृष्टीत आहेत. आपल्या घरी नाही मिळाले तरी बाहेर आहेत. देवाने आधीच तुम्हाला मित्र दिले आहेत. हे निळे निळे अनंत आकाश. ते नेहमी तुमच्यावरच पाखर घालीले. तारे तुम्हाला रमवतील. नद्या पाणी देतील. वारा गाणे गाईल. फुले सुगंध व सौंदर्य देतील. वृक्षलतावेली तुमच्यासमोर डोलतील, नाचतील. फार दु:ख नका करू. कोणी शिव्याशाप दिले तर वाईट नका वाटुन घेऊ. या निसर्गाकडे पहा आणि आनंदी रहा.
-सानेगुरूजी (सानेगुरूजींच्या गोड गोष्टी).
जिप्सी यांच्या सौजन्याने.
निसर्गाच्या गप्पांच्या ११ व्या भागाबद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf
ओ के - Aristolochia ringens
ओ के - Aristolochia ringens हे आहे तर ते बदक फुल...
अजून एक प्रश्न.. त्या
अजून एक प्रश्न..
त्या तुळशीच्या बिया .. अजून लावल्या नाहीयेत..
इथे भरपूर थंडी पडलीये.. आत्ता लावल्या तर झाडं येतील का ही शंका आहे..
माझ्या अंदाजाने त्या बिया -
माझ्या अंदाजाने त्या बिया - थोडे उबदार, मॉईस्ट वातावरण असताना लावणे चांगले. थंडीत आय डाऊट !!!
कुंडीत लावणार असशील व ती कुंडी घरात ठेवायची सोय असल्यास बहुतेक जमेल.....
काल व आज इथे (पुण्यात)
काल व आज इथे (पुण्यात) सक्काळी सक्काळी (६च्या आसपास) सुरेख नाजुक चंद्रकोर (द्वादशी- त्रयोदशीची) व सोबत शुक्राची चांदणी हे असे काही झळकत होते पूर्वेला - की बस्स...... काय नजारा होता.... माझी कधीही लवकर न उठणारी लेकसुद्धा हा नजारा पाहून एकदम खुश झाली.....>>>>>>>>>>>मला नाही दिसली. मी दररोज सकाळी ६-६.१५ ला बाहेर पडते. आणि ठराविक ठिकाणी आल्यावर आकाशत बघते. (कारण गेल्या महिन्यात मला चंद्र आणि त्याच्या अगदी जवळ चांदणी दिसली होती) पणा काल व आज काहीच दिसलं नाही. बघायची जागा चुकली. माझ्या एका मैत्रिणीने पण नंतर मला भेटल्यावर प्रथम हेच सांगितल.
वर्षू, फ़ोटो मस्तच. विशेष करून
वर्षू, फ़ोटो मस्तच. विशेष करून झेंडू आणि पूर्ण चंद्र.
शुक्र हा अंतर्ग्रह (पृथ्वी व
शुक्र हा अंतर्ग्रह (पृथ्वी व सूर्याच्या मधे) असल्याने व अतिशय तेजस्वी असल्यामुळे एकतर सूर्योदयाच्या थोडा आधी किंवा सूर्यास्तानंतर आपल्याला दिसतो. स्थानिक वर्तमानपत्रात किंवा पंचांगात त्याचा उदय किंवा अस्त देतात तो पहावा. बुध हादेखील अंतर्ग्रह असल्याने असाच दिसतो पण तो फार तेजस्वी नसल्याने साध्या डोळ्याने दिसणे अवघड असते तसेच तो सूर्याच्या अगदी जवळ असल्याने फारच थोडावेळ आपल्याला दिसतो.
याच धाग्यावर मागील काही पानांवर "साधना" ने अवकाशवेध ही तिच्या मित्राची साईट दिली आहे ती जरुर पहा - अगदी बेसिक गोष्टी त्यावर फारच सुंदररित्या सांगितल्या आहेत.
भारतात तरीही तूम्ही भाग्यवान
भारतात तरीही तूम्ही भाग्यवान आहात. आपल्याकडे मोसमी पाऊस ठराविक काळातच असल्याने, आकाश एरवी बहुदा निरभ्रच असते. आमच्याकडे कधी ढग असतील ते सांगता येत नाही, नैरोबीत पण तसेच असायचे.
पावसासाठी हिमालयाचे आपण आभार मानले पाहिजेत. मोसमी वार्यांना तो आपल्याकडे खेचतो, त्यामूळे
भारतात भरोश्याचा पाऊस पडतो. त्या हिमालयानेच उत्तरेकडचे अतीशीत वारे आणि वाळवंट रोखून धरले आहेत.
पण हे सगळे हिमालयाच्या निर्मितीनंतर घडले, त्यापुर्वी भारत हा खंड सुटा होता, त्यावेळेस हवामान कसे असेल, याबद्दल मी वाचले नाही कुठे,
परवा लोकसत्तामधे बातमी होती. डायनोसोर्स नष्ट होण्यामागे मुंबई / माथेरान परीसरातील भूगर्भीय हालचाली
कारणीभूत ठरल्या, असे एका पोर्तुगीज संशोधिकेचे अनुमान आहे
परवा लोकसत्तामधे बातमी होती.
परवा लोकसत्तामधे बातमी होती. डायनोसोर्स नष्ट होण्यामागे मुंबई / माथेरान परीसरातील भूगर्भीय हालचाली
कारणीभूत ठरल्या, असे एका पोर्तुगीज संशोधिकेचे अनुमान आहे स्मित>>>>>>>>>>>>हो. मी पण वाचली ती बातमी.
ऋतू उलटे पालटे म्हणजे काय, ते
ऋतू उलटे पालटे म्हणजे काय, ते इथे आल्यावर कळतंय.. कुणाला खरे वाटेल का, कि मी आताच झाडावर पिकलेला मोठा आंबा खाल्ला. झाडही ऑफिसच्या आवारातलेच ! चव अगदी आपल्या पायरी सारखी.
एक नवल म्हणजे, आपल्याकडे पाऊस आला कि आंबे नासतात किंवा पाणचट तरी लागतात. इथे मात्र तसे होत नाही. पाऊस पडला तरी आंबे गोडच आहेत. तसेच इथे आंब्याची कलमे नाही दिसत. बहुतेक झाडे, अगदी आमरायातली पण, कोयींपासूनच केलेली दिसताहेत. त्यामूळे प्रत्येक झाडाच्या आंब्याची चव आणि आकार वेगवेगळा आहे.
मला जरा संकोच वाटतोय म्हणून, नाहीतर लंच ब्रेकमधे ऑफिसमधल्या बहुतेक मुली, आंब्याच्या झाडाखाली
आंबे शोधायला जातात, त्यात मी पण असतो. माझ्या सेक्रेटरीला सांगून ठेवलेय. ती रोज एक मोठा आंबा, माझ्यासाठी घेऊन येते !
निसर्गाच्या गप्पा मस्त
निसर्गाच्या गप्पा मस्त आहेत...माझा हा प्रथमच सहभाग.
Bleeding Heart (Dicentra formosa) .. .. हे फुल दक्षिण अमेरिकेतील बागांनमध्ये बर्याचदा दिसते...मुख्यतः पूर्व आणि पच्छिम किनाऱ्याजवळ. लाल, पांढऱ्या रंगाची पण फुल पण या प्रकारात असतात.
सुस्वागतम तन्मय (विसरभोळा),
सुस्वागतम तन्मय (विसरभोळा), सुंदर फोटो आहे, असेच अजून येऊ देत...
व्वा!!! दिनेशदा भाग्यवान
व्वा!!! दिनेशदा भाग्यवान आहात. नेहमी आंबा खायला मिळतो.
मागच्या आठवड्यात अळीव चाळून ठेवले. खाली पडलेला कच-कचरा कुंडीत टाकला. कुंडी छान हिरवीगार झाली आहे. असेच तुळशीचे बी घातले होते. रोपे सुद्धा आली पण चिमण्या फस्त करतात. अळीव बहुदा आवडलेले दिसत नाही.
'दिनेशदा भाग्यवान आहात. नेहमी
'दिनेशदा भाग्यवान आहात. नेहमी आंबा खायला मिळतो''.. अगदी!अगदी!!!
इथले आंबे भर थंडीतही दिस्तायेत.. पहिल्यांदाच या मोसमा त दिसले. चव मात्र आपल्याकडच्या बदाम सारखी.. पण अजिबात काही नसल्यापेक्षा हे बरे..
मधू , अळिवाची पाने तिखट
मधू , अळिवाची पाने तिखट असतात. आपण खाऊ शकतो. खरे तर ती पाने म्हणजे मिरची आणि कोथिंबीर या दोन्हीना पर्याय आहेत.
इथे काजूची झाडे पण चिक्कार आहेत, पण या लोकांना काजूगर काढायची कला अवगत नाही. ( दारू पण गाळता येत नसावी )
तन्मय, सुंदर फोटो.
सध्या देवपूजेला रोज ही घरची
सध्या देवपूजेला रोज ही घरची सुरेख शेवंती असते. इतका शुभ्र पांढरा रंग आहे. मन प्रसन्न होतं. आणि भरगोस फुलं येतायत त्यामुळे झाड पण मस्त दिसतं.
वा, वा, वा, वा काय सुंदर
वा, वा, वा, वा काय सुंदर शेवंती आहे ..... याला एक मंदसा सुवास असतो ना ?
सुंदर फुले ! शशांक, कछुआ छाप
सुंदर फुले !
शशांक, कछुआ छाप मच्छर अगरबत्ती बनवतात ते पायरेथ्रम पण याच कुळातले. ते झाडही असेच दिसते आणि अशीच फुले येतात त्याला. केनयात त्याची भरपूर शेती होते.
वाहवा...शेवंती सुरेख!!
वाहवा...शेवंती सुरेख!!
लहानपण राहुरी कृषी विद्यापीठासारख्या वातावरणात घालवल्याने, पांढरी/ पिवळी शेवंती मला खुप नॉस्टॅलजिक करते.
इथे पुण्यात किती वेळेस रोपं आणली पण माझ्याकडे जगतच नाही.
तसं शेवंतीला सावलीची आणि जरा पाणथळच जागा लागते ना? आमच्या बागेत आजुबाजुला आंबा, निरगुडी, अनंत, पेरु, पारिजात, सोनचाफा अशा मोठ्या वृक्षांच्या सावलीने खाली लावलेली छोटी रोपं जगतच नाहीयेत.
<<तसं शेवंतीला सावलीची आणि
<<तसं शेवंतीला सावलीची आणि जरा पाणथळच जागा लागते ना ? >>
मी ह्यातली तज्ञ नाही पण आमची शेवंती बाहेर मोकळ्या जागेत आहे दिवसा मस्त ऊन असतं. बादलीत लावलीय. म्हणजे सावली आणि पाणथळ जागाच लागते असं नसावं.
प्रत्यक्षात खूप सुंदर शुभ्र रंग आहे फुलाचा. फोटोचा आकार कमी करण्यानी क्लॅरिर्टी पण थोडी कमी झालीय. समजून घ्यालच
शकुन, फुलं सुंदर आहेत
शकुन, फुलं सुंदर आहेत अगदी!
दिनेशदा, बरेच दिवस मला एक प्रश्न पडतोय. जाई,जुई,सायली,कुंद,मोगरा ह्या वेलींना जर आपण त्यांच्या फांद्यांचा काही भाग जमिनीत रोपला तर फुटवा येतो. म्हणजे त्यांचं प्रोपागेशन जर या पद्धतीने होत असेल तर त्यांना फुलं निर्माण करण्याची गरज काय? किंवा त्यांना जर पुढे फुलांपासून फळ आणि मग बी असं येत नाही; तर मग फुलं निर्माण करून ह्या वेली त्यांची शक्ती का वाया घालवत असतील? शिवाय ह्या फुलांमधे काळ्या रंगाचे मुंगी सारखे दिसणारे बारीक बारीक किडे असतात. मग यांचं परागीवहन होऊनही पुढे फळ नाही! मग मधुरस निर्माण करण्याचे कष्ट ह्या वेली का घेत असतील?
वर्षु,शकुन्,विसरभोळा छान फोटो
वर्षु,शकुन्,विसरभोळा
छान फोटो !
गैलरीत कुंडीमध्ये काकडी आणि दोडका यांच्या वेली चांगल्या वाढल्या, फुले ही खुप आली, पण लहान असणारी काकडी आणि दोडका मोठ्या न होता,(पिवळसर रंग येऊन) गळुन पडत आहेत, जाणकारांनी यावर उपाय असेल तर सांगावा
कुंड्यामध्ये असा भाजीपाला/वेली लावण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे
शांकली, बरीच झाडे असे करतात.
शांकली, बरीच झाडे असे करतात. जास्वंद आणि गुलाबसुद्धा.. शास्त्रीय कारण असेलच असे नाही, पण मला वाटते मानव या झाडांची भरपूर लागवड करतोय ना, म्हणुन त्यांनी हे प्रयत्न अर्धवट सोडले आहेत.
त्यांचा सुगंध आपल्याला आवडतो हेच वाक्य, आपल्याला आवडेल असा सुगंध त्यांनी निर्माण केलाय, आणि प्रजा वाढवण्यासाठी त्यांनी आपला वापर केला, असे पण लिहिता येईल.
कुंदा ची वेल असते, ती याच कुळातली. फुले देखणी आणि जास्त पाकळ्यांची असतात, पण सुगंध कमी. महाराष्ट्रातला बहुतेक डोंगरावर हि वेल असतेच. म्हणजे तिचा प्रसार बियामार्फतच होत असणार.
कुणाला सांगून खरे वाटणार नाही, इथे अंगोलातल्या वाळवंटात अगदी आमच्या ऑफिसच्या बाहेरही, या वर्गातली झाडे आहेत. ती मुद्दाम कुणी लावली असतील अशी शक्यताच नाही.
अनिल, वेलांना मातीचे पोषण कमी पडतेय.
मी थोडा कन्फ्युज आहे मला
मी थोडा कन्फ्युज आहे मला मुचकुंद आणि कनकचंपातला फरक जरा समजावून सांगा ना. कनकचंपा सर्च केल्यावर मुचकुंदाचे फोटो सापडतात. पवईच्या बागेतही विक्रमने मुचकुंदाचे झाड पाहुन हा कनकचंपा आहे आणि त्याच्या बाजुलाच मुचकुंदासारखेच अजुन एक झाड होते तो "खरा मुचकुंद" आहे असं सांगितलं. रामधनचंपा सर्च केल्यावर मला ते लाल-पिवळ्या फुलांचे (ज्यात करवंदासारखे गोळे असतात) ते फोटो सापडले.
मै परेशान परेशान परेशान....
विक्रमने सांगितल्याप्रमाणे हा "खरा मुचकुंद"
आणि हा "कनकचंपा"
हे झाड रक्तचंदनाचे आहे
हे झाड रक्तचंदनाचे आहे का?
खोड
पाने
संपूर्ण झाड
तुझ्या गार्डनला एकदा भेट
तुझ्या गार्डनला एकदा भेट द्यावी म्हणतेय कधीपासुन..
कुणाला खरे वाटेल का, कि मी
कुणाला खरे वाटेल का, कि मी आताच झाडावर पिकलेला मोठा आंबा खाल्ला. झाडही ऑफिसच्या आवारातलेच ! चव अगदी आपल्या पायरी सारखी.>>>>>>>
इथे काजूची झाडे पण चिक्कार आहेत, पण या लोकांना काजूगर काढायची कला अवगत नाही>>>>>>>>>दिनेशदा, आमच्यासाठी घेऊन या.
माझ्याकडे, ग्रील मध्ये
माझ्याकडे, ग्रील मध्ये गुलाबाच्या कुंड्या ठेवल्यात. त्याला छोटी छोटी छान फुले यायची आणि ३-४ दिवस टिकायची पण आता गेल्या ४-५ महिन्यांपासून कळ्या थोड्याशा फुलल्या की अर्धवट असतानाच सुकून जातात. कशामुळे असेल.
शोभा१२३, दिनेशदा
शोभा१२३,
दिनेशदा म्हंटल्याप्रमाणे पोषणमुल्य कमी पडत असेल, थोडी माती बदलुन ,खत टाकुन पहा.
मी कुंडीत लावलेल्या रोपाला नोव्हेंबर पर्यंत खुप गुलाब लागायचे, पण थंडीमध्ये गुलाब फुलणं बंद झालं आहे
कनकचंपा / रामधनचंपा म्हणजे ते
कनकचंपा / रामधनचंपा म्हणजे ते पिवळ्या फुलांचे, मग हिरव्या लाल कर्णफुलांच्या आकारातल्या फळासारखे झाड.
पसरट पानांचा, केळ्याच्या सालीसारखी बाह्यदले आणि मोठे पांढरे, किंचीत सुगंधी असे ( साधारण धोत्र्याच्या फुलासारखे ) फुल असणारे झाड, तो मुचकुंद.
रक्तचंदन मात्र नाही ओळखता आला !
शोभा,
मजा म्हणजे या लोकांना गोड फळे आवडत नाही. ऑफिसमधल्या एका झाडाचे आंबे खुप गोड आहेत. ते मला दिले जातात. त्यांना मात्र किंचीत आंबट / कडवट चवीची फळे आवडतात. पहिल्यांदा आंबा खाल्ल्यावर मी सेक्रेटरीला म्हणालो. गोड होता हं आंबा.. तर ती म्हणाली, नाही आवडला का ?
अनिल, आपल्याकडे उन्हाळ्यातच जास्त फुले येतात. थंडीत झाडे पाने गाळतात.
- कनकचंपा म्हणजे Pterospermum
- कनकचंपा म्हणजे Pterospermum acerifolium
आणि मला वाटतं मुचकुंद म्हणजे Pterospermum diversifolium
दोघेही Sterculiaceae या कुळातलेच.
गुगलून बघता - Pterospermum suberifolium म्हणजेही मुचकुंद असं येतंय ??? नक्की मुचकुंद कुठला आहे ??
Pages