चमचाभर उडीद डाळ, काही थेंब तेल (मी राइस ब्रान वापरले. तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही वापरू शकता).
४ छोटे किंवा ३ मोठे टोमॅटो... पिकलेले, लाल झालेले हवेत.
अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर
३ हिरव्या मिरच्या
३-४ छोट्या लसूण पाकळ्या
आल्याचा पाव इंचाचा तुकडा
आवडत असल्यास आणि सिझन असल्यास किंचित ओली हळद (ही नसली तरी चालेल)
सैंधव
चिमूटभर साखर
टोमॅटोच्या आकारानुसार उभ्या चार किंवा सहा फोडी करा.
कढलं किंवा छोट्या पॅनला तेलाचा हात पुसून घ्या.
गॅसवर चढवणे, तापल्यावर चमचाभर उडीद डाळ खरपूस परतून घेऊन डाळ काढून घ्या.
गॅस बंद करू नका.
त्याच कढल्यात किंवा पॅनमधे जास्तीचे तेल न घालता त्यात टोमॅटोच्या फोडी टाका.
साल खरपूस होऊ द्या. किंचित जळकटली तरी चालेल. सतत परतत रहा.
टोमॅटो पुरेसे परतले गेले की काढून घ्या.
फोडी थोड्या गार झाल्या की परतलेल्या फोडी, खरपूस भाजलेली उडीद डाळ, आले, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, चवीसाठी सैंधव, चिमूटभर साखर, ओल्या हळदीचा बारीकसा तुकडा असे सगळे मिक्सरमधे बारीक एकजीव वाटून घ्या.
चटणी तयार.
ऑऑ आणि इटालियन हर्ब्ज वापरूनही अशी करता येईल असे वाटते. मी केली नाहीये. तुम्ही करून पहा आणि इथे सांगा
ही चटणी अरूंधती कुलकर्णी च्या आंध्रा स्टाइल मु डा खि बरोबर अप्रतिम लागते.
चिप्स, काकड्यांचे तुकडे, बेबी गाजरे, सेलरीचे तुकडे, पिटा ब्रेड यासाठी डिप म्हणूनही उत्तम लागते.
सॅण्डविचमधे हिरव्या चटणीचा कंटाळा आला असेल तर ही लावा.
पोळीच्या रोलमधे पोळीवर सॅलडची पाने पसरून त्यावर ही चटणी पसरून मग त्यावर बॉइल्ड व्हेजीज घालून पॉकेट करून रोल करता येतील. पॅक लंच म्हणून उत्तम.
मस्तय ही चटणी. अजून एक
मस्तय ही चटणी.
अजून एक व्हेरीएशन मी करते.
चांगले पिकलेले टोमॅटो (४-५), कांदे (मध्यम २-३), सुक्या मिरच्या, बडीशेप, मीठ.
तेलावर बडीशेप, लाल मिरच्या टाकून लगेच कांदा घालून परता. दोन मिनिटांनी टोमॅटोच्या फोडी, मीठ घालून, जरा परतून झाकण ठेवा. पाचेक मिनिटांनी शिजेल. गॅस बंद करून मग थंड झाल्यावर मिक्सरमधून अगदी बारीक वाटा.
वाढदिवस साजरे करताना जे डोसेवाले बोलावतात त्यांच्याकडून शिकले आहे.
आज करून बघितली ही चटणी.
आज करून बघितली ही चटणी. करायला सोप्पी, चवीला छान. आवडली.
हीच चटणी हिरव्या टॉमेटोच्या
हीच चटणी हिरव्या टॉमेटोच्या फोडी व हिरव्या मिरच्यांचे तुकडे जरा कढईत तेलात खरपूस परतून मिक्सरमधून काढून करता येते.मस्त लागते. दाण्याचं कूट आवडत असेल तर अॅड करता येतं.
Pages