पुराणातील कथा

Submitted by नंदिनी on 16 November, 2012 - 06:21

इथे तुम्हाला माहित असलेल्या वेगवेगळ्या रोचक पुराणकथा लिहा. हिंदू, बौद्ध, जैन, इस्लाम, ख्रिस्ती, ग्रीक, रोमन आणि इतर धर्मांतील व देशांतील कथा माहित असतील तर इथे लिहा. हा बाफ अशा कथांच्या संकलनाकरता आहे. त्या कथांची सत्यासत्यता तपासण्यासाठी अथवा वैज्ञानिक कसोट्या लावण्यासाठी नाही.

इथे टिंगलटवाळी करणारे, एखाद्या धर्माला उद्देशून चेष्टा-मस्करी करणारे लिखाण करू नये ही विनंती.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पांडवाना कुठे स्वर्गारोहण करता आले? फक्त धर्मराज विमानात पोहोचला. उरलेले सगळे खाली पडले हिमालयात.

श्रीकृष्णाला कुणीतरी खिरीचं भांड देऊन सांगतं की, ही खीर अंगाला जिथे जिथे लावशील तिथे तुला शत्रुच्या कोणत्याही हत्यारापासुन इजा होणार नाही. श्रीकृष्ण अख्ख्या अंगाला ती खीर फासतो पण तळपाय राहुन जातात. रानात आराम करत असताना एका शिकार्‍याला त्याचा पाय हरणाच्या डोळ्यासारखा वाटतो आणि तो बाण मारतो. तो बाण नेमका श्रीकृष्णाला लागतो.

हो बरोबर, सगळे वाटेतच मरतात.. आणि मरताना, त्यांना स्वर्गात का पोहोचू शकलो नाही, त्याचे कारणही कळले.

आता वरच्याच कथेत बघा ना, पारध्याच्या हातून श्रीकृष्णाचा वध झाला, हि घटना. मग त्याला मुलामा म्हणून, हरणाचे तोंड, खिर, अवतारकार्य संपले... वगैरे कथा जोडल्या गेल्या.

रामाने झाडाच्या आडून बाण मारून वालीची हत्या केली होती. वालीने मरण्यापूर्वी रामाला या अन्यायाचा जाब विचारला. तेंव्हा रामाने मी पुढील अवतारात या अन्यायाचे प्रायाश्चित्त घेईन, पूर्णपणे गाफिल असताना तुझ्या हातून मृत्यु पत्करेन असे त्याला आश्वासन दिले होते.

त्यानुसार वाली व्याधरुपात जन्माला येऊन कृष्णवधास कारणीभूत ठरला.

१०० Happy

इंद्रजीताचा मॄत्युनंतर रावण पाताळातले असूरांचे राजे अहिरावण व महिरावण यांना मदतीला बोलावतो. हे दोघेही मायावी युद्धात प्रवीण असतात ते राम-लक्ष्मणांना झोपेत उचलुन पाताळात घेउन जातात. हनुमानाच्या हे लक्षात आल्यावर तोही मागोमाग पाताळात पोहोचतो व तेथेच त्याची मकरध्वजासोबत भेट होते कारण मकरध्वज तेथे द्वारपालाचे काम करत असतो.

राम-रावण युद्ध नक्की किती काळ चालू होतं? हनुमानाला झालेला मुलगा मोठा होऊन द्वारपालाचे कामपण करायला लागला. चेष्टा नाही पण अशा उपकथानकातून वेळेचा हिशोब मिळतो का?

व्वा...आज पाहिला हा धागा. मस्त कथा चालु आहेत. Happy

कुणाला दिती, आदिती, स्वाहा, स्वधा यांबद्दल माहिती असेल तर सांगा.

मला यातली फक्त 'स्वाहा' ही अग्निची पत्नी आहे हे माहिती आहे.

प्राचीन राजा बर्ही त्याची ११वा वंशज प्रचेत, त्याचा मुलगा प्राचेतस दक्ष. दक्षाची बायको अदिती. अदितीचा मुलगा विवस्वान आणि त्याचा मुलगा मनु. मनुच्या वेळेला पहिला प्रलय आला होता.

अजून १ मरीचि , अत्री , अंगिरद, पुलस्य, पुलह व क्रतू हे सहा ब्रम्हदेवाचे पुत्र रुषी होते. मरीचीचा मुलगा कश्यप.

दक्शाला १३ मुली होत्या त्या कश्यपाला दिल्या त्यातली पहिली अदिती. तिला १२ मुल झाली ती आदित्य नावाने प्रसिध्द झाली हयातला सगळ्यात धाकटा विष्णू.

दक्षाच्या दिती नावाच्या मुलीला १ मुलगा हिरण्यकश्यपू. दीती मुलगा म्हणून दैत्य. त्याचे मुल प्रल्हाद, सं-हाद, अन-हाद, शिबी व बाष्कल.

राम-रावण युद्ध नक्की किती काळ चालू होतं? हनुमानाला झालेला मुलगा मोठा होऊन द्वारपालाचे कामपण करायला लागला. चेष्टा नाही पण अशा उपकथानकातून वेळेचा हिशोब मिळतो का?
>> पॉईंट!
राम-रावणाचे युद्ध् काही दिवस सुरु होते बहुतेक १८ की काहीतरी . सीतेच्या अग्निपरिक्षेच्या वेळी ती एक वर्ष व काही महिने रावणाच्या ताब्यात होती असा संदर्भ आठवतोय.
म्हण्जे ही मकरध्वजाची कथा आधी घडलेली असेल हीच शक्यता आहे.

अशा उपकथानकातून वेळेचा हिशोब मिळतो का?>> नाही मिळणार
रामायण, महाभारत, जातकं, पुराणं ही कुणी एका लेखकाने एका वेळी लिहिलेली गोष्टींची एकसंध पुस्तकं नाहीत. रामायण, महाभारताच्या मूळ गोष्टींमधे मौखिक परंपरेतून अनेको शतकं भर पडत गेलीये. आख्यानं-उपाख्यानं यांची भर पडत गेलीये. महाभारताच्या संहितीकरणाचा असा काळ साधारणपणे ५वं शतक इसपू ते इ.स चं ६वं शतक असा मानला जातो आणि रामायण थोड्या नंतरचं २०० इसपू नंतर ते साधारणपणे ५वं शतक इ,स, वगैरे मानला जातो.

पुराणं आणि जातकं मात्र कथासंकलन आहे. समाजात अस्तित्वात असणार्‍या कथा - धार्मिक, लोककथा, मिथ्यककथा वगैरे - यांचं त्या त्या धर्म/पंथ तत्वज्ञानाच्या चौकटीत घालून पुनर्लिखित (?) स्वरूप दिसतं. पुराण परंपरेतल्या साहित्याची संख्या प्रचंड आहे. १८ महापुराणं आणि १८ उपपुराणं असं म्हणत असलो तरी त्यांची यादी सुद्धा सगळ्या पुराणांत सारखी नाही. या शिवाय असंख्य स्थळपुराणं, माहात्म्यं वगैरे ग्रंथही याच परंपरेत मोडतात. एकुणातच भारतीय सनातन धर्मात असलेल्या सगळ्या विविधतेला (उपासनेच्या, दैवतांच्या, दैवतकथेंच्या, इ.) सामावून घ्यायचा प्रयत्न पुराणात दिसतो. त्यामुळे त्या त्या दैवताच्या बदलत्या परंपरेला सामावून घेताना जुन्या कथांना नवीन अर्थ दिला जातो, नव्या कथा रचल्या जातात, दोन्हीची सांगड घातली जाते, इ. इ. पुराण रचनांचा काळ साधारणपणे ३-४ शतक इ.स. पासून पुढे असा दिसतो.

रच्याकने, रामरावणाचं युद्ध १४ दिवस चालू होतं

महाभारताच्या संहितीकरणाचा असा काळ साधारणपणे ५वं शतक इसपू ते इ.स चं ६वं शतक असा मानला जातो आणि रामायण थोड्या नंतरचं २०० इसपू नंतर ते साधारणपणे ५वं शतक इ,स, वगैरे मानला जातो. >>म्हणजे महाभारत आधी लिहिलं गेलं का? संहितीकरण म्हणजे नक्की काय ते समजले नाही.

हो, महाभारत आधीचं आहे. मुळात प्राचीन भारतीय ग्रंथ हे मौखिक परंपरेत रुजलेले होते (जसे वेद). वैदिक वाङ्मय क्लिष्ट पाठांतरपद्धतीचा अवलंब करून जसं आहे तसं टिकवलं गेलं (एका ख्यातनाम अभ्यासकाच्या भाषेत दीज आर टेप रेकॉर्डिंग्ज प्रिझर्व्ड ओरली...). पण रामायण महाभारत या गोष्टी आहेत, धर्मग्रंथ नव्हेत. त्यामुळे या कथा, उपकथानकं, त्यातल्या विविध व्हर्जन्स एकत्र करून त्यांना सुसंगत कथावस्तूच्या ओघात गुंफणं वगैरे संपादकीय कामं करत जेव्हा एक पूर्ण ग्रंथ एकसंध रूपात - मौखिक का होईना - तयार होतो त्याला संहिता म्हणायचं. आणि त्या पूर्ण प्रक्रियेला संहितीकरण. ही प्रक्रिया एका माणसाकडून होत नसते तर तीही एक परंपरा असते. व्यास या सगळ्या संपादकीय परंपरांचं प्रतिनिधित्व करणारं एक नाव आहे, किंवा मग महाभारताची जी काही मूळ गोष्ट कधीकाळी घडली असेल ती नोंदवून ठेवणारी व्यक्ती. प्रत्येक वेळा मुद्दाम सहेतुक बदल होतातच असंही नाही. अतिशय गुंतागुंतीचं प्रकरण असतं. आणखी रस असेल तर महाभारताच्या भांडारकर ओरिएन्टल रीसर्च इन्स्टीट्यूट ने प्रसिद्ध केलेल्या क्रिटीकल एडिशनची सुखटणकरांनी लिहिलेली प्रस्तावना वाचावी.

वरदा, मस्त माहिती.

बर्‍याचदा पुराणे आणि कथा वाचताना वेळ, पात्रे, घटना इ. एकसंध नसल्याने हे वेगवेगळे तुकडे पझल पीसेससारखे चपखल बसत नाहित. त्याला कल्पनाशक्तिची आणखी एक मिती जोडली जाते.

यामुळेच मला रामायणाबद्दल पडलेला प्रश्न की, ज्या रामाने अहल्येला मुक्ति दिली त्यानेच सीतेला आधी अग्निपरिक्षा आणि मग तिचा त्याग असं का केले असावे? या परस्परविरोधी घटनांमागील सत्य काय?

वरदा, चूक सुधारली. Happy

चिऊ,
(अहिल्या नाही अहल्या) अहल्येला मुक्ती मिळायच्या आधी ती कितीतरी काळ नकळत का होईना झालेल्या पापाची/चुकीची शिक्षा भोगत होती. एकुणातच तुम्ही रूढ समाजपरंपरेच्या बाहेर जाऊन वर्तन केलं तर तुम्हाला कुठल्या ना कुठल्या स्वरूपात दिव्य करायला लागतं किंवा संकटांचा सामना करताना स्वत्व पणाला लावायला लागतं असं भारतीय मिथककथेतल्या स्त्रियांकडे बघताना दिसतं. अहल्या, सीता, सावित्री (मनाप्रमाणे नवरा शोधला, खुद्द यमाशी सामना करावा लागला), देवयानी (कचावर असफल प्रेम केलं, दु:ख पदरी आलं; प्रतिलोम विवाह केला, सवत उरावर आली, शेवटी मुलांना राज्य मिळालं नाही), कैकेयी (स्वत:च्या महत्वाकांक्षेसाठी, हक्काच्या वरासाठी नवरा गेला, मुलाचा तिरस्कार पदरी आला, कायमचा वाईटपणाचा शिक्का कपाळावर बसला), द्रौपदी (दीराला हसली, वस्त्रहरण झालं), कुंती (गंमत म्हणून पोरपणी वर मागून बघितला, कुमारी माता - पुत्रविरह आणि ओघानं येणारी दु:खं सहन करायला लागली) ही पटकन आठवणारी नावं....

रामकथेमधे खूप रूपकं आहेत असंही काही अभ्यासकांचं म्हणणं आहे. राम हा शेती करणार्‍या पुरुषप्रधान आर्य परंपरेचं प्रतिनिधित्व करतो आणि त्याने असुरांना हरवणं, दंडकारण्यात स्वतःचं अस्तित्व स्थापन करणं म्हणजे शेतीप्रधान संस्कृतीने हळूहळू भटक्या शिकारी समाजांवर, त्यांच्या प्रदेशांवर तसंच अनार्य परंपरेंवर स्थापन केलेलं वर्चस्व (रावणाला हरवणं) अशा प्रकारेही त्याचा अर्थ लावता येतो. आणि सीता या शब्दाचा अर्थ नांगरलेली जमीन असा आहे तर अहल्या या शब्दाचा अर्थ न नांगरलेली जमीन असा आहे

"कृष्णमृत्यू" विषयी वर छोटे वा त्रोटक असे प्रतिसाद आल्याचे दिसत आहे. धाग्याचा विषयच "पुराणकथा" असा असल्याने मग त्या निमित्ताने कृष्णाची अखेर यावर हा एक सविस्तर प्रतिसाद देत आहे :

दुर्योधन वधानंतर महाभारत युद्ध संपुष्टात आले आणि आपली १०० मुले नाहीशी झालेली पाहणे नशिबी आलेल्या, संतापलेल्या गांधारीने कृष्णाला "तू हे युद्ध थांबवू शकत होतास पण मित्रप्रेमापोटी ते तू केले नाहीस. तेव्हा तुझा मित्रच काय पण तुझे स्वतःचे द्वारकेचे यादवांचे राज्यही पांढर्‍या कपाळांच्या जनतेसोबतच कराल...माझ्या मुलांचे मरण सार्‍या वीरांनी पाहिले पण तुला मात्र एकाकीच मृत्यू येईल" असा एकप्रकारे शापच दिला होता. 'पांढरे कपाळ' जनता याचा अर्थच विधवांचा प्रदेश. झालेही तसेच 'यादवी युद्ध....सांब, ऋषीचा शाप, मुसळ, लव्हाळी, शराचे लोखंडी टोक...' आदी बाबींचा वर उल्लेख आला आहेच. थोडक्यात 'यादव कुळ' पुरुषहीन झाले. ३६ वर्षे ही यादवी चालली होती. राज्याच्या भग्नावस्थेत कृष्ण आणि बलराम यांची मुले आणि नातूही मारले गेले. द्वारकेत फक्त वृद्ध, विधवा स्त्रिया इतकीच उरलेली पाहून कृष्ण आणि बलराम दोघांनाही विरक्ती आली व मग त्यानी वानप्रस्थाश्रम स्वीकारला. बलरामाने अरण्यात योग सामर्थ्याने मृत्यू स्वीकारला आणि त्याचे शरीर समुद्रात नेण्यासाठी अक्राळविक्राळ असा 'अनंतनाग' प्रकटला व आपल्या मुखात त्याने बलरामाचा देह घेतला आणि तो समुद्राच्या तळाशी गेला.

कृष्णाचा मृत्यू एकाकीपणातच होईल असा त्याला शापच होता. थोरल्या बंधूचा आपल्या डोळ्यादेखत झालेल्या मृत्यूने कृष्ण मग एकटाच त्या जंगलात सैरभैर अवस्थेत भटकत राहिला. अशावेळी त्याला गांधारीच्या 'एकलेपणात मृत्यू' या शापाची आठवण होत असे. आपली घटिका जवळ आली आहे असे मानून मग त्यानेही एका वृक्षाखाली 'योगासन' अवस्था घेतली. जंगलात त्यावेळी शिकारीसाठी आलेल्या 'जरा' नामक पारध्याने दुरून निळ्या रंगाचे कृष्णाचे पाय पाहिले आणि ते म्हणजे त्याला एकप्रकारच्या हरणाची जाणीव झाली व त्याने आपला शर त्या दिशेने सोडला, जो कृष्णाच्या दृष्टीने अगदी प्राणघातक ठरला. जवळ आलेल्या पारध्याने आपण काय करून बसलो आहे हे पाहिले आणि त्याने कृष्णाजवळ क्षमायाचना केली. कृष्णाने त्याला 'तू निमित्तमात्र असून तुझा बाण आणि तो मला लागणे याचा संबंध पूर्वजन्मात रामाने केलेल्या वालीच्या मृत्यूशी असून तू निमित्तमात्र आहे. असे होणे अघटित घडले असे मानू नकोस...' असे पारध्यास सांगून आपली इहलोकाची यात्रा संपवून स्वर्गलोकाकडे प्रयाण केले.

पुढे कृष्णमृत्यूचे वृत्त समजल्यावर अर्जुनाने द्वारकेत येऊन तिथे कृष्णाच्या देहाला अग्नी दिला. रुक्मिणी सती गेली तर द्वारकानगरीतील कृष्णाच्या अन्य स्त्रियांनी वानश्रमात प्रवेश करून संन्यासिनीचा धर्म पत्करला. द्वारका नगरी या घटनेनंतर उजाड झाली, तेथील मनुष्यवस्तीचे अस्तित्व संपुष्टात आले आणि कृष्णप्रभाव नाहीसा झाल्यावर मग सात दिवसांनी समुद्राने ती सुवर्णनगरी आपल्या पोटात सामावून घेतली. कृष्णाबरोबरीने द्वारका नगरीही लुप्त झाली.

कृष्ण अवतार समाप्तीनंतर 'कलियुगा'चा प्रारंभ झाला असे मानले जाते.

अशोक पाटील

खूप धन्यवाद अशोक सात्यकी बद्दल माहिती देण्यासाठी.
अजून एक शंका.
अभिमन्यूवधात कर्णाने (द्रोण सुद्धा?) सहभाग घेतला हे कर्णाच्या बाकी आयुष्यातल्या वागणुकीशी सुसंगत वाटत नाही तसेच चित्रांगद(?) गंधर्वाकडून दुर्योधन आणि कर्णादी लोक सहजच पराभूत झाले आणि शेवटी अर्जुनाला यावे लागले ईथेही कर्णाच्या पराक्रमी ह्या प्रतिमेला तडा जातो हे कसे घडले?

अभिमन्यूवधात कर्णाने (द्रोण सुद्धा?) सहभाग घेतला हे कर्णाच्या बाकी आयुष्यातल्या वागणुकीशी सुसंगत वाटत नाही >> कर्णाच्या आयुष्यात असे अजूनही काही प्रसंग आहेतच कि, उदा. वस्त्रहरणाच्या वेळचा सहभाग, फसवून ब्रह्मास्त्रप्राप्त करण्याचा प्रयत्न. मला वाटते त्याप्रमाणे त्या वेळी त्यांना योग्य वाटले ते त्यांनी केले ह्यापलीकडे ह्यात अधिक काहि नाही. पुढे त्यांना त्याचा पश्चाताप झाला असेल किंवा नसेलही.

ईथेही कर्णाच्या पराक्रमी ह्या प्रतिमेला तडा जातो हे कसे घडले? >> पराक्रमी होता म्हणजे अजेय होता असा अर्थ होत नाही. अर्जुनाचा सुद्धा पराभव झाला आहेच कि मधे मधे.

बरोबर आहे असामी, तुझे स्पष्टीकरण योग्य वाटते पण त्याचबरोबर फारच जनरलाईज्ड सुद्धा.

एका तत्वासाठी कवचकुंडले देऊन जीवावर ऊदार झालेला कर्ण ब्रम्हास्त्र मिळवण्यासाठी परशुरामाशी खोटे बोलतांना अगदीच स्वार्थी होतो.
अर्जुन सोडून सगळ्या पांडवांना अभय देणारा कर्ण अभिमन्यूला युद्धनियम बाजूला सारून मारतो.
हे असे टोकाचे वागणे पाहूनच नेमके हे काय व्यक्तीत्व होते हे कळत नाही.
त्याच्या ग्लोरीफाईड ईमेजमुळे नाही तर त्याचे वागणे एकूणच सुसंगत वाटत नाही,
जसे भीष्मापासून एकलव्यापर्यंत आणि युधिष्ठिरापासून घटोत्कचाचे वाटते.

चमन, ह्याचा अर्थ जगात कोणीही आदर्श पणे नेहमीच वागत नाही असे दिसते. Happy महाभारतात तर सगळीच कॅरेक्टर बहुतेक तशीच दिसतात.
रामायणात बहुधा सगळी कॅरेक्टर्स जशी आहेत तशीच वागतात शेवटपर्यंत...

>>
रामकथेमधे खूप रूपकं आहेत असंही काही अभ्यासकांचं म्हणणं आहे. राम हा शेती करणार्‍या पुरुषप्रधान आर्य परंपरेचं प्रतिनिधित्व करतो आणि त्याने असुरांना हरवणं, दंडकारण्यात स्वतःचं अस्तित्व स्थापन करणं म्हणजे शेतीप्रधान संस्कृतीने हळूहळू भटक्या शिकारी समाजांवर, त्यांच्या प्रदेशांवर तसंच अनार्य परंपरेंवर स्थापन केलेलं वर्चस्व (रावणाला हरवणं) अशा प्रकारेही त्याचा अर्थ लावता येतो. आणि सीता या शब्दाचा अर्थ नांगरलेली जमीन असा आहे तर अहल्या या शब्दाचा अर्थ न नांगरलेली जमीन असा आहे<<

वरदाजी, (माफ करा, तो प्रतिसाद पाटिल सरांचा आहे असे समजून टंकत होतो)

'आर्य' हे खिल्लारे घेऊन चारत फिरणारे भटके लोक होते.
बळी शेतकरी होता. वामनावतार तर रामायणाच्या फार आधी झालाय. मग कुणी कुणाला हाकलले??
का??
पुरंदर इंद्र, नगरे फोडण्यात माहिर होता. शब्दाचा अर्थच तो आहे.
नगरांत आर्य रहात असत की अनार्य???
जर नागर संस्कृती त्यांची होती, तर मागासलेले कोण होते??
सुरापान करणारे सुर, अन न करणारे. न करणारे ते असुर असं माबोवरच कुठेतरी वाचलंय.

नक्की चांगल्या कुणी वाईट कुणावर विजय मिळवला?

(इथून पुढल्या * पर्यंत पाटीलसरांच्या प्रतिसादातील आहे)
अन ते वालीचा खून केल्याचं प्रायश्चित्त पुढच्या जन्मीपण नाही, पुढच्या अवतारात घेणे! वावावा

समुद्रकिनारी लव्हाळी उपटून जेव्हा यादव त्यांचे बाण करून एकमेकांना मारू लागले, त्याआधी काय भजनकीर्तन करीत होते का?
(*)

पोपटात जीव असलेल्या जादूगाराच्या गोष्टीत जसे फक्त आणि फक्त रंजनमूल्य शोधायचे असते, तसेच पुराणांचे आहे. त्यात अजिब्बात प्रतिकं फितिकं शोधू नयेत. इतिहास अन रुपके तर नाहीच. कारण प्रतिके/रुपके दोन्ही बाजूंनी शोधता येतात. इतिहास म्हणावं तर टाईमलाईन मार खाते. हे

आपण जरा चर्चेचा प्रस्ताव पुन्हा वाचावा असे सुचवतो. Happy

>>हा बाफ अशा कथांच्या संकलनाकरता आहे. त्या कथांची सत्यासत्यता तपासण्यासाठी अथवा वैज्ञानिक कसोट्या लावण्यासाठी नाही.

इथे टिंगलटवाळी करणारे, एखाद्या धर्माला उद्देशून चेष्टा-मस्करी करणारे लिखाण करू नये ही विनंती.
<<<

सत्यासत्यता अन वैज्ञानिक किंवा ऐतिहासिकही कसोट्या लावल्या, तर मग पुढचे टिंगल टवाळी प्रकर्ण सुरु होते. कारण क्ष च्या प्रस्थापित 'श्रद्धे'विरुद्ध 'य' ने लिहिले, तर त्याला क्ष टिंगल टवाळी असे म्हणतो.

धन्यवाद!
(दोन प्रतिसादांची सरमिसळ केलेलीच आहे, तर पुढे खिचडी जरा थोडी अजून वाढवतो)

@ वरदाजी.
त्या सगळ्या बायकांची उदाहरणे दिली आहात तुम्ही. वात्रटपणे, बेजबाबदारपणे, नीचपणे वागने पुरुषांना अलाऊड होते असे म्हणायचे का मग?

पोपटात जीव असलेल्या जादूगाराच्या गोष्टीत जसे फक्त आणि फक्त रंजनमूल्य शोधायचे असते, तसेच पुराणांचे आहे. त्यात अजिब्बात प्रतिकं फितिकं शोधू नयेत. इतिहास अन रुपके तर नाहीच. कारण प्रतिके/रुपके दोन्ही बाजूंनी शोधता येतात. इतिहास म्हणावं तर टाईमलाईन मार खाते.>>>

इब्लिसजी, वरदाचा या विषयामधे अभ्यास तुमच्यापेक्षा निश्चितच जास्त आहे. आपल्यासारख्या सर्वसामान्यांसाठी या कथा रंजनमूल्यासाठी आहेत. त्यांच्यासारख्या अभ्यासकांना कदाचित टाईम मशिनसारख्या आहेत. या पुराणांमधले काय घेऊन कशी संगती लावायची याचाच तर ते अभ्यास करत असतात ना? त्यांना त्यांचा अभ्यास करू द्यावा. आपण रंजनमूल्य शोधावे. धन्यवाद.

वरदा, अशोकसर (आणि केदार, अजून कुणाचा अभ्यास असेल त्यांना माझी विनंती) कृपया इथे जमेल तशी माहिती देत रहा.

Pages