मयान कॅलेंडर सत्य असत्य

Submitted by madevi on 6 December, 2012 - 10:46

मयान कॅलेंडर्ची शेवट्ची डेट २१ डिसेंबर २०१२ आहे असे म्हणतात. त्यादिवशी खरेच काही घडेल का?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो.

वर्षा_म,
अहो त्यांचा प्रस्ताव नीट वाचा. त्यांनी 'खरेच काही घडेल का?' असे विचारले आहे. काहीतरी रोजच घडत असते, तसे काही त्याही दिवशी घडणारच आहे.
म्हणून हो म्हटले Wink

>> मेयान कॅलेंडर्ची शेवट्ची डेट २१ डिसेंबर २०१२ आहे असे म्हणतात. त्यादिवशी खरेच काही घडेल का?
काय अपेक्षीत आहे? Calender चा डिसेबर फाडला तर डिसेबर उगवनार नाही का?

मेयान/ मायन कॅलेंडर प्रमाणे २१.१२.१२ शेवटचा दिवस आहे. पण त्याआधीच १२.१२.१२ हा दिवस येतोय. त्या दिवशी बारामतीत हा निर्णय फिरवला जाण्याची शक्यता आहे Proud

२१ तारखेला काय होईल ?

किरण चार झणझणीत पोस्ट टाकेल.
स्वप्ना, शिवपार्वतीच्या घरी काय झाले ते लिहील.
जामोप्या ( आणखी १ ) आय डी घेतील.
इब्लिस, ६ चांगल्या आणि १२ खोडसाळ पोस्टी करतील.
केदार, चांगले पीजे लिहिल.
कोल्हापुरी वर ड्ब्यात काय काय होते ते लिहिले जाईल.
निंबुडा एक रहस्यभेद करेल.
भारती, एक रसग्रहण करेल.
भटके लोक कुठल्यातरी गडावर जायचा प्लान करतील ( कदाचित कळसुबाई Happy )
नि,ग. वर नेहमीचेच चालू राहील.
रसप, २०१२ चा रिव्ह्यू लिहितील.
बेफी आपला "कोटा" पूर्ण करतील.
प्राध्यापक आणखी १ (च) गझल लिहितील, त्यावर वैभव २ प्रतिसाद आणि प्राध्यापक ४ प्रतिप्रतिसाद देतील.

हायला, मग जग बूडेना का !!! काय फरक पडतो ?

२१ तारखेला आमच्याकडे पेरेंट मीट, त्यानंतर सुट्टी चालू!!!!!!!!!
रच्याकने 'त्या' महान धाग्यावरील प्रतिक्रिया परत चालू व्हाव्यात!maya_cartoon.JPG

"....कोल्हापुरी वर ड्ब्यात काय काय होते ते लिहिले जाईल....."

दिनेश.... डब्यातील पदार्थाचे रसभरीत वर्णन तर तिथे रोजच चालू असते. मात्र २१ ला माझी तिथली भाचेभाच्या कार्टी हुंदके देत तो पृथ्वीवरील शेवटचा मेनू म्हणून गळ्याखाली घालणार असेच चित्र दिसत आहे.... शेवटचा दिवस म्हणून उपाशी राहाणार नाहीत हे पक्के.

ती कोल्हापुरी रसिकता, साधी भाजी भाकरी असली तरी लई ब्येस असते ती.

परवा न्यू झीलंडला पण मोठे वादळ झाले. मी ज्या एरियात रहात असतो तिथेच झाले. अनेक घरांची हानी झाली. रस्त्यावर वीजेच्या तारा पडल्याने, रस्ते लोकांसाठी बंद केले होते. लेक घरात एकटीच होती. पण त्यांना
शाळेत योग्य ते ड्रील दिलेले असते, त्यामूळे घाबरली नाही. तिथले पोलिसपण तत्परतेने मदतीला येतात.

"...साधी भाजी भाकरी ???".....

अहो, त्यांच्या डब्यातील डिशेसचे वर्णन वाचताना असे वाटते की हस्तिनापूरमधील पाकशाळा हीच मंडळी चालवित होती की काय ?

अशोककाका

कोल्हापूर बाफ ना ?
इथल्या एका स्त्रीआयडीने मंगळवारी उपवास असताना कोल्हापूर बीबी ला भेट दिली आणि तिथ्ली वर्णने वाचून तिला उपास सोडावा लागला अशी खात्रीची बात्मी आहे.

वाचतो ना मी. मी ऑफिसमधे येतो त्यावेळी त्यांची जेवणं सुरु असतात.

०००

विदेशी चॅनेलवर खुपदा असे प्रोग्रॅम असतात.. Things to do, before you die .. या बीबीवर तसलं काही लिहिलेलं दिसत नाही.

जग संपले तर बरे होईल, कंटाळा आलाय सगळ्याचाच .किती यांत्रिक जगायचे इथे?
सगळे जग संपुन फक्त एक मोठे शुन्य ऊरायला हवे.
किती वर्ष चालणार हा विश्वव्याप? हे कुणी निर्मिले?कुणासाठी? कशासाठी? कधी? कशापासुन? या फंदात पडले तरी उत्तर सापडत नाही,निर्माता सृजन करुन कायमचाच संपला असावा. ,निदान हे मायन सत्य प्रत्यक्षात आले तर या बुद्धी भ्रमित करणार्या गौडबंगालातुन चराचराची सुटका तरी होईल...
-एकेकाळी खाडीत पोहणारा ओला बोंबिल..

Pages