Submitted by मिली२०१२ on 4 December, 2012 - 06:24
तुझी अधीर नजर
जेव्हा मला न्याहाळते,
नशा डोळ्यांतली तुझ्या
माझ्या रक्तात भिनते....
तुझ्या श्वासाचा सुगंध
माझ्या मनात दरवळतो,
आपल्या रेशमी स्पर्शाने
धुंद मला तो करतो....
नाव माझं जेव्हा मायेने
तुझ्या ओठावर येतं,
कानोकानी पानोपानी
वाऱ्याचं गीत ऐकू येतं....
हात माझा जेव्हा प्रेमाने
तू हातामध्ये घेतो,
रंग पहाटेचा नारिंगी ,
मन व्यापून टाकतो....
खट्याळपणे मग जेव्हा
तू मिठीत खेचतो,
पाऊस वळवाचा तेव्हा
चिंब धरती भिजवतो!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कविता पद्य न वाटता गद्य
कविता पद्य न वाटता गद्य वाटतेय.
मांडणी अशी बरी वाटेल ना?
तुझी अधीर नजर
जेव्हा मला न्याहाळते,
नशा डोळ्यांतली तुझ्या
माझ्या रक्तात भिनते
तुझ्या श्वासाचा सुगंध
माझ्या मनात दरवळतो,
आपल्या रेशमी स्पर्शाने
धुंद मला तो करतो....
माझं नाव जेव्हा मायेने
तुझ्या ओठावर येतं,
कानोकानी पानोपानी
वाऱ्याचं गीत ऐकू येतं....
माझा हात जेव्हा प्रेमाने
तू हातामध्ये घेतो,
रंग पहाटेचा नारिंगी ,
मन व्यापून टाकतो....
खट्याळपणे मग जेव्हा
मला तू मिठीत खेचतो,
वळवाचा पाऊस तेव्हा
चिंब धरती भिजवतो....!
??
तू हातामध्ये घेतो,
मला तू मिठीत खेचतो,
>>> घेतोस, खेचतोस असं हवंय. पण मग यमक गंडेल.
कवितेतल्या भावना नाजुक, गोड आहेत. पुन्हा नव्याने प्रयत्न करून बघा. अजून छान जमेल.
पुलेशु.
निंबू + १ पुलेशु
निंबू + १
पुलेशु
निम्बुडा, धन्यवाद, आपल्या
निम्बुडा,
धन्यवाद, आपल्या उचित व शीघ्र प्रतिसादाबद्दल !
तुम्ही सुचवलेले बदल इतके समर्पक आहेत की मी ते लगेच अमलांत आणले आहेत......
अश्या प्रतिक्रियेने लिहिणाऱ्यालाही हुरूप येतो.....
पुनश्च धन्यवाद ! !