चमचाभर उडीद डाळ, काही थेंब तेल (मी राइस ब्रान वापरले. तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही वापरू शकता).
४ छोटे किंवा ३ मोठे टोमॅटो... पिकलेले, लाल झालेले हवेत.
अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर
३ हिरव्या मिरच्या
३-४ छोट्या लसूण पाकळ्या
आल्याचा पाव इंचाचा तुकडा
आवडत असल्यास आणि सिझन असल्यास किंचित ओली हळद (ही नसली तरी चालेल)
सैंधव
चिमूटभर साखर
टोमॅटोच्या आकारानुसार उभ्या चार किंवा सहा फोडी करा.
कढलं किंवा छोट्या पॅनला तेलाचा हात पुसून घ्या.
गॅसवर चढवणे, तापल्यावर चमचाभर उडीद डाळ खरपूस परतून घेऊन डाळ काढून घ्या.
गॅस बंद करू नका.
त्याच कढल्यात किंवा पॅनमधे जास्तीचे तेल न घालता त्यात टोमॅटोच्या फोडी टाका.
साल खरपूस होऊ द्या. किंचित जळकटली तरी चालेल. सतत परतत रहा.
टोमॅटो पुरेसे परतले गेले की काढून घ्या.
फोडी थोड्या गार झाल्या की परतलेल्या फोडी, खरपूस भाजलेली उडीद डाळ, आले, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, चवीसाठी सैंधव, चिमूटभर साखर, ओल्या हळदीचा बारीकसा तुकडा असे सगळे मिक्सरमधे बारीक एकजीव वाटून घ्या.
चटणी तयार.
ऑऑ आणि इटालियन हर्ब्ज वापरूनही अशी करता येईल असे वाटते. मी केली नाहीये. तुम्ही करून पहा आणि इथे सांगा
ही चटणी अरूंधती कुलकर्णी च्या आंध्रा स्टाइल मु डा खि बरोबर अप्रतिम लागते.
चिप्स, काकड्यांचे तुकडे, बेबी गाजरे, सेलरीचे तुकडे, पिटा ब्रेड यासाठी डिप म्हणूनही उत्तम लागते.
सॅण्डविचमधे हिरव्या चटणीचा कंटाळा आला असेल तर ही लावा.
पोळीच्या रोलमधे पोळीवर सॅलडची पाने पसरून त्यावर ही चटणी पसरून मग त्यावर बॉइल्ड व्हेजीज घालून पॉकेट करून रोल करता येतील. पॅक लंच म्हणून उत्तम.
पाकृ हवी आहे बाफ वर दक्षिणाने
पाकृ हवी आहे बाफ वर दक्षिणाने चटणीबद्दल विचारले होते म्हणून ही रेस्पी टाकलीये.
छान पाकृ नी
छान पाकृ नी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त आहे. टोमॅटो हा फार
मस्त आहे. टोमॅटो हा फार आवडीचा प्रकार नाहीये पण ही चटणी करुन बघावी असं वाटतंय. तांदूळ / ओट्सच्या धिरड्यांशीही छान लागेल बहुतेक.
हो तांदूळ असलेल्या सगळ्या
हो तांदूळ असलेल्या सगळ्या गोंष्टींबरोबर मस्त जाते.
सौदिंडियन वस्तूंबरोबर पण मस्तच. आंबोळ्यांबरोबरही चांगली लागेल बहुतेक.
दक्षिण भारतात खुप मोठ्या
दक्षिण भारतात खुप मोठ्या प्रमाणात आणि आवडीने खाल्ली जाणारी डिश आहे ही
तरिही चक्क मला आवडते!
मस्त कृती! फक्त मला एक
मस्त कृती!
फक्त मला एक सांगा, ह्या चटणीची कन्सिस्टन्सी कशी असते? सॉससारखी गुळगुळीत होते, की खोबर्याच्या चटणीसारखी होते?
छान करुन बघेल...
छान![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
करुन बघेल...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त. आमच्याकडे दोश्याबरोबर
मस्त.
आमच्याकडे दोश्याबरोबर असली चटणी + हिरवी चटणी + पांढरी नारळाची चटणी असते. दोश्यासाठी करताना गोडसरपणासाठी मी साखरेऐवजी मनुका घालते ३-४.
क्वचित कधी यात टॉमॅटोबरोबरच एखादा कांदा पण परतून वेरिएशन करता येतं. यात दाण्याचं कुट घालून पण छान लागते चटणी.
ऑऑ+ इटालियन हर्ब्ज घालून करून बघणार.
मंजू, सॉससारखी गुळगुळीत होत
मंजू, सॉससारखी गुळगुळीत होत नाही कोथिंबीर असल्याने आणि खोबर्याच्या चटणीसारखी रवाळ पण नाही.
ओके नी! मिक्सरमधे किती
ओके नी!
मिक्सरमधे किती फिरवायची ते कळण्यासाठी म्हणून विचारले.
अल्पनाची मनुकांची आयडीया पण मस्त आहे.
हो मनुका मस्त लागतील चिमूटभर
हो मनुका मस्त लागतील चिमूटभर साखरेऐवजी.
टोमॅटो संपूर्ण स्मॅश होईतो मिक्सर फिरवायचा. बारीक तुकडे न राह्यलेले बरे
नी, मिरच्या पण लाल घेतल्या तर
नी, मिरच्या पण लाल घेतल्या तर रंग छान येईल. छान चवही येईल, मला वाटतं न वाटताही हे मिश्रण चांगले लागेल. आता मलाच प्रयोग करायला हवा.
( नी कडून एकाही पाककृतीचा फोटो आलेला आठवत नाही ! असे का ? )
मी टाकलेल्या ६ पैकी २
मी टाकलेल्या ६ पैकी २ रेसिपींमधे (दोदोल आणि लेमन राइस) फोटो आहेत.
मला चटणीच्या ताजेपणात सुक्या
मला चटणीच्या ताजेपणात सुक्या लाल मिरचीच्या स्वादापेक्षा ताज्या हिरव्या मिरचीचा स्वाद आवडतो. त्यामुळे हिरवी मिरची वापरलीये. अनेकदा जिथे सुकी लाल मिरची वापरायची तिथेही मी एखादी सु ला मि कमी करून हि मि ढकलते त्या स्वादासाठी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हि चटणी मस्तच लागते.
हि चटणी मस्तच लागते. व्हेरिएशन म्हणून हे असे करता येइल (मी नेहमी करते आणि चट्टामट्टा होते चटणी म्हणजे चांगली लागत असावीच इतरांनाही :फिदी:) नारळ तेलाची फोडणी करायची. उडीद डाळी सोबत, कढीपत्ता, लाल मिरच्या (कधी नंतर लाल तिखट घालते), कांदा परतून मग टो.फोडी परतायच्या. त्यात एखाद चमचा/ चवी नुसार सांबार मसाला घालून परतून भाजी सारखं (पाणी न घालता) शिजू द्यायचं. हे सगळं मिक्सर मधून वाटायचं
कविता, नारळ तेल म्हणजे
कविता, नारळ तेल म्हणजे पॅराशूट खोबरेल का? की खायचं खोबरेल तेल वेगळं वापरतेस तू?
कमीतकमी तेलात आणि टोमॅटोचा
कमीतकमी तेलात आणि टोमॅटोचा ताजेपणा ठेवून त्याला थोडा धुरकट फील द्यायचा अशी आयड्या होती![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पॅराशूटच्या बाटलीवर खाण्यास
पॅराशूटच्या बाटलीवर खाण्यास योग्य असे लिहिलेले असते ती बाटली बघून घेत जा. मेधाने सांगितले होते मला एकदा.
ओके!! अशी आयड्या होती >>
ओके!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अशी आयड्या होती >> होती म्हणजे?? आहे की अजूनही...
अगं कविताच्या व्हेरिएशनमधे ती
अगं कविताच्या व्हेरिएशनमधे ती होती होईल म्हणून लिहिले![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Oh 2/6.. Good !
Oh 2/6.. Good !
अगं कविताच्या व्हेरिएशनमधे ती
अगं कविताच्या व्हेरिएशनमधे ती होती होईल म्हणून लिहिले >>>हो खरच की.
पण असही बघ करुन आवडेल तुला. कधी कधी मी न वाटता भाजी म्हणून पण खपवते ![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
पॅराशूटच्या बाटलीवर खाण्यास योग्य असे लिहिलेले असते ती बाटली बघून घेत जा>>> +१ शुद्ध खोबरेल तेल लिहीलेलं तेल चालेल. ते अॅडव्हास, हॉट आयुर्वेदिक व्.वालं नाही चालणार
चार रेस्पीज ड्यू फॉर फोटु..
चार रेस्पीज ड्यू फॉर फोटु.. कल्पना आहे!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
इथे टाकल्यावर परत केल्याच नाहीत
कवे, करून बघणारच आहे.
पॅराशूटच्या बाटलीवर खाण्यास
पॅराशूटच्या बाटलीवर खाण्यास योग्य असे लिहिलेले असते ती बाटली बघून घेत जा>>>>> सूर्या ब्रॅ.ण्डचे खायचे खोबरेल तेल मिळते. ते घेतलेले जास्त चांगले. त्यावर "एडिबल ऑइल" छापलेले असते. आजूबाजूला कोणी मल्याळी असतील तर त्यांना विचारा. साऊथच्य अकाही पदार्थांवर खोबरेल तेलाची फोडणी सही लागते.
गनपावडर नसेल तर हमखास ही चटणी मी बर्याचदा दोशासाठी अथवा इडलीसाठी करते.
नी, मी हिरव्या मिरच्या भाजून
नी, मी हिरव्या मिरच्या भाजून घालते या चटणीत. वरून उडदाच्या डाळीची फोडणी मस्ट.
धन्यवाद फॉर रेस्पी.. नक्की
धन्यवाद फॉर रेस्पी.. नक्की करून पाहिन आणि खाईन सुद्धा.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सध्या, तु परवा सांगितलेली पुदिना, लसूण कोथिंबिर वाली चटणी सुरू आहे घरी.. ती संपली की हिच.
नक्की करून पाहिन आणि खाईन
नक्की करून पाहिन आणि खाईन सुद्धा <<
![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
तू नुसती न पाहता खाणार पण आहेस हे वाचून बरे वाटले
सही!!! करुन खाणार!
सही!!! करुन खाणार!![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
अरे हो सांगायचेच राह्यले या
अरे हो सांगायचेच राह्यले![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
या चटणीत मी एकदा पनीरचे तुकडे बुडवून ठेवले होते तासभर.
मग ते तुकडे पॅनला तेलाचा सढळ हात लावून त्यात साँटे केले. जरा खरपूस.
एकदम भारी स्नॅक/ स्टार्टर झालं. चुकूच शकणार नाही किंवा वाईट होणारच नाही असं स्टार्टर
कुठल्याही चटणीतला घट्ट भाग लावून असे पनीर साँटे करता येते.
तर ही चटणी करण्यात आलेली आहे
तर ही चटणी करण्यात आलेली आहे आणि ती अत्यंत सुरेख, उडदाच्या डाळीची छान चवयुक्त, आणि चविष्ट इत्यादी झालेली आहे!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
नी, छानच आहे चटणी. पनीरचा प्रयोग लवकरच करण्यात येईल!
Pages