मयान कॅलेंडर सत्य असत्य

Submitted by madevi on 6 December, 2012 - 10:46

मयान कॅलेंडर्ची शेवट्ची डेट २१ डिसेंबर २०१२ आहे असे म्हणतात. त्यादिवशी खरेच काही घडेल का?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

या डिसेंबर महिन्यात ५ शनिवार, ५ रविवार आणि ५ सोमवार आहेत, असे म्हणे ८२४ वर्षात एकदाच होते.
इथेच ते मायावाले गडबडले असणार !

छे बुवा, आता २ आठवडे काय या बीबीला चैन पडणार नाही. आपापली पापपुण्याची बॅलन्स शीट एकदा तपासून बघा बरं. गायींना चारा / गोशाळेला देणगी / काशी ( किमान त्र्यंबकेश्वरला ) भेट / दर्ग्यावर चादर / मतमाऊलीला मेणबत्ती / कबुतरांना ज्वारी / कावळ्यांना शेवगाठ्या / गझलेवर प्रतिसाद असं काय्काय करुन बघा जरा पोझिशन सुधारता आली तर !

ऑनलईन विमान बुकिंग कंपन्यांची एक जाहिरात पाहिली. २१ डिसेम्बर २०१२ ला जग बुडनार आहे हे खरे आहे पण आमच्या जानेवारीपर्यन्तच्या सगळ्या फ्लाईट्स बुक झालेल्या आहेत.... Happy

खर तर मी जेव्हा हे पोस्ट टाकले ना तेव्हा गुगल वर ह्याबद्ल काय काय वाचले.मग विचार केला आपल्या माबोवर नक्की खरी काय ते माहिती मिळेल पण छे विषय भलतीकडेच जातोय.
आणि हो मयान कॅलेंडर ..
नंदिनी वाचली लिंक.
राजू खरोखरीच छान माहिती

२२ तारखेला खालीलप्रमाणे नवीन ग्रुप्स सदस्यांना जॉईन करावे लागतील.

१. कैलासवरचे हितगुज
२. वैकुंठातले हितगुज
३. स्वर्गातले हितगुज
४. नरकातले हितगुज
५. पाताळलोकीचे हितगुज

सदस्यांना वाहती पाने सुरू करता येतील. त्यासाठी मा. प्रशासक श्री. चित्रगुप्त यांच्याशी संपर्क साधावा. प्रत्येक ग्रुपचे संचालक नेमलेले असून त्यांचा शब्द अंतिम राहील. कैलास हितगुज ग्रुपचे श्री महादेव त्रिनेत्रीकर हे संचालक आहेत. वैकुंठाचे संचालक श्री विष्णूपंत सुदर्शनवाले असून त्यांच्या अनुपस्थितीत श्री शेषनाग अष्टमुखे यांचेकडे संपर्क साधण्याची इथे सोय असेल. स्वर्गाचे नियंत्रण श्री इंद्रसेन पाटील यांच्याकडे आहे तसेच इतरही हितगुज बाफचे नियंत्रण परिस्थितीनुसार ते करू शकतात. नरक आणि पाताळीचे संचालक श्री प्राणनाथ स्वामी हे आहेत. त्यांची यम या पदी नेमणूक असल्याने इतर विभागातही त्यांचा संचार असून नवे सदस्य पकडून आणण्याचे आणि गरजेनुसार एका विभागातून दुस-या विभागात सदस्यांची बदली करण्याचे अधिकार त्यांच्याकडे असतील. यासाठी ऑडीटर जनरल श्री चंद्रगुप्त हसबनीस यांच्या चोपडीतल्या नोंदींचा आधार घेतला जातो, श्री चंद्रगुप्त हेच कॅगचे प्रमुख असल्याने सर्व व्यवहारांवर त्यांचे बारकाईने लक्ष असते. एखाद्या सदस्याच्या गंभीर गैरवर्तणुकीचा त्यांनी अहवाल सादर केल्यास त्या सदस्याची रवानगी इक्वाक्षूशी हितगूज या ग्रुपमधे करण्यात येईल याची नोंद घेण्यात यावी.

हुकूमावरून.

जाहीरात
जगबुडी साडी सेंटर
आजच भेट द्या !

किरण Rofl

या संदर्भात " श्वेत पत्रिका" कधी निघणार ? अशी विरोधी पक्षांची जोरदार मागणी आहे .

किरण, पण त्या पुर्वी अफझल ला फाशी दिलेच पाहिजे. नाही का ? नाहितर मग डेंग्यूने मेला का खरेच फाशी दिली.. या धर्तीवरचा वाद होईल.

नाही हो दिनेशदा. जगबुडीने मेला असे वादात म्हणतील. किंवा काय सांगावे? वाचणार्‍या २३%त तो ही असेल Wink

पण जग बुडणार म्हणजे नेमके कशात बुडणार ? पाण्यात (खरा) रुद्राक्ष टाकल्यावर बुडतो तसे बुडणार कि टायटॅनिक बुडाली होती, तसे होणार.
मायन लोकांच्या जागेपासून पूर्वेकडे बुडत जाणार कि पश्चिमेकडे ? पुर्वेकडे बुडत गेले तर तूमच्या आधी माझा नंबर बरं का ! गटग साठी जागा अडवून ठेवेन. नक्की !

आमच्याकडे गिल्स ट्रान्सप्लाण्ट करून मिळतील. प्ल्याटिनम प्ल्यान घेतल्यास एका पायाला वेब फूट फुकट. तसेच पोहोता येत नसेल तरी वॉटरपोलो टीमचे नॅशनल पार्टिसिपेशनचे सर्टीफिकेट मिळेल. Wink

ऑक्सिजन नावाचा नविन ब्रॅण्ड आला आहे काय ? >>>>> अरे ऑक्सिजन........म्हणजे जो आपल्याला श्वासोच्छास्वास घ्यायला उपयोगी असतो Happy

Pages