नमस्कार!
खूप दिवसांनी (खरंतर महिन्यांनी) मायबोली वर लिहीत आहे, त्यामुळे बिचकायला होतंय, सांभाळून घ्या प्लीज!
काही दिवसांपूर्वी थँक्सगिव्हींग च्या सुट्ट्या होत्या, तेव्हा अमेरिकेतल्या साऊथवेस्ट भागातली तीन नॅशनल पार्क्स बघण्याचं ठरवलं आणि प्रवास लास वेगास पासून चालू केला. पहिला टप्पा म्हणजे ग्रँड कॅन्यॉन ! ह्याबद्दल खूप गोष्टी ऐकल्या होत्या आणि अपेक्षेप्रमाणेच कॅन्यॉन अतिप्रचंड होती.
प्र.चि. १ - ग्रँड कॅन्यॉन - साऊथ रिम
सूर्योदय पहायला गेलो तर पहाटे असले ३ एल्क लॉजच्या मागे निवांत चरत उभे होते!
प्र.चि. २ - ग्रँड कॅन्यॉन - एल्क
ग्रँड कॅन्यॉन हे खूप प्रसिद्ध ठिकाण आहे त्यामुळे ह्याचे फोटो मायबोली वर आधीच येऊन गेले असतीलही. तरीही हा अजून एका ठिकाणचा, जिथे ग्रँड कॅन्यॉन संपून अॅरिझोनाचं वाळवंट चालू होतं. ह्याला 'डेझर्ट व्यू' असं नाव आहे.
प्र.चि. ३ - ग्रँड कॅन्यॉन - डेझर्ट व्यू
'डेझर्ट व्यू'ला एक मनोरा बांधला आहे आणि आतमध्ये भिंतीवर पूर्वीच्या आदिवासी स्टाईलमध्ये भित्तीचित्रं वगैरे चितारली आहेत. शिवाय काही जुन्या (जुनाट आणि भंगार दिसणार्या) खूर्च्या अगदी जपून ठेवल्या आहेत.
प्र.चि. ४ - ग्रँड कॅन्यॉन - डेझर्ट व्यू टॉवर
ह्यानंतर वाटेत जाताना भुकेपोटी चुकून ट्युबा सिटी ला गेलो. हे गाव 'नावाहो नेशन' (Navajo Nation) मध्ये येतं. अजूनही ह्या नावाहो नेशन मध्ये प्रामुख्यानं 'नेटीव्ह अमेरिकन' जमातींमधले लोक राहतात. त्यामुळे तिथे अमेरिकेत इतरत्र असणारी सुबत्ता अचानक कुठे गायब झाली असं वाटून गेलं.
प्र.चि. ५ - अॅरिझोना मधून युटा मध्ये जाताना
पुढे 'ब्राईस कॅन्यॉन नॅशनल पार्क' ला पोहोचलो, तर हे 'हूडू' ('Hoo-doo's) आमची कधीपासून वाट बघत उभे होते (कित्येक मिलियन वर्षं!). ब्राईस नावाच्या माणसानं हे पाहिलं आणि तो म्हटला , 'One hell of a place to lose a cow!'
प्र.चि. ६ - ब्राईस कॅन्यॉन - 'हूडू'ज - (amphitheater rocks)
हूडूजच्या मधे जाण्यासाठी डोंगरातून एक मजेदार पायवाट केली होती!
प्र.चि. ७ - ब्राईस कॅन्यॉन - 'हूडू'ज - (amphitheater rocks)
मागे दिसत होता दक्षिण- युटा (Southern Utah) चा विस्तीर्ण डोंगराळ प्रदेश!
प्र.चि. ८ - दक्षिण- युटा (Southern Utah)
त्या रात्री तिथेच राहिलो आणि सकाळी पुन्हा बाहेर पडलो.
प्र.चि. ९ - ब्राईस कॅन्यॉन - नॅचरल ब्रिज
जाताना पुन्हा एकदा पाहिल्याशिवाय राहवेना!
प्र.चि. १० - ब्राईस कॅन्यॉन - 'हूडू'ज - (amphitheater rocks)
त्याच दुपारी झायॉन नॅशनल पार्क ला गेलो आणि काही समजायच्या आत डोळे विस्फारून पाहू लागलो!
प्र.चि. ११ - झायॉन नॅ.पा.
प्र.चि. १२ - झायॉन नॅ.पा.
प्र.चि. १३ - झायॉन नॅ.पा.
प्र.चि. १३ - झायॉन नॅ.पा.
नंतर परतीच्या वाटेवर....
प्र.चि. १४ - परतीच्या वाटेवर - नेवाडा
एक गमतीशीर पाटी!! - तुका खान किंवा तू-का खान?
प्र.चि. १५ - लास वेगास च्या रस्त्यावर गमतीशीर पाटी!
तुम्हाला सगळी प्रकाशचित्रं कशी वाटली ते सांगायला विसरू नका!!!
धन्यवाद!
अफाट आहेत प्रचि.. मस्तच
अफाट आहेत प्रचि.. मस्तच
जबर्या प्रचि !
जबर्या प्रचि !
भव्यता सही टिपलेय अगदी...
भव्यता सही टिपलेय अगदी...:)
अफाट !
अफाट !
मस्त !!
मस्त !!
वॉव मस्तच !! ब्राईस आणि Xion
वॉव मस्तच !!
ब्राईस आणि Xion चे फोटो मस्त आलेत !
सुपर्ब!!! ब्राईस एकदम खल्लास!
सुपर्ब!!! ब्राईस एकदम खल्लास!
खूप छान प्रचि! काही
खूप छान प्रचि! काही वर्षांपूर्वी आम्हीही गेलो होतो, त्याची आठवण झाली. वेगवेगळ्या दिशांतून वेगवेगळी मनोहारी रूपे दिसतात ग्रँड कॅनियनची. तिथे ट्रेकिंग करायची इच्छा मात्र अजूनही आहे.
छान आहेत
छान आहेत
अथांग पसरलेला, नजरेत न भरणारा
अथांग पसरलेला, नजरेत न भरणारा निसर्ग फोटो बघून अस होतंय प्रत्यक्षात तुझं काय काय झालं असेल रे
सही...डोळे विस्फारले हे
सही...डोळे विस्फारले हे पाहुन!!
अती भव्य धन्यवाद या सफरीसाठी
अती भव्य
धन्यवाद या सफरीसाठी
मस्त प्रचि!!!
मस्त प्रचि!!!
मस्तच.. आमचे ब्राइस आणि झायॉन
मस्तच.. आमचे ब्राइस आणि झायॉन राहून गेले. युटाह मधलेच कॅनियनलँडस आणि आर्चेस नॅ. पा. (http://www.maayboli.com/node/8868) पण खूप मस्त आहेत. परत संधी मिळाली तर ते चुकवू नका
मस्त फोटो, सगळ्याचे डेक्स्टॉप
मस्त फोटो, सगळ्याचे डेक्स्टॉप करावेसे वाटताहेत !
वॉव मस्तच !! सगळी प्र.चि.
वॉव मस्तच !!
सगळी प्र.चि. आवडली.
वा, अति सुरेख आहेत सर्वच
वा, अति सुरेख आहेत सर्वच प्रचि... मस्त भव्यदिव्य दिसत आहेत नैसर्गिक देखावे..!!!
ग्रॅण्ड कॅनियन ची सफर त्या सहा सीटर प्लेनमधून केली कि नाही???
या प्लेन च्या खिडक्या चक्क उघड्याच असतात. वजनाप्रमाणे बॅलंस करून लोकांना स्थानापन्न केले जाते.. थरारक अनुभव!!!!
जबरदस्त.. . .वुडु चे आतले
जबरदस्त..
.
.वुडु चे आतले फोटो नाही काढलेत ??????
अतिशय सुरेख छायाचित्र. केदार
अतिशय सुरेख छायाचित्र. केदार सारखेच मलाही वाटले. मी फक्त ग्रॅन्ड कॅनियॉन पाहिला आहे. ब्राईसबद्दल पहिल्यांदाच ऐकले आहे. किती लांब आहे ब्राईस .. ग्रॅन्डपासून?
सर्वच प्रचि खूपच छान !!! *
सर्वच प्रचि खूपच छान !!!
* काही प्र चि तुमच्या आय डी शी साधर्म्य साधताहेत.
अफाट
अफाट
अतीशय भव्य आणी डोळ्याचे पारणे
अतीशय भव्य आणी डोळ्याचे पारणे न फेडणारे चित्र ( खरच पारण फिटत नाही ). तुम्हाला लाखो धन्यवाद अश्या सफरीबद्दल. तिथे राहीलेले आणी रहाणारे लोक किती भाग्यवान असतील/ आहेत.
एकच प्रतिक्रीया.. OMG !
एकच प्रतिक्रीया.. OMG ! सॉल्लिड एकदम !
जबरी .. हे फोटु बघुन आता
जबरी ..
हे फोटु बघुन आता तिथे जावस वाटतय
जबरदस्त!!!! घरबसल्या ग्रँड
जबरदस्त!!!! घरबसल्या ग्रँड कॅनन्सच्या दर्शनाबद्दल धन्यवाद.
फोटु मस्तच !!
फोटु मस्तच !!
छान!
छान!
मस्त! अजुन थोडि माहिति देणार
मस्त! अजुन थोडि माहिति देणार का, जायला कुठला सिझन चांगला? राहायला चांगलि जागा कुठे ?किति आधिपासुन बुकिंग केले होते? पुढ्च्या वर्षि जायच्या विचारात आहे म्हणुन माहिति हवि होति.
दैत्य, अप्रतिम फोटो! या
दैत्य, अप्रतिम फोटो!
या फोटोंमुळे मेमरी बुक रिवाईंड झाले. आम्ही काही वर्षांपूर्वी, फेब्रुवारीत गेलो होतो, तेव्हा या 'हुडूंच्या' वर स्नो ची पखरण होती. इतके अप्रतिम दिसत होते.
हा सर्व नजारा, वाळूचा असून (दगड नाही) पाऊस, स्नो, वारा व स्नो वितळण्याची प्रक्रिया यांच्या इरोजनमुळे तयार झालाय.
हे Brice Canyon आणि Zion National Park , ग्रॅन्ड कॅनीयन पासून तसं बरंच लांब आहे.
अवांतरः कोणी ग्रॅन्ड कॅनीयन ला येणार असाल तर सांगा. मी अॅरीझोत असते. एक गटग करता येईल.
छान फोटो आहेत.
छान फोटो आहेत.
Pages