पुराणातील कथा

Submitted by नंदिनी on 16 November, 2012 - 06:21

इथे तुम्हाला माहित असलेल्या वेगवेगळ्या रोचक पुराणकथा लिहा. हिंदू, बौद्ध, जैन, इस्लाम, ख्रिस्ती, ग्रीक, रोमन आणि इतर धर्मांतील व देशांतील कथा माहित असतील तर इथे लिहा. हा बाफ अशा कथांच्या संकलनाकरता आहे. त्या कथांची सत्यासत्यता तपासण्यासाठी अथवा वैज्ञानिक कसोट्या लावण्यासाठी नाही.

इथे टिंगलटवाळी करणारे, एखाद्या धर्माला उद्देशून चेष्टा-मस्करी करणारे लिखाण करू नये ही विनंती.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

डॉक्टर....

तुम्हाला सांगितले तर आश्चर्य वाटेल पण खुद्द माऊंट अबू स्थित 'ब्रह्मकुमारी' या संघटनेचे ऑफिशिअल नाव "ब्रह्मकुमारीज् वर्ल्ड स्पिरिच्युअल ऑर्गनायझेशन" असे असून 'प्रजापिता ब्रह्माकुमारी' असे नाम वापरणे म्हणजे 'द्विरुक्ती' चा एक प्रकार घडला आहे, जो निदान महाराष्ट्रात तरी रुढ झालेला दिसतो. 'ब्रह्मकुमारी' या नामाचा अर्थच मुळात 'ब्रह्मदेवाच्या मुली' असा असून पुन्हा त्यामागे 'प्रजापिता' हे विशेषनाम जोडल्यामुळे त्याचा थेट अर्थ "ब्रह्मदेवाच्या ब्रह्मकुमारी....मुली" असे काहीसे गोंधळात पडणारे नामकरण झाले आहे त्या संस्थेचे.

यांच्या ऑफिशिअल वेबसाईटवर मात्र कुठेच 'प्रजापिता' असा उल्लेख तुम्हाला आढळणार नाही.

लोकमानसात होत असलेल्या चर्चेत तुम्ही अनुभवले असेलच की वारंवार "राष्ट्रपती" तसेच "राष्ट्रपिता" संदर्भातही त्या नामांच्या नेमक्या अर्थछटेबाबत विचारणा होत असते. प्रजापतिचा जसा 'विश्वाला आधार देणारा' असा अर्थ अभिप्रेत आहे, तद्वतच 'राष्ट्रपती = राष्ट्राला आधार देणारा' असा घेणे आवश्यक आहे. "पती = मालक, स्वामी" ही संकल्पना फारच मर्यादित आणि कौटुंबिक पातळीवर घेतली जाते. महात्मा गांधींच्याकडे देशाने 'पित्या'च्या रुपातच पाहिले असल्याने साहजिकच त्यांच्या नावाला 'राष्ट्रपिता' हे संबोधन आपसूकच लाभले.

सर,
ब्रह्मा, विष्णू व महेश या त्रिमूर्ती विश्वाचे जनक, पालक व संहारक या भूमीकेतून पाहिल्या जातात. जन्म देणारा तो पिता नव्हे काय?
म्हणून ब्रह्म्याला पिता म्हणावे की पती हा प्रश्न मनात आहे. धारण करणारा, आधार देणारा इ. म्हणजे पती असेल, तर ते विशेषण विष्णूस जास्त योग्य असावे?
राष्ट्रपती/पिता इ. संदर्भ इथे मला वाटते गैरलागू असावेत.

डॉक्टर....

खुलासा काहीसा किचकट वाटू शकेल, तरीही मी वरील प्रतिसादासंदर्भात माझ्या अल्पमतीप्रमाणे काही विवेचन करण्याचा प्रयत्न करतो.

ब्रह्मा विष्णू महेश या त्रिमूर्तींच्या कर्तव्याचा उल्लेख जवळपास सर्वांनाच माहीत आहे. तरीही हे स्पष्ट होणे कठीण झाले की या तिघांपैकी कुणा एकाला 'श्रेष्ठत्व' द्यायचेच झाले तर तो मान कुणाकडे जाईल ? ऋग्वेदात या तीन देवांना उद्देश्यून असेही म्हटले गेले आहे की, "न हि वो अस्ति अर्भको देवासो न कुमारकः ! विश्वे सतो महान्तः इतं" ["हे देवानो, तुमच्यामध्ये लहान किंवा तरुण कोणीही नाही; तुम्ही सर्व सारखेच मोठे आहात..."] त्रिमूर्तींचा स्वभाव आणि अधिकार बरेच वेगवेगळे आहेत हे आपण पाहतो. सृष्टीचे ज्ञान हा एक मोठा घटक, जो ईश्वराच्या प्रत्येक अंशाला ज्ञात आहे असे मानले जाते. पण असे असले तरी भगवान विष्णूने ही जी ज्ञाननिर्मिती केली ती त्याने सर्वप्रथम ब्रह्मदेवाच्या हृदयात वसविली. ज्ञान वर्ग होण्याच्या प्रक्रियेतील ब्रह्मदेव हा सृष्टीतील पहिला जीव आहे आणि त्याने मग ते ज्ञान पुढील पिढीकडे हस्तांतरीत केले. भगवान विष्णू हे त्रैलोक्याचे स्वामी असल्याने चराचरातील प्रत्येक बाबीचे तेच निर्माते आहेत. इतकेच नव्हे तर ब्रह्मदेवाचेही ते जनक मानले जातात. ब्रह्मदेवाला जरूर 'पितामह' या संज्ञेने संबोधिले जाते पण विष्णूला तर 'प्रपितामह' असे म्हटले गेले आहे.... म्हणजेच पितामहाचाही जनक.

त्यामुळे ब्रह्माकडे जरी सृष्टीच्या जनकाचे श्रेय जात असले तरी 'विष्णू' हाच सर्वार्थाने सार्‍या घडामोडीचा जनक आहे, जरी त्याला रुढार्थाने 'रक्षक, पालक' म्हटले गेले असले तरी.....इंग्रजीमध्ये त्रिमूर्तीला क्रीएटर, प्रोटेक्टर, डीस्ट्रॉयर असे म्हटले गेले आहे.

तुम्ही वर म्हटले आहे..."जन्म देणारा तो पिता नव्हे का?", त्याला अनुसरून उत्तर द्यायचे झाल्यास मग ब्रह्माच्या अगोदर तो मान विष्णूकडे गेला पाहिजे. पण झाले आहे असे की 'क्रिएटर' ही संज्ञा 'पिता' संज्ञेशी जास्त जवळीक धरणारी झाल्याने मग जनकत्वाचा मान साहजिकच ब्रह्मदेवाकडे जातो अशी धारणा झाली.... त्यामुळे त्याला 'प्रजापिता' असे नाम [जरी मौखिक रुपात] प्राप्त झाले, प्रत्यक्षात ते 'प्रजापति' हेच हवे.

अशोक पाटील

उगाच काहीतरी घोळ सुरु आहे. प्रजापती हा वैदिक देव आहे, ब्रह्मदेव हा ब्रह्मपूजक अनार्य लोकांचा देव. यज्ञांचा बाजार फार काळ चालणार नाही, हे लक्षात आल्यावर वैदिकांनी शंकर, गणपती, कार्तिकेय, ब्रह्मा असे अनार्य देव आपलेसे केले. त्यात ब्रह्माला उद्देशून प्रजापती हे नाम दिले गेले. ऋग्वेदात कुठेही ब्रह्मदेव, महेश यांचे उल्लेख नाहीत. प्रजापती व रुद्र यांचे उल्लेख आहेत, तेही स्वतंत्रपणे.

प्रजापति हा वैदिक देव आहे पण ब्रह्मा अनार्य नाही. तो वेदातल्या ब्रह्मन् चे समूर्तीकरण आहे. ब्राह्मणग्रंथांच्या काळात प्रजापतिचे महत्व खूप वाढले, इंद्राचे कमी झाले.
वेदांत विष्णू आहे, पण एक सूर्याचे रूप आहे. फक्त ५ सूक्ते विष्णूला उद्देशून ऋग्वेदात आहेत. शंकर/ शिव नाही. रुद्र आहे. ज्याच्यात काही अनार्य देवतातत्व मिळून पौराणिक शंकर/शिव झाला. गणपती, कार्तिकेय मूळ वैदिक-ब्राह्मण परंपरेच्या बाहेरचे. कुमार, विशाख, मुरुगन् इ. देवता एकत्र येऊन कार्तिकेयाला अंतिम स्वरूप मिळाले. ब्राह्मणग्रंथ ते पुराणं यांच्यामधल्या शतकांमधे खूप मोठे धार्मिक घडामोडी झालेल्या दिसतात. त्या सगळ्या प्रक्रियांचा अंतिम परिपाक म्हणजे पौराणिक धर्म

वरदाजी,
पौराणिक धर्म म्हणजे काय? तो वैदिक धर्मापेक्षा वेगळा कसा?

धार्मिक पूजापाठ आदि विधी करताना पुरोहित काही विशिष्ट यजमानांकडे श्रुती-स्मृती-पुराणोक्त फल मिळो यासाठी प्रार्थना म्हणतो, व इतर ठिकाणी फक्त पुराणोक्त फल प्राप्त्यर्थं असे म्हणतो. तर यावरून वैदिक धर्म व पौराणिक धर्म हे वेगळे असतात काय?

इब्लिस,
सध्या थोडक्यात सांगायचं झालं तर हो - वैदिक आणि पौराणिक धर्मात फरक आहे. ते आता ज्याला आपण हिंदू धर्म म्हणतो त्याच्या विकासाचे वेगवेगळ्या काळातले टप्पे आहेत. मी पूर्वी दुसरीकडे एक पोस्ट टाकली होती त्यातला काही रिलेव्हन्ट भाग इथे परत कॉपी मारतेय

....भारतीय धर्माची वाटचाल वेदातील निराकार देवता + यज्ञ + जनसामान्यांचा लोकधर्म अशा पासून ते बौद्ध, जैन व इतर संन्यासी पंथांचा उगम, या सर्व धर्मांत मूर्तीपूजेचे आगमन, आणि मग ज्याला आज आपण हिंदू धर्म म्हणून ओळखतो त्या स्वरूपात वैदिकोत्तर धर्माचे हळूहळू झालेले परिवर्तन, ते होत असताना उपासना पद्धतींमधे, देवतास्वरूपांमधे, देवताकार्यांमधे झालेले मूलगामी बदल, या धारेत येऊन मिसळलेले अनेक अवैदिक देव-देवता, उपासना पद्धती आणि मग या सगळ्या घडामोडीतून उदयाला आलेले पुराण-ग्रंथ आणि मग या आपल्याला ओळखीच्या असणार्‍या हिंदू धर्माची पुढील वाटचाल असा काहीसा हा साधारण ३५०० वर्षांचा प्रवास आहे. अजूनही संतोषीमातेसारख्या नवनवीन देवता, शिर्डी-तिरुपती सारख्या नवीन तीर्थयात्रा यांची भर धर्मात पडतेच आहे....

श्रुति = वैदिक ग्रंथ (वेदसंहिता, ब्राह्मणं, आरण्यकं, उपनिषदं, वेदांगं, प्रातिशाख्य, इ.)
स्मृति = इ.स च्या सुरुवातीच्या शतकांमधे निर्माण झालेले समाजनियम विशद करणारे ग्रंथ (मनुस्मृती, याज्ञ्वल्क्य, नारद, इ)
पुराणं - इ.स च्या साधारण ४-५व्या शतकापासून यांची निर्मिती सुरू झाली. काही पुराणांची निर्मिती अपवादात्मक थोडी आधीची...

प्रजापति हा वैदिक देव आहे पण ब्रह्मा अनार्य नाही. तो वेदातल्या ब्रह्मन् चे समूर्तीकरण आहे.

आर्यांचा कुठलाच देव मूर्तीरूप नाही आणि कोणताच मूर्तीरूप देव आर्यांचा देव नव्हता, तो अनार्य परंपरेतूनच आलेला आहे. ब्रह्मा, विश्णू , महेश तीन्ही अनार्य देव आहेत.

मूळाय आर्य शब्द आला कुठुन? मी वाचले त्यात जर्मन लोक, म्हणजे खूद्द हिटलर सुद्धा स्वतःला आर्य म्हणवुन घेत असे. आर्य हे पश्चिमेकडुन आले असे वाचले होते. आता भारताची पश्चिम म्हणजे पार युरोपापर्यंत. मग आर्यांचा उगम नक्की कुठल्या देशातला?

महाभारत या सिरीयलमध्ये कुंती स्वतःला सतत आर्य म्हणवुन घेत असल्याचे आठवते.

आर्यांचा उगम नक्की कुठल्या देशातला?

कशाला हा प्रश्न इचारला? आता धाग्याचा आणि चार पाच आय्डींचा इस्कोट होईल, इतके भयाण भयानक सामर्थ्य या प्रश्नात आहे.

कसा होईल स्फोट? गंमत अशी आहे की बर्‍याच जणांचे यावर वेगवेगळे मत आहे. पण न भांडता आपण ते जाणुन घेउ शकतो. आमच्या शेजारचे एक सद्गृहस्थ ( जे आता हयात नाहीत) ज्यांना मी काका म्हणत असे, त्यांचे मराठी, हिंदी आणी इंग्लिशमधले वाचन अफाट होते. तर ते म्हणायचे की भारतातली संस्कृती ही संकर म्हणजे हायब्रीड आहे.

फार पूर्वी म्हणजे कदाचीत महाभारतापूर्वी ( त्या काळात इराण वगैरे देश हे मुस्लिम म्हणून नव्हे तर आर्य म्हणून अस्तित्वात होते) जे लोक भारतात आले किंवा विवाह आदी कार्याने एकमेकांशी बांधले गेले, त्याने पुढची पिढी ही एकाच रक्ताची न रहाता अनेक गोत्र कुलांनी बांधली गेली.

आता असे बघा की द्रौपदी ही इराणमधली तर गांधारी ही आताच्या अफगणिस्तानातली होती. तेथील राजे सुद्धा आपले साम्राज्य विस्तारण्याकरता लांबपर्यंत जाऊन आक्रमणे करीत होते. मग भारतीय संस्कृती एकच हिंदु / आर्य/ अनार्य न रहाता मिसळली गेली.

वरदा आणी अशोक पाटील सर यावर अधिक प्रकाश टाकु शकतील.

धन्यवाद
>>वैदिक आणि पौराणिक धर्मात फरक आहे. ते आता ज्याला आपण हिंदू धर्म म्हणतो त्याच्या विकासाचे वेगवेगळ्या काळातले टप्पे आहेत.<<
पण हे जुन्या काळी वेगवेगळे होते. आज याप्रकारे वेगळे स्तर करण्याची काय आवश्यकता आहे?

हे माऊंट अबूवाले प्रजापिता ब्रह्माकुमारी काय प्रकरण आहे मग?>> त्ये वायलं प्रकरण हाये डॉ.
त्यांची थेअरी वेगळी आहे. २१ डिशेंबरबाबत त्यांच म्हणणं काय आहे हे एकदा केन्द्रात जाउन विचारलं पाहिजे. Happy

गांधारी ही आताच्या अफगणिस्तानातली -from wikipedia -- Gandhari (Sanskrit: गांधारी) is a character in the Hindu epic, the Mahabharata. In the epic, she was an incarnation of Mati, the Goddess of Intelligence, as the daughter of Subala, the king of Gandhara, or the modern Kandahar, a region spanning northwestern Pakistan and eastern Afghanistan, from which her name is derived. Gandhari's marriage was arranged to Dhritarashtra, the eldest prince of the Kuru kingdom, a region in Delhi and Haryana region

द्रौपदी ही इराणमधली तर गांधारी ही आताच्या अफगणिस्तानातली
द्रौपदी भारतातल्या कम्पिल्य नगराची राजकुमारी तर गांधारी अफगाणिस्तानची राजधानी गांधार ची राजकुमारी होती
धार्मिक पूजापाठ आदि विधी करताना पुरोहित काही विशिष्ट यजमानांकडे श्रुती-स्मृती-पुराणोक्त फल मिळो यासाठी प्रार्थना म्हणतो, व इतर ठिकाणी फक्त पुराणोक्त फल प्राप्त्यर्थं असे म्हणतो.
वेद म्हणण्याचा , ऐकण्याचा अधिकार फक्त ब्राह्मणांना म्हून ब्राह्मणांकडे मंगल कार्यात वेदोक्त आणि बाकीच्यांकडे पुराणोक्त मंत्र म्हणतात

पुराणात ज्या पंचकन्न्यांचा उल्लेख होतो त्यापेकी तर कोण होती ? कुणी सांगू शकेल का ?

पुराणात ज्या पंचकन्न्यांचा उल्लेख होतो त्यापेकी तर कोण होती ? कुणी सांगू शकेल का ? >>>>> मोहीनी तुम्हाला तारा म्हणायच आहे का?

अहील्या, द्रौपदी, तारा, सीता, मंदोदरी या पंचकन्यांपैकी तारा ही बहुतेक राजा हरीश्चंद्राची राणी तारामती होती... खात्री करुन परत सांगेन

तारा ही बहुतेक राजा हरीश्चंद्राची राणी तारामती होती... >>>> मला वाटत वालीची बायको तारा

नाही ही तारा वेगळी, गुरुपत्नी तारा जिला चंद्राने पळवली ती. ती मूळ रुपात त्याच्याकडे गेली नाही, तिची सावली गेली आणि ती मूळ पवित्र राहिली असे मी मध्यंतरी वाचले होते.

Pages