निसर्गाच्या गप्पा (भाग ११)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 13 October, 2012 - 04:19

"जगात नाही मित्र मिळाले तरी सृष्टीत आहेत. आपल्या घरी नाही मिळाले तरी बाहेर आहेत. देवाने आधीच तुम्हाला मित्र दिले आहेत. हे निळे निळे अनंत आकाश. ते नेहमी तुमच्यावरच पाखर घालीले. तारे तुम्हाला रमवतील. नद्या पाणी देतील. वारा गाणे गाईल. फुले सुगंध व सौंदर्य देतील. वृक्षलतावेली तुमच्यासमोर डोलतील, नाचतील. फार दु:ख नका करू. कोणी शिव्याशाप दिले तर वाईट नका वाटुन घेऊ. या निसर्गाकडे पहा आणि आनंदी रहा.
-सानेगुरूजी (सानेगुरूजींच्या गोड गोष्टी).
जिप्सी यांच्या सौजन्याने.

निसर्गाच्या गप्पांच्या ११ व्या भागाबद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वर्षू ............ मानुषी... कुठायेस तू??? >>>>>
अगं मी सासू झाले.........खर्रीखुर्री.......!आहेस कुठे?
मंडळी........आमच्या घरात एका गोड मुलीचं आगमन झालं! त्यातच बीझी होते. त्यामुळे इथलं आता मिसलेलं सगळं हळूहळू वाचतेय!

वा वा वा, एका खर्‍याखुर्‍या सासूबाईंचे (पर्यायाने सूनबाईंचेही) हार्दिक अभिनंदन....

सुनेलाही मा बो विशेष करुन निसर्गाच्या गप्पांचे वळण / व्यसन लावणे.....

सुदुपार....

बरेच दिवसांनी आले. सगळेच फोटो, माहिती छान! मस्तच!!!!

रविवार, ९/१२/२०१२ : लोकसत्ता, लोकरंग पुरवणी, बाल विभाग ---- मनाच्या श्लोकाचा धर्तीवर वनाचे श्लोक आले आहेत. फारच छान आणि उद्बोधक.

हो जिप्स्या, तसाच दगड तो.
वर्षू, खरंच तसा भास होतोय.

मानुषी अभिनंदन.. मानुषीचे नाही तर सूनबाईंचे. असे छान सासर मिळवल्याबद्दल.

जावयाची सासू मी होतेच रे आधी(पण त्यात काय दम नाय!)

नक्की कोणात दम नाही ते स्पष्ट करा हो सासुबाई. चुकून जावईबोवांनी कमेंट वाचली तर रुसलेल्या जावईबोवांना सोनेरी कार्ल्याचा वेल द्यावा लागेल Happy

असे छान सासर मिळवल्याबद्दल.>>>>>>>>>दिनेशदा........खरंच १ कि. वजन वाढलं बरं!
>>>>>>............नक्की कोणात दम नाही ते स्पष्ट करा हो सासुबाई. चुकून जावईबोवांनी कमेंट वाचली तर रुसलेल्या जावईबोवांना सोनेरी कार्ल्याचा वेल द्यावा लागेल
>>>>>>>>>
साधना!..........(तीच ती हसणारी बाहुली!)
अरे ती वर्षू कुठे गेली?.............एक्स्पर्ट स कमेन्ट्स नाही आल्या अजून!(गालातल्या हसणारी बाहुली)

काल मी एक मजेदार दृष्य बघितल.
एक मस्तवाल बकरा, एक बकरी आणि २ बर्‍यापैकी वाढलेली कोकरे. एका बंद दुकानाच्या ओसरीवर होती.
बकरा भयंकर चिडलेला होता. तो चक्क दातावर दात आपटत काहीतरी बडबडत होता. त्याच्या दाताचाच ठकठक
आवाज येत होता. आणि बर्‍यापैकी मोठा आवाज होता. घश्यातून मात्र काहीच आवाज येत नव्हता.
तो दोन कोकरांवर डाफरत होता. बकरी बिचारी दुकानाच्या बंद दरवाज्याला खेटून निमूट खाली मान घालून ऊभी होती. कोकरे कधी आईला बिलगायची कधी ओसरीवरुन खाली उड्या मारायची. आईला बिलगली कि तो बकरा तिथून हाकलून द्यायचा. खाली आली कि ओसरीवर ढकलायचा. पण तो शिंगांचा अजिबात वापर करत नव्हता.

दोन मिनिटे हे नाट्य बघत मी तिथेच ऊभा होतो !

मूळात असे चौकोनी कुटुंब मी यापुर्वी कधी एकत्र बघितलेच नव्हते. आणि बकर्‍याचे डाफरणे तर पहिल्यांदाच बघितले.

मानुषी.. Happy अभिनंदन गं !!!! हितंच आहे मी...

फोटू पाठव बर्का नव्या सूनबाई चे..
आता मी हातात माईक घेऊन तुझ्या तोंडासमोर, " आपको इस नये रोल मे कैसा लग रहा है" ?? Proud

आईं गं.. दिनेश दा.. किती ते कौटुंबिक जिव्हाळ्याचं दृष्य...
बकर्‍याचे डाफरणे.. मलाही कधीच बघायला मिळालेलं नाही...
एकदा रागावलेला, चक्क चिडलेला ससा मात्र अनुभवलाय.. Blush जेंव्हा मी त्याला त्रास होईपर्यन्त त्याचे कान खेचले तेंव्हा चिडून तो माझ्यावर फिस्कारून धावला की...

आता मी हातात माईक घेऊन तुझ्या तोंडासमोर, " आपको इस नये रोल मे कैसा लग रहा है" ?? >>>>>> येस्स्स्स्स्स्स्स्स! शी ईज वर्षू !

मानुषी, अभिनंदन! Happy
दिनेशदा, अस काही तुम्ही सांगितल, की तुमच्याकडे तेव्हा कॅमेरा पाहिजे होता अस वाटतं. Sad

जेंव्हा मी त्याला त्रास होईपर्यन्त त्याचे कान खेचले तेंव्हा चिडून तो माझ्यावर फिस्कारून धावला की...>>>>>..काय ग वर्षू, Sad

कॅमेरा हवाच आता !

वर्षू, अशी झाडे, " घ्या विसावा इथेच क्षणभर" असे सांगताहेत, असं नाही वाटतं ?. त्याच्या छायेखाली बसून मन मोकळं करावं. इतक्या वर्षात त्यांनी ऐकलेलं नसेल असे वेगळं तरी आपण काय सांगणार ? पण तरीही तसे वाटतेच.

दिनेश दा Happy
खरंय झाडांच्या, निसर्गाच्या सान्निध्यात अजिबात एकटेपणा जाणवत नाही... ते जिवाभावाच्या सोबत्यांसारखे असतातच बरोबर..

सुदुपार
यावेळे एपुणे-पाचगणी रस्त्याच्या कडेने झेंडू ची भरदार शेतं पाहिली..

दसरा जवळच असल्याने शेतातील गुबगुबीत झेंडू ची फुलं तेजस्वी सोनेरी , केशरी रंग लेऊन ऐटीत मिरवत होती.

वा वर्षूदी - उन -सावलीतला हा झेंडूचा फोटो मस्तच आहे अगदी. मराठमोळा झेंडू.

काल व आज इथे (पुण्यात) सक्काळी सक्काळी (६च्या आसपास) सुरेख नाजुक चंद्रकोर (द्वादशी- त्रयोदशीची) व सोबत शुक्राची चांदणी हे असे काही झळकत होते पूर्वेला - की बस्स...... काय नजारा होता.... माझी कधीही लवकर न उठणारी लेकसुद्धा हा नजारा पाहून एकदम खुश झाली.....

वर्षू मस्त फोटो.

natGEo ला सध्या big cat week सुरु आहे. सगळेच भाग पाहण्यासारखे आहेत.रणथंबोरच्या एका वाघिणीचं तरूण्पण ते आता म्हातारपणावर एक लघुपट छान आहे शिवाय श्रीलंकेचे बिबळे पण छान कव्हर केलेत..शक्य असेल त्यांनी जरूर पहा.

वर्षूदी - तो डौलदार पक्षी हा तर नाही ना ?
Common name: Bird's Head Birthwort
Botanical name: Aristolochia ornithocephala Family: Aristolochiaceae (Birthwort family)

जरा पहाणार का गुगलून ? संपूर्ण वेल तर तूच पाहिली असशील, तूच सांगू शकशील नेमकं कुठलं रोपटे आहे हे...

वर्षू, हा वेल मी वसईला बघितला आहे. आईच्या गावाला पण आहे. तिथे त्याला बदकाची फुले म्हणतात.
हे फुल पुढे उमलतेही ( मग मात्र ते बदकासारखे दिसत नाही.)

शशांक, ती कोर मी पण बघितली. त्याचवेळी मनात विचार आला, आणखी कुणी बघितली असेल का ?

वेका, त्याची सिडी मिळाली तर बघतो.

वेका.. मला खूप आवडतात नाट जिओ वरचे प्रोग्रॅम्स..

थांकु .. पाहीन नक्की..

चंद्राची कोर आणी शुक्राची चांदणी.. आहाहा.. लक्कीयेस!!!

आवेळी पाचगणीच्या निरभ्र ,नितळ आकाशात कोजागिरी ला पूर्ण चंद्र ,पाहायला मिळाला..
पारणं फिटलं

शशांक, थांब गुगलून पाहते तू दिलेली साईट

ही वेल एका भल्या मोठ्या झाडाच्या आधाराने वरपर्यन्त गेलेली होती..

शशांक, गुगलून पाहिल्यावर कळलं कि या वेलीचं हिन्दी नाव ' हुक्काबेल' असं आहे ..
मेडिसिनल वॅल्यू आहे फुलाला..

बदक फूल .. नाव जास्त शोभतंय

मला तरी तो बर्डस हेड बर्थवर्टच वाटतोय - पाने (आकार) नीट कळत नाहीयेत.... तुझ्याकडे त्याचे इतर काही फोटो असल्यास ते सगळे ताडून पहा (गुगलून पहा)...

Pages