Submitted by क्ष... on 28 April, 2011 - 17:04
मायबोलीवर दर दोन महिन्यांनी पोळ्या नीट होत नाहीत, तवा कोणता वापरू? पीठ कोणते वापरू अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. ते सगळे एकत्र करण्यासाठी हे पान.
भाकरी आणि फुलक्यांचा व्हिडीओ - http://www.maayboli.com/node/14935
जुन्या मायबोलीवरील पोळ्यांची चर्चा इथे आहे - http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/4519.html
अजुन एक चर्चा इथे पण मिळेल - http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/111686.html?1225813423
माझे काय चुकले? आणि युक्ती सांगा या दोन्ही बा.फ. वर यासंदर्भात असंख्य वेळा विचारले गेले आहे. तेच सर्व इथे डकवले जाईल.
पोळ्यांसाठी कोणता तवा चांगला? ते इथे सापडेल - http://www.maayboli.com/node/25369
जुन्या मायबोलीवरची तव्यासंदर्भातली चर्चा इथे आहे - http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/103164.html?1157632534
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
महेश कोणाला रोटीमेकरचा अनुभव
महेश
कोणाला रोटीमेकरचा अनुभव असल्यास कळविणे
>>>
माझ्याकडे आहे. काही उप्योगी नाही. मी घेताना मलाही सगळ्यानी सांगितले होते पण मी घेतलाच.
त्याला एकतर कणिक खुपच सैल भिजवावी लागते, त्यामध्ये फुलके करायचे टेक्निक जमायला थोडा वेळ लागतो. तोपर्यंत आपला पेशन्स संपतो आणि रोटीमेकर माळ्यावर जातो.
मी प्रॅक्टिस केली होती आणि मला जमायलाही लागले होते फुलके त्यामधे करायला पण ते गरम खाल्ले तरच चांगले लागतात. आणि मला तर ते फारच जाड वाटले होते. सो पुन्हा हातानेच पोळ्या करायला सुरुवात केली. त्याला आता कमी वेळ लागतो रोटीमेकरपेक्षा
अरेरे माधवी ने माझ्या एकमेव
अरेरे माधवी ने माझ्या एकमेव आशेवर पाणी फिरवलं
महेश, जिथे मोठ्या प्रमाणात
महेश, जिथे मोठ्या प्रमाणात कराव्या लागतात, अन कॉलिटीचा फार इश्यू नसतो अन लगेच खालल्या जाणार असतील तरच उपयोग त्याचा. त्यातल्या त्यात पु-या ब-या होतात त्यात.
सॉरी रिया, मीपण
सॉरी रिया, मीपण
रोटीमेकर अजिबात घेऊ नका रिया
रोटीमेकर अजिबात घेऊ नका रिया आणि महेश.
मी लग्न झाल्यावर फार उत्साहाने घेतले पन २००० रु वाया गेले. त्यापेक्षा हातानेच छान पोळ्या जमतात सरावाने.
रोटीमेकर वर खाकरे मस्त
रोटीमेकर वर खाकरे मस्त होतात... करुन बघा
आमच्या इथल्या एका आजोबानीही
आमच्या इथल्या एका आजोबानीही घेतला. कुठे आजींना त्रास द्या या वयात म्हणुन. पण त्यांचा तर फारच भ्रमनिरास झाला.
अरेरे सोपे असेल असे वाटत होते
अरेरे सोपे असेल असे वाटत होते रोटीमेकर तंत्र, पण
पण मुळात हा प्रकार काय असतो, फक्त लाटण्याचे कष्ट वाचतात का ?
की त्यामधे भाजून पण निघते पोळी ?
पण मुळात हा प्रकार काय असतो,
पण मुळात हा प्रकार काय असतो, फक्त लाटण्याचे कष्ट वाचतात का ?
की त्यामधे भाजून पण निघते पोळी ?
>>
लाटणे आणि भाजणे अशी दोन्ही कामे होतात. फक्त सैल कणकेचा गोळा ठेवायचा.
महेश, प्रकार काय असतो ह्याचा
महेश, प्रकार काय असतो ह्याचा लांबून डेमो बघायचा असल्यास आणि तुम्ही मुंबईत रहात असल्यास मुलुंडच्या फुड मार्टला भेट द्या. तिथे एका (मार्केटिंग वाल्या बंद्या) ला गेटच्याच बाजूला रिअल डेमो देताना बघितलय.
त्याच्या कडे बघताना वाटतं, इझ्झी प्रकार आहे. पण तसं बाकी साध्या बाबतीत पण मला वाटतच असतं (वेगळ्या प्रकारचं सोलाण, किसणी इ. ते दाखवतात तेव्हा क्काय सोप्प आहे करणं असच वाटतं मला)
तसही तव्यावर थोड्या सरावाने बेश्ट फुलके होतात असं माझं मत आहे.
माहितीबद्दल ऑनेक धोन्नोबाद !
माहितीबद्दल ऑनेक धोन्नोबाद !
महेश, मी बरीच वर्षे वापरलाय
महेश, मी बरीच वर्षे वापरलाय तो. तंत्र जमायला वेळ लागतो. पिठ जरा सैल भिजवावे लागते. गोळा थेट मधे न ठेवता हँडल जवळ ठेवावा लागतो. झाकण लावताना, नेमका दाब आणि वेळ साधावे लागते. जाहिरातीत दाखवतात तशा चपात्या फुलतदेखील असत. पण खाताना काहीतरी कमी जाणवायचे. मग परत गॅसवर भाजून घेत असे. नंतर तो उत्साह राहिला नाही.
महेश, आमचा रोटीमेकर घेऊन जा.
महेश, आमचा रोटीमेकर घेऊन जा. माळ्यावरच पडलाय.
पूनम, फुलक्याची कणीक जरा घट्टसर भिजवून घे आणि तव्यावरून फुलका काढलास की त्यातली वाफ पूर्ण गेल्यावर मग त्याला तुपाचा एक हलकासा हात लाव. वाफ जायच्या आधीत तेल अथवा तूप लावलं तर फुलके वातड होतात असा माझा अनुभव
वातड व्हायचं कारण वेगळं असेल
वातड व्हायचं कारण वेगळं असेल नंदिनी, मी कणीक मिडीयम सैल भिजवते. वाफ जायच्या आधी तेल तुप लावते कधी कधी म्हणजे फुलका झाल्या झाल्याही पण नाही होत वातड. फक्त वाफ जायच्या आधीच डब्यात एकावर एक तशाच टाकत गेले तर सगळ्यात खालचा फुलका ओलसर होतो आणि डब्याच्या तळाला वाफ लागून ओलसर होतो तो ही. म्हणून आता कपड्यावर ठेवून दुसरा/तिसरा फुलका झाल्यावर मग पहिला उचलून डब्यात ठेवते
खरच रोटी मेकर इतका बाद आहे
खरच रोटी मेकर इतका बाद आहे का? मध्ये टिळक स्मारकला प्रदर्शन लागले होते, खरच ती लोक करताना खूपच सोपे वाटते. सध्या कॉलेजला desertation चे काम आहे. मार्च पर्यन्त खूप काम असणार आहे. मी सुद्धा रोटी मेकर घ्यायचा विचार करते आहे. संध्याकाळी घरी आल्यावर पोळ्या करायची खूप कंटाळा येतो.
दक्षिणेत असल्याने इकडच्या
दक्षिणेत असल्याने इकडच्या लोकांप्रमाणे रोज घरी भाताय तस्मै नमः आणि मग स्वाहा
कंटाळा आला की बाहेर एखाद्या उत्तरेकडे थाळी, पण त्याला घरी बनवतात त्या पोळीची सर नसते.
आपणा सर्वांचे अनुभव ऐकून रोटीमेकर आयडियेला सद्ध्या तरी टाटा !
फुलके डब्यात ठेवायच्या आधी
फुलके डब्यात ठेवायच्या आधी डब्यात, गरम भांडे ठेवायची स्टीलची जाळी असते ती ठेवायची. ( हवे तर त्याखाली फडके ठेवायचे ) म्हणजे तळाचा फुलका वाफेने ओला होत नाही.
पिन्कि ८०, चांगला नॉन स्टीक तवा असेल तर पॅनकेक्स हा चपाती / पोळ्यांना चांगला पर्याय आहे. माझे हल्ली तेच चाललेले असते. त्यात पिठाचे हवे तसे मिश्रण घ्यायचे. पण निदान अर्धी कणीक किंवा मैदा घालायचा.
त्याला घरी बनवतात त्या पोळीची
त्याला घरी बनवतात त्या पोळीची सर नसते.
>> रोटीमेकरमधल्या पोळीला पण ती सर नसतेच. घरी बनवलेल्या घडीच्या पोळीला कशाचीच सर नसते
नंदिनी +१
नंदिनी +१
दिनेशदा पॅनकेक ची आयडिया
दिनेशदा पॅनकेक ची आयडिया झेपली नाही थोडी डीटेल सांगाल क? मध्यंतरी मी पुरी प्रेसच्या मशीनने तव्यावर छोट्या छोट्या पुरी येवढ्या पोळ्या फुलका स्टाइलने करत होते पण पोळी खाल्ल्याचे समाधान नाही होत.
दोन कप मैदा वा कणीक + एक
दोन कप मैदा वा कणीक + एक टेबलस्पून तेल आणि थोडे मीठ असे सगळे एकत्र भिजवायचे. बासुंदीसारखे दाट भिजवायचे. तवा तापत ठेवून त्यात जरा वरुन हे मिश्रण गोलाकार ओतायचे. पातळसरच हवे. नॉन स्टिक असेल तर पहिल्या पॅनकेकला तेल लावावे लागते. नंतर नाही लागत. याला जाळी पडत नाही कि तो फुगत नाही. दोन्ही बाजूने चपाती भाजतो तितपत भाजायचे.
यात अंडे फोडून टाकले तर फ्रँकीसारखा रोल करता येईल. मसालेदार करायचे तर थोडे बेसन, हिंग, हळद, मिरची टाकायचे. कांदा / टोमॅटोही ही टाकता येईल.
कितपत पातळ भिजवायचे याचा अंदाज आला, तर पटापट होतात. मुख्य म्हणजे चपातीपेक्षा खुपच कमी श्रम लागतात.
अगदी चपातीला रिप्लेसमेंट नाही पण श्रम वाचतात हे मला महत्वाचे वाटते.
>>फुलके डब्यात ठेवायच्या आधी
>>फुलके डब्यात ठेवायच्या आधी डब्यात, गरम भांडे ठेवायची स्टीलची जाळी असते ती ठेवायची.<<
दिनेशदा, आमच्याकडे दुधावर झाकायची भोकांची ताटली उलटी (कॉन्व्हेक्स बाजू वर) अशी डब्यात तळाशी ठेवून त्यावर फडके असते. पोळ्या फडक्यात गुंडाळल्या की थोड्या(च) मॉइस्ट रहातात, अन जाळीदार ताटलीने खालचीही पोळी सर्दावत नाही.
मी रोटीमेकर भाकरी किंवा पराठे
मी रोटीमेकर भाकरी किंवा पराठे लाटायला वापरते. ( परत नीट तव्यावर भाजते )
ज्यांना भाकरी आवडतात पण आजिबात जमत नाहीत त्यांनी, ज्वारीच्या ( किंवा तांदळाच्या ) पीठाची उकड काढून घ्यावी आणि रोटीमेकर मध्ये भाकरी करावी, फार मस्त होते.
दिनेशदा, आपण दिलेल्या
दिनेशदा,
आपण दिलेल्या कणिकेच्या पॅन केक ला आपल्या ईथे म्हणजे साऊथ मध्ये गोदंब ( गोधंब) दोसा म्हणतात.
गोदंब म्हणजे गव्हाचे पीठ !! आपल्या धीरड्या प्रमाणेच !!
हो इब्लिस, फुलक्यांच्या खाली
हो इब्लिस, फुलक्यांच्या खाली थोडी हवा खेळती राहिली पाहिजे.
मागे एका लेखात वाचले होते. इंदुरात चपातीचा डबा वापरात नसतोच. जेवायला बसल्यावर गॅसवरुन थेट ताटात
फुलका पडला पाहिजे. बायकादेखील असाच थेट ताटात फुलका घेतात आणि मगच जेवायला बसतात !
डँबिस, मी आंध्रामधे पण हा प्रकार बघितलाय. ते ताकात कणीक भिजवतात. छान लागतो तो प्रकार.
flower parathe kartana meeth
flower parathe kartana meeth ghatlyanantar pani sutat ani parathe latatana futatat. Aloo parathyansarkhe flower ukadun ghevun parathe karta yetil kay?
फ्लॉवर पराठा करायचा असेल तर
फ्लॉवर पराठा करायचा असेल तर फ्लॉवर साधारण सात आठ तास बाहेर काढून ठेवायचा. ( म्हणजे फ्रीज मधे ठेवला असेल तर.) एका वेळी एका पराठ्याला लागेल इतकाच फ्लॉवर किसायचा आणी त्यात कोथिंबीर्,तिखट, मीठ, चाट मसाला, धणे जिरे पूड, बारीक चिरलेली हिरवी मिरची लागेल तसं घालून लगेच पराठा लाटायचा.
फ्लॉवर परतून सुद्धा ह्या पराठ्याचं स्टफिंग करता येतं. आहे ईथेच माबो वर कॄती. देते लिंक शोधून.
http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/46776.html?1181734768
thank you prady
thank you prady
आमची यावेळची कणीक भारी चिकट
आमची यावेळची कणीक भारी चिकट आहे. पोळ्या लाटताना चिकटत्ताय्त. उंडा करतानापण हाताला चिक्क्ट लागत्ये. काय करु?
ऱोटी मेकर
ऱोटी मेकर https://www.youtube.com/watch?v=EsfccHgWDb0
Pages